प्रभू मास्तरांचे अभिनंदन

सरपंच's picture
सरपंच in जनातलं, मनातलं
22 Jun 2012 - 3:25 pm

मिसळपाव सुरू झालं आणि इथे अनेक लोक येऊ लागले. त्यातले काही अगदी शांतपणे इथे राहू लागले तर काहींनी अल्पावधीत स्वतःचे असे एक स्थान निर्माण केले.

आमचे प्रभू मास्तर ऊर्फ विनायक प्रभू हे त्यातलेच एक भन्नाट व्यक्तिमत्व. (http://www.misalpav.com/user/1235/guestbook) इथे आल्यावर त्यांच्या क्रिप्टिक बोलण्यामुळे चक्रावला नाही असा एकही सदस्य नसेल. पण आज प्रभू मास्तर हे स्वतःच एक इन्स्टिट्युशन होऊन बसले आहेत. अनेक क्षेत्रांची जाण असलेला पण मन खर्‍या अर्थाने शिक्षण क्षेत्रात रमणारा हा कलंदर माणूस. झोपेतही कोणासाठी काहीतरी (आणि ते ही निरपेक्ष वृत्तीने) करण्याची स्वप्नं बघणारे आणि जागेपणी ती स्वप्नं प्रत्यक्षात आणणारे प्रभू मास्तर. मिसळपावसारख्या माध्यमाचाही त्यांनी केवळ याच दृष्टीने उपयोग केला.

गुणवंत पण गरजवंत असलेल्या विद्यार्थ्यांना खूप आधीच शोधून काढून त्यांना हरप्रकारे मदत ते करतात. या मदतीत काय नसतं? या मुलांना दहावीमधे उत्तम गुण कसे मिळवायचे, बारावी / सीइटीसाठी मार्गदर्शन करणे, शिष्यवृत्ती मिळवून देणे इतकंच नाही तर त्यांच्या पालकांनाही गरजेप्रमाणे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे असं कोणत्याही प्रकारे प्रभू मास्तर त्यांचं काम करत असतात.

सांगण्यास आनंद होतो की या वर्षीप्रभू मास्तरांच्या मार्गदर्शनाखालील १५ पैकी १२ विद्यार्थ्यांनी मेडिकल व इंजिनियरिंग सीइटीमधे शासकिय महाविद्यालयांमधे प्रवेश मिळवण्याइतके गुण मिळवले आहेत. या सगळ्या मुलांना गेल्या दोन तीन वर्षांपासून प्रभू मास्तरांची साथ लाभलेली आहे. इतकंच नव्हे तर या मुलांचा पुढच्या सगळ्या शिक्षणाच्या खर्चाचीही (सुमारे रु. २,५०,०००/-) सोय प्रभू मास्तरांनी केली आहे.

या घवघवीत यशाबद्दल मास्तरांचे अभिनंदन आणि ते एक मिपाकर आहेत याचा आम्हाला अभिमान वाटतो हे आम्ही कृतज्ञापूर्वक नमूद करतो.

या सीइटी परिक्षांमधे १७२ किंवा अधिक गुण मिळवणारे आणि ज्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रु. २,५०,०००/- किंवा त्याहून कमी आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी त्यांच्याकडे अजूनही मदतीचे मार्ग उपलब्ध आहेत. इच्छुकांनी त्यांच्याशी संपर्क साधावा आणि इतरांनी ही बातमी गरजूंपर्यंत पोचवावी.

