तिसरी कसम
"गळाकाटू वकी$$$$ल '',शिपायाने केलेली पुकार ऐकून डायसवर बसलेल्या काटे एकदम चमकले.
काय आडनावं आहे!चित्र विचित्र आडनावं सगळीकडेच असतात.पण इकडे विदर्भात वेगळीच त-हा आहे.
गिडमिडे,किडमिडे,बुडबुडे,लुकतुके,किरकिरे, एकवेळ ठीक.पण मानकापे,नाकमोडे,गळाकाटू,हाततोडे,
पायमोडे अशी,डोक्यापासून पायापर्यंत शरीराचे विविध अवयवांचा छेद करणारी आडनावे,भयंकरच आहेत.रोज नववीन ऐकायला मिळतात.आडनावांची निर्मिती या विषयावर संशोधन करून पुस्तक लिहीता येईल असा क्षणिक विचार त्यांच्या मनात आला.त्यांना हसू आले .पण समोरच्या फायलीत तोड घालून मोठ्या कष्टाने त्यांनी ते लपवले.साहेब आडनावाला हसले हे वकीलांना कळले तर भानगड व्ह