अर्थकारण

कॅशलेस ? एक DW Documentary

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
6 Dec 2018 - 1:50 pm

कॅशलेस विषयावर मिपावर या पुर्वी बरेच गुर्‍हाळ होऊन गेले आहे. युरोमेरीकेत होत असलेल्या कॅशलेस बदलांच्या आढावा घेणारी एक चांगली ताजी म्हणजे अलिकडील डॉक्युमेंटरी युट्यूबवर पहाण्याचा योग आला. बेचाळीस मिनीटांची आहे, विषयात रस आणि वेळ असल्यास अवश्य पहावी.

डॉक्युमेंटरीचे युट्यूबवरील डिस्क्रीप्शन खालील प्रमाणे आहे.

Cashless payments are on the rise. They are fast, easy and convenient. Worldwide, cashless transactions have become the norm.

अर्थकारणअर्थव्यवहार

उद्योग/व्यापार : प्रस्तावना

टर्मीनेटर's picture
टर्मीनेटर in जनातलं, मनातलं
24 Nov 2018 - 8:33 pm

मराठी माणूस उद्योग/व्यापारात मागे का? ह्या विषयावर आजपर्यंत शेकडो-हजारो लेख, व्याख्याने आणि भाषणे झाली आहेत. असे लेख लिहिणारे आणि व्याख्याने-भाषणे देणाऱ्यांमध्ये काही सन्माननीय अपवाद वगळता प्रामुख्याने ज्यांनी आयुष्यात कधीच उद्योग/व्यापार केला नाही असे लोकं तसेच व्याख्याने किंवा भाषणे देणे हाच ज्यांचा उद्योग आहे असे “लोकां सांगे तत्वज्ञान, आपण कोरडे पाषाण” ह्या सदरातील लोकं आणि पु.ल. देशपांडेंनी 'पुणेकर,मुंबईकर कि नागपूरकर?' मध्ये म्हंटल्या प्रमाणे " दुकानात सगळ्यात दुर्लक्ष करण्यासारखी वस्तू, म्हणजे गिर्‍हाईक - हे सूत्र आहे इथलं! त्यामुळे खास त्या ढंगाचे दुकान हे सात-आठ वर्ष चालते.

मांडणीअर्थकारणप्रकटन

विश्वस्तवृत्तीकडे वाटचाल

arunjoshi123's picture
arunjoshi123 in जनातलं, मनातलं
11 Nov 2018 - 12:43 pm

या जगाकडे पाहण्याचे दोन दृष्टीकोण आहेत- एक असा की हे विश्व निराधार नि निरीश्वर आहे. दुसरा असा की ते साधार नि ईश्वरप्रणित आहे. निराधार विश्व आपसूकच निरर्थक ठरतं. कारण शेवटी अशा विश्वातली प्रत्येक गोष्ट ही केवळ भौतिक स्वरुपाची असते. आणि स्वतःचे अस्तित्व असल्याचे भान असलेल्या, स्वतःस मुक्तेच्छा आहे असे मानत असलेल्या, बुद्धिमान, विवेकी, विचारी मनुष्यजातीस आपण केवळ करकच्च नियमांनी बांधलेले एक भौतिक पदार्थ आहोत असं सांगणं म्हणजे त्याच्या स्वतःसकट सगळं काही निरर्थक आहे असं सांगीतल्याजोगं आहे.

अर्थकारणअनुभव

आर्थिक गुंतवणूक आणि घोटाळे

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
5 Nov 2018 - 9:31 pm

वीस एक वर्षांपुर्वी नाशकातल्या त्रिमुर्ती चौकात दक्षिण भारतीय लोकांनी एक बंगला भाड्याने घेतला होता. तेथे त्यांनी संसारोपयोगी वस्तू विकण्याचा धंदा सुरू केला होता. म्हणजे लोखंडी खुर्च्या, पातेले, जग, कढई, चटया, कूकर, फॅन, पलंग अगदी पाण्याचा पेला देखील. तर या सार्या वस्तू ते कमी किमतीत विकत. काही दिवसांत त्यांचा जम बसला. त्यावेळी लोकवस्ती नवीनच होती. लोकं वस्तू विकत घेत आणि इतर वस्तूंची आगावू मागणी करत. आगावू मागणीच्या वस्तूसाठी ते लोक आधीच पैसे मागत. गिर्हाईकही स्वस्तात वस्तू मिळते म्हणून पैसे जमा करत. असे सहा सात महीने झाले.

अर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकलेख

सुरक्षा विमा आहे, साहेब?

