बर्याचं दिवसांपासुन व्हॉट्स अॅप गृप वरती किमान ३००० वेळा कट्टा करायच्या गोष्टी चाललेल्या होत्या. गेले २-३ आठवडे हो-ना-हो-ना करता करता शेवटी काल मोदक, मी, कपिलमुनी आणि अनाहितांचा लाडोबा असे चार जणांचा कट्टा ठरला. त्याचा एक वृत्तांत लिहायचा एक माफक प्रयत्न. कट्ट्याचं आयोजनं करतानाचं माझ्याकडुन एक मोठी चुक झाली ती म्हणजे वल्लींना फोन करायचा राहुन गेला :( (वल्ली मनापासुन सॉरी!! ). अन्या दातार कोल्हापुरला गेल्यानी आणि गुर्जीं फुलराणीच्या शोधात मार्केट यार्डामधे असल्यानी येउ शकले नाहीत. ;)
एक लाडोबा सोडला तर आम्ही तिघही पिंपरी-चिंचवडबद्दल अगदी पुर्ण परिचयाचे असल्याने कुठे भेटायचं हे आधीचं ठरलेलं होतं. काल दुपारी लाडोबाला फोन केला तेव्हा, "मी ना अग्गदी ३.३० ला वेळेत निघतो म्हणजे दोन अडिच तासात चिंचवड ला पोहचेन" असं म्हणाला. प्रत्यक्षात फक्त एक तासाचा उशिर करुन श्री. लाडोबा सर ठाण्याहुन निघाले. चिंचवडला उतरणार होता त्याऐवजी कपिलमुनिंनी त्याला तळेगावलाचं उतरवलं आणि गाडीत घालुन प्राधिकरणामधे आणलं. (लाडोबानी तळेगावला उतरावं म्हणुन अणाहिता चिंचवडला काळे झेंडे वगैरे घेउन उभ्या आहेत असा त्याचा समज करुन देण्यात आला असं आमच्या वि-श्वसनिय आणि गोप-निय सुत्रांकडुन समजलेलं आहे. ;) )
त्यांना थोडी वाट पहायला लावुन मी सुद्धा एक दहा-पंधरा मिनिटात तिथे भेटायला पोचलो. ह्या आधी कधीही एकमेकांना भेटलेलो नसुनही अगदी एका फटक्यामधे एकमेकांना ओळखलं. आयडीच्या नावावरुन किती फसायला होउ शकतं ह्याचा अनुभव काल परत घेतला. कपिलमुनी एखादे ४०-४५ वर्षांचे सद्गृहस्थ असतील अशी समजुत होती, हा तर चक्क समवयीन निघाला. टवाळ कार्टा इथे एवढी मस्ती करतो तर प्रत्यक्षात कसा असेल असं एक चित्र मनाशी रंगवलेलं होतं. हा प्राणी भलताचं शांत निघाला की. हाय-हेलो करुन गाड्या-बिड्या पार्क करुन समोरचं असणार्या चि.सौ.कां. गीता पावभाजी सेंटरमधे जरा श्रमपरिहारासाठी गेलो. एकमेकांशी ओळख वगैरे करुन घेतली आणि मोदकाला फोन केला. मोदक जरा कामामधे असल्याने थोडा उशिरा येणार होता. इकडे कपिलमुनि, लाडोबा आणि माझं गाड्या, मिपा आणि मिपाकर ह्यांच्यावर गप्पा रंगल्या. तीन जणांनी कॉफी, चहा आणि लेमन सोडा असा त्रिरंगी मेनु संपवला त्यानंतर बराचं वेळ वेटरचा अंत बघुन मग टेबल रिकामं केलं. दरम्यानच्या गप्पांमधे टकाला अचानक xxxताई आणि xx ताई आल्या असं एकदम सांगीतल्यावर तो जो काय दचकलाय उस्का जवाब नै बॉस!! ;) मोदक आणि आम्ही सगळे वाल्हेकरवाडीमधल्या रानमळा मधे भेटायचं ठरवलं होतं तिकडे कुच केलं.
