Skip to main content

(शापीत मेघ)

लेखक अडगळ यांनी बुधवार, 13/10/2010 19:54 या दिवशी प्रकाशित केले.
आमचीही प्रेरणा http://www.misalpav.com/node/14884 पाकिट , पर्स , चेना ढापीत चाललो मी, लवते न तोच पाते, कापीत चाललो मी, वाणी विमा विजेची , सारी बिले मिळाली, हिरवा वसंत कोठे? शोधीत चाललो मी. पाकीट का म्हणावे , "हैदोस" भावनांचा, पत्रे पुराणी पिवळी , वाचीत चाललो मी, बघतो अनंत कप्पे , ना नोट , नाही नाणे, घाला चुलीत ह्याला, काशीत चाललो मी, पेठांत या पुण्याच्या ना राहिली खुमारी, औंधात हात मारु, घोकीत चाललो मी.
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2524
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

छान विडंबन. हैदोस शब्दाला टाकलेलं अवतरण पाहून काय झालं ते इथं सांगत नाही.

In reply to by श्रावण मोडक

या शब्दाला पण अवतरणात टाकावं का असा विचार चमकून गेला. मेडिकल स्टोअरवाला (अडगळ)

एका उपेक्षित पाकिटमाराच्या भावना काय नेमक्या व्यक्त केल्यात! कोणाच्या खिशावर हात साफ केला आणि क्रेडिट कार्डाऐवजी नोटा मिळाल्या असं वाटलं.

>>पेठांत या पुण्याच्या ना राहिली खुमारी >>औंधात हात मारु, घोकीत चाललो मी. लै खास!