बैसला फांदीवरी हा चिंब भिजुनी कावळा
मेघांपरी आभाळीच्या, रंग त्याचा सावळा.
तीक्ष्ण त्याची नजर आणि बुद्धी तर तिच्याहुनी,
ना धजे कोणी म्हणाया पक्षी दिसतो बावळा.
व्यर्थ शोधी भक्ष्य अपुले, ना फळेही दृष्टीला
निवडले जे झाड त्याने ते निघावे आवळा?
कर्ण जरी नसती, शिरी...आर्त काही घुमतसे
थांबला जो थेंब नयनी, काक अश्रू सावळा?
या अशा ओल्या दिनी काय भरवावे पिलां
आजही नाही कुणाचा पिंड पुजला राऊळा?
( मीटरमध्ये खूप चुका आहेत. पण बिचा-या कावळ्यावरची बिचारी कविता.. मानून घ्या. :))
==)) ==)) ==))
In reply to ==)) ==)) ==)) by खिलजि
छान.
कहर!! =))
जे बात
पावसाच्या कविता
पावसाचे पुन्हा दमदार पुनरागमन
बारमधील बाटल्या ??
In reply to बारमधील बाटल्या ?? by चामुंडराय
विडंबन झाले तर ठिकच आहे. पण
की गूढ काही डाव...
In reply to की गूढ काही डाव... by चित्रगुप्त
कल्पनेच्या भरारीचे खांब दुमडता येतात :)
दफोराव,निरिक्षण शब्दात छान
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मेरा दिल तेरे लिये धड़कता है... :- Aashiquiमस्तच!! आता वाळत घातलेले कपडे