शापीत मेघ

गणेशा's picture
गणेशा in जे न देखे रवी...
12 Oct 2010 - 3:21 pm

सार्या उदास वाटा कापीत चाललो मी,
होऊन मेघ काळा शापीत चाललो मी

झाले उन्हाळे अनेक, ओसाड उदास राने
ओल्या अधीर धारा कुरवाळीत चाललो मी

श्रुंगार झडून गेला, गर्भगळीत निस्तेज वृक्ष
पानगळीत श्वास गुंतलेला शोधीत चाललो मी

झाले आप्त ही परके, उदास विराण घरटे
दाहक अंतरातला दूरावा तोडीत चाललो मी

पसरला गहिरा अंधार, झाकोळला आसमंत
दिशाहीन प्रवासात वाहवत चाललो मी

------ गणेशा

करुणकविता

प्रतिक्रिया

नेहमी आनंदी's picture

12 Oct 2010 - 4:21 pm | नेहमी आनंदी

सार्या उदास वाटा कापीत चाललो मी,
होऊन मेघ काळा शापीत चाललो मी

हेच खुप आवडल..

मदनबाण's picture

12 Oct 2010 - 7:05 pm | मदनबाण

वा.. :)

नगरीनिरंजन's picture

12 Oct 2010 - 7:09 pm | नगरीनिरंजन

>>सार्या उदास वाटा कापीत चाललो मी,
>>होऊन मेघ काळा शापीत चाललो मी

छान ओळी. थोडं शुद्धलेखनाकडे लक्ष दिलंत तर दाताखाली खडा आल्यासारखं होणार नाही.

तर्री's picture

13 Oct 2010 - 1:46 am | तर्री

का महीती नाही पण "तपत्या झळा ऊन्हाच्या " चालीमध्ये वाचताना अडखळलो , परत मुक्त छंदासारखी वाचली तर आवडली. शेवटाचे कडव्यात "पंच" निसटता आलाय.आशय विशेष आवडला.

गणेशा's picture

13 Oct 2010 - 4:20 pm | गणेशा

या कवितेचा पहिला मतला सोडला तर काहीही व्रुत्ता मध्ये नाही आहे.
त्यामुळे ही गेय कविता होउ शकत नाहीये.

तुमच्या सर्वांच्या प्रोत्साहन पर रिप्लायाबद्दल आभार

शुद्धलेखनाकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करतो नक्की.

पाषाणभेद's picture

13 Oct 2010 - 8:57 pm | पाषाणभेद

मस्त गझल आहे