संस्कृतीसमाजप्रकटनसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनबातमीशिफारससल्लामदतमाहिती

प्रतिक्रिया

मराठमोळा's picture

22 Jun 2012 - 5:11 pm | मराठमोळा

_/\_

अभिनंदन!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

अवांतर :
मी मधे एका ऑफिसबॉयला मदत केली होती. त्याच्या बहिणीचे लग्न आणि त्याचे शिक्षण यासाठी, नंतर हे साहेब, गुटखा खाऊन पैसे उडवत शिक्षण अपुरे ठेवुन बसले. बंगलोरच्या कामवालीच्या मुलांनी मात्र चांगलं यश मिळवलं. मदत केवळ पैशांची न करता अशीही करता येते हे मात्र प्रभू मास्तरांकडुन शिकण्यासारखं. :)

पियुशा's picture

22 Jun 2012 - 3:30 pm | पियुशा

व्वा !!!!!!!!प्रभु मास्तरांचे कार्य खरच उल्लेखणीय आहे .
कोचिंग क्लासचा सुळ्सुळाट झालेला असताना अशा प्रकारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन ध्येयपुर्तीचा रस्ता दाखवणारे " निर्वाज्य" लोक विरळाच :)
अभिनंदन :)

प्रचेतस's picture

22 Jun 2012 - 3:49 pm | प्रचेतस

हेच म्हणतो.

मास्तरांचे अभिनंदन.

प्रास's picture

22 Jun 2012 - 4:24 pm | प्रास

मास्तरांचं अभिनंदन आणि पुढील कार्याला शुभेच्छा!

बाकी पियुबैंनी लिहिलेला शब्द 'निर्व्याज' असावा असा समज करून घेतलेला आहे...

गणपा's picture

22 Jun 2012 - 3:31 pm | गणपा

ग्रेट वर्क मास्तर.
बोलणारे फार असतात पण न बोलता करणारे फार कमी.
मास्तर तुम्हाला (जुजबी का असेना पण ) ओळखतो याचा मला अभिमान आहे.

सरपंचांचे ही आभार.

सूड's picture

22 Jun 2012 - 3:37 pm | सूड

>>बोलणारे फार असतात पण न बोलता करणारे फार कमी.
असेच म्हणतो..

गवि's picture

22 Jun 2012 - 3:43 pm | गवि

अत्यंत सहमत.. ग्रेट व्यक्तिमत्व..

खडीसाखर's picture

22 Jun 2012 - 5:33 pm | खडीसाखर

>>बोलणारे फार असतात पण न बोलता करणारे फार कमी.
एकदम सहमत!

मास्तरांचे प्रचंड आणि जबरदस्त अभिनंदन!!!!!! मानलं ब्वॉ :)

sneharani's picture

22 Jun 2012 - 3:35 pm | sneharani

अभिनंदन!! अभिनंदन!! अभिनंदन!!!
_/\_

:)

सहज's picture

22 Jun 2012 - 3:37 pm | सहज

मास्तुरे!!!

सहज सराफ

अत्रुप्त आत्मा's picture

22 Jun 2012 - 3:47 pm | अत्रुप्त आत्मा

--^--
सलाम....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Jun 2012 - 3:50 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

_/\_ ग्रेट मास्तर.

-दिलीप बिरुटे

मेघवेडा's picture

22 Jun 2012 - 3:53 pm | मेघवेडा

__/\__

ऋषिकेश's picture

22 Jun 2012 - 4:09 pm | ऋषिकेश

भर्पूर कष्ट करून यश मिळवणार्‍या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या (आणि आमच्याही) प्रभु मास्तरांचे अभिनंदन

स्वाती दिनेश's picture

22 Jun 2012 - 4:09 pm | स्वाती दिनेश

प्रभूमास्तर, अभिनंदन!
स्वाती

मृत्युन्जय's picture

22 Jun 2012 - 4:14 pm | मृत्युन्जय

अभिनंदन आणि शुभेच्छा.

नाखु's picture

22 Jun 2012 - 4:28 pm | नाखु

आणि शुभेच्छा....

परिकथेतील राजकुमार's picture

22 Jun 2012 - 4:30 pm | परिकथेतील राजकुमार

हाबिणंदण गुर्जी.

सन्दीप's picture

22 Jun 2012 - 4:39 pm | सन्दीप

अभिनंदन! आणि शुभेच्छा.

