खाद्यसंस्कृती पुणेकरांची

Primary tabs

मृत्युन्जय's picture
मृत्युन्जय in जनातलं, मनातलं
18 Nov 2013 - 12:10 am

"ऐ कंबख्त तुने पेयिच नै " असे वारंवार ऐकवणार्‍या एका मित्राच्या खास आग्रहास्तव एके दिवशी धीर करुन नगरातल्या जगप्रसिद्ध लस्सीच्या दुकानात जाउन पिउन आलो. लस्सी. लस्सी पिउन आलो. उगा भलते संशय नकोत. ऑस्कर वाइल्ड (हा गे होता) एकदा फ्रान्समधल्या एका प्रसिद्ध कुंटणखान्यातुन तोंडात मारल्यासारखा चेहरा करुन बाहेर पडला होता. बरोबर आहे गाढवाला गुळाची चव काय तशी "आदमी हु आदमी से प्यार करता हु" म्हटल्यावर मग बाई ती फ्रान्समधल्या जगप्रसिद्ध वेश्यागृहातली असली तरी काय फरक पडतो. आमचेही तसेच झाले. म्हणजे कुंटणखान्यातुन बाहेर पडुन नाही. लस्सीगृहातुन बाहेर पडुन. तोंड कडु झाले.

मित्रवर्य उद्गारलेच "गाढवाला गुळाची चव काय?" .

"यात गुळ घातला होता?" मी अविश्वासाने विचारले.

"हेच. हेच. दुनिया चंद्रावर जाउन आली आणि अजुन तुमचे पुणे - ३० चे गचाळ विनोद जात नाहित"

वास्तविक तो विनोद नव्हता. ती प्रतिक्षिप्त क्रिया होती प्रश्न विचारण्याची. बुद्धी गहाण न ठेवलेल्या कुठल्याही माणसाला कळाले असते की त्या लस्सीत गोडवा निर्माण करणारा कुठलाही पदार्थ नव्हता. गूळ नाही, साखर नाही. बॅगोन असावे अशी दाट शंका आली पण तसे बोलुन दाखवले असते तर मित्र वस्सकान अंगावर आला असता. घरी बायकोचा मार खातो त्यामुळे आधीच दुर्मुखलेला असतो त्यामुळे काही झाले की असा वस्सकन समोरच्याच्या अंगावर येतो. पुणेकर म्हटला की याला गेस्टापोंना ज्यु दिसल्यावर व्हायचा तसा आनंद होतो. त्यामुळे लस्सीला बॅगोनचा वास आला म्हटल्यावर मी बॅगोन पितो असा सोयिस्कर निष्कर्ष काढुन तो गावभर बोंबलायला मोकळा झाला असता. वर पुण्यात हॉटेलमध्ये बॅगोन मिळते म्हणुन पण ओकला असता.

पुण्यातल्या गणेशची लस्सी चांगली असते या निष्पाप विधानाचा तो सूड होता. लस्सी म्हटल्यावर ती दह्याची हवी, त्यावर मलईचा गोळा हवा आणि ती गोड (किंवा खारट. खारट हा प्रकार एरवी मला मानवत नाही. खारट लस्सी प्यायच्या ऐवजी ताक प्याले तर काय वाईट?) हवी. तर मी परदेशात (पुणे सोडुन बाकी दुसरे कुठलेही गाव आमच्यासाठी परदेश असते. मुळात नदीपल्याडच्या वस्तीला आम्ही पुणे म्हणत नाही तर पुण्यापल्याडच्या वस्तीला तर आम्ही ओळखही द्यायला नको. पण असो. तो वेगळा विषय) जाउन प्यालेली ती लस्सी चक्क कडु होती आणि त्यात आईसक्रीम होते. आईस्क्रीम लस्सीत? अर्रे आमच्याक्डे ते मस्तानीत टाकतात (मस्तानी म्हणजे थिकशेक. मस्तानी मस्तानी काय करता? आमच्या हाज्जीअली ला याहुन भारी थिकशेक मिळते ही पण एक नेहमी मिळणारी प्रतिक्रिया. तर असो. ) .

"लस्सीत आइस्क्रीम टाकता तर तुम्ही मटकीच्या उसळीत फरसाण टाकुन त्याला मिसळ म्हणाल रे" मी कळवळुन करवादलो.

"मग मिसळ अजुन कशाला म्हणतात?"

अर्रे मिसळ म्हटल्यावर त्यात पोहे येतात, बटाट्याची भाजी येते, मटकीचे दाणे येतात, फरसाण येते तशी थोडी शेवही वेगळी येते, त्यात आम्ही चिवडा घालतो, दुसर्‍या दिवशी मुक्काम ठोकायचा नसेल तर् म्ह्णुन एक गोडसर आणि लाल पाट वाहु द्यायची तयारी असेल तर एक तिखट झणझणीत रस्सा तयार ठेवतो. त्यावर मस्त कांदा भुरुभुरतो, कोथिंबिर टाकतो. मग आमची साग्रसंगीत मिसळ तयार होते. झालेच तर भजीचे तुकडे टाकुन आम्ही त्याला अजुन थोडी रंगत आणतो. मिसळ म्ह्णजे असा चटकन उरकुन टाकायचा पदार्थ नव्हे आमच्यासाठी. मिसळ आमच्यासाठी पूजा आहे. बेदी, बत्रा किंवा भटांची नाही. देवळात करतो तशी. अर्रे आमच्याकडे आरतीला पण फक्त साखर देउन बोळवण होत नाही. खायचे म्हटले की तिथे आमच्याकडे कलाकुसर आलीच.

एवढे बोलुन झाल्यावर "गोड मिसळ खाणारे पुचाट लोकं तुम्ही.तुम्हाला लस्सी कडुच लागणार" असे फुत्कार टाकुन महोदय निघुन गेले. वास्तविक दोन गोष्टींचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. तसा माणुस चंद्रावर जाउन आल्याचा आणि पुणॅरी विनोदाचा पण काही सम्बंध नाही म्हणा. माझ्या त्या मित्राचा आणि विनोदाचा पण नाही (आणि त्याचा आणि गुळाचापण नाही).

पण दोष त्याचा नाही. काय आहे पुणॅ म्हटल्यावर उगाचच शिव्या घालायच्या आणि आपल्याला पण कुजकटपणा करता येतो असे दाखवायची एक फ्याशन आहे. पुणेकर जेव्हा कुजकटपणा करतात तेव्हा मण्यारीचे विष सुद्धा त्यापुढे फिक्के पडेल. एरवीची शब्दलीला ज्याला लोक कुजकटपणा म्हणतात ते म्हणजे उगाच शाही बिर्याणी बरोबर तोंडी लावायला दिलेल्या सॅलॅड सारखे असते.

