✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

एक "टवाळ" संध्याकाळ

क
कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी
Sun, 05/03/2015 - 13:30  ·  लेख
लेख
बर्याचं दिवसांपासुन व्हॉट्स अॅप गृप वरती किमान ३००० वेळा कट्टा करायच्या गोष्टी चाललेल्या होत्या. गेले २-३ आठवडे हो-ना-हो-ना करता करता शेवटी काल मोदक, मी, कपिलमुनी आणि अनाहितांचा लाडोबा असे चार जणांचा कट्टा ठरला. त्याचा एक वृत्तांत लिहायचा एक माफक प्रयत्न. कट्ट्याचं आयोजनं करतानाचं माझ्याकडुन एक मोठी चुक झाली ती म्हणजे वल्लींना फोन करायचा राहुन गेला :( (वल्ली मनापासुन सॉरी!! ). अन्या दातार कोल्हापुरला गेल्यानी आणि गुर्जीं फुलराणीच्या शोधात मार्केट यार्डामधे असल्यानी येउ शकले नाहीत. ;) एक लाडोबा सोडला तर आम्ही तिघही पिंपरी-चिंचवडबद्दल अगदी पुर्ण परिचयाचे असल्याने कुठे भेटायचं हे आधीचं ठरलेलं होतं. काल दुपारी लाडोबाला फोन केला तेव्हा, "मी ना अग्गदी ३.३० ला वेळेत निघतो म्हणजे दोन अडिच तासात चिंचवड ला पोहचेन" असं म्हणाला. प्रत्यक्षात फक्त एक तासाचा उशिर करुन श्री. लाडोबा सर ठाण्याहुन निघाले. चिंचवडला उतरणार होता त्याऐवजी कपिलमुनिंनी त्याला तळेगावलाचं उतरवलं आणि गाडीत घालुन प्राधिकरणामधे आणलं. (लाडोबानी तळेगावला उतरावं म्हणुन अणाहिता चिंचवडला काळे झेंडे वगैरे घेउन उभ्या आहेत असा त्याचा समज करुन देण्यात आला असं आमच्या वि-श्वसनिय आणि गोप-निय सुत्रांकडुन समजलेलं आहे. ;) ) त्यांना थोडी वाट पहायला लावुन मी सुद्धा एक दहा-पंधरा मिनिटात तिथे भेटायला पोचलो. ह्या आधी कधीही एकमेकांना भेटलेलो नसुनही अगदी एका फटक्यामधे एकमेकांना ओळखलं. आयडीच्या नावावरुन किती फसायला होउ शकतं ह्याचा अनुभव काल परत घेतला. कपिलमुनी एखादे ४०-४५ वर्षांचे सद्गृहस्थ असतील अशी समजुत होती, हा तर चक्क समवयीन निघाला. टवाळ कार्टा इथे एवढी मस्ती करतो तर प्रत्यक्षात कसा असेल असं एक चित्र मनाशी रंगवलेलं होतं. हा प्राणी भलताचं शांत निघाला की. हाय-हेलो करुन गाड्या-बिड्या पार्क करुन समोरचं असणार्या चि.सौ.कां. गीता पावभाजी सेंटरमधे जरा श्रमपरिहारासाठी गेलो. एकमेकांशी ओळख वगैरे करुन घेतली आणि मोदकाला फोन केला. मोदक जरा कामामधे असल्याने थोडा उशिरा येणार होता. इकडे कपिलमुनि, लाडोबा आणि माझं गाड्या, मिपा आणि मिपाकर ह्यांच्यावर गप्पा रंगल्या. तीन जणांनी कॉफी, चहा आणि लेमन सोडा असा त्रिरंगी मेनु संपवला त्यानंतर बराचं वेळ वेटरचा अंत बघुन मग टेबल रिकामं केलं. दरम्यानच्या गप्पांमधे टकाला अचानक xxxताई आणि xx ताई आल्या असं एकदम सांगीतल्यावर तो जो काय दचकलाय उस्का जवाब नै बॉस!! ;) मोदक आणि आम्ही सगळे वाल्हेकरवाडीमधल्या रानमळा मधे भेटायचं ठरवलं होतं तिकडे कुच केलं. रानमळामधे जाउन स्टार्टर्स जेमतेम संपेपर्यंत बुलेटवाले मोदकबाबा बुलेटसंप्रदायी अवतारामधे प्रकट झाले आणि मग खर्‍या अर्थानी गप्पांचा कट्टा रंगायला सुरुवात झाली. गाड्या, ट्रेक्स, भ्रमंती, मिपावरचे आयडी आणि त्यांच्या सवयी, लेखं आणि अनुभव वगैरे वगैरेंचे विषय सटासट बदलले जात होते. कालच्या गप्पांमधुन "केल्याने देशाटन" ह्या म्हणीची प्रचिती आली. जरा वेळानी झणझणीत गावरान चिकनची थाळी वगैरे मागवली. चविष्ट चिकनबरोबर गप्पांची