लोकगीत, लोककला, लोकसंगीत कसं असतं अगदि लोकांत मिसळून गेलेलं; त्यांच्यात वारंवार आढळणारं; तसेच हे "लोकसंवाद"
हल्लीचे काही लोकसंवाद. खरं तर लोकरोग. लोकांच्या टाळक्याला झालेले आजार.
(ह्यातले एक दोन मी जालवरील प्रतिसादातून उचलले आहेत)
.
.
१.मुलगी काळी असली तरी कमावती आहे!!
२.तू आयटीत आहेस? मग तिसरं होम लोन कधी घेतोयस?
३.तू आयटीत आहेस? मग भारतात काय करतोयस?
४.भेंचोत महागाई इतकी वाढलिये आजकाल; ग्लेनफिडिच पितानाही हाच विचार सतावतो.
५.मी मुलगा इंजिनिअर असला तरच होकार देणार.
६.तो मुस्लिम/ब्राम्हण्/दलित असला तरी चांगलाय!
७.तो अमुक अमुक मोठा गायक आहे ना, गायक असला तरी निर्व्यसनी आहे! (अरे चौकटीबंद चष्मा काढून जरा त्याच्या गायकीकडे बघा रे)
८.नै, तुम्हाला वाटेल जरा पर्सनल होइल, पण एक विचारु का? काय हो.....
(अरे पर्सनल आहे ना, मग गप्प बैस ना.)
९.राहुलचं बाळ गेलं मागच्या महिन्यात. शिवाय मुलगा होता हो!
१०.बस मॅम, तुम्ही आम्हाला फक्त अमुक हजार द्या. काssssही कष्ट्/व्यायाम्/आहार नियोजन न करता हे अस्सं वजन कमी होत पहा.
११.तसंही जगून काय करनार भेंचोत. मस्त सुस्साट बेभान हाकायची गाडी. आपल्याला जीवाची फिकिर नाय. बिंदास हे आपन.
१२.ई ई ई नाऱळासोबत खडीसाखरेचा तुकडा नको. क्यालरिज असतात त्यात फार.
१३. काही गोष्टी अजून विज्ञानालाही उमजलेल्या नाहित.( म्हणून मी वाट्टेल त्या कविकल्पना गळ्यात मारिन; त्या मुकाट्याने ऐक)
१४.त्या हिरोइनचं ऐकलं का? ती त्याच्यासोबत अमुक अमुक ठिकाणी फिरत असते म्हणे.
१५. अरे आपला तो हा अमुक आणि आपली ती ही तमुक फार सोबत दिसताहेत. ऑफिसनंतरही भटकताना दिसतात बराच वेळ.
मी पीछा करताना समजलं की...(आँ? त्यांचं भटकणं चूक, तर साल्या तुझं असं चोरीछुपे गॉसिपिंग आणि पीछे करणं आंबटशौकिनपणा नै का?)
१६.आता मी कशाला स्वतःच्या तोंडानं सांगू? पण अमक्याच्या तमकीसोबत काहीतरी चालल्याचं मी ढमक्याकडून ऐकलय.
१७. बस आता आम्हाला इतके इतके दिलेत, की महिन्याभरात अंबानीच्या दुप्पट रक्कम तुमच्या सेव्हिंग्ज अकाउंटमध्ये येणार!
१८.जाउ दे रे. ह्याही वेळी पार्शलिटी झाली; नाही तर आपल्यालाच मिळालं असतं प्राइझ.
१९. अहो त्यानं अभ्यास खूप केला होता. पण बोर्डात काय घोळ झाला ठाउक नाही.
तसा तो फार हुशार आहे. पण नक्की चेकिंग मध्येच प्रॉब्लेम आला असणार.
२०. आपण कोण?
किंवा:-
आडनाव काय म्हणालात तुमचं?
.
.
तुमच्या कडे असल्यास असे लोकसंवाद इथे शेअर करावेत.