रानमळामधे जाउन स्टार्टर्स जेमतेम संपेपर्यंत बुलेटवाले मोदकबाबा बुलेटसंप्रदायी अवतारामधे प्रकट झाले आणि मग खर्या अर्थानी गप्पांचा कट्टा रंगायला सुरुवात झाली. गाड्या, ट्रेक्स, भ्रमंती, मिपावरचे आयडी आणि त्यांच्या सवयी, लेखं आणि अनुभव वगैरे वगैरेंचे विषय सटासट बदलले जात होते. कालच्या गप्पांमधुन "केल्याने देशाटन" ह्या म्हणीची प्रचिती आली. जरा वेळानी झणझणीत गावरान चिकनची थाळी वगैरे मागवली. चविष्ट चिकनबरोबर गप्पांची चव द्विगुणीत झाली. (लाडोबानी थोडसं हाश-हुश करत का होईना पण खाल्लं ;) ). वयोगट आणि जवळपास समविचारी असल्यानी सगळे जण पहिल्यांदाच भेटत असुनही अगदी मोकळेपणानी गप्पा मारत होते. मोदक आणि कपिलमुनी ही दोघं लोकं सतत कुठेना कुठेतरी ट्रिपला जात असतात (शेप्रेट) अशी माहिती मिळुन बरीचं जळजळं झाली. गप्पा मारत असतानाचं बुवांचा कर्वेनगरहुन फोन आला, त्यांच्याशी जरा फोनवर गप्पा मारल्या. प्रत्यक्ष नाही तरी बुवांनी सुक्ष्मदेहानी हजेरी लावली असं म्हणायला हरकत नाही. गप्पा हाणत असताना टकाला एकदम आपल्याला पुण्यात नातेवाईकांच्या घरी जायचं आहे ह्याची आठवण झाली. त्याला पुण्यात धनकवडीला सोडायची जबाबदारी मी घेतलेली होती. आणि टक्या पत्ता चुकुन चुकल्यानी ती जागा धनकवडी नसुन फुरसुंगी आहे असं बर्याचं उशीरा लक्षात आलं. ए बाबा, हवं तर तुला ठाण्याला सोडतो पण फुरसुंगीला वगैरे सोडणार नै ज्जा अशी धमकी दिल्यावर टक्या पार रडवेला झालेला. (अनाहितांच्या ताब्यात देतो अशी धमकी देणार होतो पण उगीचं रडला बिडला अस्ता तर काय घ्या म्हणुन मोह आवरला. ) ;) ;) ;)
शेवटी त्यानी धनाजी वाकडे उर्फ स.गा. ला फोन केला आणि त्याची उतरायची सोय केली. (टक्याला आधी सगा नी येउ नको असं सांगीतलयं असं सांगुन आम्ही बराचं त्रास दिला. फायनली सगा कडे सोय झालीये हे कळल्यावर मात्र मग जरा थंडावला.) यथेच्चं जेउन प्रत्येकी तीन-तीन भले मोठे ग्लास सोलकढी ढोसली आणि हातपाय पसरुन परत गप्पा सुरु झाल्या. आठ साडेआठला ज्या गप्पा मारायला सुरुवात केलेली ते रात्री जवळ जवळ सव्वा अकरा साडे अकरा पर्यंत गप्पा कश्या रंगल्या हे समजलं सुद्धा नाही. शेवटी अगदी हाटेलमालकानी हाकलायला नको म्हणुन नाईलाजानी बाहेर पडलो. परत पार्किंगमधे बुलेट बद्दल दहा-पंधरा मिनिटं गप्पा रंगल्या. पुढे एकत्र प्रवासाचे थोडे फार बेत आखुन परत भेटायचे प्लान करुन कट्ट्याची सांगता झाली.
टक्याचं पुढे काय झालं? सगानी टक्याला घरात घेतलं का? हे वाचण्यासाठी आज वल्ली, बुवा, सगा आणि टक्याचा आत्ता पुण्यात कट्टा चालु आहे त्याचा वृत्तांत वाचावा लागेल. स्टे ट्युन्ड!!
असो. मिपामुळे असे विविध क्षेत्रामधले, समविचारी मित्र मिळाले ह्याचा आनंद वाटतो. मिपाकरांच्या भेटीचे असे प्रसंग वारंवार येवोत हिच एक इच्छा व्यक्त करुन धागा संपवतो.
