मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बिभत्स

गाल चोळ फक्त

ज्ञानोबाचे पैजार ·
चड्डी खाली खेचल्या शिवाय मोकळे होता येत नाही पण कधी कधी चड्डी खाली खेचायलाही वेळ मिळत नाही...... निवडुंग ती गेली तरी तीने मागे सोडलेला गंध काही गेला नाही नाकावर दाबुन धरलेल्या रुमालालाही त्याला रोखणे जमले नाही...... निवडुंग तो म्हणाला प्रिये मला डोळ्यात साठवुदे तुझे हे सुंदर रुपडे ती म्हणाली त्या साठी आधि साफ कर तु़झ्या डोळ्यातली चिपडे.......निवडुंग पळायची करु नको घाई, पळायची करु नको घाई, चप्पल हातात घेतली म्हणजे प्रत्येक वेळेला ती मारेलच असे नाही कधी कधी तिची चप्पलही तुटलेली असु शकते....... निवडुंग पैजारबुवा,

मी काय करू??..........

बटाटा चिवडा ·
मी काय करू??.......... तो रिटायरमेंट घेणार आहे म्हणे.. मग मी काय करू?? त्यांचं स्मारक इथं नाही तिथं बांधणार म्हणे मग मी काय करू?? त्याच्या त्या मुव्ही मध्ये ती मर्डरर नाहीये म्हणे मग मी काय करू?? म्हणे तो तर डेंग्यू ने मेलाय मग मी काय करू?? तो म्हणे भारताचा नेक्स्ट पंतप्रधान मग मी काय करू?? आणि तो म्हणे भारताची नवीन WALL मग मी काय करू?? फेसबुक BAN होणार आहे म्हणे मग मी काय करू?? अरे पेट्रोल महाग ..Gas महाग महागाईची भडकलीये आग तसं म्हंटलं तर मी काहीच करू शकत नाही.. कारण ना मी "हृदयसम्राट", ना मी कोणाचा "माही" तुटपुंज्या कमाईत जगतोस रे कसा तू.. अशी कोणीच विचारपूस करत नाही

माणुसकी....

अमितसांगली ·
न मानला धर्म न मानली जात धरली फक्त माणुसकीची कास कारण हीच आहे माझी वाट ... बेभान उधळणाऱ्या पावसाच्या सरींनी नभी आकाशाच्या इंद्रधनुष्य उमटते माय-माउली मातीतून, मादक सुगंध दरवळतो जणू घेऊनी रूप परिसाचे, सृष्टीचे चराचर उजळिते इथे नसे कधी दुजाभाव, न कधी नरपशुंचा भेदभावाचा घाट, बरसावे आपणही कधीतरी यासवे, हाच मनी ध्यास कारण हीच आहे माझी वाट ... करुनी पैशाला श्वास, लाविली संवेदनांची वाट मारुनी ताव फुशारकीचे, समेटले सोंग सज्जनांचे घेऊनी शिक्षण इयत्तांचे, कातडे पांघरले माणुसकीचे, कातड्यालाच या लावावी आग, हाच मनी ठाव, कारण हीच आहे माझी वाट ...

कायच्या काय

ज्ञानोबाचे पैजार ·
बोलु नको काय, तुझे ऐकणार नाय बोलु नको काय, तुझे ऐकणार नाय दादा आज आम्ही बसणार हाय काळ्या काळ्या ओल्डमाँकची आणली आहे बाटली चौकोनाची बाटली पाहुन पोर सारी पेटली पेटलेल्या पोरांना चकणा पुरणार नाय दादा आज आम्ही बसणार हाय दोन पेग पोटी जाता डॉन होती सारे झोपी जाती काही काही मोजतात तारे वकार युनुसचा काही भरवसा नाय दादा आज आम्ही बसणार हाय सकाळी डोके दुखता हवा एक उतारा जमले नाही त्याने तर लिंबुपाणी मारा ऑफीस मात्र उगाच चुकवायचे नाय दादा आज आम्ही बसणार हाय बाटलीधर,

<बद्ध लेखक>

लंबूटांग ·
प्रेरणा इवलं -इवलं ठावं रोज पाडी लेख उत्तरं सोपी कुणा देईचिना आपली ती तंगडी दरवेळी वरती किती पडलो तेही आठवेना टाकतो त्या जिलब्या, ज्ञानाचा देखावा रेग्युलरली जिणे काही झेपेचिना वेळेची ती त्यक्ती कामाचा कंटाळा डेडलाईनी काही केल्या चुकेचिना एकहार्ट पैसा काल रोब मरून सांगतोय काय नक्की कळेचिना अचाट अध्यात्म, पुचाट विचार जगतो ते लिहितो कोणा पटेचिना उपप्रतिसादी ओशट या जिलब्या लेख झाला जुना तरी संपेचिना वाचकाचा खात्मा, बद्ध हा लेखक आपटली डोकी, तरी थांबेचिना

( ढोस देशीही तू, हर दिवशी तू)