--मनोबा
प्रतिक्रिया
14 Nov 2013 - 11:46 pm | यसवायजी
१ मित्र दुसर्याला:- तीचं फेसबूक प्रोफाईल बघीतलं आणी लग्नाला नकारच दिला. काय पोरगी म्हणायची का सोंग.. :))
15 Nov 2013 - 1:43 am | बॅटमॅन
अगागागागागा =))
बाकी पोराचे स्वतःचे घर असूनही १ बीएचकेचाच फ्लॅट असल्याने नकार देणार्या पोरीही पाहिल्या आहेतच.
15 Nov 2013 - 9:33 am | खबो जाप
आमच्याकडे एकाला आयटीत आहे (जवळपास ७५ च्या वर पगार) पण परदेशी जाण्यचा चान्स नाही म्हणून नकार दिला एका मुलीने. आता बोला.
15 Nov 2013 - 12:00 pm | बॅटमॅन
जरा हळू ओ, स्त्रीद्वेष्टेपणाचा शिक्का बसेल नैतर.
18 Nov 2013 - 7:04 pm | खबो जाप
बघितलं ते सागितलं…… मी कशाला पांगे घेवू
18 Nov 2013 - 8:40 pm | बॅटमॅन
अहो तुम्ही काहीही सांगितलं तरी शिक्का बसवणारे बसवतीलच. तुमचं निरीक्षण खरंखोटं आहे की कसं याचा त्यांना फरक पडत नै.
15 Nov 2013 - 2:26 pm | यसवायजी
आमच्या वेळी हे असलं नव्हतं. कलियुग का काय ते हेच.. ;)
-----------------
बाकी, 'नकार दिला जाण्याची हल्लीची कारणे' यावर १ धागा उघडता येइल.
15 Nov 2013 - 4:47 pm | टवाळ कार्टा
+११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११
:(
#@#@$$%^%$$@#!$^%#%#&%%!@%#$@%
14 Nov 2013 - 11:59 pm | अग्निकोल्हा
खरा कट्टा तर दारुल-अमुक-तमुक वाल्यांचाच.
15 Nov 2013 - 12:06 am | रेवती
१)'नाकीडोळी नीटस मुलगी' आणि 'कमावता मुलगा' हेही ऐकून ऐकून कंटाळा येतो.
डॉक्टर इंजिनियरांना तर इतका भाव असतो की जगातले बाकीचे व्यवसाय हे मोडीतच काढलेले असतात (बरं याबद्दल फार बोलत नाही कारण माझ्या बाबांचच असं मत असल्याने गप्प बसावं लागतं, त्यामुळेच तो ३ इडियट शिनेमा आवडला मला).
२)आणखी म्हणजे मुलगी सरळ्/चांगल्या वळणाची/ सोशीक असणं. कशाला हवी सोशीक मुलगी? घरातल्यांनी हवं तसं उधळावं आणि हिनं खस्ता खाव्यात म्हणूनच ना!
३)एकदा घरी कोणतातरी कार्यक्रम होता, साहजिकच जेवणं लांबली. मी खाण्यापिण्याच्या वयातली असल्यानं "कधी संपणार ही पूजा, मला भूक लागलीये" म्हणताच एक शिनियर शिट्टीझन बाई म्हणाल्या "अंहं, असं नाही म्हणायचं, आधी पुरुषांची पंगत होऊ दे, भूक काढायला शिकलं पाहिजे." हे कसं काय बुवा शिकायचं? ते मला अजूनही जमलेलं नाही. भूक लागली की मी जेवते.
15 Nov 2013 - 12:30 am | पाषाणभेद
आजकाल वेबसाईटवर काही वाचणेबल येतच नाही.
15 Nov 2013 - 12:46 am | सूड
१. मी काय म्हणत्ये, मुलगी चांगली आहे रे. घराचं सवडीनं बघ. शिवाय दोघे कमावते असल्यावर सोपं जाईल.
२. त्यांनी नकार दिलाच नव्हता तसा, म्हणजे नकार नव्हताच. ज्या ज्योतिषाला पत्रिका दाखवलंनीत त्याने नीट सांगितलं नव्हतं. तुम्ही लोक पहा ना जरा तुमच्याकडे कोणाला तरी पत्रिका दाखवून.
३. आडनांव काय म्हणे?? म्हणजे नक्की कोण? देवरुखला आहे का कोणी?
४. सर, ते फ्याट मसल्स मध्ये कन्व्हर्ट होतं हो !! (कसं शक्य आहे?? :)) )
५. तू सप्लिमेंट्स घेत नाहीस? कसं होणार मग !!
६. आज खरंच कंटाळा आलाय.
15 Nov 2013 - 6:25 am | अत्रुप्त आत्मा
लक्षणं काही ठीक नै दिसत! ह्हूं..... =)) असतं ब्वॉ एकेकाचं असं! :p
15 Nov 2013 - 12:05 pm | सूड
>>लक्षणं काही ठीक नै दिसत!
का हो बुवा?
15 Nov 2013 - 1:02 am | विजुभाऊ
१) इथे कंपुबाजी फारच चालते.
15 Nov 2013 - 1:57 am | प्रभाकर पेठकर
अखेर आई म्हणालीच, बाबारे! मुलगी कमी शिकलेली असेल तरी चालेल पण फेसबुक, वॉट्सअपवाली नको रे बाबा. आपल्या घरात कामं असतात.
15 Nov 2013 - 2:11 am | खटपट्या
मस्त !! प्रत्येक वाक्यावर एक लेख होउ शकतो.
यावर माझा अनुभव:
मला जेव्हा दुसरी मुलगी झाली तेव्हा मी आणि बायको खूप आनंदी होतो. आम्हालाही मुलगीच हवी होती. पण शेजारच्या दोघी तिघी जणी हॉस्पिटल मध्ये आल्या आणि एकच वाक्य वारंवार उच्चारू लागल्या.
"दुसरी पण मुलगीच झाली? अरेरे मुलगा झाला असता तर बरे झाले असते"
च्याआयला आम्हाला काही प्रोब्लेम नाही तर तुम्ही का हळहळताय. एवढा संतापलो होतो कि वाटले होते कि सर्वाना हाकलून द्यावे.
त्यात अजून एक मित्र ज्याला दोन मुली आहेत तो मला बायको समोर म्हणाला "आता आपण समदुख्खी"
आता मात्र माझी सटकली व त्याच्याकडे रागाने बघत म्हणालो "समदुख्खी ??????"
त्यानंतर तो बरेच दिवस मला टाळत होता.
15 Nov 2013 - 3:14 am | अगोचर
अरे व्वा मज्जा आहे तुमची !
15 Nov 2013 - 6:15 am | अत्रुप्त आत्मा
नेहमी लिहीत नै तो!........ पण धागा काढलन ना,की शंभर चुकत नैत मेल्याचे! =))
15 Nov 2013 - 11:02 am | शैलेन्द्र
+ कनेक्शनच तसे आहेत त्याचे
15 Nov 2013 - 9:49 am | प्रचेतस
काय बे मनोबा, जरा ते अब्राहमिक धर्मांवरचं लिखाण पूर्ण कर की रे.
15 Nov 2013 - 12:35 pm | प्यारे१
तू आधी 'ते' राष्ट्रीय कार्य पूर्ण कर.
विक्रमादित्य पिछा सोडणार नाही नाहीतर वेताळा! ;)
सारखा सारखा 'जाहीर' प्रश्न विचारतो हा विक्रमादित्य!
हे कुठं नि ते कसं! =))
15 Nov 2013 - 12:45 pm | बॅटमॅन
कुठलं राष्ट्रीय कार्य?
18 Nov 2013 - 11:16 pm | मन१
कराच राष्ट्रिय कार्य पूर्ण
19 Nov 2013 - 3:38 pm | बॅटमॅन
कुठलं कार्य??? स्पष्टीकरण करा की जरा.
18 Nov 2013 - 12:34 am | पुष्कर जोशी
हो खरेच बर्यच दिवसापसुन बाकि आहे
15 Nov 2013 - 12:57 pm | सुहासदवन
काय करणार! हे असंच चालणार बाबा!! शेवटी अल्पसंख्यांक आहोत ना आपण!!!
15 Nov 2013 - 1:03 pm | बॅटमॅन
आणी एकः
$$$$$$ फार माजलेत अलीकडे.
15 Nov 2013 - 2:03 pm | सुहासदवन
डॉलर फार माजलेत अलीकडे. साला रुपयाला काही किंमतच नाही
15 Nov 2013 - 2:05 pm | बॅटमॅन
=))
अवांतरः तुमचा आयडी सुहासवदन असा पाहिजे होता की तुम्ही 'सुहास धवन' आहात ;)
15 Nov 2013 - 2:15 pm | पियुशा
तुला एक फार चांभार चौकश्या रे ब्याट्या ;)
हापिसातले काही डायलॉग
खुप झेलु आहे हा (ही ) नुसता सरांपुढे हांजी हांजी करत असतो ( ते)
बिचारा एक्स वाय झेड घरातली सगळी कामे उर्कुन येतो म्हणून उशिर होतो हापिसला ;)
15 Nov 2013 - 2:17 pm | बॅटमॅन
पिवशे मझ्यशि मय्त्रि कर्न्र कं?
15 Nov 2013 - 2:27 pm | यसवायजी
ब्याट्या.. दोस्तीत कुस्ती? :(
15 Nov 2013 - 2:35 pm | बॅटमॅन
आँ? कसली हो कुस्ती? तो 'मय्त्रि कर्न्र कं' हाही एक लोकसंवादच आहे, फक्त पियुशाचं नाव घालून लिहिला इतकंच.
15 Nov 2013 - 3:42 pm | यसवायजी
लोकसंवाद का ? वोक्के..
पन त्यात नाव घालायची काय गरज होती ऑं?
(रच्याकने.. ब्याट्या, पियुशा हा ड्यु आयडी आहे - इती प्यारे.)
जपुन बरं का भौ..
15 Nov 2013 - 3:47 pm | पियुशा
च्यायला ....
यसवायजी , का पण जळुन राहीले बाप्पा तुम्ही ब्याट्या वर :P
कु्. ह. घ्या :)
15 Nov 2013 - 3:48 pm | बॅटमॅन
हाहाहा. अन अहो ते क्षयझ आहे, सयज नै कै ;)
15 Nov 2013 - 3:51 pm | पियुशा
अहो अहो कुणाला करता आहात हो बॅटमॅन तुम्ही ?
अग - तुग चालेल ;)
बस्स बुवा ...धाग्याचा मालक यायचा पिटाळायला आप्ल्याला पळते मी ब्ब बाय ;)
15 Nov 2013 - 4:01 pm | बॅटमॅन
'अहो', पण तुम्हाला कुठं अहोजाहो केलं मी ;) =))
15 Nov 2013 - 4:10 pm | यसवायजी
अग्ग अग्ग पियुशी..
ते मला अहो अहो म्हंतायत.. तु टेन्षन नक्को घेउ हां.. :)
-------
आणी अहो बॅटमॅन तुम्ही .. मला अरे तुरे म्हणा बघु.. उगाच (आपल्या?) पियुशीला त्रास होतोय..
15 Nov 2013 - 3:07 pm | पियुशा
पिवशे मझ्यशि मय्त्रि कर्न्र कं?
इश्श्श्श........... ;)
अजुन भर
* आमचे हे नाही हो असले , देवमाणूस आहेत अगदी ....
* तिने नवर्याचा घाण्याचा बैल करुन ठेवलाय नुसता....
* डोक्यात भुसा भरलाय का ?
* आमची कामवाली बै नै आली आज, सगळ मीच केल हो एक्टीने ...
* माझी कड्की चालुये ...
* मी कंगाल ब्यांकेचा म्यानेजर आहे ....