अर्रे तुम्हाला नकोय ना गोड मिसळ? मग तर्री मागा. देतात ते. तेही नको असेल तर रामनाथला जा. पार्श्वभागातुन जाळ निघेपर्यंत तिखट नरड्यात ओता. तेही नको असेल तर टिंबर मार्केटला जा महेश भुवन मध्ये मिसळ ओरपा. अगदीच नाहितर कर्वे रोड वर आयकर गल्लीत जाउन उभे रहा. वाडगा घेउन नाही. प्लेट घेउन., हे बाहेरच्यांना समजावुन सांगायला लागते. सपच्य अमागे जा, सिष्टर षिटीत नेवाळे, दे धक्का ला जा. पण मरायला तुम्हाला मित्राच्या *गणाला ढुं** लावुन यत्ता नववीत तुमच्या शहरात खाल्लेलीच मिसळ हवी असेल तर तशीच कशी मिळेल? (इथे *गणाचा आणि मिसळीच्या चवीचा संबंध नाही. त्याचा संबंध वातावरणनिर्मितीशी आहे हे लक्षात घ्या). ढेकण्या तुझ्या आईच्या आणि तुझ्या आज्जीच्या हातच्या पदार्थांची चव तरी एकसारखी आहे का रे? चवी बदलतात ना?

कसे असते प्रत्येक शहराची एक संस्कृती असते आणि ती तिथल्या खाद्यसंस्कृतीतुन परावर्तित होते. आता गोव्याला जाउन पाटवड्या आमच्या गावसारख्या नाही मिळत म्हणुन गळे काढण्यात काय अर्थ आहे? तिथे गेलात तर मासे खा, काजु करी खा, फेणी प्या, समुद्राचा वारा प्या. पाटवड्या तुला परसदारात मिळतात ना रे भावड्या? तुझ्या गावात मिसळीबरोबर लादीपाव देतात, ब्रेड स्लाइस देतात. पिझ्झा बेस देतात की ढेकळे देतात याच्याशी कोणाला घेणेदेणे आहे? पुणेरी मिसळीबरोबर ठिकानानुरुप यापैकी काहिही देउ शकतात (ढेकळे आणि पिझ्झा बेस सोडुन). मग? पुढे काय? पण लोकांचे हे असे असते त्यांची दुनिया स्वतःपाशी संपते. स्वतःला नाही आवडले आणि न आवडणारे आपण एकटे असलो तर हे लोक आख्ख्या समाजाच्या नावाने गळे काढणार. तुला नाही ना आवडले तु नको ना खाऊ. तिथे रांगा लावुन खाणारे मुर्ख म्हणुन कशाला केकाटतोस बाबा?

बाकी पुण्याला खाद्यसंस्कृती शिकवणे म्हणजे सामान्य माणसाने देवाला धर्म, आनंदला बुद्धीबळ आणि तेंडुलकरला क्रिकेट शिकवण्याएवढे हास्यास्पद आहे. अर्रे खाण्यात राज्ये बुडवली आम्ही (याला किमान २ आयडी अनुमोदन देतील याबाबत शंका नाही). इतिहासाची पुस्तके उघडुन बघा. साले लग्नसमारंभात पानावर केवळ चटण्या ८ प्रकारच्या वाढायचो आम्ही. लोणच्याच्या जागी कोशिंबीर आणि कोशिंबीरिच्या जागी अळुचे फदफदे असले नतद्रष्ट प्रकार करत नाही आम्ही. प्रत्य्के चौथे दुकान इथे एक हॉटेल असेल आणि पाचही खंडातल्या व्यंजनांची चव चाखायला मिळेल या शहरात (पेंन्ग्विन आणी कांगारु कुठे मिळतात हे विचारु नये. अपमान करण्यात येइल). जाओ अपने गिरेबान मे जाकर ढुंढो तुमच्या शहरात जो खाद्यपदार्थ बरा मिळतो त्याचे नाव सांगा पुण्यात खायला घालतो तुम्हाला. (पैसे तुमचे. पुणेकराने वाद जिंकण्यासाठी सुद्धा स्वतःचा पैसा खर्च करावा ही अपेक्षाच फोल आहे). अर्रे आम्ही नाणे वाजवुन घेतो तिथे खायचे पदार्थ असेच कुठलेही उचलु होय? हॅट. हुडत. अर्रे केशराची कांडी आणि तिचा स्वाद आणि रंग दिसला नाही तर आम्ही चितळेच्या श्रीखंडालाही दहीसाखर म्हणुनच खाउ. पण चितळे देतो उत्कृष्ट श्रीखंड तर मग कसला आलाय दु:स्वास?

पण पण. पुणेकराचे एक आहे. "अर्रे आमच्या नागपुरची संत्री बघा एक एक काय रसाळ असतात (पुलं). नाहितर तुमच्या पुण्याच्या संत्री ..... " असली वाक्ये आमच्या तोंडुन निघायची नाहित. आम्ही बेडेकरांची सो कॉल्ड गोड मिसळ खाउन तृप्त आहोत. तुमची रसरंग, मामलेदार, गोखले, फडतरे, खासबाग, बावडा जी काही चांगली असेल ती तुम्हाला लखलाभ. आम्हीही खाउन बघु. आवडली तर आम्हालाही लखलाभ. आम्ही उगा नसतीकडे वाकड्यात शिरत नाही. अर्रे अन्न ते पुर्णब्र्हम. त्यात कसली आलीय इर्ष्या, तिरस्कार, स्पर्धा, मानापमान आणि तुच्छता (आम्ही परगावचा आख्खा माणुसच तुच्छ लेखु ती गोष्ट वेगळी). आमच्या श्रद्धास्थानांवर गरळ ओकाल तर मात्र फणा काढुन उभे राहु ही गोष्ट वेगळी.