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
27 Oct 2018 - 10:38 am

कालची गोष्ट, उत्तम नगर मेट्रो स्टेशनवर उतरल्यावर नेहमीप्रमाणे घरी येण्यासाठी इलेक्ट्रिक रिक्षा घेतला. दिवाळीचे दिवस साहजिक आहे, रस्त्यावर ट्राफिक वाढणारच. दिल्लीकरांची एक अत्यंत वाईट सवय, रस्त्यावर जरा हि ट्राफिक दिसले कि लगेच वाहन रॉंग साईट वर घ्यायचे. रिक्षावाला हि त्याला अपवाद नाही. पंखा रोड वर ट्राफिक पाहून, सवयीनुसार रिक्षा चालकाने, समोरून येणार्या बसची पर्वा न करता, रिक्षा रॉंग साईड वर टाकला. चालक शेजारी बसलेल्या सवारीने त्याला टोकले, रिक्षा बस खाली असती तर, तू तर वर गेला असता, सोबत आम्हाला हि घेऊन गेला असता.

अर्थकारणविचार

जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण { भाग-६ } ट्रेड वॉर

मदनबाण's picture
मदनबाण in जनातलं, मनातलं
7 Jul 2018 - 8:15 pm

आज ७-०७ -२०१८ काल पासुन अमेरिका आणि चीन मध्ये ट्रेड वॉर सुरु झाले आहे. सगळीकडे आता याची चर्चा होत आहे.
चीन त्यांच्या डिफेन्स बजेट मध्ये मोठी वाढ करत चालला आहे आणि चीनच्या सेंट्रल मिलेटरी कमिशन मधुन त्यांचा एक महत्वाचा विचार समोर येतो तो म्हणजे :- “The lessons of history teach us that strong military might is important for a country to grow from being big to being strong,”
अमेरिकेला जर चीनवर नियंत्रण मिळवायचे असेल तर चीनच्या मिलेटरीवरील खर्चावर अंकुश लावणे महत्वाचे ठरते आणि हे करण्यासाठी चीनच्या अर्थव्यवस्थेवर जमेल त्या मार्गाने त्यांना आघात करावा लागेल.

अर्थकारणप्रकटन

निर्लेपच्या तव्यावर आपआपली पोळी

सुधीर मुतालीक's picture
सुधीर मुतालीक in जनातलं, मनातलं
18 Jun 2018 - 5:10 pm

निर्लेपची बातमी लोकसत्ताने अर्थकारण मध्ये न देता हेडलाईन टाकून कुचकट राजकीय फोडणी देण्याचे काम केले आहे.

मांडणीसमाजजीवनमानतंत्रअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकराजकारणप्रकटनप्रतिसादलेखमाहितीवाद

( पुन्हा नोटा )

गबाळ्या's picture
गबाळ्या in जे न देखे रवी...
19 Dec 2017 - 4:04 am

नोटा

(चाल : गे मायभू तुझे मी)

नोटा अनेक असती
येती तुझ्याकडे त्या
मी नोट शोधतो माझी
परक्याच भासती साऱ्या

दूरस्थ योजना* त्या
खुणवी सदा मनाला
मी गुंतवित जाता
बुडतात घेऊनि मजला

मागावयास जाता
देती कुणी न काही
नोटांनी भरले पाकिट
मी स्वप्नी रोज ते पाही

* योजना - बँका, पतपेढ्या इ. आणतात त्या नवनवीन "स्कीम"

vidambanअनर्थशास्त्रअविश्वसनीयकविता माझीकाहीच्या काही कविताफ्री स्टाइलभावकवितामाझी कवितामुक्त कवितारतीबाच्या कविताकरुणकवितामुक्तकविडंबनशब्दक्रीडाविनोदअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूक

प्राध्यापक रिचर्ड थेलर यांना नोबेल पारितोषिक आणि बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्स

मिल्टन's picture
मिल्टन in जनातलं, मनातलं
9 Oct 2017 - 11:39 pm

अर्थशास्त्रातील सर्वोच्च मानाच्या नोबेल पारितोषिकासाठी रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचेही नाव विचारात घेतले जात आहे असे क्लॅरीव्हेट अ‍ॅनॅलिटिक्स या कंपनीने म्हटल्याची बातमी शनीवारी ७ ऑक्टोबरला आली आणि अर्थशास्त्रातील हे मानाचे पारितोषिक नक्की कोणाला मिळणार याची उत्सुकता चाळावली गेली.

अर्थकारणप्रकटन

बुलेट ट्रेन (भाग ६)

Anand More's picture
Anand More in जनातलं, मनातलं
28 Sep 2017 - 2:56 pm

मागील पाच भागात आपण भारतातला ताजमहाल, अमेरिकेतील हूवर धरण, जपानची शिन्कान्सेन, तैवानची बुलेट ट्रेन, श्रीलंकेचा मटाला राजपक्षा आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि हॉंगकॉंगचा हॉंगकॉंग आंतरराष्ट्रीय विमानतळ यांच्या आर्थिक बाजूंचा विचार केला. यातील हूवर धरण, शिन्कान्सेन आणि हॉंगकॉंग आंतरराष्ट्रीय विमानतळ सोडल्यास इतर प्रकल्प आर्थिक दृष्ट्या आतबट्ट्याचा व्यवहार ठरले आहेत हे देखील पाहिले.

अर्थकारणविचार