चहा, सिगरेट आणि तत्वज्ञान - सुशिक्षित कि …. ?

खोंड's picture
खोंड in जनातलं, मनातलं
24 Oct 2014 - 12:31 pm

"५ कटिंग दे रे…. "
माझ्या कडून ऑर्डर गेली …
"जोश्या चल ना … " सावंतने डोळयाने खुणावलं …
दोघे सिगरेटी घेऊन आले….
"च्यायला या दुचाकी वाल्यांच्या…. " सावंत कडाडला … सकाळपासूनच मूड खराब होता
"काय झालं रे " मी
सावंतने फक्त निराशार्थी मान हलवली सिगरेटचा एक मोठा झुरका घेतला आणि हळू हळू धूर सोडू लागला
सगळे सावंत कडे डोळे लाऊन
"सकाळी ऑफिस ला येताना गाडी ठोकली एकानं … वितभर डेंत पडलाय डाव्या दरवाज्याला … "
"अर्रर्र …. " एका सुरात
"कस काय … "
"काही नाही रे … खर तर चूक माझी पण होती… चौकात डावीकडून येणाऱ्या वाहनांना लाल सिग्नल लागला माझा सिग्नल हिरवा व्हायला अजून १० सेकंद तरी अवकाश होता …
मागचे जोरजोरात होर्न वाजवू लागले … मग नाईलाजाने मी निघालो तेवढ्यात एका हरामखोरान डावीकडून सिग्नल तोडला आणि येउन धडकला …"

" कुणी सांगितली होती तुला घालायला …. गाडी … "(हशा)
"तेच तर न… जाऊदे "
"पण मागच्यांना एवढी काय घाई झाली होती … कुठल्या लढाईवर जायचं होता मी तर अशा वेळी हटतच नाही, कितीही होर्न वाजुडे … "देशपांडे म्हणाला
"देशपांडे तुझं नाव बाजीप्रभू ठेवायला पाहिजे … " टाळी घेत जोशी म्हणाला. सावंतच्या चेहर्या वर अजूनही टेन्शन.
"जाऊदे रे होईल निट. इन्शुरन्स असेल,१-२ हजार खर्च येईल "
"खर्चाच काही नाही रे … नवी गाडी आहे पहिलाच डेंट आहे… "
"हा मग दुखं होणारच… गाडीने दिलेली काय पोरीने दिलेली काय पहिली ठोकर हि नेहमीच जिव्हारी लागते … पण नंतर मन अभेद्य होतं… अरे कच्च्या विटेलाही जेंव्हा भट्टी च्या झळा बसतात तेंव्हा कुठे ती भक्कम होते … होईल सवय "
सगळे गप्प
"साले सुशिक्षित असून असा का करतात देव जाने "
"काही नाही रे … आपण सगळे स्वतःला सुशिक्षित म्हणवतो पण तसे वागतो का आपण …
"आता सावंत चच बघ … एवढा software engineer तरी तोडला ना सिग्नल"
मेंढर आणि माणसं यात काहीच फरक नाही … एकाने गाडी घातली कि दुसरा त्याच्या मागे… एकाने सिग्नल तोडला कि दुसरा पण…
अरे परवाचीच गोष्ट … देशपांडे म्हणाला
" लकडी पुलावर सिग्नल ला सगळ्या गाड्या थांबल्या होत्या … म्हणून एक कुत्त्रा रस्ता ओलांडत होता तेवढ्यात सिग्नल निघाला तर या जनावांनी त्या बिचार्याला रस्ताही ओलांडू नाही दिला … बिचारा सिग्नल लागे पर्यंत कासावीस होऊन पुढे मागे करत होता … पण कुनाला गय नाही आली…
अरे देशपांडे कुत्त्र्याचा काय घेऊन बसलास हे रानटी लोक अपंग, वृद्ध यांनाही दाद नाही देत … एवढाच काय तर एखादी अम्बुलन्स जरी आली तरी कुणी जागा करून नाही देत …
का ? तर यांना ऑफिस ला उशीर झाला कि बॉस ओरडेल … बायको घरी वाट बघतीये… किंवा सिनेमाचा intro चुकेल … अरे एखाद्या दिवशी तुमचा स्वतःचा कुणी असेल ना अम्बुलन्स मध्ये मग हतबल होऊन जे रडाल ना तेंव्हा समजेल … प्रत्येक सेकंदाची किंमत …. काही नाही हि जी काही पापं करतायेत ना ती कधी ना कधी फेडावी लागतातच
एक जरी त्या कुत्त्र्या साठी किंवा अम्बुलन्स साठी थाम्बला असता ना मी लिहून देतो ४-५ जनांनी त्याचे अनुकरण करत गाड्या थांबवल्या असत्या… कुठे तरी वाचलं होतं
"माणसाला त्याच्या वाईट कृती साठी प्राय्स्चीत्त हवं असतं …. " आणि तशी संधी मिळाली कि आपोआपच तो चांगली कृती करून जातो

