जोवरी हे जग, जोवरी भाषण - १

तिरकीट's picture
तिरकीट in जनातलं, मनातलं
17 Aug 2013 - 11:56 am

नमस्कार ..
मिपावर माझे हे पहीलेच लिखाण आहे. कुठला विषय घ्यावा हा विचार करताना असं मनात होतं की मिपावर आत्तापर्यंत माझ्या वाचनात न आलेला विषय घ्यावा.

आपल्याकडे अश्या अनेक गोष्टी वारसा असल्यासारख्या आल्या आहेत की ज्या नवीन पिढीला वेगळ्या शिकवाव्या लागत नाहीत, घरातील थोरा-मोठ्यांचे बघून, ऐकून त्या लहान मुलांपर्यंत पोहोचतात..मग त्यामध्ये रामरक्षा, अथर्वशीर्ष, भीमरूपी यांसारखी घरोघरी म्हटली जाणारी स्तोत्रं असोत किंवा क्रिकेट सारखे खेळ असोत. याचसारखी अजून १ गोष्ट बघायला मिळते ती म्हणजे 'गीतरामायण'...

आत्तापर्यंत मला जे काही ५० च्या घरात गीतरामायणाचे कार्यक्रम करायला मिळाले त्यामध्ये हे दिसलं कि बरीचशी गाणी समोर बसलेल्या लोकांना तोंडपाठ आहेत, गाणं सुरु करायचा अवकाश त्यांचं गुणगुणणं सुरु...गीतरामायणामधील ५६ गाणी, प्रत्येक गाण्याला जवळपास ७ ते ९ कडवी...प्रत्येक वेळेला गाण्याची तयारी करताना किंवा सादर करतान वेगळाच आनंद मिळतो कि आपण या नितांत सुंदर गोष्टीचा एक भाग होऊ शकतो..

अर्थात हा आनंद मिळालेला काही मी एकटाच नाही..महाराष्ट्रात आणि बाहेरसूद्धा अनेक कलाकार, श्रोते हा आनंद वर्षानुवर्षे मिळवतायत. गीतरामायणाचे अजून एक विशेष म्हणजे इतके वेळेला अनेक लोकांनी ह्या विषयावर बोललेलं असलं तरी ही गोष्ट कायम ताजी आहे..

यावरून असं वाटलं की गीतरामायणवरील माझे विचार, कार्यक्रमादरम्यानचे काही अनुभव, किस्से आपल्याला सांगावेत.
तुमच्याकडेही याबद्दल काही सांगण्यासारखे असेल तर जरूर सांगा, मला नक्की आवडेल. मिपाकरांना आवडले तर गीतरामायणामधील काही गाण्यांवर लेख लिहायचा विचार आहे..
(तुम्हाला आवडल्यास क्रमश:) )

संस्कृतीकलासंगीतभाषासाहित्यिकप्रकटनविचारआस्वादसमीक्षालेखअनुभवप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

दत्ता काळे's picture

17 Aug 2013 - 12:20 pm | दत्ता काळे

बेधडक लिहा.

विटेकर's picture

17 Aug 2013 - 12:30 pm | विटेकर

ञेस

अद्द्या's picture

17 Aug 2013 - 12:23 pm | अद्द्या

मिपा वर स्वागत .

युन्द्या लेख लवकर .

तिरकीट's picture

17 Aug 2013 - 12:26 pm | तिरकीट

धन्यवाद

शिल्पा ब's picture

17 Aug 2013 - 12:34 pm | शिल्पा ब

अगदी !! माझ्या लेकीला तर गीत रामायणातलं सूड घे त्याचा लंकापती भयंकर आवडतं .

विश्वनाथ मेहेंदळे's picture

17 Aug 2013 - 12:57 pm | विश्वनाथ मेहेंदळे

हाहाहा !!!!

शिल्पा ब's picture

17 Aug 2013 - 1:09 pm | शिल्पा ब

त्यात हसण्यासारख काय आहे?

अत्रुप्त आत्मा's picture

19 Aug 2013 - 10:47 pm | अत्रुप्त आत्मा

@हाहाहा !!!! >>> =)) =)) =))

तिरकीट's picture

17 Aug 2013 - 1:57 pm | तिरकीट

अगदी,
त्या गाण्यातल्या शब्दोच्चारांमुळे आणी तालाच्या वेगामुळे ते गाणं लहान मुलांना पण आवडतं.

नक्की लिहा. लेखनाला शुभेच्छा!

प्रभाकर पेठकर's picture

17 Aug 2013 - 12:41 pm | प्रभाकर पेठकर

जरूर लिहा. संकोच कशाकरीता?

प्रतिक्षेत आहोत.

दत्ता काळे's picture

17 Aug 2013 - 12:56 pm | दत्ता काळे

गीत रामायण म्हटल्याबरोबर जसे गदीमा आणि बाबूजी डोळ्यासमोर उभे राहतात, तसंच श्री. प्रभाकर जोग ह्यांनी व्हायोलीनवर वाजवलेलं "दैवजात दु:खे भरता, दोष ना कुणाचा" कानात वाजायला लागतं.

@विटेकर, प्रभाकर पेठकर, दत्ता काळे, आदूबाळ, शिल्पा ब : प्रतिसादबद्दल धन्यवाद

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Aug 2013 - 2:56 pm | डॉ सुहास म्हात्रे

जरूर लिहा ! पुभाप्र.

भ ट क्या खे ड वा ला's picture

19 Aug 2013 - 7:20 pm | भ ट क्या खे ड वा ला

जरूर लिहा वाचायला नक्की आवडेल

जरूर लिहा वाचायला नक्की आवडेल!!

पैसा's picture

25 Aug 2013 - 10:45 pm | पैसा

चांगला उपक्रम आहे! जरूर लिहा! तुम्ही स्वतः कार्यक्रम करता म्हणजे क्या बात है!

विजुभाऊ's picture

26 Aug 2013 - 4:45 am | विजुभाऊ

मला त्यात्ले " माता न तु वैरीणी .माता न तु वैरीणी ........" हे गाणे
सेतू बांधा रे सागरी ........ , स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे...." ही गाणी फार आवडायची.

अमोल केळकर's picture

26 Aug 2013 - 10:00 am | अमोल केळकर

गीत तरामायण वरील लेखमाला वाचायला नक्की आवडेल

अमोल

पुढील भागाचा दुवा...
http://www.misalpav.com/node/25484

अनिरुद्ध प's picture

26 Aug 2013 - 12:55 pm | अनिरुद्ध प

और पुछ-बुज ? जरुर लिहा वाट पहात आहे.