विनीत संखे's picture

22 Jun 2012 - 4:41 pm | विनीत संखे

मास्तरांच्या कार्याचा आणखीन लेखाजोखा वाचण्यास आवडेल... मास्तरांच्या स्वतःच्या निगर्वी लिखाणातून तर अगदीच.

विकास's picture

22 Jun 2012 - 4:45 pm | विकास

चांगली बातमी. नुसतेच मार्गदर्शन नाही तर शैक्षणिक खर्चावर होणार्‍या अवाढव्यव खर्चाला मार्ग देखील दाखवणे फारच स्पृहणीय आहे!

प्रभू मास्तरांचे आणि त्यांच्या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन!

मूकवाचक's picture

22 Jun 2012 - 4:47 pm | मूकवाचक

_/\_

प्रभुमास्तरांचे आणि त्यांच्या शिष्यांचे अभिनंदन!

संजय क्षीरसागर's picture

22 Jun 2012 - 4:53 pm | संजय क्षीरसागर

मनःपूर्वक अभिनंदन!

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

22 Jun 2012 - 4:54 pm | निनाद मुक्काम प...

मिपा वरील प्रभू मास्तर हे आजच्या काळातील चितळे मास्तर आहेत.
देव त्यांच्या कार्यास उंदंड यश देओ.

स्पंदना's picture

22 Jun 2012 - 5:00 pm | स्पंदना

सहमत.

मृगनयनी's picture

23 Jun 2012 - 11:01 am | मृगनयनी

अभिनन्दन!.. गुड लक !!!

|| *~*_*~* ||

सर्वसाक्षी's picture

22 Jun 2012 - 5:02 pm | सर्वसाक्षी

तुमच्या या कार्याला तोड नाही. हार्दिक अभिनंदन आणि अभिवादन.

अमितसांगली's picture

22 Jun 2012 - 5:04 pm | अमितसांगली

अभिनंदन....अतिशय स्त्युत उपक्रम....

विसुनाना's picture

22 Jun 2012 - 5:11 pm | विसुनाना

प्रभू सरांच्या या अनमोल कार्याबद्दल त्यांना प्रणाम.
त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन आणि भावी जीवनासाठी सदिच्छा.

मुक्त विहारि's picture

22 Jun 2012 - 5:23 pm | मुक्त विहारि

मस्त काम करत आहेत..

शुचि's picture

22 Jun 2012 - 5:31 pm | शुचि

देशाला फक्त नावे ठेवण्यात अग्रणी बरेच जण असतात. पण या ना त्या प्रकारे खारीचा का होईना वाटा उचलून , समाजसेवा किती लोक करतात?

मास्तरांचे फक्त लेखन माहीत होते, ही माहीती नवीन आहे.

विप्रं _/\_

तिमा's picture

22 Jun 2012 - 5:34 pm | तिमा

दंडवत स्वीकारावा.
आम्हाला तुमचा अभिमान आहे.

सुनील's picture

22 Jun 2012 - 6:27 pm | सुनील

अभिनंदन आणि शुभेच्छा!

प्रभू गुर्जीँचे अभिनंदन आणि त्याना पुढील कार्यासाठी शुभेच्छा! तसंच त्यांच्या "मुलांनाही" अभिनंदन आणि शुभेच्छा!

संदीप चित्रे's picture

22 Jun 2012 - 6:47 pm | संदीप चित्रे

अनेक मुलांना तुमच्या मार्गसर्शनाचा लाभ व्हावा ह्या शुभेच्छा!

चौकटराजा's picture

22 Jun 2012 - 7:06 pm | चौकटराजा

प्रभू तेरो धाम जो अध्याये फल पाये यश लाये तेरो काम !
मास्तर , न हि ज्ञानेन सदृश्यं पवित्रं इह विद्यते हेच खरे !
सलाम !

रम्या's picture

22 Jun 2012 - 7:17 pm | रम्या

अभिनंदन!

श्रीरंग_जोशी's picture

22 Jun 2012 - 7:46 pm | श्रीरंग_जोशी

प्रभू मास्तरांचे व त्यांच्या गुणी विद्यार्थ्यांचे.

