शरीरसंबंधांना नकार हे क्रौर्य ????

खटासि खट's picture
खटासि खट in काथ्याकूट
16 Dec 2013 - 9:27 am
गाभा: 

http://www.esakal.com/Tiny.aspx?K=E3NLG
(बातमी जुनीच आहे. कुणी तरी धागा काढेल असं वाटलं होतं म्हणून महत्वाचा असूनही मागे पडला विषय).

न्यायालयाच्या निकालावर टिप्पणी करणे हा उद्देश नाही. हा निकाल कोणत्या कायद्यामुळे दिला असावा अशा काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. शरीरसंबंधांना नकार या गोष्टीकडे मानवी हक्काच्या दृष्टीने पाहता येणार नाही का ? बलात्काराच्या व्याख्येत जर मनाविरुद्ध शरीरसंबंध ठेवले (लग्नाच्या जोडीदाराबरोबरही) तर तो बलात्कार ठरतो असं म्हटलय. मग या निकालामुळे ती व्याख्या चुकीची ठरतेय का असे कैक प्रश्न उभे राहतात. गोंधळ होतोय अशा परस्परविरोधी माहीतीमुळे.

दुसरीकडे केवळ पाच महीने शरीरसंबंध ठेवले नाहीत म्हणून डायरेक्ट घटस्फोटासाठी अर्ज करणे योग्य वाटतं का ? समजावून घेता आले नसते का ? कदाचित कारण समजले असते आणि उपायही सापडला असता. बाई आहे म्हणून तिच्या नकारामुळे इगो हर्ट झाला असेल का ? लग्नाच्या आधीच एकमेकांना समजून घेतलं असतं तर या गोष्टी टळल्या नसत्या का ? हेच जर पुरुषाच्या बाबतीत घडलं असतं तर त्या बाईला लगेच घटस्फोटाचा अर्ज देता आला असता का ? न्यायव्यवस्थेत महिलांचं प्रमाण वाढायला हवेय का असे प्रश्न अशा निकालांमुळे पडतात.

प्रतिक्रिया

मारकुटे's picture

16 Dec 2013 - 9:46 am | मारकुटे

समलिंगी संबंध आणि लिव ईन हेच समस्येवरचे उत्तर आहे. त्यामुळे स्त्रीमन पुरुषमन कळले नाही, समजावून घेता आले नाही वगैरे फापटपसारा नकोच. आणि ज्याच्याशी जमत, ज्याला जमत, त्याच्याशीच संबंध ! जै हो !

खटासि खट's picture

16 Dec 2013 - 10:00 am | खटासि खट

अहो साहेब,
तुम्ही लै भारी खेळाडू असला तरी दुखापतग्रस्त म्हणून टेबलटेनिसच्या मैदानात लॉन टेनिस खेळू शकाल का ? प्रतिक्रिया देताना जरा तरी संबंध जोडा कि..

अत्रुप्त आत्मा's picture

16 Dec 2013 - 11:07 am | अत्रुप्त आत्मा

अगागागागागागा.....! =))

आम्ही कुठेही काहीही खेळू शकतो. तुम्हाला जमत नाही त्याला आम्ही काय करणार? ऑ !! ;)

खटासि खट's picture

16 Dec 2013 - 6:55 pm | खटासि खट

ब्वॉर !!

बलात्काराच्या व्याख्येत जर मनाविरुद्ध शरीरसंबंध ठेवले (लग्नाच्या जोडीदाराबरोबरही) तर तो बलात्कार ठरतो असं म्हटलय.

चुकीची माहिती. बलात्काराच्या व्याख्येमध्ये लग्नाच्या जोडिदारांना वगळलेले आहे.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

16 Dec 2013 - 12:17 pm | विश्वनाथ मेहेंदळे

नक्की का ? कायद्यात हल्ली बदल झालेत की इतकी वर्ष चुकीचे ऎकत होतो ?

ऋषिकेश's picture

16 Dec 2013 - 2:42 pm | ऋषिकेश

इथे बघा
यात What is Rape? या प्रश्नाच्या उत्तराच्या शेवटी Exception दिले आहे.