"खरं बोललास "
"कोथरूड ला त्या कॉफ्फी शॉप जवळ काय झाला पाहिलास ना … facebook वर video पहिला असशील ।
त्या जाडी ने म्हणे कचरा पेटी असताना कचरा पेटी जवळच खाली कचरा टाकला… एका पोरीने टोकलं तर स्वताची लाज वाटून कचरा उचलणं तर लांबच उलट हिलाच शिव्या ।
काय चाललाय काय आपल्या पुण्य नगरीत … "
"ती मुलगी पण काय शहाणी … तिने नाही उचलला तर स्वतः उचलून टाकला असता कचरा तर काय बिघडला असत…. त्या जाडीला नक्कीच लाज वाटली असती … पण हि दीड शहाणी video काढत बसली … एका अर्थाने बराच झाला म्हणा … हि आपली आधुनिक सुशिक्षित पिढी …

"तीच गोष्ट तुला हि लागू होते सावंत. सिग्नल तोडण्या ऐवजी तू जर होर्न ला घाबरून हलला नसतास तर कुणाची काय बिशाद होती सिग्नल तोडायची
"माणसाच मन पण मोठा विलक्षण असत आजूबाजूची एक जरी व्यक्ती बरोबर वागत असेल तर त्याची भीती म्हणून म्हणा आदर म्हणून म्हणा, अभिमान म्हणून म्हणा कि लाज म्हणून म्हणा … ती एक व्यक्ती इतरांना वाईट वागण्या पासून परावृत्त करते … आणि तीच व्यक्ती प्रवृत्त पण करू शकते । "
There are two kind of people in this world my friend those who are cultured and mannered and those who are सुशिक्षित…
लाख बोललास
सुशिक्षित !!! …. सावंत मला सुशिक्षितपणा ची व्याख्या सांग …
"सुशिक्षित म्हणजे ज्याला लिहिता वाचता येतं … ज्याला व्यवहार कळतो … तो "
"बस … एवढंच "
"सुशिक्षित म्हणजे काय मी सांगतो … सुशिक्षित म्हणजे ज्याला सारासार विवेक बुद्धी आहे … ज्याला स्वतची मत आहेत … जो स्वतंत्र विचार आणि स्नुरूप कृती करू शकतो … ज्याला शिष्टाचार म्हणजे काय हे कळत… ज्याला माणुसकी म्हणजे काय हे कळत… आणि ज्याला हे काळत कि आपण गाढव नसून एक बुद्धिवान मानव आहोत …
The fact is we all are so called सुशिक्षित … खरं तर शिक्षित एवढाच शब्द खरा …
वास्तविकता शिक्षणाचा आणि शिष्टाचाराचा काही सम्बन्ध असतो का ? अरे शाळा शिकून जर शिष्टाचार आला असता तर चौका चौकात trafiic police ची गरज पडली नसती .
मी तर म्हनतो शाळेत science, maths वैगेरे शिकवतात ते ठीक आहे पण इतिहास, नागरीकशासत्र इत्यादी व्यवहारामध्ये आणि एकूणच व्यक्तिमत्त्व विकासामध्ये निरुपयोगी असणारे विषय काढून एक चांगला नागरिक म्हणजेच "सुशिक्षित" नागरिक कस बनाव याच शिक्षण दिल पाहिजे …
हळू हळू एक एक करून चहाचे पेले टेबलावर टेकत होते.
काही म्हणा चहाच्या प्रत्येक घोटाबरोबर विचारचक्र कस top gear मध्ये फिरायला लागत.
दारू नंतर एवढ तत्द्वज्ञान बाहेर काढणार पेय चहाच असल पाहिजे …
चहाचा शेवटचा झुरका मारत सावंत म्हणाला "आपण चहा चा घोट घ्यावा आणि प्रत्येक घोटानिशी तत्वज्ञान मांडावे … आणि चहा संपला कि चहाच्या रिकाम्या पेल्याप्रमाणे आपल मन आणि मेंदू दोन्ही रिकामे करावे !!"

