मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

dive aagar

'मिसळपाव' चा गदारोळ

माहितगार ·
नक्कीच, दिलेल्या तीन लिंकमधील माहितीच्या आधारे एक कविता तयार करण्याचा प्रयत्न मी करत आहे. **कविता:** **शीर्षक: 'मिसळपाव' चा गदारोळ** चार भिडू डावे, उजवेही चार, कुंपणाच्या वर, दोन भिडू फार. भिडू भिडतात, त्वेषे परस्परा, मौज ही इतरा, फुकटची जरा. राजकारणाच्या व्यतिरिक्त काही, घडतची नाही, देशात ह्याही. ऐसा आविर्भाव, भिडू बाळगती, आता झाले अती, हौस फिटे किती. अवांछित मजकूर, डोळे फिरवतो, दुर्लक्ष करणे, उपाय ठरतो. मिसळपाव चा रस्ता, वळणावळणाचा, वाद-विवाद, विषय नानाच. बातमी ताजी, चर्चा नवी, मतमतांतरे, इथे दाटली जगी. 'मिसळपाव' चा थाट, न्यारा असा, प्रत्येकाचा आवाज, इथे घुमतो दाही दिशा. पण, हे भिडू,

देशद्रोहींच्या उड्या आणि देशप्रेमींनाच सात्विक संतापाचीही चोरी?

माहितगार ·
देशद्रोहींच्या उड्या आणि देशप्रेमींनाच सात्विक संतापाची चोरी? देशद्रोही दरोडेखोर भारतदेशाचे तुकडे करण्याचे भाषण स्वातंत्र्य मागत उड्या मारत मिरवून घेताना असे कुणि देशद्रोही दरोडेखोर माझा मुलगा मुलगी निघाले तरी उभ्या चितेवर चढवण्याची शिक्षा असावी एवढेही म्हणावयची देशप्रेमींनाच चोरी? देशद्रोहींच्या उड्या आणि देशप्रेमींनाच सात्विक संतापाचीही चोरी? - सात्विक संतत्प्त माहितगार

वसंतात मृगजळ खास

माहितगार ·
काठावरचे गुपित झेलता अनु'मतीची महत्ता विशेष वसंताचे मृगजळ खास कटी बंधात उष्म निश्वास नभी नाभी ताम्र गोल चा'लते जातो तोल आर्त कुंजन आस पास पर्ण विरहीत पुष्प तटी दाट दिंगबर सुरेख मदन पाझरतो . . . . . . . स्वतःच्याच कवितेच्या विडंबनाचा विचार केला आणि कवितेतला(च) मदन अकस्मिक पाझरला. ;)

आङळे वाङळें साहित्य संमेलन

माहितगार ·
आङळे वाङळें साहित्य संमेलन आङळे वाङळेंना म्हणाली मराठी साहित्य संमेलनाला नाही गेलात कसे ते? वाङळें आङळेंना म्हणाला तुमच्या आङळीकेचे साहित्याने अजीर्ण झाल्यावर इतर साहित्याला जागा आता उरलीच कुठे ?

कितीसा पुरोगामी आहेस ?

माहितगार ·
(* कविता जेंडर न्यूट्रल वाचावी) कमिटेड टू हूम कमिटेड टू व्हॉट पुरोगामी पुरोगामी कितीसा पुरोगामी आहेस ? तुझ्यासाठी आपले कुणीच नाही तूला तू त्यांचा आहेस असे वाटते तेही फसवे नसते का ? आपल्यातल्या आपल्यांचा होऊ शकला नाहीस त्यांचाही होऊन रहाणे खरेच जमेल का तूला ? आणि तूही कुणाचाच नाहीस हेच खरे नसते का ? त्यागी आहेस हे बरे आहे एका अर्थाने आपल्या अंगच्या वस्त्रांचाही त्यागकरुन त्या तपस्वी मुनींप्रमाणे जंगलात जाऊन कायमचा एकांतवास अनुभवून पहाशील का ? पूरोगामीत्व निवांतपणे अनुभवण्याचा आणि अनुभवू देण्याचा तो सर्वोत्कृष्ट पुरोगामी मार्ग आहे ना स्वतःस पुरोगामी सिद्ध करण्याचा तोच

