सल्ला

माझे सल्ले

सदासुखि's picture
सदासुखि in जनातलं, मनातलं
13 Dec 2013 - 2:25 pm

काहि दिवसांपासुन मला (उगाचच) असे वाटत आहे कि मी सल्ले (प्रवचन?) छान देऊ शकते.उदा. ऑफीस चा ताण कमी कसा करावा, बॉसचा त्रास कसा टाळावा,मुलांबद्द्ल जास्त काळजी वाटल्यास काय करावे,आई रागवल्यास काय करावे? इ.
पण कसे आहे आपण दिलेला सल्ला लिखित रुपात राहिला तर्?असे मला वाटले म्हणुन इथे लिहित आहे.(खरं तर तसे मी सल्ले(मुलाच्या शब्दात प्रवचन ) खूप देत असते नवरोजींना.पण ते तुळ राशीचे असल्याने प्रतिक्रिया देत नाहीत.कदाचित त्यांना बॉस खूप त्रास देतो म्हणून माझे सल्ले काम करत नसतील.असो म्हणूनच इथे प्रतिकिया काय मिळतात ते पहायचे आहे!)

जीवनमानसल्ला

अजूनही मराठी लेखन अवघड आहे ?

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
5 Dec 2013 - 5:09 pm

आंतरजालावर युनिकोडात मराठी टाईप करण्याच्या आतापर्यंत खूप सगळ्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.तरीही मराठी विकिपीडियावरील आकडेवारी नुसार आजही ६०% लोकांना मराठी विकिपीडियावर मराठीत टाईपकरणे जमत नाही.दिवसाकाठी किमान २ ते ४ नवी रोमनलिपीतून मराठीत लिहीण्याचा प्रयत्न करणारी मंडळी थांबवावी लागते.विवीध पद्धतीने सहाय्य उपलब्ध करून देऊन सुद्धा आपण नेमके कुठे कमी पडत

लिवैनरिलेशनितेचे आईस पत्र

खटासि खट's picture
खटासि खट in जनातलं, मनातलं
3 Dec 2013 - 7:30 pm

प्रिय आई,

प्रत्येक मुलिप्रमाणे मी ही लिवइनरिलेशनशिप (लिइरि) बद्द्ल कोर्टाचा निर्नय आल्यापासुण खुप उत्सुक होते. माझ्या राजकुमारांची स्वप्ने रंगवत होते.

पण आज मला जाणिव होते आहे की लिइरि म्ह्णजे फक्त गुलाबी स्वप्ने. लिइरि म्हणजे केवळ तुमच्या लाडक्या व्यक्ति सोबत राहाणे . तर लग्न म्ह्णजे जबाबदार्या, त्याग, कटकटी आणि तडजोडी यांवर अवलंबुन असलेली एक संस्था आहे.

संस्कृतीशुद्धलेखनसमाजजीवनमानराहणीसद्भावनाअभिनंदनअनुभवशिफारससल्लामदतवाद

पॅरलल पार्किंग

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जनातलं, मनातलं
30 Nov 2013 - 5:45 pm

गाडी चालवणा-या समस्त लोकांपैकी फार कमी लोकांना पॅरलल पार्किंग व्यवस्थित जमतं. माझ्या सोसायटीतल्या काही महाभागांना तर पार्किंग नावाचं काही असतं हेच माहित नाही; ते येतात आणि जिथे भिंत समोर येईल तिथे गाडी थांबवून उतरून घरी जातात. असो.

पॅरलल पार्किंग हे खूप महत्वाचं स्किल आहे स्किल, माझ्या मते. आणि ते यायला हवं. ते वाटतं तितकं कठीण नव्हे. जराशी भूमिती, जरासं गणित, आणि जरासा अंदाज आला, की झालं.

मांडणीसमाजजीवनमानतंत्रविचारलेखअनुभवमतसल्ला

मदत....

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
29 Nov 2013 - 4:51 pm

मला माझ्या काही पुस्तकांचे ई-बुक विक्रीस उपलब्द्ध करायचे आहे. मी काही कंपन्यांची सॉफ्टवेअर बघितली व त्यांच्या साईटही पाहिल्या. काहीजण म्हणतात डी एम आर वापरु नका तर काही म्हणतात त्याला पर्याय नाही. मला पायरसी होणार नाही असे काहीतरी पाहिजे. अर्थात मला कल्पना आहे ते १०० % होउ शकत नाही पण ८० % झाले तरी खूप आहे.....