"४० रुपये मांडून ठेव" मी म्हणालो

धोरणमांडणीवावरसंस्कृतीसमाजजीवनमानराहणीशिक्षणप्रकटनविचारअनुभवमत

प्रतिक्रिया

एस's picture

24 Oct 2014 - 1:10 pm | एस

मुक्तक आवडले.

खोंड's picture

24 Oct 2014 - 4:06 pm | खोंड

पहिलाच प्रयत्न होता ….
काही सूचना असतील तर नक्किच आवडेल …

नियम पाळणं/तोडणं या संदर्भात 'सुशिक्षितपणाच्या' सहज-संवादाची कल्पना आवडली.

सूचना विचारताच आहात तर दोन आहेतः

चहा, सिगारेट आणि तत्वज्ञान यांची सांगड ओढून-ताणून घातलेली वाटली, त्यातले चहा आणि सिगारेट नसते तरी संवादातल्या 'सुशिक्षितपणाच्या' चर्चेत काही उणं पडलं असतं असं वाटत नाही.

आणि तुम्ही लिहिलेल्या संवादांच्या एकंदरीत बाजावरून तुम्ही अशुद्धलेखन सहसा करत नसावेत असं वाटलं, तेंव्हा 'कितीही होर्न वाजुडे', 'तिने नाही उचलला तर स्वतः उचलून टाकला असता कचरा तर काय बिघडला असत', 'एका अर्थाने बराच झाला म्हणा' वगैरे वाक्यं पाहून असं वाटलं की तुम्ही मिपावरचं गमभन न वापरता इतरत्र टंकलेखन करून इथे paste करीत असाल, त्यामुळे अशा रसभंग करणार्‍या चुका लेखनात शिरल्या असतील. तसं असेल तर इथे टंकलेखनासाठी मदत मिळेल.

Bottom line: लेखन आवडलं. और भी आने दो!

खोंड's picture

24 Oct 2014 - 10:24 pm | खोंड

सर्वप्रथम आभार ….
हो गुगल transliterate वापरले …
आणि type करताना झालेल्या चुकांचे पुनरावलोकन करायचा कंटाळा केला …
पुढच्या वेळी काळजी घेतली जाईल …

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

24 Oct 2014 - 7:49 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

आवडलं.

खोंड's picture

24 Oct 2014 - 10:25 pm | खोंड

धन्यवाद

माणसाच मन पण मोठा विलक्षण असत आजूबाजूची एक जरी व्यक्ती बरोबर वागत असेल तर त्याची भीती म्हणून म्हणा आदर म्हणून म्हणा, अभिमान म्हणून म्हणा कि लाज म्हणून म्हणा … ती एक व्यक्ती इतरांना वाईट वागण्या पासून परावृत्त करते … आणि तीच व्यक्ती प्रवृत्त पण करू शकते । "

हे निरिक्षण खास आहे!

'तीच व्यक्ती प्रवृत्त पण करू शकते' हे लेखात होतं का? माझ्या अगदी हेच मनात आलं होतं....

तुमचा अभिषेक's picture

26 Oct 2014 - 1:41 am | तुमचा अभिषेक

छान ऊतरलेय, आवडले :)

विजुभाऊ's picture

29 Oct 2014 - 11:22 am | विजुभाऊ

जय पुणेकर........

राजेश घासकडवी's picture

29 Oct 2014 - 11:40 am | राजेश घासकडवी

संवादातून प्रसंग लिहिणं ही कठीण कला असते. त्याहीपेक्षा कठीण म्हणजे संवादांतून नैसर्गिकरीत्या घडणारी चर्चा लिहिणं. कारण कितीही प्रयत्न केला तरी तो कोणाच्या तरी तोंडी घातलेला वैचारिक लेख वाटतो. वरच्या प्रसंगात बोलण्याचा नैसर्गिक ओघ कायम ठेवलेला आहे हे खूप आवडलं.