चव द्विगुणीत झाली. (लाडोबानी थोडसं हाश-हुश करत का होईना पण खाल्लं ;) ). वयोगट आणि जवळपास समविचारी असल्यानी सगळे जण पहिल्यांदाच भेटत असुनही अगदी मोकळेपणानी गप्पा मारत होते. मोदक आणि कपिलमुनी ही दोघं लोकं सतत कुठेना कुठेतरी ट्रिपला जात असतात (शेप्रेट) अशी माहिती मिळुन बरीचं जळजळं झाली. गप्पा मारत असतानाचं बुवांचा कर्वेनगरहुन फोन आला, त्यांच्याशी जरा फोनवर गप्पा मारल्या. प्रत्यक्ष नाही तरी बुवांनी सुक्ष्मदेहानी हजेरी लावली असं म्हणायला हरकत नाही. गप्पा हाणत असताना टकाला एकदम आपल्याला पुण्यात नातेवाईकांच्या घरी जायचं आहे ह्याची आठवण झाली. त्याला पुण्यात धनकवडीला सोडायची जबाबदारी मी घेतलेली होती. आणि टक्या पत्ता चुकुन चुकल्यानी ती जागा धनकवडी नसुन फुरसुंगी आहे असं बर्‍याचं उशीरा लक्षात आलं. ए बाबा, हवं तर तुला ठाण्याला सोडतो पण फुरसुंगीला वगैरे सोडणार नै ज्जा अशी धमकी दिल्यावर टक्या पार रडवेला झालेला. (अनाहितांच्या ताब्यात देतो अशी धमकी देणार होतो पण उगीचं रडला बिडला अस्ता तर काय घ्या म्हणुन मोह आवरला. ) ;) ;) ;) शेवटी त्यानी धनाजी वाकडे उर्फ स.गा. ला फोन केला आणि त्याची उतरायची सोय केली. (टक्याला आधी सगा नी येउ नको असं सांगीतलयं असं सांगुन आम्ही बराचं त्रास दिला. फायनली सगा कडे सोय झालीये हे कळल्यावर मात्र मग जरा थंडावला.) यथेच्चं जेउन प्रत्येकी तीन-तीन भले मोठे ग्लास सोलकढी ढोसली आणि हातपाय पसरुन परत गप्पा सुरु झाल्या. आठ साडेआठला ज्या गप्पा मारायला सुरुवात केलेली ते रात्री जवळ जवळ सव्वा अकरा साडे अकरा पर्यंत गप्पा कश्या रंगल्या हे समजलं सुद्धा नाही. शेवटी अगदी हाटेलमालकानी हाकलायला नको म्हणुन नाईलाजानी बाहेर पडलो. परत पार्किंगमधे बुलेट बद्दल दहा-पंधरा मिनिटं गप्पा रंगल्या. पुढे एकत्र प्रवासाचे थोडे फार बेत आखुन परत भेटायचे प्लान करुन कट्ट्याची सांगता झाली. टक्याचं पुढे काय झालं? सगानी टक्याला घरात घेतलं का? हे वाचण्यासाठी आज वल्ली, बुवा, सगा आणि टक्याचा आत्ता पुण्यात कट्टा चालु आहे त्याचा वृत्तांत वाचावा लागेल. स्टे ट्युन्ड!! असो. मिपामुळे असे विविध क्षेत्रामधले, समविचारी मित्र मिळाले ह्याचा आनंद वाटतो. मिपाकरांच्या भेटीचे असे प्रसंग वारंवार येवोत हिच एक इच्छा व्यक्त करुन धागा संपवतो.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
धोरण
मांडणी
वावर
संस्कृती
कला
नृत्य
नाट्य
संगीत
धर्म
पाकक्रिया
इतिहास
वाङ्मय
कथा
बालकथा
कविता
चारोळ्या
प्रेमकाव्य
बालगीत
मुक्तक
विडंबन
गझल
भाषा
उखाणे
प्रतिशब्द
म्हणी
वाक्प्रचार
व्याकरण
व्युत्पत्ती
शब्दक्रीडा
शब्दार्थ
शुद्धलेखन
सुभाषिते
विनोद
साहित्यिक
समाज
जीवनमान
तंत्र
राहणी
औषधोपचार
प्रवास
भूगोल
देशांतर
राहती जागा
नोकरी
विज्ञान
क्रीडा
अर्थकारण
अर्थव्यवहार
गुंतवणूक
ज्योतिष
फलज्योतिष
सामुद्रिक
कृष्णमुर्ती
राशी
राजकारण
शिक्षण
मौजमजा
चित्रपट
छायाचित्रण
रेखाटन
स्थिरचित्र
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
प्रतिसाद
सद्भावना
शुभेच्छा
अभिनंदन
प्रतिक्रिया
आस्वाद
समीक्षा
माध्यमवेध
लेख
बातमी
अनुभव
मत
शिफारस
सल्ला
माहिती
संदर्भ
चौकशी
प्रश्नोत्तरे
मदत
वाद
प्रतिभा
भाषांतर
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
50341 वाचन