मिसळपाव
प्रतिक्रिया
फाउल
फोटु नाही तर कट्टा नाही.
पुन्हा एकदा कट्टा करा.
पैजारबुवा,
फोटु टाकयचे नैत ह्या
In reply to फाउल by ज्ञानोबाचे पैजार
फोटु टाकयचे नैत ह्या कट्ट्याचे अशी एका सदश्याची मागणी असल्यानी फोटु टाकलेले नैत. तसे गप्पांच्या नादात फोटो काढायचं राहुन गेलेलं २-३ फोटो काढले बास्स :)
आयोजन करा ;)
अरे बघितलाय त्याचा फटु
In reply to फोटु टाकयचे नैत ह्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
मुंबैच्या एका कट्ट्याला हजर होता तो.
विषयच संपला.
In reply to फाउल by ज्ञानोबाचे पैजार
फोटु नाही तर कट्टा नाही.
विषय संपला.
-दिलीप बिरुटे
कुठे काय?
फटु नसल्याने कट्टा झाला, तसेच चिमणराव आणि टका हे दोघेजण अस्तित्त्वात आहेत यावर विश्वास ठेवणार नाही.
(टकाचे पुण्यात काही खास काम होते असा सौंशय आहे. त्याचे काय झाले?)
तुम्ही पर्वाच चेपु वर माझा
In reply to कुठे काय? by पैसा
तुम्ही पर्वाच चेपु वर माझा फोटु लैक केलेला आहे. त्यामुळे मी अस्तित्वात आहे ह्यावर शंका नसावी ;)
होय काय!
In reply to तुम्ही पर्वाच चेपु वर माझा by कॅप्टन जॅक स्पॅरो
फेस्बुकावर हेमामालिनीचा फोटो आपला म्हणून टाकणार्या पण माहीत आहेत. आहेस कुठे! =))
हेमा मालिनीचं ठिके हो. ती
In reply to होय काय! by पैसा
हेमा मालिनीचं ठिके हो. ती कमीत कमी सुंदर म्हातारी तरी आहे. माझा फोटो अगदी अंधळा माणुस सुद्धा मुद्दाम नाही लावणार चेपु ला =)) सो तो मीचं आहे.
फटु नसल्याने कट्टा झाला, तसेच
In reply to कुठे काय? by पैसा
ओ पैसा टै...इथे लिहिता मी अस्तीत्वात नै...दुसर्या प्रतिसादात लिहिता की माझा फटू बघितला...ये क्या गोडा...चतुर...गोडा...चतुर जी
बाकी माझे पुण्यात खास काम नव्हते...असले की तुम्हालाच घेउन जातो बोलणी करायला :)
अर्रर्र, खास काम नव्हतं का!
In reply to फटु नसल्याने कट्टा झाला, तसेच by टवाळ कार्टा
ब्वार्र. बोलणी करायला फारसा उपयोग व्हायचा नै. मांडवात जेवायला बोलावलंस तरी पुरे! =))
ब्वार्र. बोलणी करायला फारसा
In reply to अर्रर्र, खास काम नव्हतं का! by पैसा
ओ...बोल्णी करायला नै...समोरचे उग्गीच फाल्तू विषयावरून नखरे करायला लागले की त्यांना वठणीवर आणायला ;)
ते जमेल!
In reply to ब्वार्र. बोलणी करायला फारसा by टवाळ कार्टा
ते जमेल नक्की!
रान मळा
हे ठिकाण माझ्या घरापासून चालत १० मिनिटांचे अंतरावर आहे.
सबब
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
योग्य जागी सुपारी दिली आहे कॅप्टन.
गपचिप नाखु
तुमचा भ्रमणध्वनी क्रमांक
In reply to रान मळा by नाखु
तुमचा भ्रमणध्वनी क्रमांक माझ्याकडे नाही तस्मात कळवु शकलो नाही. सुपारी अन्या दातारला दिलेली असल्यास कळवणे तो पुण्यात नै त्यामुळे ती सुपारी माझ्यापरंत पोचणं अवघड आहे :)
माझ्याकडची सुपारीची खांडं
In reply to तुमचा भ्रमणध्वनी क्रमांक by कॅप्टन जॅक स्पॅरो
माझ्याकडची सुपारीची खांडं संपलीत :P
असो, तर विशेष सदस्य वगळता फोटो टाकायला हरकत नसावी. पण ज्याअर्थी एक्कही फोटो नाही, त्याअर्थी कट्टा झालेला नसल्याची शंका घेण्यास भर्पूर वाव आहे.
