Skip to main content

(शापीत मेघ ) ...

लेखक गणेशा यांनी बुधवार, 13/10/2010 20:59 या दिवशी प्रकाशित केले.
आदिती आणि अडगळ यांच्या प्रेरणेने. सारे बोबाट शब्द, फेकीत चाललो मी सोडुन सार्या वाटा, का पीत चाललो मी ? रिचवुनी अनेक प्याले, रातीचे ओसाड नाले अडखळीत का असेना, धुंदित चाललो मी रात्रीत विरले दु:ख, सरलेली सारी स्वप्न झुगारुन लक्ख नभास , ऐटीत चाललो मी झाले आप्त ही परके, रक्तबंध विस्कटलेले नजरेच्या तप्त ज्वाला, सोशीत चाललो मी डागाळलेला चंद्र उरी, नभास का खंत आहे आपुलेच खोटे नाणे, घाशीत चाललो मी
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1494
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

आपल्याच कवितेच विडंबन! पण जमलंय. फक्त एकच वाटलं, शेवटचे २ शेर विडंबन नाहीत. ती एका स्वतंत्र गजलची सुरुवात आहे.

In reply to by पैसा

पैसा ताई गझल नाहीये वरील .. कारण अक्षरवृत्त . गणवृत्त (लघु -गुरु) सम्थींग काही पाळले नाहीयेत. पण तरीही स्वतंत्र गझलची सुरुवात हे चुकीचे वाटते आहे. --------- कविता आणि गझल मधील मुळ फरक हा आहे की गझल मध्ये प्रत्येक २ ओळींचा शेर हा स्वतंत्र कविता असतो .. आणि कविता मध्ये प्रत्येक कडवे हे कवितेचा मुळ गाबह विस्तारीत नेत असते. असो आणि मतला आणि शेर वेगळा असतो . म्हण्जे मतला मध्ये दोन्ही ओळीत रदिफ , काफिला असते उदा. -- शापीत चाललो मी -- कापीत चाललो मी पण शेरा मधेय फक्त दूसर्या ओळीत रदिफ , काफिला असते. -------- असो गझल चा अभ्यास केला आहे. पण ती लिहायला लागणारी प्रतिभा आपल्याकदे नाही .. त्यामुळे कवातरी त्या फॉरमॅट मध्ये लिहुन तलप भागवतो ..