Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Profile picture for user चामुंडराय
Submitted by चामुंडराय on Sun, 06/23/2019 - 06:53
कवी " बी " यांना विनम्र अभिवादन धागा चालेना, धागा पळेना धागा संथ चाली, काही केल्या पेटेना गेलो ट्यार्पीच्या बनी म्हंटली ट्रोलांसवे गाणी आम्ही सुरात सूर मिळवून रे गेलो डू-आयडीच्या बनी डूख धरला मी मनी ट्रोलांसवे गळाले आयडीभान रे चल ये रे, ये रे ट्रोल्या टोचू उचकवू घालु काड्या टाकू पिंका पिंक पोरी पिंक पोरी पिंक हे मिपाचे अंगण अम्हां दिले आहे आंदण ट्रोलिंग करू आपण सर्वजण रे आयडी विषयाचे किडे यांची धाव प्रतिसादाकडे आपण करू शुद्ध "पिंक"पान रे धागा पेटला आला बहरून ट्रोलांनी दिला विषय भरकटून कोण मी - ट्रोल? कोठे डू-आयडी जण रे

Submitted by श्वेता२४ on Sun, 06/23/2019 - 07:17

Permalink

हा हा हा

झकास जमलीय. मस्तच
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Sun, 06/23/2019 - 08:18

Permalink

=))

=))
  • Log in or register to post comments

Submitted by दुर्गविहारी on Sun, 06/23/2019 - 13:05

Permalink

मस्त लिहीले आहे.

मस्त लिहीले आहे.
  • Log in or register to post comments
Profile picture for user जॉनविक्क

Submitted by जॉनविक्क on Sun, 06/23/2019 - 13:15

Permalink

मस्तय

फक्त इतकेच सिमीत राहू नका, अजून विविध विषय हाताळा. आपल्या क्रिएटिव्हिटीला सलाम.
  • Log in or register to post comments

Submitted by जालिम लोशन on Sun, 06/23/2019 - 14:13

Permalink

+1

:-)
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Sun, 06/23/2019 - 18:28

Permalink

समयोचीत

हे मिपाचे अंगण अम्हां दिले आहे आंदण ट्रोलिंग करू आपण सर्वजण रे हेच गेल्या दोन-तीन वर्षांत अनुभवयास येत आहे
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Mon, 06/24/2019 - 00:29

Permalink

=))

=))
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानोबाचे पैजार on Mon, 06/24/2019 - 10:08

Permalink

झकास...

मस्त, झकास लिवले आहे, माझे हे हात शिवशिवत आहेत. डोक्यातले बटाटे शिजायला लागले आहेत. टाकतोच यावर अजून फोडणी, पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

Submitted by इरामयी on Mon, 06/24/2019 - 16:32

Permalink

अगाध!

अगाध!
  • Log in or register to post comments
Profile picture for user चामुंडराय

Submitted by चामुंडराय on गुरुवार, 06/27/2019 - 05:39

Permalink

धागा चालेना, धागा पळेना... दहाच्या पुढे काही जाईना !!

सर्व प्रतिसादकांचे आभार _/\_ धागा चालेना, धागा पळेना दहाच्या पुढे काही जाईना !!
  • Log in or register to post comments

Submitted by महेश जोगलेकर on गुरुवार, 06/27/2019 - 06:53

Permalink

प्रतिक्रिया लिहिता येतात पण मला नवीन धागा च सुरु करीत येत नाहीय

प्रतिक्रिया लिहिता येतात पण मला नवीन धागा च सुरु करीत येत नाहीये ? उजव्या बाजूस "नवीन लेखन" असे शीर्षक दिसतंय त्यावर टिचकी मारल्यानंतर काही तरी लिहिण्याची खिडकी उघडेल असे वाटले होते परंतु तसे ना होता "नवे लेखन" हि यादी समोर येते? कोणी म्हणते मिपा वॉर सध्या काही तरी तांत्रिक अडचण आहे , कारभारी म्हणतात कि "नवीन लेखन" यावर टिचकी मारा दुसरे असे कि समजा परवलीचा शब्द बदलला , इमेल आले कि एक एरर संदेश येतो ! काय कळत नाहीये
  • Log in or register to post comments
Profile picture for user चामुंडराय

