समाज

सरकारमान्य महिष्यौच्चवंशरेतन केंद्राचे उद्घाटन

नगरीनिरंजन's picture
नगरीनिरंजन in जनातलं, मनातलं
24 Nov 2013 - 1:29 pm

मौजे चढेवाडी, जातिवंत प्रतिनिधीकडून: देशातल्या पहिल्या आणि एकमेव सरकारमान्य महिष्यौच्चवंशरेतन केंद्राचे काल मौजे चढेवाडी येथे भव्य उद्घाटन झाले. आपल्या म्हशींच्या पोटी जातिवंत अवलादी पैदा व्हाव्यात म्हणून व्याकुळ झालेल्या पंचक्रोशीतल्या शेतकर्‍यांना यामुळे फार मोठा आधार मिळाला आहे असे मानले जाते. हे केंद्र उभारले जाईल असे माननीय खासदार श्री. गोरक्षनाथ गोर्‍हे यांनी गेल्या निवडणुकीत दिलेले आश्वासन अशारितीने पूर्ण करून आपल्या समाजसेवेच्या व्रताचे उदाहरणच लोकांसमोर ठेवले आहे असे चढेवाडीचे सरपंच माननीय श्री. सखाराम दामोदर चढे यांनी आवर्जून सांगितले.

संस्कृतीविनोदसमाजजीवनमानविरंगुळा

खरा काँग्रेसभक्त

हुप्प्या's picture
हुप्प्या in काथ्याकूट
23 Nov 2013 - 12:44 pm

कुमार केतकरांचा अवतार छ.गडमधे जन्माला आला की काय अशी शंका यावी असा हा एक अस्सल काँग्रेसप्रेमी भारतीय!

http://divyamarathi.bhaskar.com/article/NAT-OTS-chhatisgarhs-rajeshwarao...

राजेशराव पवार नामक छत्तीसगडमधील कुणी विभूती महाराणी सोनिया, युवराज राहुल, युवराज्ञी प्रियांका यांची रोज साग्रसंगीत पूजा करतात. आपले जाणते पवार ह्यातून काही स्फूर्ती घेतील काय ?

२० मिनिटात होणारा व्यायाम - सर्किट ट्रेनिंग

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जनातलं, मनातलं
22 Nov 2013 - 7:27 am

व्यायाम हा प्रत्येक आणि प्रत्येक जणाला किती महत्वाचा आहे हे सगळेच जाणतात. ते नव्याने सांगायला नको. पण तो न केला जाण्याची जी अनेक कारणं असतात त्यापैकी जास्तीत जास्त जणांना लागू होणारी आणि टॉप ३ कारणं अशी असतील.
१. कंटाळा
२. वेळच नाही (याचं खरं कारण क्र.१ आहे)
३. त्यापेक्षा सोप्पं काहीतरी सांग ना

समाजजीवनमानराहणीविचारसल्लामाहिती

प्रतिभा सान्त की अनंत?

प्यारे१'s picture
प्यारे१ in काथ्याकूट
21 Nov 2013 - 12:45 am

नमस्कार मंडळी!
नेहमीच्या पेक्षा थोडा वेगळा विषय.
म्हणजे पटतंय का बघा. मला जे वाटतंय ते लिहीतोय.
अनेक क्षेत्रातील कला- अभिनय, दिग्दर्शन, गीतकार,
साहित्य- ह्यात कथा, कादंबर्‍या, कविता, सगळे प्रकार,
संगीत, क्रिडा नि अनेक अशाच क्षेत्रांतील बर्‍याच प्रतिभावंत लोकांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला हे लोक ज्या दर्जाच्या क्रिएशन्स (निर्मिती?) करतात तशा, त्याच दर्जाच्या क्रिएशन्स नंतर करु शकत नाहीत का?
उदाहरणादाखलः
ए आर रेहमान ह्या अत्यंत प्रतिभावान संगीतकाराची कुठली गाणी आपल्याला पटकन आठवतात?

पद्म पुरस्कार… सन्मान की खैरात ?

रामबाण's picture
रामबाण in जनातलं, मनातलं
20 Nov 2013 - 12:19 pm

देशातल्या सर्वोच्च अशा पद्म पुरस्कारांची घोषणा होते. लगेच त्यावरुन वाद होतात. काही काळ तरी आपली चांगली करमणूक होते. या वर्षाच्या सुरुवातीलाच ‘पद्म’ वरुन दक्षिणात्य गायिका एस. जानकी, कुस्तीवीर सुशीलकुमार यांच्या मानापमान सोहळ्याचीच जास्त चर्चा झाली. खरं तर त्यावेळीच म्हणजे जानेवारीत मी हा ब्लॉग लिहायला घेतला होता. पण नेहेमीप्रमाणेच आळस आणि पार्किन्सन्स लॉ या दोन्हींमुळे लिहिणं मागे पडलं.

