Skip to main content

गंधवार्ता

लेखक गंगाधर मुटे यांनी सोमवार, 11/10/2010 08:16 या दिवशी प्रकाशित केले.
गंधवार्ता दोर गळ्यात लटकवून बाप झुलतोय झाडावर माय निपचित पडलीय हृदय फाटता धरतीवर बाळ खिदळतंय मनीसंगे मिशा तिच्या धरता-धरता नाही जराही त्याला कसलीsssचं गंधवार्ता . . . . . गंगाधर मुटे ...................................
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2360
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

विदारक कविता आहे. मुटेसाहेबांच्या कविता खरोखरच वाचनीय असतात.

शब्दांची कित्ती रुपे.. टिपतात भावनांचे विविध क्षण, कधी खेळते हसु ओठांवर, अन कधी आगतिक विषण्ण मन ! -अथांग.

आभारी आहे मित्रांनो.