सुदैवाने मी १० गावात राहिलो आहे. नंदुरबारचा पात्रा ज्या सुखाने चाखला त्याच आनंदाने सातारी कंदी पेढा खाल्ला, रंकाळ्यावर भेळ खाल्ली, इंदौरला कचोरी हाणली, ठाण्याला राजमाताचा वडापाव कोंबला, कुंजविहारचा वडापाव रिचवला, मामलेदारची झणझणीत ( अहाहा. आत्ताही लाळ सुटली) मिसळ, संगमनेरला सुदाम्याची पावभाजी आणि नढेची भेळ हे स्वर्गसुख अनुभवले. त्याच भक्तीभावाने मी आता कल्याणला जाउन भेळ, मनिषात पाणीपुरी, जेजे गार्डनला (आणि विट्ठल मंदिरा च्या बाहेर आणि शिवदीपमध्ये आणि भोलाकडे) वडापाव, सुप्रीमची पावभाजी, बेडेकरची मिसळ, गणेशची लस्सी आणि सुजाताची मस्तानी खाउ शकतो. देवाच्या दयेने मी खाण्याच्या बाबतीत भेदभाव करत नाही. त्याबाबतीत आकस ठेवत नाही. चांगले आहे हे कळत असुनही केवळ नावे ठेवण्याच्या लालसेपायी माझ्या जिव्हेवर अन्याय करत नाही. जे जे उत्तम उदात असेल ते ते खावे हा नियम भक्तिभावाने जोपासतो. जीभ (बोलुन आणि खाउन) संस्कृती घडवते हे माहिती असलेल्या गावात राहुन मी इतके तरी शिकु शकतोच ना?

संस्कृतीकलाधर्मपाकक्रियाइतिहाससमाजऔषधोपचारशिक्षणमौजमजासद्भावनाआस्वादलेखअनुभवमतवादविरंगुळा

प्रतिक्रिया

चाणक्य's picture

18 Nov 2013 - 12:16 am | चाणक्य

अगदी फर्मास

आदूबाळ's picture

18 Nov 2013 - 12:21 am | आदूबाळ

ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात!

अत्रुप्त आत्मा's picture

18 Nov 2013 - 12:35 am | अत्रुप्त आत्मा

ज्जे बात! :)
.
.
.
.
.
.
या आता!!!!! =))

अग्निकोल्हा's picture

18 Nov 2013 - 12:44 am | अग्निकोल्हा

फक्त इतके समतोल विचारी लिखाण असताना विशेषत: पुण्याला यात अनावश्यक घुसड्लेले पटले नाही.

लेखातील मताशी लेखक प्रामाणिक आहे हे जाणवले असते

प्यारे१'s picture

18 Nov 2013 - 1:03 am | प्यारे१

द्यायचा होता 'सुज्ञ' ला प्रतिसाद, झाला लेख!
होतंय असं. :)

लेख आवडला रे!
-पुण्याच्या लांबच्या परिघातला प्यारे. :)

समजुन घेणार की लेखकाला फाट्यावर मारून हिडिसतेचा नंगानाच दाखवणार याचे कुतुहल आहे.

पक पक पक's picture

19 Nov 2013 - 9:18 pm | पक पक पक

बळी गेलेले .. ;) फाटा ... ???? :)

पण जे चांगले नाही त्याला सुध्दा छान म्हणतात. म्हनुनच लेखकावर अनावश्यक पुण्याचा उल्लेख करायची नामुष्की आली व् अमुक तमुक हिकड़े नाय आवडलं तर तिकड जाऊंन खा म्हणावे लागले. इतर शहरात असे ऑप्शन देणारे नसतात तिथे अमुक ठिकाणी छान असते असे सांगतात तेव्हां ते छानच निघते उगाच त्याच पदार्थासाठी दुसर होटेल ट्राय मारावे लागत नाही

मृत्युन्जय's picture

22 Nov 2013 - 4:22 pm | मृत्युन्जय

पुण्याचा उल्लेख पुणेकर कधीही नामुष्कीने करणार नाही. अभिमानानेच करेल. मी रुढार्थाने पुणेकर नाही ते वेगळे.

अनेक पर्याय देण्यामागचे कारण असे की वेगवेगळ्या चवींचे अनेक पर्याय पुण्यात उपलब्ध आहेत. प्रत्येकाने स्वतःच्या आवडीप्रमाणे निवडावे. उदाहरणच द्यायचे झाले तर मी नगरातल्या लस्सीचे दिले. मला अजिबात नाही आवडली. कोल्हापुरची फडतरे मिसळ अशीच माझ्यासाठी हुकलेली होती. त्याप्रमाणे एखाद्याला बेडेकर नाही आवडणार तर अजुन अनेक पर्याय आहेत. शक्यता आहे की एखाद्याला काहिच नाही आवडणार. पण असा एखादाच असेल.

बॅटमॅन's picture

20 Nov 2013 - 12:16 am | बॅटमॅन

अगदी, अगदी!!!

जॅक डनियल्स's picture

18 Nov 2013 - 12:57 am | जॅक डनियल्स

मिसळ जमून आली आहे. अगदी माझ्या मनातले लिहिले आहे सगळे.

विट्ठल मंदिरा च्या बाहेर

कुठल्या ? पासोड्या का नवीपेठेतल्या ?

मृत्युन्जय's picture

18 Nov 2013 - 10:40 am | मृत्युन्जय

नवीपेठ. गोखले किंवा आण्णा या नावाने ओळखला जातो तो वडापाव

तुम्हाला कंटाळा (किंवा टंकाळा) येत नाही का हो मृत्युंजयजी? कशाला नादी लागावे कोणाच्या (किंवा कोणाच्याही)! ;)

प्यारे१'s picture

18 Nov 2013 - 2:01 am | प्यारे१

मला असा वाद ऐकला वाचला की राहून राहून मुंबई पुणे मुंबई हा सिनुमामा आठवतो.
सारसबागेतली भेळ खाताना (पुणेकर असून देखील) स्वप्निल जोशी म्हणतो :
भेळ! कुरमुरे, शेंगदाणे, फरसाण, लिंबू, कोथिंबीर.... भेळ!
त्या पदार्थाला अस्मितांचे टॅग न लावता खा की!
फॉर दॅट मॅटर सगळ्याच गोष्टी तशा अस्मितांचा टॅग न लावता एन्जॉय करा की! आणखी मजा येईल.

आनि लई बारीक बगायचंच म्हनलं तर बाईला बी मिशा दिसत्यातच की!
तेला काय शीमा हाय व्हय मग?

मृत्युन्जय's picture

18 Nov 2013 - 10:42 am | मृत्युन्जय

भेळ! कुरमुरे, शेंगदाणे, फरसाण, लिंबू, कोथिंबीर.... भेळ!
त्या पदार्थाला अस्मितांचे टॅग न लावता खा की!

आयला प्यारे हेच लिहायचे होते रे. त्यासाठी एक लेख खर्ची पाडायला लागला. छ्या.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

18 Nov 2013 - 2:13 am | विश्वनाथ मेहेंदळे

तुम्ही लोक उचकता लय लवकर… जालावर तुमच्यावर सर्वात जास्त टीका होण्याचे कारण तेच असावे. ;-)

बॅटमॅन's picture

18 Nov 2013 - 5:27 pm | बॅटमॅन

हा हा हा, नेमके!!!! उचकणारे असले की उचकवणारे भेटतातच! बरं मजा अशी की दुर्लक्षिलेलेही चालत नाही =)) धरलं तर चावतंय आणि सोडलं तरी परत जवळ येतंय =))

स्पंदना's picture

18 Nov 2013 - 3:12 am | स्पंदना

हाण्ण तेच्या!
शंभर घाव एक तुकडा
अर्धा पांगळा अर्धा वाकडा!!