अन्या..
In reply to माझ्याकडची सुपारीची खांडं by अन्या दातार
अफवांवर विश्वास ठेऊ नकोस.
बाकीचा साक्षीदार
नाखु
अरे वा! मस्त कट्टा नि
अरे वा! मस्त कट्टा नि वृत्तांत.
लई दिसांची हौस राया..चला आता पुरी करू......
चला पुण्यनग्रीत जाऊ... तिथे मिसळपाव खाऊ !!!
बावले, अरे टवाळजी कार्टा पूना
बावले, अरे टवाळजी कार्टा पूना आया से? मण्णे तो पताही णा था.
सुकांताकी भी खबर णा थी. अव्हेंजर्स की भी णा थी.
टवाऴजी कार्टा यांना आताच
In reply to बावले, अरे टवाळजी कार्टा पूना by यसवायजी
टवाऴजी कार्टा यांना आताच सिंहगड रस्त्यावर टेम्पोत बसवून आलो आहे.
अर्रर्र
In reply to टवाऴजी कार्टा यांना आताच by सतिश गावडे
बरा सापडला होता तर मला फोन नै का करायचा!
तुम्ही पुण्यनगरीत आहात?
In reply to अर्रर्र by पैसा
तुम्ही पुण्यनगरीत आहात?
रच्याकने, माझ्याकडे तुमचा बेस्नेल नंबर नाही.
एवढं कुठलं माझं पुण्य!
In reply to तुम्ही पुण्यनगरीत आहात? by सतिश गावडे
नंबर नाही? कधी लक्षातच आलं नाही! आता पाठवते.
बाकी कै नै! फोनवरून जरा चौकशी केली असती टक्याची!
बाकी कै नै! फोनवरून जरा चौकशी
In reply to एवढं कुठलं माझं पुण्य! by पैसा
म्हणजे आता खरडी, व्यनी, प्रतिसाद यांनंतर फोनवरून धमक्या???
बसवला टेम्पोत? :))
In reply to तुम्ही पुण्यनगरीत आहात? by सतिश गावडे
बसवला टेम्पोत? :))
बरा सापडला होता तर मला फोन नै
In reply to अर्रर्र by पैसा
फोनवायच्या ऐवजी तुम्हीच या की हिकडे
त्याला ठाण्याचा पत्ता तरी
In reply to टवाऴजी कार्टा यांना आताच by सतिश गावडे
त्याला ठाण्याचा पत्ता तरी म्हैती होता का? ;) नाहीतर जायचा डायरेक्ट बेंगळुरला :P
टवाऴजी कार्टा यांना आताच
In reply to टवाऴजी कार्टा यांना आताच by सतिश गावडे
चायला...त्या ट्येंप्यूने २ तास घेतले पुण्याच्या बाहेर पडायला :(
वृत्तांत मस्त.उरलेल्या
वृत्तांत मस्त.उरलेल्या वृत्तांत्तांच्या प्रतिक्षेत!!
धनाजी वाकडे यांच्या च्याहा-
In reply to वृत्तांत मस्त.उरलेल्या by अजया
धनाजी वाकडे यांच्या च्याहा- डागाच्या कन्फेशनबद्दल वाचण्यासही उस्सुक.
धनाजी वाकडे यांच्या च्याहा-
In reply to धनाजी वाकडे यांच्या च्याहा- by यसवायजी
धाग्याच्या प्रतिक्षेत ;)
दाग अच्छे है लिखो लिखो
In reply to धनाजी वाकडे यांच्या च्याहा- by यसवायजी
दाग अच्छे है लिखो लिखो धनाजीराजे!!
वा वा
वा वा, मजा आली वृत्तांत वाचून.