अन पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा

मदनबाण's picture

22 Jun 2012 - 7:51 pm | मदनबाण

अभिनंदन ! :)

कवितानागेश's picture

22 Jun 2012 - 8:05 pm | कवितानागेश

अभिनंदन आणि शुभेच्छा!

प्रभू मास्तरांचे अभिनंदन

मास्तर होणे जमु शकते पण त्याबरोबर प्रभू होऊन जगता येणे अशक्य असते ..
दोन्हीचा मिलाप झालेला पाहुन छान वाटले

शुचि's picture

22 Jun 2012 - 8:18 pm | शुचि

हाडाचे कवी आहात गणेशा!

प्रभाकर पेठकर's picture

22 Jun 2012 - 8:25 pm | प्रभाकर पेठकर

प्रभू साहेब,

आपल्या कार्यापुढे नतमस्तक आहे.
आपल्या चरणी आमचा साष्टांग नमस्कार रुजू करून घ्यावा ही विनंती.

मास्तर, आपण ग्रेट आहात.
आपले व आपल्या मुलांचे अभिनंदन.

शिल्पा ब's picture

22 Jun 2012 - 8:46 pm | शिल्पा ब

मास्तरांचे अन त्यांच्या मेहनीतीची किंमत ठेउन ती वाया न जाउ देणार्‍या त्यांच्या विद्यार्थ्यांचे कौतुक.

शैलेन्द्र's picture

22 Jun 2012 - 8:47 pm | शैलेन्द्र

मास्तरांशी ओळख आहे याचा नेहमीच अभिमान व आधार वाटत राहील.. अभिनंदन सरं, तुमच्या विद्यार्थ्यांचही अभिनंदन..

वेल डन
मास्तर तुमचे आणि तुमच्या विद्यार्थाचे मनापासून अभिनंदन
त्या विद्यार्थाना पुढील वाटचालीस शुभेच्छा


मास्तर आणि मास्तरचा विश्वास सार्थ ठरविणा-या विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन तसेच पुढिल वाटचालीस शुभेच्छा.

धनंजय's picture

22 Jun 2012 - 9:25 pm | धनंजय

मनःपूर्वक अभिनंदन

हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!

कर जोडुन मनःपुर्वक धन्यवाद देतो फक्त. तुमच्या विद्यार्थ्यांचे मात्र अभिनंदन... केवळ चांगले मार्क्स आणि अ‍ॅडमीशन मिळाली म्हणुन नव्हे तर योग्य वेळी योग्य हाताने त्यांना साथ दिली आणि डोळ्यापुढे आदर्शही.
__/\__

अर्धवटराव

चतुरंग's picture

22 Jun 2012 - 10:36 pm | चतुरंग

ज्या माणसांशी ओळख आहे असे सांगताना आपल्याला अभिमान वाटावा अशा फार थोड्या व्यक्ती असतात. मास्तर त्यापैकी एक आहेत!
(प्रभूसखा) रंगा

बिपिन कार्यकर्ते's picture

22 Jun 2012 - 10:45 pm | बिपिन कार्यकर्ते

शंभर टक्के सहमत, रंगाशेठ!

बिपिन कार्यकर्ते's picture

22 Jun 2012 - 10:44 pm | बिपिन कार्यकर्ते

खुद के साथ बातां : चला! मास्तरचं कौतुक तर झालं... आता मास्तरला मदत कोण कोण करणार?

अर्धवटराव's picture

22 Jun 2012 - 10:55 pm | अर्धवटराव

हेच स्वगत धाग्याच्या रुपाने मांडा. सविस्तर चर्चा करुया. मास्तरांच्या कार्याला हातभार लावायला मिपकर मिसळेची प्लेट खाली ठेऊन सहभागी होतील अशी खात्री आहे.

अर्धवटराव

बहुगुणी's picture

23 Jun 2012 - 1:32 am | बहुगुणी

प्रभू सरांचं आणि त्यांच्या विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन!