(तिखले)

सूड ·
बंद जाहला वाजून वाजून, गजराचे चुकले कठीण दिलीसे नेमून कसरत, ट्रेनरचे चुकले मध्ये उपटला कुठून जन्मदिन, पेस्ट्रीचे चुकले वामकुक्षीला विसावला त्या, खाटेचे चुकले बुडून गेला दुलईमध्ये, झोपेचे चुकले शर्ट दाटला पोटाला अन टेलरचे चुकले तडफडला पण गेला नाही, ट्रेकिंगचे चुकले रांजणापरी उदरी ढकले, माशाचे तिखले... (गजब)

(ती पहा पडली गझल)

सूड ·
ती पहा पडली गझल ती,पिंक पडल्यासारखी दादही मिळते मला का पानठेल्यासारखी!? पावसाचे थेंब..वणवा, काय आणि मी लिहू... वाचकांची जाण मेल्याहून मेल्यासारखी! कोपऱ्यावरती विडंबन काय कोणी टाकते रंगते मैफील तिथली जान आल्यासारखी! हो!जरा साशंक होतो,पोस्ट क्लिकतानाच मी उडवतील का टेर माझी मोरु झाल्यासारखी! काय तो पडला जरासा जीव भांड्यामाजी या प्रतिक्रिया जल्लोष करते,बाद केल्यासारखी -व्रात्यजित

(एक ग्लास त्याचा....)

सतिश गावडे ·
प्रेरणा बसण्याचा हिशोब साचा एक ग्लास त्याचा, एक माझा! दिसायला दोन्ही एकच ब्रँडही सारखाच फक्त चखण्याची रित ज... रा निराळी म्हणूनच.. एक ग्लास त्याचा,एक माझा! माझा आधी संपेल, त्याचा नंतर चालायचंच हे असं जंतरमंतर! अगदी निरंतर.. त्यातूनच घडते जादू शेवटी टेस्टी... लज्जतदार...

गन्धाल्पबलरागीयम् | Gandalf and the Balrog.

बॅटमॅन ·
लॉर्ड ऑफ द रिंग्स पिच्चरची जी ट्रिलजी आहे त्यातील पहिला भाग. प्रसंग तोच आपला नेहमीचा: बुढ्ढा गँडाल्फ आणि समोर तो महाकाय बॅलरॉग. बुढ्ढ्याचे काय होणार या विवंचनेतच सगळे होते. पुढे काय झाले? काही शब्दार्थ अगोदरच दिलेले बरे. गंधाल्प- गँडाल्फ. सगळीकडे फिरूनही स्वतःच्या अफाट ताकदीचा परिचय न दिल्यामुळे अल्प आहे ज्याचा गंध असा तो. बलराग- बॅलरॉग. वामन- बुटका अर्थात ड्वार्फ. अनल्प - एल्फ.

(नाक गळतंय माझं..)

खेडूत ·
प्रेरणा (मूळ कविता, त्यातल्या कल्पना सुरेख आहेत. उगाच टैमपास म्हणून हे विडम्बन. अजून बरे होऊ शकले असते..) नाक गळतंय माझं तसं ते नेहमीच गळतं पण पाऊस आला की येतात जोराच्या दोन चार शिंका अन नाक येते कफही होतो जरासा नाक गळतंय माझं रुमाल ओलागिच्च झालाय केंव्हाचं तुंबलंय वाट पाहतेय निचरा होण्याची हाताशी व्हिक्स आहेच पण विकोरील मिळेना.. जौदे ,निचरेल ...