बाकी हा कायदा पहिल्यापासून असाच आहे. यात बदल व्हावा अशी मागणी अनेकदा होते. (न्या.वर्मा कमिटीची शिफारसही होती)

खटपट्या's picture

17 Dec 2013 - 12:04 am | खटपट्या

जीव भांड्यात पडला

शैलेन्द्र's picture

16 Dec 2013 - 11:20 am | शैलेन्द्र

कसलं तळमळीने लिहीलयं हो.. :)

खटासि खट's picture

16 Dec 2013 - 11:44 am | खटासि खट

छोड दिया. दुखापतग्रस्तांची संख्या वाढवण्यात सध्या इंटरेस्ट नाही.

शैलेन्द्र's picture

16 Dec 2013 - 12:54 pm | शैलेन्द्र

गैर्समज :)

चालुद्या...

कौन्तेय's picture

16 Dec 2013 - 11:27 am | कौन्तेय

नकार हे क्रौर्य नाही. पण त्या आधारावर नवर्‍याला घटस्फोट हवा असेल तर त्यासाठी मोडते घातले गेल्यास सामान्य दृष्टीने क्रौर्य ठरेल. अर्थात या बातमीत नि वरच्या नोंदीत 'क्रौर्य' ही संज्ञा न्यायिक अर्थाने अभिप्रेत आहे. त्यामुळे मी म्हटले तसे हे सामान्य क्रौर्य घटस्फोट मिळवण्यासाठी पायाभूत बनेल वा नाही सांगता येत नाही. विषय लवचिक आहे. प्रत्येकाच्या कामतृप्तीच्या व्याख्या नि गरजा वेगवेगळ्या असू शकतात. त्यांत तडजोड करता न येण्याइतपत तफावत असल्यास नेमकं काय करायचं ते न्यायालय कसं सांगणार? ज्या जोडीदाराला 'पूर्ण संतोष' लाभत नाही त्याने (वा तिने) त्या कारणासाठी एक लफडे ठेवावे व त्याव्यतीरिक्त गुण्यागोविंदाने नांदावे असे न्यायालय कसे सांगणार? म्हणून या केसमधे घटस्फोटाचाच मार्ग योग्य होता असे वाटते.
अपत्यप्राप्ती होईपर्यन्तचा काळ हा चाचणी कालखंडच समजला जावा ... नि त्या कालखंडात आता हे पुढे न्यायचे की नाही हा पूर्ण विचार करून अपत्य जननाचे पाऊल उचलले जावे. पण एकदा का अपत्य आले की मग मात्र आपले 'व्यक्ती' म्हणूनचे आग्रह बाजूला ठेवून अपत्यासकट सगळ्यांनीच केवळ कुटुंब म्हणून जगावे अशी पद्धत रूढ व्हायला हवी असे गेल्या काही वर्षांत प्रकर्षाने जाणवत आहे. यात अनेक कारणांबरोबरच स्त्री-पुरूष दोघेही आपपल्या कामविषयक गरजांबाबत पूर्वी कधीही पेक्षा जास्त जास्त जागरुक झाल्यामुळेही अनेक जोडप्यांमधे वाद निर्माण होत आहेत. या केसमधे घटस्फोट झाल्याने लेखक खटासि-खटांना झालेले दु:ख स्वागतार्ह असले तरी आवश्यक नाही. हीच पाळी त्या बाईवर नवर्‍याने वा नवर्‍यावर बाईने अपत्यप्राप्तीनंतर आणली असती तर त्या घटस्फोटाला दोष देणे योग्य ठरले असते. इथे नाही असे वाटते.

खटासि खट's picture

16 Dec 2013 - 11:38 am | खटासि खट

या केसमधे घटस्फोट झाल्याने लेखक खटासि-खटांना झालेले दु:ख स्वागतार्ह असले तरी आवश्यक नाही >>>

न्यायालयाचं मत/ निकालपत्र हे पुढच्या केसेसमधे विचारात घेतलं जातं ना ? स्पष्टता नसेल तेव्हां जवळजवळ तो कायदाच समजला जातो हे खरं आहे ना ?

कौन्तेय's picture

16 Dec 2013 - 11:58 am | कौन्तेय

तुम्हाला शुद्ध मराठीत प्रिसीडंट म्हणायचे आहे ना. प्रत्येक केस ही वेगवेगळी हाताळली जावी व अनुचित प्रिसीडंट तयार होण्याच्या भीतीपायी धाडसी निर्णय घेण्यास कचरू नये असा न्यायसंस्थेचा संकेत आहे. वकीली पेशाचा नाही. वकील लोक सोयिस्कररित्या नेमके मागच्या केसेसमधले संदर्भ काढ-काढून न्यायमूर्तींना भंडावून सोडतात नि खरे न्यायासन त्यातला नीर-क्षीर विवेक करून निर्णय देते. आपली चर्चा आदर्शतः काय व्हावे अशी असल्याने न्यायासन competent आहे असे गृहित धरले आहे.

खटासि खट's picture

16 Dec 2013 - 12:03 pm | खटासि खट

मुद्दे मस्त मांडताय.
पूर्वी न्यायालयाचे काही निकाल वाचनात आले होते. पाहण्यातही होते. न्यायालयाने घटस्फोटाचे अर्ज विचारात घेताना कुणाला आणखी एक वर्ष, कुणाला त्यापेक्षा अधिक काळ एकत्र घालवावा मगच घटस्फोटासाठी अर्ज करावा असं सुचवलं होतं. म्हणूनच पाच महीने हा काळ वाचून आश्चर्य वाटले.

खटासि खट's picture

16 Dec 2013 - 11:42 am | खटासि खट

कोर्टाशी संबंधित कुठल्याही गोष्टीवर प्रतिक्रिया द्यायला सामान्यजन कचरतात. साहेबांना चिमटे काढण्यासाठी विशेष सूट असावी असं दिसतंय ;)

पैसा's picture

16 Dec 2013 - 1:04 pm | पैसा

याची एग्झॅक्ट व्याख्या कशी करणार? पट्ट्याने फोडून काढणे हे उघड क्रौर्य आहे. पण एखाद्या अतिसंवेदनाशील माणसाला असा सतत नकार हा खूप मानसिक त्रास देणारा वाटू शकेल बहुधा. ते मानसिक क्रौर्य या व्याख्येत येईल असं वाटतं.

प्रभाकर पेठकर's picture

16 Dec 2013 - 4:06 pm | प्रभाकर पेठकर

घटस्फोटाच्या कायद्यात 'डेझरटेशन' असा एक मुद्दा आहे. सातत्याने शरीरसंबंधास नकार असेल तर दुसर्‍या जोडीदारास घटस्फोटासाठी 'डेझरटेशन'च्या मुद्द्याचा आधार घेता येतो.

उद्दाम's picture

16 Dec 2013 - 1:04 pm | उद्दाम

दुसरीकडे केवळ पाच महीने शरीरसंबंध ठेवले नाहीत म्हणून डायरेक्ट घटस्फोटासाठी अर्ज करणे योग्य वाटतं का ? समजावून घेता आले नसते का ?

लग्न करतानाच धर्म अर्थ काम मोक्ष वगैरेसाठी लग्न करायचे हे आधीच कबूल केलेले असते. त्यामुळे नंतर पुन्हा समजूत घालत वेळ घालवून नवर्‍याने आपली जवानी बरबाद का करायची?

द्विभार्यापर्तिबंधक कायदा रद्दच करुन टाक्ल्यास हे प्रश्न उद्भवणार नाहीत.

खटपट्या's picture

17 Dec 2013 - 12:14 am | खटपट्या

अहो !! असे घाबरवू नका… आम्ही (मी आणि बायको) गेले दीड वर्षे भेटलो नाही आहोत …. म्हणून लगेच घटस्पोट ????

कवितानागेश's picture

16 Dec 2013 - 1:34 pm | कवितानागेश

अशा केसेस सहसा आधी कौन्सिलरकडे सोपवल्या जातात. त्यावेळेस नकारामागचं नक्की काय कारण आहे ते कळू शकतं.
बातमीतली माहिती अर्धवट वाटली.
असो.
झाला का त्यांचा घटस्फोट?
सुटूदेत बिचारे एकमेकांच्या तावडीतून!

बातमीतली माहिती अर्धवट वाटली.
सहमत आहे.

माझ्यामते भारतात शरीरसंबंधास दिलेला तात्पुरता नकार/अनिच्छा हे सबळ कारण नाहिये. अश्या संबंधास दिलेला कायमा नकार / असे संबंधच न ठेवणे हे सबळ कारण आहे असे वाटते

भारतातच का, इन जण्रल कुठेही हेच कारण लागू होत असेल असे वाट्टे. शिवाय ५ महिने हा कालखंड त्या दृष्टीने मोठा आहे.

विनायक प्रभू's picture

16 Dec 2013 - 6:02 pm | विनायक प्रभू

हल्ली लग्न झाल्यावर १ वर्षात विविध कारणांनी हा प्रकार सूरु होतो.
@बॅट्याला प्रश्न कळ्ळलाच नै.

विनायक प्रभू's picture

16 Dec 2013 - 4:54 pm | विनायक प्रभू

तुला काय रे माहीत?

बॅटमॅन's picture

16 Dec 2013 - 5:30 pm | बॅटमॅन

अहो साधं लॉजिक आहे हे. लग्न झालेलं नस्ताना आणि सेक्स केलेलं नसताना ती उर्मी किती प्रबळ असते हे त्या अवस्थेतून गेलेला कोणीही पुरुष सांगू शकेल. लग्न झाल्यावरही भावनेचा निचरा व्हावा तसा होत नसेल तर फ्रस्ट्रेशन प्रबळ का होणार नाही? अन तेही एखादा महिना नाही तर तब्बल ५ महिने असेल तर डोके फिरेल नैतर काय.

मृत्युन्जय's picture

16 Dec 2013 - 5:39 pm | मृत्युन्जय

स्प्ष्ट शब्दात सांगायचे तर लग्न व्हायच्या आधीची अवस्था कधीही गायीचे दूध न प्यालेल्या अश्वत्थाम्यासारखी असते. दूध काय हेच माहिती नसेल तर दूध नसल्याने फारसा फरक पडत नाही किंवा दूध म्हणुन काहिही मिळाले तरी चालते. एकदा दूधाची चव कळली की सगळीच गणिते बदलतात.

ते आहे हो, कमीतकमी कशाचीतरी चव मिळावी असे तर वाटणारच ना. ती कशी आहे वैग्रे पुढच्या गोष्टी झाल्या. बाकी सहमत हेवेसांनल.

विनायक प्रभू's picture

16 Dec 2013 - 6:06 pm | विनायक प्रभू

तुला प्रश्न कळ्ळलाच नै.
असो.

पिलीयन रायडर's picture

16 Dec 2013 - 6:09 pm | पिलीयन रायडर

तो प्रॉब्लेम आहे खरा बॅट्याचा.. अनुभव नाही...पण तरी (रादर म्हणुनच) जोरजोरात चर्चा करत अस्तो तो मॅरिडलोकांच्या प्रॉब्लेम्स बद्दल..!!

बॅटमॅन's picture

17 Dec 2013 - 12:44 am | बॅटमॅन

आणि तुला काय प्रत्येक गायनॅकॉलॉजिस्टने प्रेग्नंट झाल्याशिवाञ प्रॅक्टिस करू नये असेच म्हणायचे आहे बरोबर? =))

पिलीयन रायडर's picture

17 Dec 2013 - 1:10 pm | पिलीयन रायडर

नाही..पण विंजेनेर ने गायनॉक्लोजिस्ट सोबत सी सेक्शन बद्दल हिरीरिने वाद घालु नयेत हे मात्र म्हणायचे आहे..

सी सेक्शनबद्दल वाद घालतोय हा गूगलशोध पहिल्यांदाच पाहिला. मणोरञ्जणाबद्दल धण्यवाद!

बॅटमॅन's picture

17 Dec 2013 - 12:43 am | बॅटमॅन

ओक्के.

टवाळ कार्टा's picture

16 Dec 2013 - 6:22 pm | टवाळ कार्टा

+१

विनायक प्रभू's picture

16 Dec 2013 - 6:13 pm | विनायक प्रभू

@बॅ ट्या
जनरल नॉलेज का स्वानुभव

सुहास..'s picture

16 Dec 2013 - 6:58 pm | सुहास..

...असो

!!

आता उद्याच्या विषयाची तयारी करा ...काय नवीन / जुना विषय ?