Skip to main content

आज या कातरवेळी तिची आठवण का होतेय?

आज या कातरवेळी तिची आठवण का होतेय?

Published on शुक्रवार, 15/10/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
तो दिनकर तिकडे जसजसा बुडत चालला आहे अन् माझा आठवणींचा डोह घुसळला जात आहे पलीकडे एक सुंदर पहाट फुलणार आहे इकडे माझ्या आयुष्याची वाट हरवली आहे इतके दिवस या आठवणी दडपून टाकल्या होत्या मग आजच का या पुन्हा आठवू पाहात आहेत? उद्या काहीतरी घडणार आहे का? माझ्या प्रिय व्यक्तीला काही होणार तर नसेल ना? देवा, तिला नेहमी आनंदात ठेव काढत नसेल माझी आठवण तरी सुखात ठेव माझ्या आठवांच्या लहरी तिच्यापर्यंत पोहोचू नको देऊस मन माझे रडले तरी तिला ऐकू नको येऊ देऊस विसरून गेली मला तरी सुद्धा चालेल पण भेट जर कधी झाली तर ओळख मात्र दाखव -स्वप्निल
काव्यरस

याद्या 1683
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

मनातील खळबळ समजतेय, आणि 'सुन्दर पहाट' किंवा 'आयुष्याची वाट' असे सुरेख शब्दप्रयोगही आहेत,पण थोडी विस्कळीत वाटली कविता. मुक्तछंदात वाचायचा पण प्रयत्न केला, परंतु तेवढी भिडली नाही. तो दिनकर तिकडे जसजसा बुडत चालला आहे अन् माझा आठवणींचा डोह घुसळला जात आहे च्या ऐवजी - तो दिनकर तिकडे (जसजसा) लुप्त होतोय, माझा आठवणींचा डोह घुसळत जातोय ! पलिकडे एक सुन्दर पहाट फुलतेय, इकडे माझ्या आयुष्याची वाट हरवतेय ! असं काहीसं लिहीलं तर गेयता येईल, असे मला वाटते.