आमचीही प्रेरणा https://www.misalpav.com/node/14884
पाकिट , पर्स , चेना ढापीत चाललो मी,
लवते न तोच पाते, कापीत चाललो मी,
वाणी विमा विजेची , सारी बिले मिळाली,
हिरवा वसंत कोठे? शोधीत चाललो मी.
पाकीट का म्हणावे , "हैदोस" भावनांचा,
पत्रे पुराणी पिवळी , वाचीत चाललो मी,
बघतो अनंत कप्पे , ना नोट , नाही नाणे,
घाला चुलीत ह्याला, काशीत चाललो मी,
पेठांत या पुण्याच्या ना राहिली खुमारी,
औंधात हात मारु, घोकीत चाललो मी.
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2553
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
आवडले .. वाचुन हसु आले
आवडले .. वाचुन हसु आले
छान...
छान विडंबन. हैदोस शब्दाला टाकलेलं अवतरण पाहून काय झालं ते इथं सांगत नाही.
हॅ हॅ हॅ
In reply to छान... by श्रावण मोडक
हा 'इब्लिस'पणा म्हणायचा की काय? ;)
रंगीन सडक
भा.पो.
In reply to छान... by श्रावण मोडक
आलं लक्षात बरं बेळगावकर. ;)
पाकीट
In reply to छान... by श्रावण मोडक
या शब्दाला पण अवतरणात टाकावं का असा विचार चमकून गेला.
मेडिकल स्टोअरवाला (अडगळ)
लै भारी...वेगळ्या पठाडीतलं..
लै भारी...वेगळ्या पठाडीतलं..
क ड क!
क ड क!
एक लिहु का मी पण परत ?
एक लिहु का मी पण परत ?
होऊन जाऊ दे की! श्रामो: =))
In reply to एक लिहु का मी पण परत ? by गणेशा
होऊन जाऊ दे की!
श्रामो: =)) =))
विडंबन झकासच!
वाहवा
एका उपेक्षित पाकिटमाराच्या भावना काय नेमक्या व्यक्त केल्यात! कोणाच्या खिशावर हात साफ केला आणि क्रेडिट कार्डाऐवजी नोटा मिळाल्या असं वाटलं.
एकदम झकास पयल्या धारंचा माल
एकदम झकास पयल्या धारंचा माल हाय ह्यो
झकास हो अडगळभौ!
(हिरवा वसंतप्रेमी)रंगा ;)
मस्तच!
मस्तच!
मस्त
मजा आला. :) एकदम दर्जेदार विडंबन. अजून येऊ द्यात.
मस्त!!
मस्त!!
लै खास!
>>पेठांत या पुण्याच्या ना राहिली खुमारी
>>औंधात हात मारु, घोकीत चाललो मी.
लै खास!
मस्त
दर्जेदार विडंबन