* मी कशी दिस्त्ये ;)
15 Nov 2013 - 3:12 pm | बॅटमॅन
जल्ला ता इश्श म्हंजी क म्हनाचा, मना त द्येवदासवाला आठवून र्हालाय.
बाकी अजून आमचीपण भरः
* आज कुठली साडी घालू? घाल कुठलीपण. (तसंही कोण बघणारे तेच्यायला, इतकी वर्षं झाली लग्नाला इ.इ. अनुभवी लोकांनी रिकाम्या जागा भराव्यात-अर्थात मनातच)
15 Nov 2013 - 3:25 pm | पियुशा
* आज कुठली साडी घालू? घाल कुठलीपण. (तसंही कोण बघणारे तेच्यायला, इतकी वर्षं झाली लग्नाला इ.इ. अनुभवी लोकांनी रिकाम्या जागा भराव्यात-अर्थात मनातच)
झालं..... टाकली का काडी बॅटमॅना ;)
पॉप कॉर्न घेउन ये ;)
15 Nov 2013 - 3:30 pm | बॅटमॅन
बघू की काय होते, पॉपकॉर्न तर आम्ही सुरुवातीलाच घेऊन बसलो होतो ;)
15 Nov 2013 - 3:41 pm | प्यारे१
काही ठरलं की नाही?
तुझ्याएवढा/ढी असताना दोन दोन मुलं झालेली आम्हाला!
15 Nov 2013 - 5:17 pm | यशोधरा
अहो भाषासम्राट, साडी घालत नाहीत, नेसतात!:P
15 Nov 2013 - 5:34 pm | सूड
तेच लिहीणार होतो पण मेल्यान् शब्दात पकडलंन् तर काय करु म्हणून गप बसलो.
15 Nov 2013 - 6:04 pm | बॅटमॅन
अरे सुडक्या मी उगीच पकडापकडी खेळत नै रे ;) (माझा मूड असल्याशिवाय ;) )
15 Nov 2013 - 6:02 pm | बॅटमॅन
हा हा हा, बरोबरे, अंमळ गुंडाळलं खरं ;) बादवे अलीकडे धोत्रेसुद्धा प्यांटप्रमाणे 'घालायची' निघालीत असे ऐकतो.
15 Nov 2013 - 6:51 pm | रेवती
साडी नेसतात.
15 Nov 2013 - 2:32 pm | सुहासदवन
माझे नाव आत्तापर्यंत बऱ्याच वेळेला बऱ्याच जणांनी सुहासवदन म्हणूनच लिहिलेले आहे.
पण ते सुहास द वन (SUHAS THE ONE) असे आहे.
15 Nov 2013 - 2:34 pm | बॅटमॅन
वा! हे मस्त आहे, आवडलं.
15 Nov 2013 - 3:13 pm | मन१
+१
15 Nov 2013 - 1:55 pm | उद्दाम
तो उद्दाम ना , तो नेहमी ट्रोल करण्यासाठी लिहितो..
15 Nov 2013 - 2:17 pm | मनीषा
१. अगं बाई, कपाळावरची टिकली पडली वाटतं तुझी, (पडायला मुळात आधी लावायला हवी ना ?), हे काय हातात बांगड्या नाहीत तुझ्या?
२. काय आराम चालू आहे वाटतं?
३. जेवण झालं का? आज काय केलं होतं?
४. (माझा मुलगा माझ्या बरोबर आलेला असेल तर ) किती मोठा झाला हा? ओळखलच नाही? आईपेक्षा उंच झाला ना? मजा आहे. (आता यात मजा काय कोण जाणे)
५. सध्या उद्योग काय चालू आहे?
('काही नाही' असे उत्तर दिले की ) अगं मग घरी ये ना कधी तरी, रिकामीच असतेस ना? :(
५. (प्रत्येक वेळी पुण्याला आल्यावर) आता परत कधी जाणार? किंवा किती दिवस मुक्काम? :(
15 Nov 2013 - 3:20 pm | वामन देशमुख
+१
15 Nov 2013 - 7:06 pm | रेवती
सगळ्या संवादांशी सहमत.
आणखी भर म्हणजे "काय मग्ग, काय म्हणते अमेरिका?, तुमच्या ओबामानं अमूक तमूक केलं." (जसं काही मनमोहन सिंगानं जे काय केलय त्याची नोंद या ठेवतातच).
तुमचं बरय बै, तिकडं अमेरिकेत कोणाचं येणं जाणं नै, सगळी कामं यंत्रानं होतात, इथं म्हणजे सगळ्या ठिकाणी आपणच मरा! धुणं भांड्याची बाई आली नाही की कपड्याचं मशीन लावा, कामापुरती भांडी धुवून घ्या, निदान घरात व्हॅक्यूम क्लिनर तरी फिरवा. मग काय, तुमच्या नेहमी पार्ट्या असतात ना?
आईकडे गेलं की आईला नेहमी "काय मग आता, लेक आलीये ना?" "काय गं, तिकडं नेहमी बर्गर, पिझ्झाच खाता ना?" "तिकडं म्हणे नको इतकं मोकळं वातावरण आहे?" या प्रश्नांची उत्तरं देऊन देऊन मला भोवळ येते. ;)
15 Nov 2013 - 8:01 pm | विजुभाऊ
किती मोठा झाला हा? ओळखलच नाही? आईपेक्षा उंच झाला ना? मजा आहे.
वडिलांवर गेलाय अगदी.
उत्तर: अहो हा शेजारचा रवी आहे. तो आमच्या ह्यांच्यावर कशाला जाईल.....
15 Nov 2013 - 8:08 pm | मन१
ठ्ठो
15 Nov 2013 - 8:54 pm | बॅटमॅन
खपल्या गेले आहे =))
अन मग यानंतर खाजगीतः तरी मी म्हणत होते, त्यांचं ('आमच्या' ह्यांचं) लक्षण कै ठीक नाही. घरचं सोडून दारच्याची भूल पडली हो त्यांना. अन आता तेच फक्त म्हटले तर कोण राग येतो ;)
16 Nov 2013 - 2:34 am | जेनी...
=))
17 Nov 2013 - 12:40 am | अत्रुप्त आत्मा
=)) चावट बालिका. =))
15 Nov 2013 - 2:37 pm | मीता
काहि नविन करायला गेले की "आमच्या कडे असच असत.."
15 Nov 2013 - 3:07 pm | प्यारे१
ब्याट्या, पियुशा हा ड्यु आयडी आहे. ;)
15 Nov 2013 - 3:09 pm | बॅटमॅन
अहो मी सांगितलेलं वाक्यसुद्धा मिपालोकसंवादाचंच उदाहरण होतं, त्यात फक्त पियुशाचं नाव घातलं एवढंच =))
15 Nov 2013 - 3:44 pm | प्यारे१
>>>मिपालोकसंवादाचंच उदाहरण
आमचं पण! ;)
15 Nov 2013 - 3:13 pm | पियुशा
ओय्य प्यारेकाका कै च्या कै अफवा पसरवु नका :प
तु नको लक्ष देउस रे ब्याट्या, ;)
15 Nov 2013 - 3:21 pm | बॅटमॅन
हा हा हा, अगदी अगदी ;) प्यारेकाकांना आज ओळखत नाय आपण ;)
हां तर मग ते मय्तरिचं काय झालं म्हणे?
15 Nov 2013 - 3:35 pm | केदार-मिसळपाव
काही म्हणाल्याच नाहित अजुन.
केव्हढी ती घाई...
15 Nov 2013 - 3:37 pm | बॅटमॅन
माहितीये ना कै म्हणाल्या नैत, म्हणून तर विचारतोय ;) तुम्हीपण आहात वाट्टे लायनीत =))
15 Nov 2013 - 3:39 pm | केदार-मिसळपाव
ब्याटमाना..
15 Nov 2013 - 3:43 pm | पियुशा
लोल्झ ... मेले मेले मेले ... ;)
तेरि मय्त्री कबुल है ब्याटया ;)
आउर कौन कौन है लाइन मे ? आन दो :P
15 Nov 2013 - 3:46 pm | प्यारे१
१० जणांची फ्रेंडशिप आहे. कशी किलो देणार?
15 Nov 2013 - 3:48 pm | बॅटमॅन
काका लोकांना प्रवेश बंद आहे.
15 Nov 2013 - 3:57 pm | प्यारे१
अरे समाजसेवा रे फक्त. काय गं पियु? ;)
तिकडं त्या पिलियन नि पिशी खुश होणार बघ ब्याट्या. जरा 'माणसाळलास' म्हणून. कुठं गेल्या?
15 Nov 2013 - 4:03 pm | बॅटमॅन
अंहं. इथे समाजसेवा वैग्रे कै नै. काका सो काका और तरणा सो तरणा.
अन आम्ही माणसाळायला मुळात जंगलाळलो कधी होतो?
15 Nov 2013 - 9:10 pm | पिशी अबोली
तो कसला माणसाळतो? तरी पिवशीने बोलतं केलं बरंच त्याला.. कीप माणसळाविंग पियु... लायनीत सगळ्यांना... ;)
16 Nov 2013 - 12:28 am | बॅटमॅन
स्वतः रानटी (वाइल्ड म्हटले की कसे फ्याशनेबल वाट्टे नै =)) ) राहून दुसर्यांना माणसाळवणे हे कै बरे नव्हे ;)
19 Nov 2013 - 5:05 pm | पिशी अबोली
मी कुठे माणसाळवतेय तुला? पियुशा करतेय ते काम... ;)
19 Nov 2013 - 5:10 pm | बॅटमॅन
हा लै मोठा गैरसमज आहे. आम्ही अगोदर जैसे होतो तैसेच आहोत.
15 Nov 2013 - 3:47 pm | बॅटमॅन
मय्त्री कबुल असल्याने तूर्तास आम्ही 'बॅट'मध्ये बसून अख्ख्या गॉथम शहरावर घिरट्या घालत आहोत ;)
अन मेल्यावरपण डॉळा मारणारी पियुशा बाकी ग्रेटच हो ;)
15 Nov 2013 - 4:01 pm | यसवायजी
@ आउर कौन कौन है लाइन मे ? आन दो
:D
अगो काय सतनारयनाचा पर्साद हाय काय? का गावजेवन हाय?
;)
15 Nov 2013 - 4:24 pm | पियुशा
SYG
तुम्ही जळकुकडे आहात :P
(पळते आता )
15 Nov 2013 - 4:28 pm | यसवायजी
पळते आता>>
ए पलट..
15 Nov 2013 - 4:31 pm | गुलाम
१)साला लाईफच झंड झालीय...
२) टॅलंट वर काही नसतं रे, सगळं लक वर आहे...
३) कंटाळ्याचादेखील आता कंटाळा येतो..
15 Nov 2013 - 4:44 pm | प्रचेतस
अरे काय चाललंय रे हे तुमचं, त्या मनोबाला काय वाटेल ह्याचा कै विचार =))
15 Nov 2013 - 6:02 pm | यसवायजी
अहो वल्ली हे सगळे "चितपरिचित डायलॉग्ज" आहेत. तुम्हाला काय वाटलं?
15 Nov 2013 - 5:02 pm | सूड
अरे काय धागा आहे का रुक्मिणीस्वयंवर !!
15 Nov 2013 - 9:08 pm | मन१
रुक्मिणी.... ये ना....
जगू कसा तुझ्याविना मी राणी ग
हे रुक्मिणीच्या लग्नाचे थीम साँग असावे काय?
15 Nov 2013 - 10:06 pm | सूड
नाय तिला लोक 'मयत्रि कर्नार कं' विचारत असावेत !! :))
15 Nov 2013 - 6:06 pm | राजेंद्र मेहेंदळे
१.साला ३० लाखात फ्लॅटच मिळेना आजकाल (यात दरवर्षी १० लाखाची भर घाला)
२.जास्त ब्लॅक दिला तर रेटमध्ये अॅड्जस्ट करुन देउ (सगळाच दिला तर?)