हे चांगलं काम वृद्धिंगत व्हावं म्हणून अनेक जण स्वेच्छेने हातभार लावायला तयार असतील याची खात्री आहे.

बिका आणि सरपंचः धागा टाकण्याचा नक्की विचार करा.

जाता जाता: सौ. प्रभूंचाही सहभाग खासच महत्वाचा, तेंव्हा त्यांचेही आभार आणि अभिनंदन.

बिपिन कार्यकर्ते's picture

23 Jun 2012 - 12:39 pm | बिपिन कार्यकर्ते

@अर्धवटराव आणि बहुगुणी : भापो. पण....

मास्तर इथे नवीन होते तेव्हा या मंचाचा त्यांच्या कामाकरता कसा आणि काय उपयोग करून घ्यावा यावरून सुरूवातीला त्यांच्याशी बोलणेही झाले होते. त्यानुसार, साधारण तीन वर्षांपूर्वी, त्यांनी दहावीला ज्यांना खूप चांगले गुण मिळायची अपेक्षा होती त्यांच्या गुणात कमीतकमी ५% वाढ होईल असा एक कार्यक्रम आखला होता. हा कार्यक्रम वर्षभर चालणार होता आणि यात शाळांचा सहभाग अपेक्षित होता. अर्थात, यासाठी काही विशिष्ट आर्थिक खर्चही अंदाजित होता. त्यावेळी (मला वाटतं मीच) मिपावर एक धागा टाकला होता. (नक्की आठवत नाहीये, पण मिपावर याबद्दल नक्कीच माहिती आली होती.) काही लोकांनी मदत केली. मात्र ज्या प्रमाणात लोकांनी कौतुक केले त्या प्रमाणात मदत मिळाली नाही हे मात्र खरे. (इतकेच नाही तर त्यावेळी मास्तरांची व्यक्तिशः आणि त्यांच्या कार्याची इथे टिंगल झाली होती. तेव्हाही मास्तर त्यांना हसले होते आणि चूपचाप आपलं काम करत राहिले होते.) आणि म्हणूनच मी माझी ही प्रतिक्रिया दिली.

हा झाला एक मुद्दा. अजून एक मुद्दा म्हणजे, तेव्हाही आणि आत्ताही, मास्तरांना आर्थिक मदत अपेक्षित नाही. इतकी वर्षे त्यांनी अक्षरशः स्वतःच्या कमाईतले पैसे वापरूनही मुलांना मदत केली आहे. आता तर ते काही सामाजिक संस्था / चॅरिटेबल ट्रस्ट यांच्याशी खूप जबळून निगडित आहेत आणि आर्थिक मदत करू शकतात. पण एखाद एकाम उभे रहायचे म्हणजे नुसते पैसे असून उपयोग नसतो. किंबहुना पैसे कमी असले तरी चालतील पण माणसं पाहिजे असतात ते काम पुढे न्यायला. आपल्यापैकी किती लोक मास्तरांना म्हणतील, "चला! आलो आम्ही. बोला काय करू?" ... अनुभव फारसा उत्साहवर्धक नाहीये. अर्थात, असे काम करणारे लोक, विशेषतः मास्तरासारखे, फारश्या उत्तुंग अपेक्षा ठेवून नसतात, त्यामुळे निराशही होत नाहीत. एकांड्या शिलेदाराच्या चिवटपणाने मास्तर शक्तीबाहेर काम करत राहतो. मास्तर ही प्रवृत्ती आहे. व्यक्ती नाही. आजही मास्तरांना गरज आहे ती हे काम करण्यात त्यांना मदत करणार्‍यांची. एखाद्याने यावं आणि म्हणावं "मास्तर, हे काम मी आमच्या गावात पोचवण्यासाठी तुम्हाला काही मदत करू शकतो का? काय आणि कसं? माझ्या गावात अमुक एवढी मुलं गरजू आहेत, तुमच्या क्रायटेरियामधे बसणारी आहेत. त्यांना पाठवू का?"