💬 प्रतिसाद (133)

प्रतिक्रिया

फाउल

ज्ञानोबाचे पैजार
Sun, 05/03/2015 - 13:42 नवीन
फोटु नाही तर कट्टा नाही. पुन्हा एकदा कट्टा करा. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

फोटु टाकयचे नैत ह्या

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 05/03/2015 - 13:44 नवीन
फोटु टाकयचे नैत ह्या कट्ट्याचे अशी एका सदश्याची मागणी असल्यानी फोटु टाकलेले नैत. तसे गप्पांच्या नादात फोटो काढायचं राहुन गेलेलं २-३ फोटो काढले बास्स :)
पुन्हा एकदा कट्टा करा
आयोजन करा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

अरे बघितलाय त्याचा फटु

पैसा
Sun, 05/03/2015 - 21:10 नवीन
मुंबैच्या एका कट्ट्याला हजर होता तो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

विषयच संपला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 05/04/2015 - 09:47 नवीन
फोटु नाही तर कट्टा नाही. विषय संपला. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

कुठे काय?

पैसा
Sun, 05/03/2015 - 14:03 नवीन
फटु नसल्याने कट्टा झाला, तसेच चिमणराव आणि टका हे दोघेजण अस्तित्त्वात आहेत यावर विश्वास ठेवणार नाही. (टकाचे पुण्यात काही खास काम होते असा सौंशय आहे. त्याचे काय झाले?)
  • Log in or register to post comments

तुम्ही पर्वाच चेपु वर माझा

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 05/03/2015 - 14:08 नवीन
तुम्ही पर्वाच चेपु वर माझा फोटु लैक केलेला आहे. त्यामुळे मी अस्तित्वात आहे ह्यावर शंका नसावी ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

होय काय!

पैसा
Sun, 05/03/2015 - 15:52 नवीन
फेस्बुकावर हेमामालिनीचा फोटो आपला म्हणून टाकणार्‍या पण माहीत आहेत. आहेस कुठे! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

हेमा मालिनीचं ठिके हो. ती

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 05/06/2015 - 06:02 नवीन
हेमा मालिनीचं ठिके हो. ती कमीत कमी सुंदर म्हातारी तरी आहे. माझा फोटो अगदी अंधळा माणुस सुद्धा मुद्दाम नाही लावणार चेपु ला =)) सो तो मीचं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

फटु नसल्याने कट्टा झाला, तसेच

टवाळ कार्टा
Tue, 05/05/2015 - 14:21 नवीन
फटु नसल्याने कट्टा झाला, तसेच चिमणराव आणि टका हे दोघेजण अस्तित्त्वात आहेत यावर विश्वास ठेवणार नाही. (टकाचे पुण्यात काही खास काम होते असा सौंशय आहे. त्याचे काय झाले?)
ओ पैसा टै...इथे लिहिता मी अस्तीत्वात नै...दुसर्या प्रतिसादात लिहिता की माझा फटू बघितला...ये क्या गोडा...चतुर...गोडा...चतुर जी बाकी माझे पुण्यात खास काम नव्हते...असले की तुम्हालाच घेउन जातो बोलणी करायला :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

अर्रर्र, खास काम नव्हतं का!

