झाडांच्या सावलीत, राणीच्या बागेत, ... ... येताय ना ? ;)

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
5 Jan 2016 - 1:06 pm

प्रेरना माननीय प्रेषक, कंजूस, यांची नैसर्गीकपणे मोकळी-चाकळी माफी मागून :) मिपाकरांच्या सेवेत सादर ...

झाडांच्या सावलीत
राणीच्या बागेत
ने-चर वॉक
श्रवणोत्सुक नेत्र
वेगळ्या कोनातून
मनोरा पाहणारे
Appreciation टॉक
चिंचेची अन चिनाराची झाडे
कुट-कुटली, पुर्व-पश्चिम
दक्षीण-उत्तर,
गाभुळलेले, हिरवे
चढ उतार
झेलत हळूवार-मौन
कधी जोरदार
वाहत्या वार्‍यासंगे
बोलके तुषार
वळणे डौलदार
नजाकत लवलव
गवताची पाती
झुलता झंकार
फुलपाखरे किती चमकदार
पक्षीगाती मंजुळ
मनाचे तराणे
कळ्या फुलतात हळूवार
प्रतिक्षा त्या
खास किटकांची
फुलांचे परागीभवन
फळांच्या आशा
कधी निराशा
अखंड खेळ निसर्गाचा
रम्य रमेसी रमणिय
अद्भूतात रमलेला
कधी वठलेला कधी सुटलेला
कधी वेली नी कळ्या घेऊन
पुन्हा पुन्हा सुवास देणारा
कधी पाचोळा
कधी हिरवी पालवी होऊन
हळूवार संथ लयीत
किंवा नाचरे संगित होऊन
पुन्हा पुन्हा भेटणारा
ने-चर वॉक
वेगळ्या कोनातून
Appreciation टॉक
... ... येताय ना ?

येण्याचा मनोदय झाल्यास कंजूसरावांची हि जाहीरात अवश्य वाचा :)

dive aagarvidambanअनर्थशास्त्रअनुवादअभंगआरोग्यदायी पाककृतीइशाराकविता माझीकाणकोणकालगंगाकाहीच्या काही कविताकॉकटेल रेसिपीकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडचिकनचौरागढछावाजिलबीनागद्वारप्रवासवर्णनप्रेम कविताफ्री स्टाइलभावकविताभूछत्रीमराठीचे श्लोकमुक्त कवितावाङ्मयशेतीविठ्ठलशिववंदनाशृंगारहिरवाईहास्यशांतरसकवितामुक्तकविडंबनशब्दक्रीडारेखाटन