धनकवडी अन फुरसुंगी मध्ये गोंधळ होणे म्हणजे फारच बुवा. बाकी पुणे महानगराच्या विविध टोकांवरून दुचाक्यांनी कट्ट्यांना जाणे खरंच कौतुकास्पद आहे.
फो..........
फो...........टूssssssssssssssssss??????
@गुर्जीं फुलराणीच्या शोधात मार्केट यार्डामधे असल्यानी येउ शकले नाहीत.>>>
ज्याकू! "ओ...चाफा काय पुडी लावलाय?" ही फुलवाल्याला विचारलेली ओळ- फुलराणी अशी ऐकू येते क्काय?? दुत्त दुत्त! 
दुष्ष्ष्ष्ट! दुष्ष्ष्ष्ट! अफवाळ
@टवाळ कार्टा इथे एवढी मस्ती करतो तर प्रत्यक्षात कसा असेल असं एक चित्र मनाशी रंगवलेलं होतं. हा प्राणी भलताचं शांत निघाला की>> ये इक गेहेरा सच है।
@दरम्यानच्या गप्पांमधे टकाला अचानक xxxताई आणि xx ताई आल्या असं एकदम सांगीतल्यावर तो जो काय दचकलाय उस्का जवाब नै बॉस!! >>
तुम्ही अला नाहीत ह्याबद्दल
In reply to फो.......... by अत्रुप्त आत्मा
तुम्ही अला नाहीत ह्याबद्दल णीषेध...तुम्हाला सुद्द साकाहारी थाळी मिळवायची जबाबदारी घेतली असती. :P
@तुम्ही अला नाहीत ह्याबद्दल
In reply to तुम्ही अला नाहीत ह्याबद्दल by कॅप्टन जॅक स्पॅरो
@तुम्ही अला नाहीत ह्याबद्दल णीषेध...>> णिषेध करनेचा हक्क काढून घेनेत येत आहे!
आपणास सायंकाळी ८:२० मिनिटानी फोण केलेला होता,टेंव्हा आपणच मला "लै वेळ लागेल तुम्हाला...यायला!" अशे बोल्लात! आणि मलाच म्हन्ता व्हय "अला नाहीत" म्हणूण! :-/ दुत्त दुत्त 
कट्टा ६.३० ला चालु झाला.
In reply to @तुम्ही अला नाहीत ह्याबद्दल by अत्रुप्त आत्मा
कट्टा ६.३० ला चालु झाला. तुम्ही ८.३० ला कर्वेनगरहुन निघुन अजिबात वेळेत आला नसतात एवढ्या ट्रॅफिकमधुन. दु दु दु ट्रॅफिक...पुढच्या वेळी लवकर या ना. मंजे मनसोक्त गफ्फा हाणता येतील.
Llllllllluuuuuuu :-\
In reply to कट्टा ६.३० ला चालु झाला. by कॅप्टन जॅक स्पॅरो
Llllllllluuuuuuu :-\
आभासी कट्टा !
रंगीत कट्टा !
सचित्र वृत्तांत अधिक रंगतदार होईल
सचित्र कट्टा केला तर एका
In reply to आभासी कट्टा ! by सस्नेह
सचित्र कट्टा केला तर एका मित्राच्या जीवाला धोका संभवतो असं त्यानी सांगीतलय :P
=)) अर्र्र्र्र्र्र्र लैच !!
In reply to सचित्र कट्टा केला तर एका by कॅप्टन जॅक स्पॅरो
=)) अर्र्र्र्र्र्र्र लैच !!
सचित्र कट्टा केला तर एका
In reply to सचित्र कट्टा केला तर एका by कॅप्टन जॅक स्पॅरो
मग मग...मला बेसावध असताना बोचकारले तर???
अच्छा !
In reply to सचित्र कट्टा केला तर एका by टवाळ कार्टा
मित्र कोण हे सांगितल्याबद्दल धन्यवाद.
मित्र कोण हे सांगितल्याबद्दल
In reply to अच्छा ! by सस्नेह
आम्च्यात खूसफूस...पदराआडची बोलणी...कानगोष्टी असे प्रकार नस्तात :P
अगदी अगदी. आम्ही अगदी थेट मा
In reply to मित्र कोण हे सांगितल्याबद्दल by टवाळ कार्टा
अगदी अगदी. आम्ही अगदी थेट मा.पं. काढतो. हो की नी रे टक्या. ६ फुट २ इंच. ;) ;)
हेच्यात मधीच आमची पर्श्नल मायती कुटं आली?