पैसा
Tue, 05/05/2015 - 14:51 नवीन
ब्वार्र. बोलणी करायला फारसा उपयोग व्हायचा नै. मांडवात जेवायला बोलावलंस तरी पुरे! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

ब्वार्र. बोलणी करायला फारसा

टवाळ कार्टा
Tue, 05/05/2015 - 15:17 नवीन
ब्वार्र. बोलणी करायला फारसा उपयोग व्हायचा नै. मांडवात जेवायला बोलावलंस तरी पुरे! =))
ओ...बोल्णी करायला नै...समोरचे उग्गीच फाल्तू विषयावरून नखरे करायला लागले की त्यांना वठणीवर आणायला ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

ते जमेल!

पैसा
Tue, 05/05/2015 - 15:25 नवीन
ते जमेल नक्की!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

रान मळा

नाखु
Sun, 05/03/2015 - 14:04 नवीन
हे ठिकाण माझ्या घरापासून चालत १० मिनिटांचे अंतरावर आहे. सबब . . . . . . . . . . . . . . . . . . . . योग्य जागी सुपारी दिली आहे कॅप्टन. गपचिप नाखु
  • Log in or register to post comments

तुमचा भ्रमणध्वनी क्रमांक

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 05/03/2015 - 14:05 नवीन
तुमचा भ्रमणध्वनी क्रमांक माझ्याकडे नाही तस्मात कळवु शकलो नाही. सुपारी अन्या दातारला दिलेली असल्यास कळवणे तो पुण्यात नै त्यामुळे ती सुपारी माझ्यापरंत पोचणं अवघड आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

माझ्याकडची सुपारीची खांडं

अन्या दातार
Sun, 05/03/2015 - 15:37 नवीन
माझ्याकडची सुपारीची खांडं संपलीत :P असो, तर विशेष सदस्य वगळता फोटो टाकायला हरकत नसावी. पण ज्याअर्थी एक्कही फोटो नाही, त्याअर्थी कट्टा झालेला नसल्याची शंका घेण्यास भर्पूर वाव आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

अन्या..

नाखु
Sun, 05/03/2015 - 15:47 नवीन
अफवांवर विश्वास ठेऊ नकोस.
कट्टा ! अरे गफ्फा आहेत नुसत्या आणि तू भुललास असल्या भूलथापांना.
बाकीचा साक्षीदार नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

अरे वा! मस्त कट्टा नि

एस
Sun, 05/03/2015 - 14:32 नवीन
अरे वा! मस्त कट्टा नि वृत्तांत.
  • Log in or register to post comments

लई दिसांची हौस राया..चला आता पुरी करू......

माम्लेदारचा पन्खा
Sun, 05/03/2015 - 16:03 नवीन
चला पुण्यनग्रीत जाऊ... तिथे मिसळपाव खाऊ !!!
  • Log in or register to post comments

बावले, अरे टवाळजी कार्टा पूना

यसवायजी
Mon, 05/04/2015 - 10:11 नवीन
बावले, अरे टवाळजी कार्टा पूना आया से? मण्णे तो पताही णा था. सुकांताकी भी खबर णा थी. अव्हेंजर्स की भी णा थी.
  • Log in or register to post comments

टवाऴजी कार्टा यांना आताच

सतिश गावडे
Sun, 05/03/2015 - 17:45 नवीन
टवाऴजी कार्टा यांना आताच सिंहगड रस्त्यावर टेम्पोत बसवून आलो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

अर्रर्र

पैसा
Sun, 05/03/2015 - 17:47 नवीन
बरा सापडला होता तर मला फोन नै का करायचा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

तुम्ही पुण्यनगरीत आहात?

सतिश गावडे
Sun, 05/03/2015 - 17:50 नवीन
तुम्ही पुण्यनगरीत आहात? रच्याकने, माझ्याकडे तुमचा बेस्नेल नंबर नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

एवढं कुठलं माझं पुण्य!

