विहीर खोदण्याचा विचार

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
3 May 2019 - 8:24 am

विहीर खोदण्याचा विचार...

डोळ्यांतील उजेड कमीकमी होऊ लागला
हसण्यातील सच्चेपणा संपू लागला
तेव्हा मी विहीर खोदण्याचा विचार करू लागले....

जमिनीला भेगा, उन्हाच्या झळा
पाण्याची पातळी इतकी खोल
इतकी खोल....
कि आतला लाव्हाच दिसू लागला!
विहीर खोदल्यावर पाणीच लागेल
हे मी तरी कशाच्या आधारावर ठरवले?

डोळ्यांतील उजेड संपताना, संपू द्यावा
उन्हात हसू हरवताना, हरवू द्यावे
दुष्काळात विहीर खणू नये
जमिनीला कष्ट देऊ नयेत .....
इतकेच काय पावसाचीही वाट पाहू नये

आता, डोळ्यातील क्षीण उजेडाला फसवू नये
संपू पाहणाऱ्या हसण्याला धरून ठेवू नये.....

विहीर खोदण्याचा विचार मात्र.....??
विचार काही माझ्या आधीन नाही......

-शिवकन्या

अदभूतअनर्थशास्त्रइशाराकविता माझीकाणकोणकालगंगामाझी कवितामुक्त कविताधोरणमांडणीवावरवाङ्मयकवितामुक्तकसाहित्यिकसमाजजीवनमान

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

3 May 2019 - 9:22 am | ज्ञानोबाचे पैजार

तहान लागल्यावर विहीर खोदणे यालाच म्हणत असावे
पैजारबुवा,

रातराणी's picture

3 May 2019 - 9:55 am | रातराणी

सुरेख नेहेमीप्रमाणे!!

सोन्या बागलाणकर's picture

3 May 2019 - 11:46 am | सोन्या बागलाणकर

इच्छामरणावरती आहे का ही कविता?

श्वेता२४'s picture

3 May 2019 - 12:42 pm | श्वेता२४

कि आतला लाव्हाच दिसू लागला!
विहीर खोदल्यावर पाणीच लागेल
हे मी तरी कशाच्या आधारावर ठरवले?

शब्दानुज's picture

3 May 2019 - 1:26 pm | शब्दानुज

म्हातारपणावर आहे का हो कविता ? वय झाल्यावर जीवनरस संपत जाणारी कविता ?

शिव कन्या's picture

4 May 2019 - 10:56 am | शिव कन्या

आपण लावू तितके अर्थ.
कविता आहे, कोडे नाही. :))

पाषाणभेद's picture

4 May 2019 - 1:37 pm | पाषाणभेद

खॅ खॅ खॅ
विहीर नको पण पाऊस पडण्यापुर्वी जमीनीची नांगरट करावीच लागते ना? नांगरट खोल झाली तर जमीन भुसभूशीत होते. बी बियाणं चांगलं रुजते. वरून पाऊस असतोच दणकेबाज. मग पीकही चांगले जोमदार येते.

आमची माती अन त्यांची झालेली माती.
खॅ खॅ खॅ

अन्या बुद्धे's picture

4 May 2019 - 9:00 pm | अन्या बुद्धे

आवडली.. पण नेहमीप्रमाणे बांधीव नाही वाटली..

दुर्गविहारी's picture

5 May 2019 - 7:00 pm | दुर्गविहारी

चांगली आहे, पण काही तरी मिसींग वाटले.

बाकी "धागा काढण्याचा विचार" असे विडंबन कोण लिहीतयं बघू. ;-)

नाखु's picture

12 May 2019 - 10:59 pm | नाखु

आम्ही पूर्ण केलेली आहे.

कर्ता करविता स्वामि,आम्ही निमित्त पात्र

चौथा कोनाडा's picture

13 May 2019 - 1:24 pm | चौथा कोनाडा

कर्ता करविता स्वामि

हा हा हा !

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

7 May 2019 - 3:49 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

खोल आहे.

चौथा कोनाडा's picture

13 May 2019 - 1:25 pm | चौथा कोनाडा

जीवनरस शुष्क करणारे असे काही शब्द पाहून चटके बसले डोळ्यांना.

घश्याला कोरड पाडणारी कविता !

जालिम लोशन's picture

13 May 2019 - 3:15 pm | जालिम लोशन

लिहले आहे छान पण एक शब्द कळला नाही.