In reply to अगदी अगदी. आम्ही अगदी थेट मा by कॅप्टन जॅक स्पॅरो
जल्ला हेच मन काय कल्ना नाय …. काय वो कॅप्टन सायेब? बरं न्हाय वो ह्ये ………
(सनी देओल मोड ऑन )
टका… सम्झाव इसे … सम्झाव…… ऐसे डायलाग मिपापे बहोत मिलते हाय…
चिमणरावांनाच विचार ते =))
In reply to हेच्यात मधीच आमची पर्श्नल मायती कुटं आली? by माम्लेदारचा पन्खा
चिमणरावांनाच विचार ते =))
अरे तुम्ही लोक माझ्या गल्लीत
अरे तुम्ही लोक माझ्या गल्लीत येऊन गेलात ! किती दिवस अनाहितांतर्फे घेऊन ठेवलेला पुस्पगुच्च देऊन गेले असते ना !!!
आधी माहिती असतं तर तुम्हालाही
In reply to अरे तुम्ही लोक माझ्या गल्लीत by मितान
आधी माहिती असतं तर तुम्हालाही कट्ट्याला बोलावलं असतं :)...सत्काराचे फोटो इथे चिकटवता आले असते :P
आधी माहिती असतं तर तुम्हालाही
In reply to आधी माहिती असतं तर तुम्हालाही by कॅप्टन जॅक स्पॅरो
आणि सत्काराऐवजी कट्टा पेटला असता तर? :)
अरे तुम्ही लोक माझ्या गल्लीत
In reply to अरे तुम्ही लोक माझ्या गल्लीत by मितान
अर्र...मला आधी माहित अस्ते तर कधीचे ते क्यॅटबरी घरात पडले आहे ते आणले असते :P llluuuuuulllluuuuu
*^%%&^&
In reply to अरे तुम्ही लोक माझ्या गल्लीत by टवाळ कार्टा
*^%%&^&
आम्ही पण चिंचवड ला राहतो
आम्ही पण चिंचवड ला राहतो आम्हाला का नाही बोलावले ? किंवा का नाही सांगितले कि चिंचवड मध्ये कट्टा घेत आहे
सगळे कट्टे
In reply to आम्ही पण चिंचवड ला राहतो by देवांग
सगळेच कट्टे मिपावर धागा काढून आयोजित केले जात नसतात हो...
सगळेच कट्टे मिपावर धागा काढून
In reply to सगळे कट्टे by श्रीरंग_जोशी
तर तर...असे किती कट्टे होऊन काही दू...दू मिपाकरांचे ढेकर पण देउन झालेत
कट्टा व्हॉट्स अॅपवरुन अगदी
In reply to आम्ही पण चिंचवड ला राहतो by देवांग
कट्टा व्हॉट्स अॅपवरुन अगदी अचानकपणे ठरलेला असल्यानी धागा काढायला वेळ झाला नाही. चर्चा बरेचं दिवस चालु होती पण कट्ट्याला मुहुर्त सापडत नव्हता.
मस्त वृत्तांत रे. पुढच्या
मस्त वृत्तांत रे. पुढच्या वेळी आठवणीने फोन कर. मस्त कट्टा करु हा का ना का.
बाकी काल दुसरा कट्टा पण जोरदार साजरा झाला.
शनिवार पेठेत साधनापाशी धन्या, टका भेटले. अल्पशी पुस्तक खरेदी केली. नंतर बुवेश आला. मग परत हसत खिदळत गप्पांना ऊत. नंतर ॐकारेश्वरापाशी यसवायजी भेटला. बुवास कामे असल्याने तो निघून गेला व आम्ही चौघांनी आमरस खाण्यासाठी सुकांतास प्रयाण केले. इतर काही न खाता वाट्याच्या वाट्या आमरस नुसता ओरपला गेला. नंतर पिक्चर बघायला म्हणून आर डेक्कन, तिथे हाउसफुल्ल असल्याने मंगलाला गेलो. तिथेही टाईमपास २ हाऊसफुल्ल.