पैसा
Sun, 05/03/2015 - 17:58 नवीन
नंबर नाही? कधी लक्षातच आलं नाही! आता पाठवते. बाकी कै नै! फोनवरून जरा चौकशी केली असती टक्याची!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

बाकी कै नै! फोनवरून जरा चौकशी

टवाळ कार्टा
Tue, 05/05/2015 - 14:21 नवीन
बाकी कै नै! फोनवरून जरा चौकशी केली असती टक्याची!
म्हणजे आता खरडी, व्यनी, प्रतिसाद यांनंतर फोनवरून धमक्या???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

बसवला टेम्पोत? :))

यसवायजी
Sun, 05/03/2015 - 18:06 नवीन
बसवला टेम्पोत? :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

बरा सापडला होता तर मला फोन नै

टवाळ कार्टा
Tue, 05/05/2015 - 14:21 नवीन
बरा सापडला होता तर मला फोन नै का करायचा!
फोनवायच्या ऐवजी तुम्हीच या की हिकडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

त्याला ठाण्याचा पत्ता तरी

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 05/03/2015 - 18:08 नवीन
त्याला ठाण्याचा पत्ता तरी म्हैती होता का? ;) नाहीतर जायचा डायरेक्ट बेंगळुरला :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

टवाऴजी कार्टा यांना आताच

टवाळ कार्टा
Tue, 05/05/2015 - 14:21 नवीन
टवाऴजी कार्टा यांना आताच सिंहगड रस्त्यावर टेम्पोत बसवून आलो आहे.
चायला...त्या ट्येंप्यूने २ तास घेतले पुण्याच्या बाहेर पडायला :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

वृत्तांत मस्त.उरलेल्या

अजया
Sun, 05/03/2015 - 19:22 नवीन
वृत्तांत मस्त.उरलेल्या वृत्तांत्तांच्या प्रतिक्षेत!!
  • Log in or register to post comments

धनाजी वाकडे यांच्या च्याहा-

यसवायजी
Sun, 05/03/2015 - 19:59 नवीन
धनाजी वाकडे यांच्या च्याहा- डागाच्या कन्फेशनबद्दल वाचण्यासही उस्सुक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

धनाजी वाकडे यांच्या च्याहा-

टवाळ कार्टा
Tue, 05/05/2015 - 14:22 नवीन
धनाजी वाकडे यांच्या च्याहा- डागाच्या कन्फेशनबद्दल वाचण्यासही उस्सुक.
धाग्याच्या प्रतिक्षेत ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

दाग अच्छे है लिखो लिखो

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 05/05/2015 - 19:51 नवीन
दाग अच्छे है लिखो लिखो धनाजीराजे!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

वा वा

श्रीरंग_जोशी
Sun, 05/03/2015 - 20:21 नवीन
वा वा, मजा आली वृत्तांत वाचून. धनकवडी अन फुरसुंगी मध्ये गोंधळ होणे म्हणजे फारच बुवा. बाकी पुणे महानगराच्या विविध टोकांवरून दुचाक्यांनी कट्ट्यांना जाणे खरंच कौतुकास्पद आहे.
  • Log in or register to post comments

फो..........

अत्रुप्त आत्मा
Sun, 05/03/2015 - 20:45 नवीन
फो...........टूssssssssssssssssss?????? Image removed. @गुर्जीं फुलराणीच्या शोधात मार्केट यार्डामधे असल्यानी येउ शकले नाहीत.>>> दुष्ष्ष्ष्ट! दुष्ष्ष्ष्ट! अफवाळ Image removed. ज्याकू! "ओ...चाफा काय पुडी लावलाय?" ही फुलवाल्याला विचारलेली ओळ- फुलराणी अशी ऐकू येते क्काय?? दुत्त दुत्त! Image removed. @टवाळ कार्टा इथे एवढी मस्ती करतो तर प्रत्यक्षात कसा असेल असं एक चित्र मनाशी रंगवलेलं होतं. हा प्राणी भलताचं शांत निघाला की>> ये इक गेहेरा सच है। @दरम्यानच्या गप्पांमधे टकाला अचानक xxxताई आणि xx ताई आल्या असं एकदम सांगीतल्यावर तो जो काय दचकलाय उस्का जवाब नै बॉस!! >> Image removed.
  • Log in or register to post comments

तुम्ही अला नाहीत ह्याबद्दल

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 05/03/2015 - 21:01 नवीन
तुम्ही अला नाहीत ह्याबद्दल णीषेध...तुम्हाला सुद्द साकाहारी थाळी मिळवायची जबाबदारी घेतली असती. :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

@तुम्ही अला नाहीत ह्याबद्दल

अत्रुप्त आत्मा
Sun, 05/03/2015 - 21:11 नवीन
@तुम्ही अला नाहीत ह्याबद्दल णीषेध...>> णिषेध करनेचा हक्क काढून घेनेत येत आहे! Image removed. आपणास सायंकाळी ८:२० मिनिटानी फोण केलेला होता,टेंव्हा आपणच मला "लै वेळ लागेल तुम्हाला...यायला!" अशे बोल्लात! आणि मलाच म्हन्ता व्हय "अला नाहीत" म्हणूण! :-/ दुत्त दुत्त Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

कट्टा ६.३० ला चालु झाला.