Submitted by चामुंडराय on गुरुवार, 06/27/2019 - 07:52

In reply to प्रतिक्रिया लिहिता येतात पण मला नवीन धागा च सुरु करीत येत नाहीय by महेश जोगलेकर

Permalink

नव्या लिखाणावर टिचकी

नव्या लिखाणावर टिचकी मारल्यावर साहित्य प्रकार निवडा आणि लिखाण करा मात्र कृषी आणि प्रश्नोत्तरे साठी ऍक्सेस डिनायीड येतो आहे. काही प्रॉब्लेम आहे का?
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on गुरुवार, 06/27/2019 - 11:24

In reply to प्रतिक्रिया लिहिता येतात पण मला नवीन धागा च सुरु करीत येत नाहीय by महेश जोगलेकर

Permalink

नवीन धागा लिहिण्यासाठी...

मिपावर नवीन धागा लिहिण्यासाठी... १. "लेखन करा" या पर्यायावर क्लिक करा. ("नवीन लेखन" नाही... तो मिपावर नवीनच प्रसिद्ध झालेले लेख दाखवतो.) २. पुढे आलेल्या पानावर धाग्यांच्या प्रकारांची यादी दिसेल, त्यातून हव्या असलेल्या धाग्याच्या प्रकारावर क्लिक करा. ३. त्यानंतर पुढे आलेल्या पानावरील एडिटबॉक्समध्ये धाग्याचा मजकूर लिहा व (असल्यास) चित्रे टाका. चित्रे टाकण्यासाठीची प्रक्रिया येथे सापडेल. ४. लेखाच्या वर असलेल्या, सर्वात वरच्या टेक्स्टबॉक्समध्ये लेखाचे शीर्षक लिहा. ५. लेखाच्या प्रकाराप्रमाणे, (लेखाच्या वर असलेल्या टेक्स्टबॉक्समध्ये) त्याचे वर्गिकरण लिहा किंवा (लेखाच्या खाली असलेल्या टेक्स्टबॉक्समध्ये) त्याचा लेखनप्रकार आणि लेखनविषय निवडा. ६. लेखाच्या खाली असलेला "पूर्वपरिक्षण" पर्याय वापरून तात्पुरत्या प्रसिद्ध होणार्‍या लेखाचे (जो फक्त तुम्हालाच दिसतो) परिक्षण करा. जरूर असल्यास मजकूर/चित्रांत योग्य ते बदल (संपादन) करा आणि परत पूर्वपरिक्षण करा. लेख प्रकाशित करण्याअगोदर, हे तुम्ही कितीही वेळा करू शकता. ७. प्रकाशित केलेल्या लेखात तुम्हाला बदल (संपादन) करता येणार नाही. म्हणून, लेख समाधानकारक झाला आहे अशी खात्री झाल्यावरच "पूर्वपरिक्षण" पर्यायाच्या लगतच असलेला "प्रकाशित करा" हा पर्याय वापरा. विशेष सूचना : अर्धवट लिहिलेला मजकूर साठवण्याची सोय मिपावर नाही. त्यामुळे... १. अनेक बैठकींत लेख लिहित असल्यास, अर्धवट लिहिलेला मजकूर एमएस वर्ड किंवा तत्सम मजकूर (टेक्स्ट) साठविणारे अ‍ॅप्लिकेशन वापरून स्वतंत्रपणे साठवून ठेवा. परत मिपावर आल्यावर तो मजकूर मिपावर कॉपी करून लेखाचा पुढचा मजकूर लिहायला सुरुवात करा. २. किंवा, मजकूर लिहायला दुसरे एखादे सोईस्कर अ‍ॅप्लिकेशन वापरून पूर्ण केलेला लेख मिपावर कॉपी करून तो प्रसिद्ध करा.
  • Log in or register to post comments

Submitted by गड्डा झब्बू on गुरुवार, 06/27/2019 - 13:38

Permalink

भारी.......

>>>आयडी विषयाचे किडे यांची धाव प्रतिसादाकडे आपण करू शुद्ध "पिंक"पान रे>>> +1
  • Log in or register to post comments

Submitted by खिलजि on Sat, 06/29/2019 - 16:19

Permalink

जबराव जबराव जबराव

जबराव जबराव जबराव आवडेश भारी आवडेश
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 11620 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com