(गैरसमज नको, मला सौ बात की एक बात म्हणायच आहे. जरा पद्यात म्हंटल)

नगरीनिरंजन's picture

18 Nov 2013 - 4:18 am | नगरीनिरंजन

बालिशपणा!
नगरच्या लस्सीवाल्याच्या लस्सीला नावं ठेवली म्हणून आम्हाला राग येत नाही; पण हा असला बालिशपणा पाहून करमणूक मात्र होते. :-)

मीता's picture

18 Nov 2013 - 10:44 am | मीता

नगर ची लस्सी जगात भारी.....

पक्या's picture

19 Nov 2013 - 4:18 am | पक्या

हे हे हे, आम्ही दिल्लीची लस्सी उत्कृष्ट मानतो नगरची काहीच नाही त्यापुढे. अजुन पंजाबला जायचा योग आला नाही पण तिकडची अजुन बेस्ट असेल असे वाटते.

यसवायजी's picture

19 Nov 2013 - 6:07 pm | यसवायजी

लुधियाणात ४-५ दिवस होतो तेंव्हा रोज लस्सी प्यायचो. आपल्याकडे मिळणारी आणी तिकडची लस्सी यात फरक आहे. इथे लस्सी खुप दाट असते. तिकडे तितकी दाट नव्हती. तिथल्या स्विट अन साल्टी दोन्ही मस्त वाटल्या. खाण्याच्या -(पिण्याच्या सुद्धा ;) ) बाबतीत चंगळ होती.
पण
एके दिवशी कांदे-पोह्यात पनीर पाहीले अन एकदाच ठरवलं की, व्हेन यु आर इन पंजाब, पंजाबीच खा. (हे इतरत्रही लागु पडावे असे वाटते)
उगाच आमच्या महारष्ट्रात असले पोहे मिळतात असे सांगण्यात काही अर्थ नाही ना. ;)

रमेश आठवले's picture

18 Nov 2013 - 8:14 am | रमेश आठवले

पुण्याबाहेर रहणार्या मझ्या सारख्याच्या माहितीसाठी मस्तानी हा कोणता खाद्य पदार्थ आहे ते सांगाल का ?

शैलेन्द्र's picture

18 Nov 2013 - 11:34 am | शैलेन्द्र

मस्तानी हा खाद्य्/पिद्य पदार्थ आहे, घट्टश्या दुधात, कस्टर्ड, फ्लेवर, आइस्क्रीम व चवीपुरते जिन्नस टाकुन स्टृऑ/ चमच्याने खातात..
पोटभर पिण्यासाठी मात्र तुम्ही बाजीरावच हवे..

सुहास..'s picture

18 Nov 2013 - 11:48 am | सुहास..

mastaani

ही घ्या मस्तानी

आनंदी गोपाळ's picture

21 Nov 2013 - 1:06 pm | आनंदी गोपाळ

थोडे पाणचट चवीचे फ्रूट सॅलड ग्लासात भरून, त्यावर आंबट अननसाची चकती खोचून, व वर थोडी टूटीफ्रूटी उर्फ रंगीत साखरेच्यापाकातल्या भोपळ्याच्या बारीक फोडी टाकल्या, त्याला अव्वाच्या सव्वा किम्मत लावून ओव्हरहाईप केले, की जे बनते, त्याला पुण्यात मस्तानी म्हणतात.

मृत्युन्जय's picture

21 Nov 2013 - 2:20 pm | मृत्युन्जय

अशी मस्तानी पुण्यात कुठे मिळते? सुजातात नक्कीच नाही.

गोपाळराव, मलाही मस्तानी आवडत नाही पण तुम्ही म्हणताय तितकी वाईट्ट नक्कीच बनवलेली नसते. उगीच नावं ठेवताना कै च्या कै नको.

याला मस्तानी म्हणतात ?? नक्की?? एकदा सुजातामधली आंबा-केशर विथ ड्रायफ्रुट ट्राय कराच.

तुषार काळभोर's picture

23 Nov 2013 - 10:19 am | तुषार काळभोर

चव काय... असं कायतरी म्हनत्यात ना..

यशोधरा's picture

18 Nov 2013 - 8:19 am | यशोधरा

झक्कास! एकदम आवडलं!

त्रिवेणी's picture

18 Nov 2013 - 9:35 am | त्रिवेणी

पात्राची आठवण करून दिल्याबद्दल तुमचा त्रिवार निषेढ....
तसही जळगाव, धुळे, मालेगाव साइडचा बटाटेवडाही मस्तच असतो.

मैत्र's picture

18 Nov 2013 - 10:39 am | मैत्र

पुण्यापासून शेकडो मैल लांब असल्याने सर्व वर्णने वाचून थोडा त्रास झाला

पण जी खास पुणेरी तळमळ दिसली - की जे जे उत्तम उदात्त उन्नत च्या चालीवर

जे जे चविष्ट खमंग रूचकर ते ते मनापासून खा ना लेको!!

ती विलक्षण आवडली.

पण तरीही नगरची लस्सी चांगलीच आहे. जरा कालमानाप्रमाणे थोडी दर्जात घसरली आहे. तरी एका विधानाचा सूड घेण्यासाठी दुसर्‍या पदार्थात पार बेगॉन (बॅगोन नव्हे) घालण्यापर्यंत जाणं हे शेवटच्या परिच्छेदाशी जुळलं नाही..

बाकी आनंदच वाटला जरा अस्सल आपल्या खाद्यकुळीतला पाहून :)

सुहास..'s picture

18 Nov 2013 - 10:44 am | सुहास..

पुणेकरांना घुसडल्याबद्दल निषेध, पण आय डी नेमका आपलाच असल्याने ;) ....लेख अतिशय समतोल आणी प्रामाणीक .

माझे ही होते असे , चेन्नईल एकदा सांबर, रस्सम, ईडलई ;) , वडाई ;) , दोसाई ;) आणि उथ्थप्पम खाल्ले की दुसरी कडे (अगदी जगात ) खायला जरा त्रास च होतो ....आमच्या पुनमला मिळणारी दाल -खिचडी मी बाहेर कुठे ही खावु शकय नाही .......तसेच नोएडा/दिल्ली ला गेलो की लस्सी , कुलचे , तंदुरी याची चव तोंडार रेंगाळत असते ...

मृत्युन्जय's picture

18 Nov 2013 - 10:46 am | मृत्युन्जय

चेन्नईल एकदा सांबर, रस्सम, ईडलई Wink , वडाई Wink , दोसाई Wink आणि उथ्थप्पम खाल्ले

मुरुगन रे मित्रा मुरुगनची आठवण झाली. कासावीस झाला रे जीव. मला ते सर्वणा भवन एवढे आठवत नाही पण मुरुगन म्हटल्यावर जीव जातो.

अनुप ढेरे's picture

18 Nov 2013 - 11:12 am | अनुप ढेरे

आम्ही बेडेकरांची सो कॉल्ड गोड मिसळ खाउन तृप्त आहोत.

एकदम चपखल !! हेच वाटतं बेडेकर मिसळ खाल्लीकी... लेख फक्कड !!

विटेकर's picture

18 Nov 2013 - 11:31 am | विटेकर

खरयं , म्हणोन आमची चक्कर दर शनिवारी सकाळी बेडेकरांकडे ! अगदी गेल्यी जन्मीचे देणे असल्यासारखे.
मधे त्यांनी कमिन्स कॉलेजच्या गलीत ब्राण्च काढली होती पण तिथे ती " अस्मिता " की कायशी नव्ह्ती ( त्यांना तुसडेपणा म्हणायचा असावा !) त्यामुळे पुन्हा गावातल्या चकरा सुरु झाल्या !
हल्ली फार महाग झालीय पण बेडेकर मिसळ ! चाळीस रुपये घेतात आणि पुन्हा स्वंय्-सेवा( शेल्फ सर्विस)
पण मजा येते हां !
लेख छानच ! बा़की अस्मिता वगैरे ठीक आहे , पण बा़कीच्या गावांत चांगले पदार्थ मिळ्तात.
मागे एकदा धाराशिव ( उस्मानाबाद ) ला एका मुस्लिम होटेल मधून आणलेले गुलाब जामून खाल्ले होते ! अप्रतिम !
एवढ्या दुष्काळी गावात ( तेव्हा महिन्यातून दोनदा पाअणी येते होते शहरात ) असला जबराट मेवा मिळाला ! फार प्रसिद्ध आहेत म्हणे हे गुलाब जामून.

मृत्युन्जय's picture

18 Nov 2013 - 11:54 am | मृत्युन्जय

हल्ली एक्स्ट्रा रस्श्याचे पैसे घेतात हो ते. त्यामुळे जास्तच महाग पडते :)

अनुप ढेरे's picture

18 Nov 2013 - 5:57 pm | अनुप ढेरे

पण सुरुवातीला जेवढा देतात तो रग्गड असतो मिसळीला. काही लोक यक्ष्ट्रा स्लाइस घेउन फुकटच्या तर्रिबरोबर हादडायचे. त्यांचा वांदा.

गणामास्तर's picture

18 Nov 2013 - 10:50 pm | गणामास्तर

विटेकर साहेब 'उस्मान' असे नाव आहे त्या हॉटेल (त्याला हॉटेल म्हणणे म्हणजे मांजरीला वाघ म्हणण्यासारखे आहे)चे. बाकी तिथे बसून गरमागरम, भल्या मोठ्या आकाराचे गुलाब्जाम (तिथे असाचं उच्चार होतो) खाण्याची मजा निराळीचं.तिथे पुरी भाजी सुद्धा अप्रतिम मिळते..पुरी सोबत येणारी तिखट जाळ बटाट्याची भाजी खाल्ल्यावर
रामनाथ आणि चिंचवडातला नेवाळे मिसळवाला सुद्धा लाजेल..

बाकी रामनाथ बद्दल आपले मत कै खास नै आज्याबात. पाटी जितकी बुंगाट आहे तितके खाणे बुंगाट असते तर अजून बरे झाले असते.

विटेकर's picture

20 Nov 2013 - 11:46 am | विटेकर

धन्यवाद गणामास्तर ! आमच्या बहिणाबाईनी तृप्त केले होते ते गुलाबजामुन खायला घालून !
पुरी -भाजी खाण्याची वेळ आली नाही पण रस्सा हादडयचा म्हणजे पाण्याची सोय मस्ट आहे हो !

सुहास..'s picture

18 Nov 2013 - 11:18 am | सुहास..

:)

मुरुगन च !!

बॅटमॅन's picture

18 Nov 2013 - 5:29 pm | बॅटमॅन

हा मुरुगन काय प्रकार आहे? चेन्नैतच आहे की पुण्यात पण आहे???

(पुण्यात राहूनही रोज एकवेळ आंध्रा मेसमध्ये जेवून तृप्त होणारा) बॅटमॅन.

कपिलमुनी's picture

19 Nov 2013 - 1:49 pm | कपिलमुनी

हिंजवडीमधे आहे ती का ?

हिंजवडीत असेल तर माहिती नाही. आम्ही मगरपट्ट्यातल्या मेशीत जेवतो.

सौंदाळा's picture

20 Nov 2013 - 12:31 pm | सौंदाळा

आहे हिंजवडीत
फेज १, परर्सिटंट्च्या मागे

मृत्युन्जय's picture

19 Nov 2013 - 2:25 pm | मृत्युन्जय

मुरुगन चेन्नैतले एक उच्च शुद्ध शाकाहारी हॉटेल आहे. तिथे केळीच्या पानावर पदार्थ वाढतात, सांबारासकट सग्ळे. सांबार चटणीसाठी वेगळ्या वाट्या नसतात. तर मिनिटाला येउन पानात वाढुन जातात. मद्रासी स्टाइलने ओरपायचे. दाक्षिणात्य पदार्थांसाठी निव्व़ळ सुख

बॅटमॅन's picture

19 Nov 2013 - 3:30 pm | बॅटमॅन

ओहोहोहो....घासाघासाला ऑर्गॅझमच म्हणायचा तर. वॉव!

विटेकर's picture

20 Nov 2013 - 11:51 am | विटेकर

मुरगन इडली म्हणजे स्वर्गारोहण !
आण्खी एक वैशिष्ट्य . सांबार वाटी असते पण चमाचा दिला नव्हता. ओरपा हाताने . म्हणजे बघा, ईडली घ्यायची आणि त्या केळीच्या पानावरच सांबार / चट्णी ओतायची ! आणि मग ..... आ क्र म ण !
त्या मानाने सर्वनन( उच्चार सार्व्ण) भुवन चे नाव जास्त झाले आहे. ते ही ठीकच आहे पण हल्ली त्याचे मद्रासी स्वरुप जाऊन अधुनिक झाले आहे.