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 05/03/2015 - 21:56 नवीन
कट्टा ६.३० ला चालु झाला. तुम्ही ८.३० ला कर्वेनगरहुन निघुन अजिबात वेळेत आला नसतात एवढ्या ट्रॅफिकमधुन. दु दु दु ट्रॅफिक...पुढच्या वेळी लवकर या ना. मंजे मनसोक्त गफ्फा हाणता येतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

Llllllllluuuuuuu :-\

अत्रुप्त आत्मा
Sun, 05/03/2015 - 23:34 नवीन
Llllllllluuuuuuu :-\
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

आभासी कट्टा !

सस्नेह
Sun, 05/03/2015 - 20:56 नवीन
रंगीत कट्टा ! सचित्र वृत्तांत अधिक रंगतदार होईल
  • Log in or register to post comments

सचित्र कट्टा केला तर एका

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 05/03/2015 - 20:59 नवीन
सचित्र कट्टा केला तर एका मित्राच्या जीवाला धोका संभवतो असं त्यानी सांगीतलय :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

=)) अर्र्र्र्र्र्र्र लैच !!

आनन्दिता
Sun, 05/03/2015 - 22:06 नवीन
=)) अर्र्र्र्र्र्र्र लैच !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

सचित्र कट्टा केला तर एका

टवाळ कार्टा
Tue, 05/05/2015 - 14:22 नवीन
सचित्र कट्टा केला तर एका मित्राच्या जीवाला धोका संभवतो असं त्यानी सांगीतलय :P
मग मग...मला बेसावध असताना बोचकारले तर???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

अच्छा !

सस्नेह
Tue, 05/05/2015 - 15:10 नवीन
मित्र कोण हे सांगितल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

मित्र कोण हे सांगितल्याबद्दल

टवाळ कार्टा
Tue, 05/05/2015 - 15:20 नवीन
मित्र कोण हे सांगितल्याबद्दल धन्यवाद.
आम्च्यात खूसफूस...पदराआडची बोलणी...कानगोष्टी असे प्रकार नस्तात :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

अगदी अगदी. आम्ही अगदी थेट मा

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 05/05/2015 - 19:52 नवीन
अगदी अगदी. आम्ही अगदी थेट मा.पं. काढतो. हो की नी रे टक्या. ६ फुट २ इंच. ;) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

हेच्यात मधीच आमची पर्श्नल मायती कुटं आली?

माम्लेदारचा पन्खा
Wed, 05/06/2015 - 15:20 नवीन
जल्ला हेच मन काय कल्ना नाय …. काय वो कॅप्टन सायेब? बरं न्हाय वो ह्ये ……… (सनी देओल मोड ऑन ) टका… सम्झाव इसे … सम्झाव…… ऐसे डायलाग मिपापे बहोत मिलते हाय…
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

चिमणरावांनाच विचार ते =))

टवाळ कार्टा
Wed, 05/06/2015 - 15:42 नवीन
चिमणरावांनाच विचार ते =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा

अरे तुम्ही लोक माझ्या गल्लीत

मितान
Sun, 05/03/2015 - 22:05 नवीन
अरे तुम्ही लोक माझ्या गल्लीत येऊन गेलात ! किती दिवस अनाहितांतर्फे घेऊन ठेवलेला पुस्पगुच्च देऊन गेले असते ना !!!
  • Log in or register to post comments

आधी माहिती असतं तर तुम्हालाही

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 05/04/2015 - 05:45 नवीन
आधी माहिती असतं तर तुम्हालाही कट्ट्याला बोलावलं असतं :)...सत्काराचे फोटो इथे चिकटवता आले असते :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितान

आधी माहिती असतं तर तुम्हालाही

टवाळ कार्टा
Tue, 05/05/2015 - 14:22 नवीन
आधी माहिती असतं तर तुम्हालाही कट्ट्याला बोलावलं असतं :)...सत्काराचे फोटो इथे चिकटवता आले असते :P
आणि सत्काराऐवजी कट्टा पेटला असता तर? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा