हार्टब्लीड (Heartbleed) बग; आंतरजालावरील संस्थळावरील पासवर्ड बदलणे; काही शंका
आंतरजालाची २५ वर्षे झाली याचा आनंद साजरा होतो न होतो तोच मागोमाग फायरवॉल्स आणि अँटीव्हायरस आणि इतरही सुरक्षा वापरून निर्धास्त होऊ पहात असलेल्या सर्वांनाच हार्टब्लीड (Heartbleed) बग ही त्रुटी लक्षात येऊन मोठाच धक्का दिला आहे. जवळपास दोन तृतीयांश (२/३) वेबसाईट्सवर त्यात अगदी विश्वासार्ह समजल्या जाणार्या असंख्य वेबसाईट्स सहित अनेक ठिकाणी नोंदवलेले सदस्य नाव आणि पासवर्ड इतर व्यक्तीगत माहितीची गोपनीयता राखली न गेल्याची हादरवून टाकणारी शक्यता समोर आली आहे की ज्याबाबत सामान्य आंतरजाल उपयोगकर्ता काही म्हणजे काही करू शकत नाही.