आपल्या मिपावर अनेक सॉफ्टवेअर तज्ञ आहेत त्यांनी जर थोडा वेळ काढून अभ्यास करुन काय वापरणे ठीक राहील याचा सल्ला दिला तर मला चांगली मदत होईल..... ती विनंती करण्यासाठी हा धागा...अर्थातच इतरांनाही त्याचा उपयोग होईल...

जयंत कुलकर्णी

तंत्रमतसल्ला

युद्धाचे वादळ या पुस्तकाचे मुखपृष्ठ.....

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
23 Nov 2013 - 5:56 pm

मित्रांनो,
मी माझ्या पुस्तकाचे मुखपृष्ठ स्वतः तयार केले आहे. ( आपल्याला आठवत असेल यातील दोन पूर्ण प्रकरणे मी मिपावर टाकली होती एक होते ज्यूंच्या शिरकणाबद्दल आणि दुसरे एक होते. असो) आता मी पुस्तक पूर्ण केले आहे (८३० पाने). हे जे मी मुखपृष्ठ तयार केले आहे ते ठीक आहे का याबद्दल आपली प्रांजळ मते मागवीत आहे. जर तुम्हाला आवडले तर मी दुसरे कव्हर डिझाईन करणार नाही व माझा बराच वेळ वाचेल. अर्थात जर दुसरे मत पडले तर मला ते करावेच लागेल....जेव्हा प्रकाशन होईल तेव्हा अर्थात मी कळवेनच....
पहिले मागचे पृष्ठ आहे.

कलासल्ला

२० मिनिटात होणारा व्यायाम - सर्किट ट्रेनिंग

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जनातलं, मनातलं
22 Nov 2013 - 7:27 am

व्यायाम हा प्रत्येक आणि प्रत्येक जणाला किती महत्वाचा आहे हे सगळेच जाणतात. ते नव्याने सांगायला नको. पण तो न केला जाण्याची जी अनेक कारणं असतात त्यापैकी जास्तीत जास्त जणांना लागू होणारी आणि टॉप ३ कारणं अशी असतील.
१. कंटाळा
२. वेळच नाही (याचं खरं कारण क्र.१ आहे)
३. त्यापेक्षा सोप्पं काहीतरी सांग ना

समाजजीवनमानराहणीविचारसल्लामाहिती

कुठली कार घ्यावी?

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in काथ्याकूट
19 Nov 2013 - 2:05 pm

नमस्कार मिपाकर मंडळी

माझा कार घ्यायचा विचार चालु आहे.
बजेट- ५-६ लाख

वापर शनिवार/रविवार नक्की. इतरवेळी कधीतरी ऑफिसला येण्यासाठी..
नेहमीप्रमाणे जास्त मायलेज,कमी मेंटेनन्स्,सर्व सुविधा,आफ्टर सेल सर्व्हिस या अपेक्षा आहेतच.

काही प्रतिक्रिया
मारुती-- स्पेअर पार्ट स्वस्त आणि मस्त,सगळीकडे उपलब्ध,पण पिक अप नाही (ओवरटेक करताना दम तोडते),पत्रा पुचाट,अक्सिलेटरला जोर लावावा लागतो

फोर्ड्-दणकट गाडी,लाँग ड्राइव्हला मस्त पण सर्विसिंगला महाग,अॅव्हरेज कमी

टोयोटा- गाडी बेस्ट,स्पेअर पार्ट महाग

फोक्सवॅगन- फारशी माहीती नाही

मि.पा वर नवीन सोयींबाबत

निरु's picture
निरु in काथ्याकूट
14 Nov 2013 - 10:47 am

नमस्कार. मि. पा. वर मी तसा नवीनच आहे. भटकंती करता करता मनोगतावरुन इथे आलो आणि इथलाच होतोय हळूहळू.

एक दोन सोयी मि. पा. वर असाव्यात असे वाटते.

२०१४ च्या निवडणुकीनंतरचा झांगडगुत्ता : एक सोल्युशन

खटासि खट's picture
खटासि खट in काथ्याकूट
7 Nov 2013 - 7:37 pm

सालाबादप्रमाणे पाच वर्षांनी निवडणुका येणार. काही जण गुडघ्याला बाशिंग लावून बसले. काही काळजीत पडले, काही बोहल्यावर चढले, काही लाल किल्ल्यावर चढून बसले, काही टवाळ मोडात गेले, काही मवाळ मोडात गेले तर काही मौनात गेले. पण कर्णपिशाच्चाने सांगितलं कि सगळेच आपटणार म्हणून. च्यायला, सगळ्यांना कधी ना कधी चान्स मिळाला, आता कुणाला चुना लावताय या मोडात मतदार आहे. त्याला जास्त चुना लावायला गेलं तर जाळ होणार यात शंका नाही.