१-२ BHK सदनिका पुणे भागामध्ये... गुंतवणूक रक्कम (४५ लक्ष)
नमस्ते,
मला गुंतवणूक सल्ला हवा आहे. मिपा कार जाणकार असल्याने सल्ला घेणे पसंत करतोय.
१ स्थावर मालमत्ता विकून नवी १-२ BHK सदनिका पुणे भागामध्ये स्वरुपाची गुंतवणूक करणेचे योजतोय. व्यक्तिगत शोध मोहीम सुरु आहेच. एखादा धागा मिळाला तर शोध सोपा होईल.
विशेष माहिती-::
गुंतवणूक रक्कम (४५ लक्ष)
पुणे भाग म्हणजे वाघोली-कात्रज-रावेत-मांजरी हद्द गृहीत धरतोय.
नवीन सदनिकेत राहण्याचा विचार अजिबात नाही.
४-५ वर्षांनी सदनिका विकणे हा विचार पक्का.
बांधकाम सुरु असलेले प्रकल्प चालतील. ताबा मिळण्याची गडबड नाही.
धन्यवाद!