नाना चेंगट ·
प्रेरणा - http://misalpav.com/node/22392 ढोस देशीही तू, हर दिवशी तू गुत्त्यात हरेक, असशी परी तू तुझी रंगभूमी, ही सृष्टी जरी बारमधे तू, बारीतही तू ढोसून उठशी, गुत्यातूनी तू तर्राट होशी, लाल होऊन तू मग जोकर विदुषक होशी प्रकार अनेक, डोलकर तू पडता गटारीत, तोल जात रूप रम्य सृष्टीचे, दाखव तू चालत कधी, धप्कन पडून तू कौतूक तुझे, सत्‌ एकची तू दाविशी दिव्य, जरी हे तू दुसरे दिवशी, विसरशी तू नानुडी सांगे, परका न कुणी एकच सगळे जण, मी आणि तू (आमचे परममित्र ... हो तेच ते .. त्यांना समर्पित ;) ) आणि हो, छंद यमक मात्रा आणि त्यांचे गुणगान गाणारे सर्व काही फाट्यावर आधीच मारलेले आहे.

दुष्काळ

शैलेन्द्र ·
कोरड्या विहरीतुन आटलेला दुष्काळ, रस्त्यातल्या पाईपातुन फुटलेला दुष्काळ, गळत्या टँकरमधुन गावकीला तुडवत, सोन्याच्या मोलाने लुटलेला दुष्काळ. पंचायतीत मंजुरीला आलेला दुष्काळ, मंत्रालयातुन पास केलेला दुष्काळ, टक्क्याच्या हिशोबाने चोख वाजवुन, आपापल्या घरी नेलेला दुष्काळ. टग्यांनी बघ्यांचा चोरलेला दुष्काळ, रिकाम्या पोटातुन कोरलेला दुष्काळ, हिरव्या वावरांतुन, पाटाच्या कडेने, भरपाईच्या पाण्याने पेरलेला दुष्काळ. खादीतुन बोलणारा प्रागतीक दुष्काळ, एन्जीओतुन खर्चलेला जागतीक दुष्काळ, भेगाळल्या जमीनीत जळुन मेलेला, लाचार निर्वासीत अगतीक दुष्काळ

जात जात जात

रमताराम ·
जिथे तिथे चहुकडे आम्हा लिहावी लागते जात. जन्म घेतल्याक्षणीच आमच्या मागे लागते जात. जन्म नोंदणी करतेवेळी लिहावी लागते जात. शाळेत दाखल करताना लिहावी लागते जात. फी भरतानाही शाळेत पुन्हा पाहिली जाते जात नोकरीसाठी वणवणताना लिहावी लागते जात. ब्राह्मण, मराठा, महार चांभार असो तुमची जात. नालायकांच्या नालायकीची आधार असते जात. अपयशाला नि न्यूनाला पण लपवून ठेवते जात लायकीला पण बंधन नसते, नसते कुठली जात बढतीसाठी हापिसात रांगा, सांगा पुन्हा जात तुमची आमची रांग वेगळी, वेगळी तुमची जात दहावी, बारावीत बोर्ड सांगतं, वेगळी तुमची जात सैनिकांच्या पलटणीतूनही दिसून येते जात इलेक्शनच्या फडी उतरता, लिहावी लागते ज

रमतारामाची आरती

नाना चेंगट ·
वडिलांची किर्ती गाऊ नये, धर्माच्या फुकाच्या गप्पा मारु नये, सारासार विचार करुन वागावे असा आम्हा रात्रंदिन उपदेश करणार्‍या रमतारामांचे आमच्यावर थोर उपकार आहेत. आम्हास ज्ञान देणारा आम्हाला देवासमान असतो. त्यामुळे रमताराम आमचे देव आहेत. साहजिकच त्यांची आरती करणे अतिशय गरजेचे आहे. आरतीनंतर प्रसाद मिळेल. प्रसादासाठी कोणतीही गडबड करु नये. देव रागवतो. शिस्त ही आवश्यक आहे. चला तर आरती करुया...

प्रार्थना.. आता एकच...

५० फक्त ·
(*परवा एका दवाखान्यात गेलो होतो, एका मित्राला भेटायला, तिथं आयसियुच्या दरवाजाच्या काचेतुन एक आजी दिसल्या,बाजुला कॉटवर आजोबा होते, ते दृश्य डो़ळ्यासमोरुन जात नव्हतं, लेख लिहिणार होतो पण आज प्रार्थना पुन्हा वाचली अन त्यावरच लिहिलं, याला विडंबन किंवा सुडंबन म्हणण्यापेक्षा दु:(ख्)डंबन म्हणावं का ?) कोपरापुढचे हात सुने होत नाहीत, विटत नाहीट, विरत नाहीत, त्रासदायक माणसांची विल्हेवाट कशी लावतात ? बोळकं झालेल्या तोंडात पेज भरवताना दोन चमचे उकळतं पाणि टाकावंसं वाटतं आहे माझी म्हणावी अशी अपेक्षा उरलेली नाही माझे म्हणावे असे ' हे ' पण फार उरले नाही गोळ्या,सुया, सलाईन ह्यांचा वरखर्च रक्त संपत आ