विटेकर's picture

20 Nov 2013 - 11:59 am | विटेकर

बंगळूरातील .. एम टी आर .. हौस फिटते सौदिन्डियन खाण्याची !
मलबारी, तामिळ , तेलगु , कानडी अशा विविध छटा असल्या तरी मराठी माणसाला फार विशेष वाट्त नाही. कानडी स्व्यंपाक सर्व सौदिन्डियन मधे उजवा अशी माझी आवड आहे !
बाकी बंगलोरात चालुक्य चा दोसा खाणे यासाठी बरेच पुण्य गाठीशी हवे ! अस्ला मसाला दोसा जगात कुठेही मिळत नाही.
दुधाची ताकावर साठी - विद्यार्थी ( गांधीबाजार ) , गणेश ( उच्चार गनेश - जयनगर ), बल्लाळ रेसिदेन्सी (रेसीदेन्सी रोड) , अडिगा ( जय नगर ) कामत आणि शांतिसागर यांचे दोसे ही चालतील.

बॅटमॅन's picture

20 Nov 2013 - 12:11 pm | बॅटमॅन

धण्यवाद सरजी. चार महिने बंगळुरात राहण्याचा योग आला होता दोनेक वर्षांमागे पण केंगेरीजवळ आणि दोघा बंगाल्यांसोबत राहिल्याने ही ठिकाणे काही कव्हर करता आली नाहीत. बंगाली तेच्यायला नुस्ते नॉनव्हेज नॉनव्हेज करत मरत असायचे त्यामुळे जरा मागेच पडलं हे ऑथेंटिक खाणं. आता मात्र जाईन तेव्हा अवश्य खाईन तिथे!

विटेकर's picture

20 Nov 2013 - 12:22 pm | विटेकर

खर आहे..
एकदा भुवनेश्वर मध्ये बंगाल्याबरोबर आठवडाभर होतो. मी शुद्ध शाकाहारी आणि हा साला माश्याशिवाय नाव काढेना ! शेवटी एका स्थानिक रिक्षावाला पकडला आणि त्याने ज्या ठिकाणी नेले... शुद्ध शाकाहारी खाणावळ होती ! तृप्ती म्हणजे काय याचा अखंड अनुभव ! आणि इअतके विविध प्रकार .. फक्त मिठाया नव्हेत तर भाज्या आणि स्टफड मटेरियल ! अप्रतिम !
त्यानंतर दोन वर्षांनी पुरीला आई- वडिलांसोबत गेलो होतो . ती खाणावळ शोधून काढली अणि चेपून आलो!
भारतातील सर्व प्रांतात उत्तम शाकाहारी पदार्थ मिळतात आणि त्या त्या भागात तेच खावे.. शक्य तर नोन होटेल्स टाळून गल्लिबोळ धुंडाळावेत, उत्तमोत्तम पदार्थ मिळतात. थोडी रिस्क घेण्याची तयारी हवी . पाटण्यच्या गांधी मैदानाच्या बाजूला बेलफळाचे सरबत विकतात. २ रुपये ग्लास . .. हायला शप्पथ सांगतो , हलाहलाचा दाह शांत होईल .पण धाडस हवे.बाटलीतील पाणी पिनार्याला ती मजा नाही.

बॅटमॅन's picture

20 Nov 2013 - 1:05 pm | बॅटमॅन

ओरिसामध्ये कधी गेलो नाही. बंगालमध्ये २ वर्षे राहिलो-कलकत्त्यात. नॉनव्हेज खात नसतो तर कसा जगलो असतो देव जाणे तिथे. बंगाली व्हेज हा अंमळ टर्न ऑफच प्रकार आहे माझ्यासाठी.

सुहास..'s picture

20 Nov 2013 - 6:31 pm | सुहास..

+ पंधरा अब्ज करोड !!

मासे आणि मास्याचे किती प्रकार असतात हे कोलकात्यात समजते :)

आता कबूल करायला हरकत नाही. कोलकात्यात मासे कमीच खाल्ले :( माशाचा वास कैक दिवस सहन होत नसे. पुढेपुढे खाऊ लागलो अन मग मात्र प्रेमात पडलो. पाबदा, हिलसा ऊर्फ इलिश, रोहू अन सरताज म्हणजे भेटकी हे माझे खाल्ले. त्यापुढे जास्त नै. प्रॉन ऊर्फ चिंगडी तेही खाल्ले. माछेर झोल चांगली असते पण आपल्या गोवन/मालवणी फिश करीसारखी खंग्री नसते. चिंगडी माछेर मलाई करी हाही एक वेगळा पदार्थ खाल्ला-नारळाच्या दुधासोबतची प्रॉन करी. बाकी सर्वांत आवडलेला पदार्थ म्हणजे भेटकी. आखूडशिंगी बहुदुधीसारखे बहुमांसी स्वल्पकाटी म्हणता येईल त्या माशाला. त्याची ती डिश भेटकी पातुडी म्हणजे पानांत भेटकी माशाचे तुकडे करून वाफवले जातात. त्याची चव निव्वळ अप्रतिम लागते. जण्रल करी ऊर्फ झोलसुद्धा मस्त उत्तम लागतो. पण ज्याचा इतका उदोउदो केला जातो त्या हिलशात मात्र कै दम वाटला नै. दोनतीनदा खाऊनही कैच वाटलं नै. एक तर ढीगभर काटे त्यात परत टेस्टपण लै खास नै.

असो, (अंमळ) जुन्या आठवणी जाग्या झाल्या या निमित्ताने.

रेवती's picture

20 Nov 2013 - 6:48 pm | रेवती

हा प्रतिसाद वाचल्यावर मनुष्याने लगेच उठून त्या त्या ठिकाणी जावे. असो. भारतवारीत (म्हन्जे पुढील दोन तीन वर्षात) येईन तेंव्हा जाण्यासाठी हा धागा वाचनखूण म्हणून साठवावा म्हणते.

मैत्र's picture

20 Nov 2013 - 10:14 pm | मैत्र

बहुधा माझे पुण्य पुरेसे नसावे गेल्या तीन वर्षात या चालुक्य बद्दल कधी ऐकले नाही त्यामुळे योग आला नाही.
गुगलून पाहिले तर एक हॉटेल चालुक्य - म्हणजे राहण्याचे हॉटेल - रेस्टॉरंट नव्हे, दिसते आहे बसवेश्वर नगर मध्ये.
तेच का अजून दुसरे कुठे आहे..