हाय रे कर्मा. मग अॅव्हेन्जर्स एज ऑफ अल्ट्रोनची तिकिटं काढली. आत जाऊन बसतो तर पिक्चर मूळ इंग्लिश नसून हिंदी डब केलेला. आईये जनाब पासून डायलॉग सुरु मधेच राजस्थानी, हरियाणवी भाषा. मण्णे तो पता णा था, मेरी प्यारी बेहणा वैग्रे. चुथडा करुन टाकला राव सगळा. शिरेस पिक्चरला जाम इनोदी करुन टाकलं
पिक्चर संपल्यावर निघालो. मला दुसर्या मित्रांबरोबर बेडसे लेणीला जायचे असल्याने लगेच दोस्तांचा निरोप घेतला.
बाकी टवाळ कार्टा नावाप्रमाणे नसून लै शांत आहे आम्ही त्याच्यापेक्षा जास्त टवाळ आहोत असे त्याचे मत..
@मण्णे तो पता णा था, मेरी
In reply to मस्त वृत्तांत रे. पुढच्या by प्रचेतस
@मण्णे तो पता णा था, मेरी प्यारी बेहणा वैग्रे. चुथडा करुन टाकला राव सगळा.>>> =))))))
इंग्रजी चित्रपट हिंदीमधे
In reply to मस्त वृत्तांत रे. पुढच्या by प्रचेतस
इंग्रजी चित्रपट हिंदीमधे पहाणं हा
"गुनाह है ये"
हो ना राव.
In reply to इंग्रजी चित्रपट हिंदीमधे by कॅप्टन जॅक स्पॅरो
हो ना राव.
नशिब मी त्याआधी इंग्लिश पण पाहिला होता.
बाकी टवाळ कार्टा नावाप्रमाणे
In reply to मस्त वृत्तांत रे. पुढच्या by प्रचेतस
मग...हैच मी शांत... :)
=))))
=))))
फोटु
मोदकराव




चिमणराव
टवाळ कार्टा
कपिलमुनी
लै भारी
In reply to फोटु by जेपी
फोटु अंजा वरुन साभार
पैजारबुवा,
हायला माझे मित्र पण हल्कचं
In reply to फोटु by जेपी
हायला माझे मित्र पण हल्कचं म्हणतात मला. :/
तरी बरं रविवारी नव्हतास.
In reply to हायला माझे मित्र पण हल्कचं by कॅप्टन जॅक स्पॅरो
तरी बरं रविवारी नव्हतास. नाहीतर हल्कचा फोटो बल्कमधे टाकावा लागला असता. :))))
का रे?
In reply to तरी बरं रविवारी नव्हतास. by यसवायजी
का रे?
चोम्पीटेशन होतं तुला.
In reply to का रे? by कॅप्टन जॅक स्पॅरो
चोम्पीटेशन होतं तुला.
प्रकाटाआ
In reply to चोम्पीटेशन होतं तुला. by यसवायजी
प्रकाटाआ
कप्तानसाहेब
In reply to हायला माझे मित्र पण हल्कचं by कॅप्टन जॅक स्पॅरो
जसे हिरवट, पिवळट, इ. म्हणतात तसे तुम्हांला हल्क-ट म्हणावे काय? ;)
सगळ्या मित्रांमधे ह्या-च्च
In reply to कप्तानसाहेब by बॅटमॅन
सगळ्या मित्रांमधे ह्या-च्च नावानी प्रसिद्ध असल्यानी तुही तसं म्हणालास तर हल्कट नाही.
हायला माझे मित्र पण हल्कचं
In reply to हायला माझे मित्र पण हल्कचं by कॅप्टन जॅक स्पॅरो
आम्ही "हल्क"ट म्हणणार
कपिलमुनी आणि मी आयर्न मॅन व
In reply to फोटु by जेपी
कपिलमुनी आणि मी आयर्न मॅन व थॉर्ची अदलाबदल करून घेत आहोत याची णोंद घेत्ली जावी
बाब्बो चान चान =))
बाब्बो चान चान =))
बाकी चिमणराव " आये टाकी भरली मोटर बन्द कर असे ओरडातायेत की काय असे वाटुन गेले ;)
अगो काय हे!
