Skip to main content

गंधवार्ता

लेखक गंगाधर मुटे यांनी सोमवार, 11/10/2010 08:16 या दिवशी प्रकाशित केले.

गंधवार्ता

दोर गळ्यात लटकवून
बाप झुलतोय झाडावर
माय निपचित पडलीय
हृदय फाटता धरतीवर

बाळ खिदळतंय मनीसंगे
मिशा तिच्या धरता-धरता
नाही जराही त्याला
कसलीsssचं गंधवार्ता
.
.
.
.
.
गंगाधर मुटे
...................................

काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2393
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

शब्दांची कित्ती रुपे..
टिपतात भावनांचे विविध क्षण,
कधी खेळते हसु ओठांवर,
अन कधी आगतिक विषण्ण मन !

-अथांग.