Skip to main content

अर्थकारण

ते पंधरा लाख !

लेखक सुधीर मुतालीक यांनी सोमवार, 04/06/2018 16:14 या दिवशी प्रकाशित केले.
२०१४ च्या निवडणुकीच्या धामधुमीत प्रत्येक अकौंटमध्ये पंधरा लाख जमा करू अशी घोषणा झाली आणि जणू प्रत्येक भारतीय कधी एकदा तो एसेमेस आपल्या मोबाईलवर येतोय याची डोळ्यात प्राण आणून वाट बघत होता. दोन तीन वर्षे झाले तरी असे काही झाले नाही हे जाणवून कळवळलेल्या जनसमुदायांनी " फेकतोय साला" अशी ओरड सुरु केली. माझ्या मते ते पंधरा लाख प्रत्येकाच्या अकौंटमध्ये कधीच जमा झाले आहेत. कल्पना अशी असेल की ते पैसे प्रत्यक्षात जमा व्हावेत आणि त्यातून आपण गाडी खरेदी करावी वा माडी बांधावी तर तसे फुकटच्या पाकट का बरे व्हावे आणि कशासाठी ? हे समजावून सांगण्याची गरज असू शकते. पण समजावून सांगितलं नाही हे ही ठीकच आहे.

( पुन्हा नोटा )

लेखक गबाळ्या यांनी मंगळवार, 19/12/2017 04:04 या दिवशी प्रकाशित केले.
नोटा (चाल : गे मायभू तुझे मी) नोटा अनेक असती येती तुझ्याकडे त्या मी नोट शोधतो माझी परक्याच भासती साऱ्या दूरस्थ योजना* त्या खुणवी सदा मनाला मी गुंतवित जाता बुडतात घेऊनि मजला मागावयास जाता देती कुणी न काही नोटांनी भरले पाकिट मी स्वप्नी रोज ते पाही * योजना - बँका, पतपेढ्या इ. आणतात त्या नवनवीन "स्कीम"

चार कोटी रुपये .......

लेखक आनन्दा यांनी मंगळवार, 07/11/2017 22:52 या दिवशी प्रकाशित केले.
गाभा: चार कोटी रुपये ....... "शेअर मर्केटमधून पैशांचा पाऊस ! भोंदू ब्रोकरने व्यावसायिकाना चार कोटी रु.ना गंडवले." या शीर्षकाची बातमी कोल्हापूर म.टा.(०१-११-२०१७) मध्ये अनेकांनी वाचली असेल. ती अशी:- कोल्हापुरात अनेक डॉक्टर आहेत. ते डॉ. असणार म्हणजे त्यांच्याकडे किमान बुद्धी आणि पैसा असणारच. त्यांच्याकडे गुन्तवणुकदारांचे, बँकवाल्यांचे येणे- जाणे असते. क्षक्षक्ष नावाचा शेअर ब्रोकर त्या डोक्टरांकडे आला. "तुम्हांला धंद्यात चांगली प्राप्ती आहे, मी शेअर मार्केट नावाचा अक्षय धनाचा कुंभ देतो. हवे तेवढे धन मिळेल. " असे सांगून त्याने प्रत्येकाडे काही लाख रुपये मागितले. वैद्यांनी आनंदाने दिले.

कॅशलेस अर्थव्यवस्था आणि चोरी/भ्रष्टाचार

लेखक मिल्टन यांनी मंगळवार, 24/10/2017 20:32 या दिवशी प्रकाशित केले.
साधारण चार महिन्यांपूर्वीची गोष्ट. संध्याकाळी ऑफिसमधून घरी परतत होतो आणि कुर्ला स्टेशनवर नव्या मुंबईकडे जाणार्‍या लोकल ट्रेनची वाट बघत होतो. बर्‍याचदा संध्याकाळी भूक लागली की मी स्टेशनवरून खायला एखादा बिस्किटाचा पुडा घेतो.त्याप्रमाणे त्या दिवशी मी एक बिस्किटाचा एक पुडा घेतला. तो पुडा होता १० रूपयाचा. मी त्या स्टॉलवाल्याला १०० ची नोट दिली. वरचे पैसे परत देताना त्याने ५० ची एक नोट दिली आणि २० रूपयाच्या दोन नोटा दिल्या. तेवढ्यात माझी गाडी आली त्यामुळे त्या नोटा घेऊन घाईघाईतच मी गाडीत चढलो.

प्राध्यापक रिचर्ड थेलर यांना नोबेल पारितोषिक आणि बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्स

लेखक मिल्टन यांनी सोमवार, 09/10/2017 23:39 या दिवशी प्रकाशित केले.
अर्थशास्त्रातील सर्वोच्च मानाच्या नोबेल पारितोषिकासाठी रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचेही नाव विचारात घेतले जात आहे असे क्लॅरीव्हेट अ‍ॅनॅलिटिक्स या कंपनीने म्हटल्याची बातमी शनीवारी ७ ऑक्टोबरला आली आणि अर्थशास्त्रातील हे मानाचे पारितोषिक नक्की कोणाला मिळणार याची उत्सुकता चाळावली गेली.

