मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(काय करून आलो)

नाखु · · जे न देखे रवी...
वाचायला(च) गेलो, लिहून काय आलो? आमंत्रण नव्हते तरी ज्ञान पाजळून आलो .. ना अर्थ आशयाचा बोली.. लावून आलो . कावलेल्या समयी भडास काढून आलो .. होते कोण न कोण बघतोच मी कशाला ? बिना वातीचेच (मुद्दाम) कंदील लावून आलो ? धागे जरी भिकार डोके फिरवून आलो.. जाऊ मुळी न देता संधी साधून आलो . (जालिय विचारवंत आणि सल्लागारांना समर्पित)

वाचने 35243 वाचनखूण प्रतिक्रिया 40

यशोधरा Sat, 06/29/2019 - 18:40
आमंत्रण नव्हते तरी ज्ञान पाळून आलो .
आमंत्रणाविना, तरीही पाजळून ज्ञान आलो.. असं चालेल का? पाजळून च्या ऐवजी मिरवून पण म्हणू शकता!

In reply to by यशोधरा

नाखु Sat, 06/29/2019 - 19:37
हेच लिहीलं होतं पण मोबल्या स्वयंसुधारक मोठ्ठा घोटाळा करुन ठेवतोय. त्याखाली जालिय विचारवंत आणि सल्लागारांना समर्पित ही ओळसुद्धा गंडली खुलासेदार वाचकांची पत्रेवाला नाखु

टर्मीनेटर Mon, 07/01/2019 - 10:59
धागे जरी भिकार डोके फिरवून आलो.. जाऊ मुळी न देता संधी साधून आलो . हे खासच :)

In reply to by प्राची अश्विनी

नाखु Sun, 07/07/2019 - 19:27
किमानपक्षी आपण तरी वैयक्तिक पातळीवर न घेतल्या बद्दल विशेष आभार कुठलाही सल्लागार नसलेला सामान्य मिपाकर वाचकांची पत्रेवाला नाखु

प्रचेतस Wed, 07/03/2019 - 12:44
चाहत्यांच्या जगात तुमच्या स्थाण मागत आलो इतकी रांग पाहून (गुपचुप)नंबर लावून गेलो.

In reply to by सस्नेह

जॉनविक्क Wed, 07/03/2019 - 21:05
बहुतेक मलाच काही त्यांच्या वाक्यांचा संदर्भ लागत नसावा, असो. माझे विधान अथवा प्रतिसाद डिलीट केला तरी चालेल. काही अडचण नाही. :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

जॉनविक्क Sat, 07/06/2019 - 15:33
हे डुप्लिकेट आयडीचे प्रकरण आहे होय, आत्ता लक्षात आलं कि मिपाचालकांची गल्ली कधी का चुकत नसते ते. असो. आपल्या विस्तृत माहितीबद्दल अतिशय धन्यवाद. -/\-

In reply to by जॉनविक्क

(शिक्षण मोड सुरू) हे "डुप्लिकेट आयडी"चे प्रकरण नाही. ते स्वतःच्याच आयडिच्या बदललेल्या नावाने (पक्षी : प्रचेतस) सद्या लिहितात. असा नावबदल केल्यास, जुने नाव (पक्षी : वल्ली) बंद होते. त्यानंतरचे नवे व आयडीचे नाव बदलण्यापूर्वी लिहिलेले, लेख व प्रतिसाद, नवीन नावावर (उदा : प्रचेतस) दिसू लागतात. मिपामालकांना विनंती करून हे करवून घेता येते. एकाच व्यक्तीने, एकाच वेळी दोन आयड्या काढून त्या आलटून-पालटून वापरल्यास (पक्षी : प्रत्येक आयडी वेगवेगळ्या व्यक्ती आहेत असा आभास निर्माण केल्यास), ते डुप्लिकेट आयडी"चे प्रकरण बनते. (शिक्षण मोड बंद) ;) :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

जॉनविक्क Sun, 07/07/2019 - 02:54
हा हा हा... माहितीसाठी धन्यवाद. विषय काय होता आणि कसा संपला :), हे मिसळपाव.कॉम म्हणजे ना खरोखर एक मोठं गहन आहे गहन, याचा पार सामान्याला कधी लागूच शकणार नाही असं वाटतं. रत्न आहे हे अंजावरील. तसेच अफलातुन प्रकरण आहे प्रचेतस उर्फ वल्ली ताईंचे.

In reply to by धर्मराजमुटके

जॉनविक्क Sun, 07/07/2019 - 13:23
भितींवर डोके आपटल्याची स्मायली कल्पावी. मिसळपाव.कॉम एक भुलभुलैय्या आहे हेच खरे. बाकी माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो असे म्हणतात ते उगीच न्हवे ;)

धर्मराजमुटके Wed, 07/03/2019 - 20:39
मी थिंक करत होतो की ही कविता मा. श्री. हार्दिक पंड्या" जी को सादर समर्पित है की कसे :)

राघव गुरुवार, 07/04/2019 - 13:09
हाहाहा.. लय भारी.. मालकानु, आणखी थोडी भर घालायची परवानगी असावी.. --- कसल्या पिंका अन् कसलं काय.. प्रतिसादांचे मातीचे[च] पाय.. हळूच काही काड्या सारून आलो.. फकड्यांची संख्या वाढवून आलो.. आता नादच खुळा त्याचे करायचे काय? आपलेच बूड अन् आपलेच पाय..! ताटातले खरकटे वाढून आलो.. चवीने हाडूक चघळून आलो..!! -- राघव

नाखु Sat, 07/06/2019 - 08:36
कोण कोण आले प्रतिसादा, हळूच पाहण्या आलो!! साक्षात मालकांना पाहून गहिवरलो!! मिपा सदस्य तपाचे पुण्य कामी आलो!! सर्व नववाचकांचे आभार

अभ्या.. Sat, 07/06/2019 - 21:26
बागडण्यास्तव गेलो, कसा बिघडून आलो? अक्षरही न उमगे तरी डेटा जाळून आलो..... . ना गावठी ना शहरी मनाचा आरसा जहरी ओळख पटवण्या स्वतःची स्वतःस माळून आलो.... . घटकेचे प्रवासी सगळे अर्ध्यात उमजून गेलो उरल्या अर्ध्याच्या हिशोबात सरत्या अर्ध्यास विसरुन आलो... . कुणाशी वा, कुणाशी संवाद कुणाशी खुन्नस हे ठरवूनच गेलो, म्यान तलवारी असताही परक्या नथीतून टोचून आलो.. . आता काही न कळेना.. कशासाठी कुठे गेलो? कोण होतास तू, काय झालास तू प्रश्नचिन्ह घेऊन आलो.... . वाह वाह वाह वाह (हेही माझीच)

In reply to by अभ्या..

नाखु Sat, 07/06/2019 - 23:22
दिलखुलास दाद दिली आहे. या निमित्ताने उपस्थित राहिले, वल्लीशेठ आणि अभ्याराजे हे काय कमी आहे. आणि चालकांना धागा दखलपात्र वाटला हे चेरी अॉन केक आनंदित वाचकांची पत्रेवाला नाखु

मदनबाण Sun, 07/07/2019 - 17:49
कच्चा माल चांगला असला कि इथे प्रतिभेची स्पर्धा दिसुन येते. :) अभ्या ने सुद्धा भारी लिवलं हाय !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- #Breathless #ShankarMahadevan #VeenaSrivani