हे एवढं झालं तरी मास्तर त्या दिवशी आनंदाने रडेल!

रेवती's picture

23 Jun 2012 - 4:47 am | रेवती

मास्तरांना आम्ही तीन वर्षापूर्वीच काय ते सांगून ठेवलय. त्यांनी फोन केला की काम होईल.

कौशी's picture

22 Jun 2012 - 11:11 pm | कौशी

अभिनंदन गुरुजी..

खेडूत's picture

23 Jun 2012 - 12:36 am | खेडूत

अभिनंदन! आणि शुभेच्छा.
पुढे ती मुले पण इतरांच्या मदतीला धावतील..

इन्दुसुता's picture

23 Jun 2012 - 3:18 am | इन्दुसुता

मास्तरांचे व मुलांचे अभिनंदन व मास्तरांना पुढील कार्यासाठी अनेक शुभेच्छा

राजेश घासकडवी's picture

23 Jun 2012 - 6:55 am | राजेश घासकडवी

मनःपूर्वक अभिनंदन.

अभिनंदन! आणि शुभेच्छा

विनायक प्रभू's picture

23 Jun 2012 - 10:29 am | विनायक प्रभू

पिवळा डांबिस
यशोधरा
स्वाती
बिका
गणामास्तर
३ वर्षापुर्वी कार्यक्रम सुरु झाला तेंव्हा सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल.
तेंव्हा रोपटे होते आज वटवृक्ष झाला.
आणि हो रामदासांना कसा विसरेन बरे.

नाना चेंगट's picture

23 Jun 2012 - 11:11 am | नाना चेंगट

मास्तरसहीत वरील सर्वांचे अभिनंदन :)

श्रीयुत संतोष जोशी's picture

23 Jun 2012 - 10:37 am | श्रीयुत संतोष जोशी

मनापासून अभिनंदन , माझी तुमच्याशी प्रत्यक्ष ओळख आहे हे माझं भाग्य.

विनायक प्रभू's picture

23 Jun 2012 - 11:13 am | विनायक प्रभू

प्रसन्न केसकर आणि परा यांचे सुद्धा धन्यवाद.
हा कार्यक्रम पुण्यात पोचवणे त्यांच्या सहभागाशिवाय शक्य नव्हते.

प्रसन्न केसकर's picture

23 Jun 2012 - 2:08 pm | प्रसन्न केसकर

का लाजवता मास्तर?
तुम्ही कार्याचा डोंगर रचताय त्यातच आमची एखादी चिमुट. तसेही पत्रकारांचे आणि वृत्तपत्रांचे कामच आहे अशा कार्याला प्रसिद्धी देणे.
अंकिताची मदत मिळाल्यानंतरची मुलाखत http://www.dnaindia.com/pune/report_pune-medical-students-dream-comes-tr... येथे वाचता येईल.
डीएनए वृत्तपत्राने काल पुण्यात परिक्षेत अपेक्षेप्रमाणे यश न मिळालेल्या मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी कार्यशाळा आयोजित केली होती. तीमध्ये मास्तर कार्यबाहुल्यामुळे सहभागी होऊ शकले नाहीत. मुले त्यांच्या मार्गदर्शनाला मुकली याचा खेद वाटतो. या कार्यशाळेची बातमी http://epaper.dnaindia.com/story.aspx?id=20547&boxid=13868&ed_date=2012-... येथे वाचता येईल.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

23 Jun 2012 - 12:14 pm | घाशीराम कोतवाल १.२

हाबिणंदण गुर्जी.

समंजस's picture

23 Jun 2012 - 9:12 pm | समंजस

अभिनंदन असं म्हणणार नाही कारण तुम्ही त्याच्या पलिकडे आहात.

फक्त धन्यवाद!
तुमच्या सारखी काही वेडी माणसे समाजात असणे आवश्यक आहे त्यामुळे समाज थोडाफार का होईना चैतन्यशील आहे अन्यथा "झोम्बीज" च्या पलिकडे जास्त नाही.