बडोदा येथे "मी राज्य करण्यासाठी आलो आहे"
फर्जंद ए खास ए दौलत ए इंग्लीशिया, श्रीमंत महाराजा सर, सेना खास खेल शमशेर बहादूर महाराजा गायकवाड बडोदेकर
अशी पदवी धरण करणारे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड (तिसरे), जन्मनाव श्रीमंत गोपाळराव गायकवाड,
(मार्च १०, इ.स. १८६३ - फेब्रुवारी ६, इ.स. १९३९) हे इ.स. १८७५ ते इ.स. १९३९ सालांदरम्यान बडोदा संस्थानाचे अधिपती होते. बडोदा संस्थानातील प्रजेच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याकरता ते विशेषत्वाने ओळखले जातात.
जन्म: सयाजीराव नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तहसीलात कळवण(आज हा स्वतंत्र तालुका आहे) या गावी मेहेरबान श्रीमंत काशिराव भिकाजीराव उर्फ दादा साहेब गायकवाड (१८३२-१८७७) आणि श्रीमंत अखंड सौभाग्यवती उमाबाई साहेब यांच्या पोटी मराठा कुटुंबात द्वितीय सुपुत्र म्हणून जन्माला आले व श्रीमंत गोपाळराव गायकवाड हे नाव दिले गेले.
उत्तराधिकारी निर्णय: बडोद्याचे बहुचर्चित महाराजा सर श्रीमंत खंडेराव (१८२८-१८७०) यांच्या मृत्युनंतर त्यांचे बंधू मल्हारराव (१८३१-१८८२) राज्याचे उत्तराधिकारी होणार अशी अपेक्षा होती. परंतु त्यांनी खंडेराव महाराजांच्या जीवाला धोका पोचवण्याचे कारस्थान केल्याने पूर्वाश्रमी अटक झाली असल्याकारणाने आणि गंगा भागीरथी महाराणी जमनाबाई (१८५३-१८९८) ह्या गर्भवती असल्याने पोटातील मुलाचे लिंगनिदान न झाल्याने निर्णय होऊ शकला नाही. यथावकाश ५ जुलै १८७१ रोजी मुलीने जन्म घेतल्यामुळे मल्हाररावांना गादी प्राप्त झाली. परंतु मल्हाररावांनी पैसे उडवून(ज्यात प्रामुख्याने मोत्याचा गालीचा व चक्क सोने वापरून दोन तोफा बनवल्या) दौलतीचे अतोनात नुकसान केले. आपली चूक दडविण्यासाठी अर्सेनिकच्या संयुगाचा विषप्रयोग केल्यामुळे १० एप्रिल १८७५ रोजी भारतीय राज्याचे सचिव लॉर्ड सॅलीस्बरी यांनी आदेश देवून मल्हाररावांना पदमुक्त केले.
राज्यप्राप्ती: सिंहासनावर कोणीच बसू न शकल्याने महाराणी जमनाबाई राज्याच्या सर्व परगणा(विभाग)प्रमुखांना दौलतीसाठी उत्तराधिकारी शोधण्यासाठी आपल्या मुलांना घेवून बोलावले.कळवणहून काशिराव आनंदराव(१८५७-१९१७), गोपाळराव (१८६३-१९३८) आणि संपतराव (१८६५-१९३४) या आपल्या तिन्ही मुलासोबत ३५०(कि ६००?)किलोमीटर दुरून आले. असे समजते कि प्रश्नोत्तरांच्या दरम्यान बडोद्याला का आले असे विचारले असता गोपाळरावांनी बडोदा येथे “मी राज्य करण्यासाठी आलो आहे” असे रोखठोक उत्तर देवून निवडसमितीचे मन जिंकून ब्रिटीश सरकारचे बडोदा संस्थानाचे उत्तराधिकारी म्हणून निवडले गेले.
महाराणी जमनाबाईंनी गोपाळरावांचे २७ मे १८७५ रोजी रीतसर दत्तकविधान करून सयाजीराव असे नामकरण केले. कायद्याने सज्ञान झाल्यावर २८ डिसेंबर १८८१ रोजी त्यांना बडोदा संस्थानाचे पूर्ण अधिकारी बनवले गेले. तोवर राजा सर टी. माधव राव यांच्या अधिपत्याखाली सयाजीरावांना राज्यव्यवस्थेचे शिक्षण दिले गेले.
क्रमश:
ता.क. हा इंग्लिशविकिपिडीयावरचा मूळ लेख मराठीत भाषांतरीत केला असून मराठी विकिपिडीयावर देण्यासाठी काळजीपूर्वक लिहिण्याचा प्रयत्न आहे. आपल्याकडे अधिक माहीत असल्यास वा या लेखात काही तफावत किंवा चूक आढळल्यास अवश्य नमूद करावी ही विनंती.
प्रतिक्रिया
छान भाषांतर
बहुत धन्यवाद!
सूचना आवडली.
"रेसिडेंट" हे पद असे. बडोदा,
"रेसिडेंट" किंवा पूर्ण नाव
रेसिडेंट (ब्रिटीश राजसत्तेच्या प्रतिनिधी)
फोटो
मी राज्य करायला आलोय....
महाराजा सयाजीराव गायकवाडांचा आदर्श
महाराजा सयाजीराव गायकवाड एक महान प्रशासक होते!
हिटलरला भेटणारे पहिले भारतीय होते सयाजीराव गायकवाड!
पर्ल कारपेट:1989 ची किंमत तीन कोटी दहा लाख अमेरिकी डॉलर्स...
छान माहिती
कौळाणे (नि.) ता. मालेगांव जि. नाशिक
व्वा...
इतका सुंदर वाडा कोणी पहिलाय का आजकाल? कृपया माहिती पुरवावी.
बडोदे संस्थान
वासुदेव बळ्वंत फडके
सयाजीरावांची नात