धोरणमांडणीसमाजजीवनमानविचारप्रतिक्रियासमीक्षामत

एका गारुड्याची गोष्ट १२: धामण: जुन्या ओळखीचा साप !

जॅक डनियल्स's picture
जॅक डनियल्स in जनातलं, मनातलं
19 Nov 2013 - 10:10 am
समाजजीवनमानशिक्षणलेखअनुभव

खाद्यसंस्कृती पुणेकरांची

मृत्युन्जय's picture
मृत्युन्जय in जनातलं, मनातलं
18 Nov 2013 - 12:10 am

"ऐ कंबख्त तुने पेयिच नै " असे वारंवार ऐकवणार्‍या एका मित्राच्या खास आग्रहास्तव एके दिवशी धीर करुन नगरातल्या जगप्रसिद्ध लस्सीच्या दुकानात जाउन पिउन आलो. लस्सी. लस्सी पिउन आलो. उगा भलते संशय नकोत. ऑस्कर वाइल्ड (हा गे होता) एकदा फ्रान्समधल्या एका प्रसिद्ध कुंटणखान्यातुन तोंडात मारल्यासारखा चेहरा करुन बाहेर पडला होता. बरोबर आहे गाढवाला गुळाची चव काय तशी "आदमी हु आदमी से प्यार करता हु" म्हटल्यावर मग बाई ती फ्रान्समधल्या जगप्रसिद्ध वेश्यागृहातली असली तरी काय फरक पडतो. आमचेही तसेच झाले. म्हणजे कुंटणखान्यातुन बाहेर पडुन नाही. लस्सीगृहातुन बाहेर पडुन. तोंड कडु झाले.

संस्कृतीकलाधर्मपाकक्रियाइतिहाससमाजऔषधोपचारशिक्षणमौजमजासद्भावनाआस्वादलेखअनुभवमतवादविरंगुळा

शेतकऱ्याचा खरा मित्र – सचिन तेंडुलकर

रामबाण's picture
रामबाण in जनातलं, मनातलं
16 Nov 2013 - 3:37 pm

निवृत्ती जाहीर केल्यापासून सचिन तेंडुलकर अस्वस्थ होता…

त्याची अनेक कारणं.. काही आम्हाला कळली.. काहींचा अंदाज…

दोनशेवी कसोटी, घरचं मैदान.. पहिल्या दिवशी सचिन खेळलाही मस्त.. ३८ धावांवर नाबाद.. दुसऱ्या दिवशी शतक पक्कं.. स्वप्नवत समारोप..

या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावं अशी कुणाची इच्छा नसेल?

दुसऱ्या दिवशी म्हणजे १५ नोव्हेंबरला मॅच सुरु झाली, सचिन-पुजाराची नाबाद जोडी मैदानात आली..

सचिन जुन्या फॉर्मात होता..

वानखेडे स्टे़डियमवर सचिनची मॅच बघायला सचिनचं कुटुंबिय तर होतंच पण अगदी दिग्गज, मोठमोठी मंडळीसुद्धा आली होती.

समाजजीवनमानअनुभवमत

अल्का झाडकावकर यांच्या शोधाचे पुढे काय झाले?

संचित's picture
संचित in काथ्याकूट
15 Nov 2013 - 7:59 pm

फार थोडेच शोध असतात ज्यामध्ये सामान्य माणसाचं जीवन बदलण्याची क्षमता असते. अल्का झाडगावकर १०-१२ वर्षाआधी यांनी प्लास्टिक पासून पेट्रोल निर्मिती करण्याचा शोध लावला. हा शोध असाच एक वाटतो. या संशोधनात बरेच काही बदलण्याची क्षमता आहे असे वाटत असतानाच काही म्हणावे तसे ऐकण्यात आले नाही.

http://www.goodnewsindia.com/index.php/magazine/story/alkaz/

त्यामुळे त्यांच्या बद्दल बरेच प्रश्न पडतात. यावर कोणी मिपाकर प्रकाश टाकू शकेल का?
काही प्रश्नः

लोकसंवाद :- काही चितपरिचित डायलॉग्ज

मन's picture
मन in काथ्याकूट
14 Nov 2013 - 11:37 pm

लोकगीत, लोककला, लोकसंगीत कसं असतं अगदि लोकांत मिसळून गेलेलं; त्यांच्यात वारंवार आढळणारं; तसेच हे "लोकसंवाद"
हल्लीचे काही लोकसंवाद. खरं तर लोकरोग. लोकांच्या टाळक्याला झालेले आजार.
(ह्यातले एक दोन मी जालवरील प्रतिसादातून उचलले आहेत)
.
.