चंद्रकिनार

चांदणशेला's picture
चांदणशेला in जे न देखे रवी...
22 Jul 2017 - 7:13 pm

मावळतीच्या चंद्रकिनारी
श्रावणाची चिंब पहाट
उतरुन आला शुक्र
निळी निळी पाऊलवाट

सावळ्या तरुंच्या छायेत
पसरला धुक्यांचा फुलोरा
थरथरणाऱ्या पानांतून सांडला
शुभ्र कवडसा लाजरा

संथ उभ्या जळांत
मधुर ओले चांदणे
निशब्द ही लहर
गाते मंजुळ गाणे

वेलींवरचा धुंद गारवा
घेवून पंखांच्या कुशीत
एक थेंब जागलेला
गंध हिरवा वेचित

माझी कविताकविता

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

22 Jul 2017 - 10:34 pm | पद्मावति

मावळतीच्या चंद्रकिनारी
श्रावणाची चिंब पहाट

आहा! सुरेख कल्पना.
कविता आवडली.

चांदणशेला's picture

22 Jul 2017 - 11:53 pm | चांदणशेला

धन्यवाद

यशोधरा's picture

23 Jul 2017 - 12:00 am | यशोधरा

आवडली.

सुरेख आहे. थोडी गेयता अजून आणण्यासाठी चार शब्दांची एक ओळ असे करून पहायला हवे असे सुचवतो.