Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by प्राची अश्विनी on Wed, 07/31/2019 - 12:17
बैसला फांदीवरी हा चिंब भिजुनी कावळा मेघांपरी आभाळीच्या, रंग त्याचा सावळा. तीक्ष्ण त्याची नजर आणि बुद्धी तर तिच्याहुनी, ना धजे कोणी म्हणाया पक्षी दिसतो बावळा. व्यर्थ शोधी भक्ष्य अपुले, ना फळेही दृष्टीला निवडले जे झाड त्याने ते निघावे आवळा? कर्ण जरी नसती, शिरी...आर्त काही घुमतसे थांबला जो थेंब नयनी, काक अश्रू सावळा? या अशा ओल्या दिनी काय भरवावे पिलां आजही नाही कुणाचा पिंड पुजला राऊळा? ( मीटरमध्ये खूप चुका आहेत. पण बिचा-या कावळ्यावरची बिचारी कविता.. मानून घ्या. :))

Submitted by राघव on Wed, 07/31/2019 - 14:26

Permalink

चांगलंय.. पण प्रयोजन समजले

चांगलंय.. पण प्रयोजन समजले नाही. रूपक म्हणून तर नाही ना वापरले असा विचार मनाला चाटून गेला एवढंच! ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by प्राची अश्विनी on Sun, 08/04/2019 - 22:03

In reply to चांगलंय.. पण प्रयोजन समजले by राघव

Permalink

नाही, अगदी सहज.

नाही, अगदी सहज.
  • Log in or register to post comments

Submitted by इरामयी on Wed, 07/31/2019 - 15:11

Permalink

मानली. घेतली.

मानली. घेतली. थोडीशी आवडली. थोडीशी गंडल्यासारखी वाटली. "आवळा" केवळ यमकासाठी टाकल्यासारखा वाटतो. (काव्यनिर्मितीच्या वेळी "यमक" हे जर जाचक बंधन होत असेल तर ते झुगारून द्यायचं. मुक्तछंद सुद्धा छानच वाटतो.) गोळाबेरीजः छान!
  • Log in or register to post comments

Submitted by प्राची अश्विनी on Sun, 08/04/2019 - 22:04

In reply to मानली. घेतली. by इरामयी

Permalink

हो. म्हणूनच आधीच माफी मागितली

हो. म्हणूनच आधीच माफी मागितली.:)
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on Wed, 08/21/2019 - 12:53

Permalink

छान आहे !

छान आहे !
  • Log in or register to post comments

Submitted by प्राची अश्विनी on Fri, 08/23/2019 - 12:06

In reply to छान आहे ! by चौथा कोनाडा

Permalink

धन्यवाद.:)

धन्यवाद.:)
  • Log in or register to post comments

Submitted by गणेशा on Wed, 08/21/2019 - 12:56

Permalink

बैसला फांदीवरी हा चिंब भिजुनी

बैसला फांदीवरी हा चिंब भिजुनी कावळा मेघांपरी आभाळीच्या, रंग त्याचा सावळा. मस्त एकदम
  • Log in or register to post comments

Submitted by प्राची अश्विनी on Fri, 08/23/2019 - 12:05

In reply to बैसला फांदीवरी हा चिंब भिजुनी by गणेशा

Permalink

धन्यवाद!

धन्यवाद!
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 5485 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com