In reply to बाब्बो चान चान =)) by पियुशा
=)) =)) =))
चिमणराव आसपास नाहीत ना हे बघून बाहेर पड!
=)) =))
@ बाकी चिमणराव " आये टाकी
In reply to बाब्बो चान चान =)) by पियुशा
@ बाकी चिमणराव " आये टाकी भरली मोटर बन्द कर असे ओरडातायेत की काय असे वाटुन गेले ;)>>> =))))))
खिक्कं!!!
In reply to बाब्बो चान चान =)) by पियुशा
खिक्कं!!!
गुर्जी मोडॉन
दु दु दु जिल्बुशा
गुर्जी मोडॉफ!!!
बाब्बो चान चान =))
In reply to बाब्बो चान चान =)) by पियुशा
चान चान...व्हत्सप्प वरून फिरत असलेला जोक स्वताचा म्हणून खपवायचा क्षीण प्रयत्न :)
आत्ता ऑफिसात आहे...संध्याकाळी
आत्ता ऑफिसात आहे...संध्याकाळी घरी पोचल्यावर एक एक प्रतिसाद टंकतो (चुन चुन के प्रतिसाद टंकूंगा)
चायला या चोच्या चिमण्याने बराच नसलेला मालमसाला टाकला आहे माझ्या नावाने
चायला मोदक आणि कपिलमुनि दोघं
In reply to आत्ता ऑफिसात आहे...संध्याकाळी by टवाळ कार्टा
चायला मोदक आणि कपिलमुनि दोघं साक्षी आहेत ;)
=)))आणि टकाच्या वरच्या
=)))आणि टकाच्या वरच्या फोटुतले पोझमधले चिमणराव पाहुन टका संशयाने कसा बघतोय बघा=)))
=)))आणि टकाच्या वरच्या
In reply to =)))आणि टकाच्या वरच्या by अजया
ही अशी कमेंट आल्यावर जसे बघायला हवे तसे बघतोय :P
=)))आणि टकाच्या वरच्या
=)))आणि टकाच्या वरच्या फोटुतले पोझमधले चिमणराव पाहुन टका संशयाने कसा बघतोय बघा=)))
नै ग नै ते अस हाय :) ( क्रु. ह.घे.)
टका - " ३ फिट से था डरता अब ५ फिट जाता तु इतनी जल्दी कैसे बढ गया ..........................
आखीर खाता क्या हे ....................................... ???????
चिमणराव - " आय एम चोम्प्ल्यान ब्वॉय ;)
( आता मार खायच्या आत पलते ....)
=))
In reply to =)))आणि टकाच्या वरच्या by पियुशा
=))
नाही ब्रँड वेगळा आहे माझा.
In reply to =)))आणि टकाच्या वरच्या by पियुशा
नाही ब्रँड वेगळा आहे माझा. बोर्न्व्हिटा पितो (खरचं पितो)
नाही ब्रँड वेगळा आहे माझा.
In reply to नाही ब्रँड वेगळा आहे माझा. by कॅप्टन जॅक स्पॅरो
तुझे वय काय...तु पितो काय =))
वजन कमी करायचे आहे ना रे...पिणे बंद कर :)
चवीसाठी पितो रे..अजुनही आवडतं
In reply to नाही ब्रँड वेगळा आहे माझा. by टवाळ कार्टा
चवीसाठी पितो रे..अजुनही आवडतं. वजन :/
=)))आणि टकाच्या वरच्या
In reply to =)))आणि टकाच्या वरच्या by पियुशा
हाय पियुशा...कश्शी आहेस
रानमळा
रानमळा बेश्ट आहे.
काळ्या रस्श्यामधला चिकन , सुका फ्राय चिकन , आणि सोलकढी तर अप्रतिम !
खाणं आणि गप्पाच्या नादात फोटू घ्यायचे राहिले.
बाकी पिंचिं महाकट्टाकरू या !
पुणे-मुंबै- को`पूर पेक्षा भारी होइल !
फोटू टाका!!
In reply to रानमळा by कपिलमुनी
फोटू टाका!!