मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(गावात प्लेग)

अर्धवट · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
सार्‍या उदास वाटा, कापीत चाललो मी होउन मूषक काळा, शापीत चाललो मी नाले गटारे अनेक, सुगंधी या पथाने, ओल्या ओघळांत काही, हुंगीत चाललो मी वस्ती उठून गेली, ओसाड ती कवाडे, तो घास नासलेला, शोधीत चाललो मी, काखेत एक गाठ, आक्रोश आणि टाहो, मृत्यो तुझ्या तमाच्या धुंदीत चाललो मी. पसरला प्लेगपाश, दूषीत आसमंत, प्रतिशोध मानवाचा भेदीत चाललो मी. ( खूप दिवसांनी एकाच कवितेवर विडंबने पडताना पाहिली आणी रहावलं नाही.. खुप दिवस काहीच लिहायला वेळ मिळाला नाही म्हणुन जरा हात आणी कळफलक साफ करून घेतोय.. )

वाचने 3355 वाचनखूण प्रतिक्रिया 14

In reply to by मेघवेडा

गणेशा गुरुवार, 10/14/2010 - 19:57
रिप्लाय केला तरी रिप्लाय प्रकाशीत होत नव्हता. २ दा पुन्हा कील केले तरी तीच बोंब शेवटी सोडुन दिले तर सगळ्या क्लिक ला रिप्लाय पडले होते इकडे . बरे झाले रिप्लाय प्रकाशीत होइ पर्यंत क्लिक केले नाही. नाहीतर हिंदी मालीकांचे असंख्य भाग आले असते येथे असे वाटले असते

चेतन गुरुवार, 10/14/2010 - 14:27
विडंबन ठीक (पहिल्या कडव्यात अडखळायला होतयं असं वाटलं)

धमाल मुलगा गुरुवार, 10/14/2010 - 20:07
उत्तम आहे.. तुम्ही उत घाला म्हणजे आम्हाला मात घालायला वाव मिळेल. -धमाल रँड.

विसोबा खेचर गुरुवार, 10/14/2010 - 20:26
शी...! :) तात्या. -- तात्या-धर्मेन्द्र भेट हा लेख मिपावर लौकरच! :)