मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दुष्काळ

शैलेन्द्र · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
कोरड्या विहरीतुन आटलेला दुष्काळ, रस्त्यातल्या पाईपातुन फुटलेला दुष्काळ, गळत्या टँकरमधुन गावकीला तुडवत, सोन्याच्या मोलाने लुटलेला दुष्काळ. पंचायतीत मंजुरीला आलेला दुष्काळ, मंत्रालयातुन पास केलेला दुष्काळ, टक्क्याच्या हिशोबाने चोख वाजवुन, आपापल्या घरी नेलेला दुष्काळ. टग्यांनी बघ्यांचा चोरलेला दुष्काळ, रिकाम्या पोटातुन कोरलेला दुष्काळ, हिरव्या वावरांतुन, पाटाच्या कडेने, भरपाईच्या पाण्याने पेरलेला दुष्काळ. खादीतुन बोलणारा प्रागतीक दुष्काळ, एन्जीओतुन खर्चलेला जागतीक दुष्काळ, भेगाळल्या जमीनीत जळुन मेलेला, लाचार निर्वासीत अगतीक दुष्काळ

वाचने 2749 वाचनखूण प्रतिक्रिया 8

निश Wed, 06/06/2012 - 18:59
शैलेन्द्र साहेब, जर भेगाळल्या जमीनीत जळुन मेलेला, लाचार निर्वासीत अगतीक दुष्काळ दुष्काळ जर असा असेल तर मग दुष्काळ कसा तो सुकाळ नाही का? कारण सुकाळ मेला जळुन म्हणुन तर दुष्काळ आला ना

In reply to by निश

शैलेन्द्र Wed, 06/06/2012 - 19:15
निश, दुष्काळ म्हणजे फक्त पावुस न पडणे, पाण्याची टंचाई नसते, दुष्काळाला अनेक आर्थीक सामजीक कंगोरे असतात. प्रत्येक दुष्काळ हा काही जणांसाठी सुकाळच असतो, माझी कविता त्यावर भाष्य करतेय... यात खरा दुष्काळपीडीत कसा होरपळतो ते शेवटच्या ओळीत सांगायचा प्रयत्न केलाय. ..

जेनी... Wed, 06/06/2012 - 19:06
सुकाळ मेला जळुन म्हणुन तर दुष्काळ आला ___________________ नै ओ निश सैब , जळुन गेलेलाहि दुष्काळच.. दुष्काळात दुष्काळ असा त्याचा अर्थ असावा अस मला वाटतय .