मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माणुसकी....

अमितसांगली · · जे न देखे रवी...
न मानला धर्म न मानली जात धरली फक्त माणुसकीची कास कारण हीच आहे माझी वाट ... बेभान उधळणाऱ्या पावसाच्या सरींनी नभी आकाशाच्या इंद्रधनुष्य उमटते माय-माउली मातीतून, मादक सुगंध दरवळतो जणू घेऊनी रूप परिसाचे, सृष्टीचे चराचर उजळिते इथे नसे कधी दुजाभाव, न कधी नरपशुंचा भेदभावाचा घाट, बरसावे आपणही कधीतरी यासवे, हाच मनी ध्यास कारण हीच आहे माझी वाट ... करुनी पैशाला श्वास, लाविली संवेदनांची वाट मारुनी ताव फुशारकीचे, समेटले सोंग सज्जनांचे घेऊनी शिक्षण इयत्तांचे, कातडे पांघरले माणुसकीचे, कातड्यालाच या लावावी आग, हाच मनी ठाव, कारण हीच आहे माझी वाट ...

वाचने 3918 वाचनखूण प्रतिक्रिया 10

काय म्हणू मी याला? काय लिहायचा घातला घाट? वृत्त नाही,छंद नाही, नुसतीच भावना तोंडपाठ. .... ;) ........................ सांगा,सांगा,सांगा... कुणाच्या मापाचा हा अंगा? नुसते कापड भारी,...परी शिवता सुटे बोंगा! :-p

In reply to by अमितसांगली

ठिक आहे,मग या पुढे असले फालतू कष्ट घेऊ नका,,, आणी मी टोला हाणलेल्याला जर विडंबन म्हणत असाल,तर आपल्यालाही पावसात भिजण्यापेक्षा चिखलात लोळण्याची हौस जास्त आहे,असा निष्कर्ष त्यातून निघतोय,हे लक्षात घ्या...! :-p

In reply to by अत्रुप्त आत्मा

पक पक पक Sun, 09/16/2012 - 22:18
सांगा,सांगा,सांगा... कुणाच्या मापाचा हा अंगा? नुसते कापड भारी,...परी शिवता सुटे बोंगा :bigsmile: :bigsmile: :bigsmile: यात कुठेच कसा आला नाही ,नाडी तुट्लेला लेंगा..... :d:

In reply to by अत्रुप्त आत्मा

पक पक पक Sun, 09/16/2012 - 22:23
न मानला धर्म न मानली जात धरली फक्त माणुसकीची कास कारण हीच आहे माझी वाट ... ना सुचले शब्द ना जमले यमक फाट्ले आशयाचे फडके लागली जिलबीची वाट... :D:

ज्ञानराम Sun, 09/16/2012 - 15:28
काय म्हणू मी याला? काय लिहायचा घातला घाट? वृत्त नाही,छंद नाही, नुसतीच भावना तोंडपाठ. .... सांगा,सांगा,सांगा... कुणाच्या मापाचा हा अंगा? नुसते कापड भारी,...परी शिवता सुटे बोंगा! आवडल्या गेले आहे.....