बुलेट ट्रेन (भाग ६)

लेखक Anand More यांनी गुरुवार, 28/09/2017 14:56 या दिवशी प्रकाशित केले.
मागील पाच भागात आपण भारतातला ताजमहाल, अमेरिकेतील हूवर धरण, जपानची शिन्कान्सेन, तैवानची बुलेट ट्रेन, श्रीलंकेचा मटाला राजपक्षा आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि हॉंगकॉंगचा हॉंगकॉंग आंतरराष्ट्रीय विमानतळ यांच्या आर्थिक बाजूंचा विचार केला. यातील हूवर धरण, शिन्कान्सेन आणि हॉंगकॉंग आंतरराष्ट्रीय विमानतळ सोडल्यास इतर प्रकल्प आर्थिक दृष्ट्या आतबट्ट्याचा व्यवहार ठरले आहेत हे देखील पाहिले. याशिवाय, विरळ लोकवस्ती असलेल्या अमेरिकेत अजूनही बुलेट ट्रेन नाहीत. तुलनेने घनदाट वस्ती असलेल्या स्पेन, फ्रान्स आणि जर्मनी मधील जलद गती रेल्वे तोट्यात आहेत आणि त्यांचा सुरक्षिततेचा रेकॉर्ड फार उल्लेखनीय नाही.

बुलेट ट्रेन (भाग ५) : अफू, हॉंगकॉंग आणि चेक लॅप कोक

लेखक Anand More यांनी गुरुवार, 28/09/2017 08:10 या दिवशी प्रकाशित केले.
अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपात मुक्त व्यापाराचे वारे वाहात होते. अॅडम स्मिथने सांगितलेल्या अर्थविषयक अनेक तत्वांपैकी काही काही तत्वे युरोपातील देशांनी स्वीकारायला सुरुवात केली होती. 'देशाची संपत्ती म्हणजे तिथे तयार होणाऱ्या वस्तू आणि सेवा' हे तत्व मान्य झालेले होते. सरकारने बाजारात पडू नये, केवळ कायदे करावेत आणि राजनैतिक संबंध सांभाळावेत हे तत्व अर्धेमुर्धे पटलेले होते. अर्धेमुर्धे म्हटलं कारण सरकारने बाजारात उतरू नये हे तत्व युरोपातील बहुतेक सरकारे पळत होती पण अॅडम स्मिथचा ज्याला तीव्र विरोध होता टी मक्तेदारी मात्र सरकारी आशीर्वादाने फोफावत होती.

बुलेट ट्रेन (भाग ४) : तैवान आणि श्रीलंका

लेखक Anand More यांनी बुधवार, 27/09/2017 11:37 या दिवशी प्रकाशित केले.
बुलेट ट्रेन प्रकल्पात इतर देशांनी आपल्याला फसवले आहे का? की आपणच आपली फसगत करून घेऊन एक पांढरा हत्ती आपल्या पुढील पिढ्यांच्या गळ्यात मारला आहे? जर हा प्रकल्प सुरु झालाच आहे तर मग आता आपण पुढे काय करू शकतो? या प्रश्नांची उत्तरे देण्यापूर्वी वाहतुकीसंबंधीच्या तीन महाकाय प्रकल्पांबद्दल मी काय वाचले आहे ते चौथ्या आणि पाचव्या भागात प्रथम सांगतो आणि मग सहाव्या भागात वरील प्रश्नांची उत्तरे देऊन ही लेखमाला संपवतो. पहिला प्रकल्प आहे तो तैवान बुलेट ट्रेनचा. तैवान हा एक छोटासा देश आहे. श्रीलंकेच्या बेटाची रुंदी जर कमी केली तर ते बेट जसं दिसेल साधारणपणे तसाच तैवानचा आकार आहे.

बुलेट ट्रेन (भाग ३) शिन्कान्सेन, बुलेट ट्रेन, नॅरो गेज, स्टॅंडर्ड गेज, ब्रॉड गेज

लेखक Anand More यांनी मंगळवार, 26/09/2017 13:07 या दिवशी प्रकाशित केले.
भाग २ ज्याला जगभरात बुलेट ट्रेन म्हणतात त्याला जपानमध्ये शिन्कान्सेन म्हणतात. शिन्कान्सेन या जपानी शब्दाचा इंग्रजीत शब्दशः अर्थ होतो New Trunk Line. आपण मराठीत त्याला म्हणूया 'नवी रेल्वे लाईन'. यातलं बाकीचं सगळं नंतर बघूया पण 'नवी' या शब्दात जपानमधल्या या प्रकल्पाचे कारण दडले आहे. ही जर नवी रेल्वे लाईन आहे तर जुनी रेल्वे लाईन असणारंच. आणि कुठल्या ना कुठल्या कारणाने जपानी लोकांना नवी रेल्वे लाईन चालू करावीशी वाटले असणार. काय होती ती कारणं? आणि नवी रेल्वे लाईन आल्यावर जपानमधली जुनी रेल्वे लाईन बंद झाली का?

बुलेट ट्रेन (भाग २) प्रकल्पाचे लाभार्थी

लेखक Anand More यांनी सोमवार, 25/09/2017 10:42 या दिवशी प्रकाशित केले.
बुलेट ट्रेनवरच्या लेखमालेच्या पहिल्या भागात ताजमहाल आणि हूवर धरण याची तुलना करून बुलेट ट्रेन प्रकल्पापुढील आव्हाने मांडायचा प्रयत्न केला होता. मुख्य मुद्दा एकंच होता. ताजमहाल संपूर्ण सल्तनतीच्या गोळा करून ठेवलेल्या करातून बनला आणि जेव्हा त्यामुळे सल्तनतीचा खजिन्यात ठणठणाट झाला तेव्हा पुढील सम्राट औरंगझेबाला संपूर्ण सल्तनतीकडून नवीन जाचक कर वसूल करावे लागले.