बाकि आडिगा उत्तम. बंगलोरात आवडलेले म्हणजे अडयार आनंद भवन आणि अर्थात एम टी आर. - बिशि बेळे भात, खारा भात (म्हणजे उपीठ) (सगळीकडे स्पेलिंग bath), एका प्लेटला एकच मिळणारा अप्रतिम वडा.
आणि हो अनलिमिटेड थाळी.. फारच तयारीने जावे लागते. पण त्यातले सांबार / रसम माझ्या तेलूगू चवीला सरावलेल्या जिभेला थोडे गोड आणि कमी चवीचे वाटते. बाकी झकास..

सगळ्यात एक नंबर इडली आणि वडा मिळतो ब्राम्हिन्स कॉफी बार नामक एका अतिशय लहान जागेत .. ही आप्पासारखीच आणि त्याहून जुनी एक इन्स्टिट्युशन आहे. याहून भारी इडली, वडा आणि फिल्टर कॉफी कोणी बनवूच शकणार नाही. (अजून मुरुगनची चव नाही पाहिलेली त्यामुळे त्याशिवाय इतर)

विटेकर's picture

21 Nov 2013 - 11:40 am | विटेकर

चालुक्य - रेसकोर्स रोडला .. विधानभवानाच्या मागे .. बसवेश्वरांचा पुतळा आहे त्याच्या बरोबर समोर. होय तिथे राहण्याची सोय आहे पण तेच बसवेशवर नगर का हे माहीत नाही. दहा वर्शे उलटून गेली त्यामुळे आता को ओर्डिनेट्स स्मृतीतून पुसट होऊ लागले आहेत.
ब्राह्मिन्स कॉफिबार - शंकर पुरम चा ना ? क्लासच आहे. पण त्याची मुरुगन बरोबर तुलना नको , दोन्ही इडल्या आपआपल्या जागी महान आहेत. एक कानडी तर एक मद्रासी , दोन्हीची घराणी वेगळी. आणि तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे - ती एक संस्कृतीच आहे. तो भाग ही जुन्या कन्नडिगांचा आहे. विद्वत्प्रचुर चेहर्याचे अनेक कानडी आप्पा तिथे गहन चर्चा करताना दिसतील. तिथून केशव- कृपा अगदी हाकेच्या अंतरावर आहे त्यामुळे अनेक वेळा जाणे व्हायचे ! तिथली चट्णी.. वॉव .. तोंडाला पाणी सुटले.

Hotel Chalukya
44, Race Course Road, Basaveshwara Circle, High Grounds, Bangalore, Karnataka 560001 ‎
080 2226 6866
याच हॉतेल्मध्ये रेस्त्रो आहे.आणि दारात कार लावून कारमध्ये बसून खायची पद्धत आहे.
"कामत" आणि "पै" ची कर्नाटकी पातळ भाकरी ( जोल्डा रोटी - आपला जोंधळा) खाल्ली की नाही ? कधीतरी जायला हरकत नाही, पण वांग्याच्या भाजीचा चिखल करतात, आप्लं तेल वांगे दहावेळा तोंडात मारेल त्याच्या.

हे बेंगळुरूच्या खाद्यसंस्कृती बद्दलचे प्रतिसाद वेगळ्या धाग्यात हलवा. परत बेंगळुरूला गेलो की या ठिकाणी जायचा बेत आहे - तेव्हा वाचनखूण सापडली पाहिजे :)

का वेगळा लेखच लिहिताय बेंगळुरू बर?

मैत्र's picture

22 Nov 2013 - 3:59 pm | मैत्र

प्रतिसाद आवडल्या गेला आहे

बंगलोरचे प्रतिसाद इथे नकोत हे इतक्या सभ्यपणे लिहिल्याबद्दल --/\--
नोंद घेण्यात आली आहे. यापुढचे प्रतिसाद पुणे खाद्यसंस्कृतीवरच दिले जातील. (बंगळूरच्या तीन आधी पुण्यातच तीस वर्षे मनसोक्त खादाडी केली आहे..)

दर्यावर्दी's picture

18 Nov 2013 - 11:27 am | दर्यावर्दी

मुर्ख लेख.

मृत्युन्जय's picture

18 Nov 2013 - 11:40 am | मृत्युन्जय

+१

सुहास..'s picture

18 Nov 2013 - 11:40 am | सुहास..

? नेमका कसा मुर्ख ब्वा ??

>>पुणेकर जेव्हा कुजकटपणा करतात तेव्हा मण्यारीचे विष सुद्धा त्यापुढे फिक्के पडेल. एरवीची शब्दलीला ज्याला लोक कुजकटपणा म्हणतात ते म्हणजे उगाच शाही बिर्याणी बरोबर तोंडी लावायला दिलेल्या सॅलॅड सारखे असते.

सहमत.

मस्त लिहीलंय.

काल एफ.सी रोडवर (याला काही लोक एफ.सी. कॉलेज रोड असेही म्हणतात)यानामध्ये सिझलर्स खाल्ल्यानंतर कॅफे चॉकोलेडमध्ये एक लार्ज वॉलनट कॅड बी खाताना काहीसं असंच डिस्कशन चाललं होतं. पुण्यात जितकी खाण्याची चंगळ आहे तितकी मुंबईत नाही यावर एक छोटासा परिसंवादही (हो, परिसंवादच !! ;) ) घडला.

सुनील's picture

18 Nov 2013 - 12:01 pm | सुनील

पुण्यात जितकी खाण्याची चंगळ आहे तितकी मुंबईत नाही

आता शिक्रणालादेखिल चंगळीच्या यादीत टाकले तर, यादीतील आयट्म्सची संख्या वाढणारच ! ;)

मृत्युन्जय's picture

18 Nov 2013 - 12:11 pm | मृत्युन्जय

मटार उसळ विसरलात? आमच्या आप्पासारखी मटार उसळ त्रिखंडात मिळत नाहित. त्रिखंडात् मटार तरी मिळतात की नाही देव जाणे.

गणामास्तर's picture

18 Nov 2013 - 10:54 pm | गणामास्तर

आप्पाच्या मटार उसळ हज्जार वेळा सहमत मृत्युन्जय रावांशी ..

मैत्र's picture

18 Nov 2013 - 11:51 pm | मैत्र

आप्पा गेले असं ऐकलं आहे. :(
मटार उसळ घेतल्यावर अतिशय मऊ आवाजात - "शेव देऊ का? ताजी आहे." असं विचारलं होतं एक दोन वेळा.
दस्तुरखुद्द प्रेमाने विचारतायत म्हटल्यावर काय बिशाद.

मग एका बिस्किटाच्या (पारलेचा मोठा पत्र्याचा डबा) डब्यातून वर्तमानपत्रात ठेवलेली खरोखर ताजी आणि केवळ अप्रतिम शेव आप्पा बशीमध्ये द्यायचे.

