"पुष्पक "

VINODBANKHELE's picture
VINODBANKHELE in जनातलं, मनातलं
14 Mar 2011 - 5:07 pm

राम राम, मिपाकर ,
न बोलता फटाके फोडण्या साठी मिपा संस्थळ प्रसिद्ध आणि म्हणून खूप लोकप्रिय आहे , अर्थात हे सांगण्याची काही गरज नाही म्हणा ,पण असेच एक माईल स्टोन स्थळ माझ्या आठवणीत आणि गुगल व्हिडिओ वर आहे त्याची आणि आपली भेट घडवावी म्हणून हे लेख पुष्प .
मला माझ्या नावाला जागवणारे बनवण्यात या चित्रपटाचा फार मोठा हात आहे, हा चित्रपट मी किती वेळा पाहिला काही गणतीच नाही आता पर्यंत ७ते८ वेळा सीडी विकत आणलीय आणि संपूर्ण सीडी उगळे पर्यंत पाहिलाय , आता तर पेन ड्राईव्ह मधेच असतो,
एक दुजे के लिये वाला कमल हसन माहित नाही असा असामी खरेच असामीच असू शकतो तो पण गेल्या चार पिढ्या पासून आफ्रिकेत रहाणाराअसेल बहुतेक , तसा कमल हसन आजच्या पिढीला देखील ऐकून का होईना माहित असेलच कारण त्याचे दशावतार काही फार शिळे नाही झाले अजून , अगदी झोकून देऊन काम करणारा कलावंत म्हणून जरी तो प्रसिद्ध असला तरी देखील हा लेख तुम्हाला त्याची माहिती देण्या साठी लिहिलेला नसून मला आवडलेला आणि भावलेला कमल हसन ज्या चित्रपटात मला भेटला त्या "पुष्पक "चित्रपट विषयी तुमच्याशी संवाद साधावा म्हणून हि सुरवात केलीय ,
या चित्रपटाची सुरवात होते कमल हसनच्या रुमच्या दर्शनाने आणि एका मराठी गाण्याच्या बोलांनी ,
पदर पडतो जीवनात तो अन भलत्याच जागी टाका उसवतो ,
बटन कितींदा लावायचं आता बटन कितींदा लावायचं ,
तांबडं फुटलंय आता राजसा कशाला कोंबडं झाकायच .

आणि सुरु होतात न बोलता वाजणारे फटाके , सगळे एक से एक आयटम , अगदी सुरसुरी पासून दस हजारी पर्यंत , आपण फक्त हसायचे आणि लोटपोट व्हायचे ,
कधीही ,कितीही वेळा ,कसेही ,कुठेही पाहिलातरी दर वेळेस तेवढेच हसवणारा हा पुष्पक माझ्या जीवनातील एक महत्वाचा आनंद दाता आहे ,हा आनंद तुमच्याशी शेअर करण्या साठी हा प्रयास ,
हि घ्या गुगल बाबा आणि कमल हसनची कृपा आणि मनसोक्त हसा , या चित्रपट विषयी मी काही बोलणे म्हणजे सरळ सरळ खंडीच्या वरणात मुतल्या सारखे होईल , संपूर्ण चित्रपटात कोणी काही बोलले नाही ,मग मी काय बोलू , फक्त तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर एन्जॉय करा हा चित्रपट ,हसून हसून पोट दुखले , गडबडा लोळताना काही दुखापत झाली तर न मी जबाबदार न कमल हसन ...................

जय गुगल बाबा ..............

अरर्र्र्रर्र्र्र लिंक राहिलीका ?

http://video.google.com/videoplay?docid=-4312765018546963901#

मजा करा .........................

ACTING - Kamal Haasan - the young unemployed man
Amala - magician's daughter
Sameer Khakhar - rich man
Tinu Anand - contract killer
K.S Ramesh - magician
Farida Jalal - magician's wife
Ramya Krishna - rich man's wife
Pratap K Potan - Lover of rich man's wife
Loknath - hotel owner
P.L. Narayana - Beggar
EDITOR - D. Vasu
DIRECTOR of PHOTOGRAPHY - B. C.Gowri Shanker
BACKGROUND MUSIC - L. Vaidyanathan
ART DIRECTOR - Tota Tharani
CO-DIRECTOR - Purna Pregna

चित्रे आणि माहिती जाला वरून साभार ...

विनोदमौजमजाचित्रपटप्रकटनसद्भावनामतसंदर्भशिफारसअनुभवमदतमाहितीआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

तसा तो इतरही भाशांत डब केला गेला असेल तर त्या त्या भाशेतही मला फारफार आवडतो

योगेश सुदाम शिन्दे's picture

14 Mar 2011 - 6:06 pm | योगेश सुदाम शिन्दे

कालच पाहिला ...परत एकदा ...असा बराच वेळा ' परत एकदा ' पाहिलाय . तात्पर्य हेच कि मला आवडला बाब्ब्बा ....
हेरोईन झक्कास दिसती त्यातली ... पण हे कारण नाहीये चित्रपट आवडण्याचे...

योगी९००'s picture

14 Mar 2011 - 6:06 pm | योगी९००

मला वाटले की परिक्षण वगैरे लिहिले की काय...मस्त चित्रपट...

बाकी चित्रपटाच्या दिग्दर्शकाचा उल्लेख नाही केला कोठे... संगितम श्रीनीवास राव यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. त्यांनी नंतर कमल हसनचा अप्पूराजा बनवला.

संपूर्ण चित्रपटात कोणी काही बोलले नाही ,मग मी काय बोलू , फक्त तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर एन्जॉय करा हा चित्रपट ,हसून हसून पोट दुखले , गडबडा लोळताना काही दुखापत झाली तर न मी जबाबदार न कमल हसन ...................

इतका काही हसवत नाही हा चित्रपट...तसेच मधे मधे करूण प्रसंग पण आहेत

हा चित्रपट मी किती वेळा पाहिला काही गणतीच नाही आता पर्यंत ७ते८ वेळा सीडी विकत आणलीय आणि संपूर्ण सीडी उगळे पर्यंत पाहिलाय
सीडी काय जात्यामध्ये घालत होता काय? माझी आत्तापर्यंत कोणतीही सीडी खराब झालेली नाही...भले मी ती सीडी कितीतरी वेळा वापरली असेल..