ध्रांगध्रा - १८
लेखनविषय:
लेखनप्रकार
- Read more about ध्रांगध्रा - १८
- 8 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
" माझ्यावर विश्वास ठेव" महेश माझ्याकडे पहात बोलतो. " हो खात्री बाळग.... आपण मित्र आहोत. " महेशला खांद्यावर हात ठेवत मी दिलासा देतो. तो काय बोलणार आहे हे मला माहीत नाही. " तुला खोटं वाटेल पण मी खरं सांगतोय. विश्वास ठेव."आपण आलो त्या दिवसापासून मी झोपू शकलेलो नाही. त्या दिवशी तुला सोडलं आणि घरी गेलो. हातपाय धुवून झोपायला गेलो. थकलो तर होतोच. जरा डोळा लागला असेल माझा. हा मघाशी फोटोत दिसला ना तो स्वप्नात आला. रागारागाने पहात होता. दरडावून काहीतरी बोलत होता. विचारत होता. मला भाषा समजत नव्हती. पण मी खडबडून जागा झालो. खूप घाबरलो होतो. दरदरून घाम फुटला होता अंगाला.