आप्पा हे एक इंस्टीट्युशन होतं खाद्य संस्कृतीचं.

शेखर's picture

19 Nov 2013 - 3:35 am | शेखर

अप्पा जाऊन २ वर्षे झाली असावीत.
अजुन म्हणजे, अप्पाकडची खिचडी काकडी केवळ अप्रतिम.. खरच तुम्ही म्हणता तसे आप्पा हे एक इंस्टीट्युशन होतं खाद्य संस्कृतीचं.

तुम्ही क्यांपातल्या रामकृष्ण समोरच्या "द प्लेस" मधला सिझलर खाल्ला आहे का? जन्नत...

सुहास..'s picture

19 Nov 2013 - 11:04 am | सुहास..

कित्येकदा !!

कँम्पवरून आठवले , काय खावे तिथे ?

मार्जोरिन ला आईसक्रीम
बर्गर किंग ला किंगसाईज बर्गर
नायाब , रेडिओ ला खिमा
गार्डनपासला वडापाव
फुटबॉल, बियरचा प्युयर ड्राफ्ट आणि बिलीयर्डचा मुड असेल तर टुन्स ला बसाव

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Nov 2013 - 11:55 am | डॉ सुहास म्हात्रे

:)

सुज्ञ's picture

18 Nov 2013 - 11:55 am | सुज्ञ

शोभलात हो !

आला का अभिमान वर. म्हनलेत स्वतास शहाने.. केलीत जहिरात...

शोभलात हो पुनेकर !

मृत्युन्जय's picture

18 Nov 2013 - 11:57 am | मृत्युन्जय

तुम्ही कंच्या गावचे म्हनुन शोभता पावने?

सुज्ञ's picture

18 Nov 2013 - 12:03 pm | सुज्ञ

चौकशा करु नये . अपमान केला जाइल..

..अभिमानाने

स्पंदना's picture

19 Nov 2013 - 12:26 pm | स्पंदना

हे पक्के दिसत नाहीत, कच्चे वाटतात.
जे पक्के असतात ते किमान शब्दात कमाल अपमान अस म्हणतात. :\

पिलीयन रायडर's picture

18 Nov 2013 - 12:27 pm | पिलीयन रायडर

झालय असं की ह्या लेखाचं ब्याकग्राउंड मला माहितीच नाहीये..
म्हणुन मला लेखाचा "निर्भेळ आनंद" घेता आला..!!! (पण काय हाणलाय च्यामारी.. वगैरे मजा नाही घेता आली!!)

लेख उत्तम जमुन आलाय..!!! अगदी फक्कड..!!

मालोजीराव's picture

18 Nov 2013 - 12:39 pm | मालोजीराव

एकदम दिलसे !

संजय क्षीरसागर's picture

18 Nov 2013 - 1:08 pm | संजय क्षीरसागर

यांचे जरा सविस्तर पत्ते मिळतील का?
मनिषात पाणीपुरी - गणेशची लस्सी
आणि ....सुजाताची मस्तानी खाउ शकतो... कधी मथुराची मस्तानी (जे एम रोड) ट्राय कर. आणि सिझलर्सचा विषय निघालाच आहे तर दोन ठिकाणं : शांग्रीला (कर्वे रोड) आणि रविराज (भांडारकर रोड).

मृत्युन्जय's picture

18 Nov 2013 - 1:17 pm | मृत्युन्जय

मनिषा - कर्वेनगर मध्ये. कर्वे नगर मध्ये ३ गणेश भेळ आहेत. एक जोशी स्वीट्स समोर, एक चितळे (देवेश बंधु) शेजारी आणि एक त्यापासुन थोडेसे पुढे जाउन मयुर हॉटेलच्या अलीकडच्या गल्लीत. हे जे तिसरे गणेश भेळ आहे त्यासमोर मनिषाची पाणीपुरी आहे. त्यांची मसाला पुरी देखील मस्तच.

गणेश लस्सी मोदी गणपतीजवळ आहे. स्टेशनवरचे कैलास देखील चांगले आहे.

मथुरा, शांग्रीला आणि रविराज ट्राय किया जायेगा. धन्यवाद.

राजेंद्र मेहेंदळे's picture

18 Nov 2013 - 3:47 pm | राजेंद्र मेहेंदळे

लॉ कॉलेज रोड चे योको सिझलर्स बेस्ट्.आणि नंतर सिझलिंग ब्राउनी खायला विसरु नका
तेच ते...केकवर आइस्क्रीम आणि वर गरम चॉकलेट ओतुन

मी-सौरभ's picture

19 Nov 2013 - 7:36 pm | मी-सौरभ

मला कल्याणि नगर मधलं बाऊंटी सिझलर खुप आवडलयं. ईतर कुणी ट्राय केलयं का?
तसचं ईस्ट स्ट्रीट वरचं चायनीज रुम आणि जहांगीर बाहेरचा वहुमन कॅफे या पण लई भारी जागा आहेत :)

कपिलमुनी's picture

19 Nov 2013 - 8:17 pm | कपिलमुनी

तुझ्या गाडीची पार्टी कुठे करायची ?
बाऊंटी सिझलर? चायनीज रुम ?

मी-सौरभ's picture

20 Nov 2013 - 10:27 am | मी-सौरभ

सॉमट्न, भोलेनाथ किंवा पालथा पण चालेल

मुनीवर्यः एका सेकंड ह्यांड गाडीची पार्टी मागण्यापेक्षा तुमच्या नव्या जॉब ची पार्टी द्या. (नवा पगार आल्यावर पण चालेल)

नितीन पाठक's picture

18 Nov 2013 - 2:03 pm | नितीन पाठक

लेख एकदम छान जमला आहे.
माझ्या मते फक्त नगर येथे लस्सी मध्ये आइसक्रीम टाकून मिळते. (चूक भूल द्यावी / घ्यावी). नगरची दूर्गासिगची अंजीर लस्सीची चव छानच आहे. आपण नगरच्या लस्सीवरून पुणेकरांच्या खाद्यसंस्कृती वर कसे काय वळाला ? तसेच पुण्याचे लोक लग्नाचा बस्ता बा^धण्यासाठी नगरमध्ये येतात आणि संपूर्ण लग्नाचे व-हाड नगरची लस्सी पिल्याशिवाय परत जात नाही.

कापड बाजारात ली आनंद लस्सी .. कोहिनूर समोर..

शैलेन्द्र's picture

18 Nov 2013 - 3:28 pm | शैलेन्द्र

बरोबर, पण मला ती तितकीशी आवडली नाही