३.पाण्याची सोय नाहीये अजुन..पण काही प्रॉब्लेम येणार नाही ..टँकर २४ तास (बांधकाम होइपर्यंत आमच्याकडुन..नंतर बसा बोंबलत हे नै सांगत)
४.फ्लॅट मस्त होता हो..पण बजेट ज..रा कमी पडले
15 Nov 2013 - 7:44 pm | चिरोटा
गाडी घेताय? मारूतीचीच घ्या. जास्त टेन्शन नाय्.परत चांगल्या किंमतीला विकता येते.
गाडी घेताय ? मग टाटाचीच घ्या.खात्रीलायक ब्रॅन्ड.
गाडी घेताय?Volkswagaon घ्या. महाग असते पण जर्मन इंजिनियरिंग आहे ना?कधीच प्रॉब्लेम नाही येत.
गाडी घेताय? कशाला पाहिजे?रिक्षा आहेत्,मेरू कॅब्स आहेत. गाडी म्हणजे पांढरा हत्ती.
15 Nov 2013 - 8:09 pm | मी-सौरभ
तुझं बरं आहे रे घरी राह्तोस. आमच्यासारख्या होस्टेलाईट नाहीयेस.
15 Nov 2013 - 8:58 pm | भाते
विकांताला बराच टीआरपी खेचणार आहे हा धागा अस दिसतंय.
15 Nov 2013 - 9:00 pm | अधिराज
प्रसिद्धिसाठी काढलेला धागा!
15 Nov 2013 - 9:06 pm | मन१
कुणाच्या प्रसिद्धीसाठी?
15 Nov 2013 - 9:11 pm | अधिराज
ते वाक्य मिपा लोकसंवाद म्हणून लिहिले आहे. :-)
15 Nov 2013 - 9:26 pm | मन१
ओह सॉरी.
15 Nov 2013 - 10:40 pm | आनंदी गोपाळ
ते: क्वॉय? ऑळखलं ना?
आपणः हॅहॅहॅ..हॅ..हॉ.. हो. होहो.. हं..हॅहॅहॅ..
ते: सांगा बघू कोण?
आपण.....
**
आता काही डॉक्टरकी स्पेशलः
**
मी (गंभीर चेहर्याने) : आजींच्या मेंदूत रक्तस्त्राव झालेला आहे. वय ही ८०च्या पुढेच आहे. आपण त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवलंय. पेसिंगही केलेलं आहे. थोडक्यात म्हणजे मशीन चालू आहे तोपर्यंत त्या आहेत. पुढचा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे..
पेशंटचे नातेवाईक : डाक्टर, पण तसं शिरेस काय नाय ना?
मी....
**
पेशंटः डाक्टर, ४ दिवसापासून थोडा नॉर्मल ताप येतोय.
मी...
**
मी: काय होतंय?
पेशंटः बघा ना तुम्हीच तपासून!
15 Nov 2013 - 11:20 pm | मन१
शेवटचे दोन कहर आहेत.
पहिलं खूपच परिचयाचं आहे.
सर्वात बकवास म्हणजे कुठूनही कॉल करुन "ओळख बरं मी कोण बोल्तोय" हा एक होप्लेस प्रकार.
कुणीतरी दहा वर्षांपूर्वी आपण अभिनयाचं , चित्र्कलेच किम्वा अजून कशाचं एक दिवसाचं शिबिर/वर्कशॉप केलेलं असतं ; तेव्हा फक्त दोन मिनिटापुरतं हाय्-हॅलो झालं असलं तरी इथं फोनवर फाल्तू "विसरले राव तुम्ही" वगैरे छळवाद होतो. बालिश वर्तणूक वाटते.
हे असं "ओळख बरं कोण आहे.", "चल अजून एक चान्स देतो. आता ओळख" वगैरे वगैरे प्रकार लै डोक्यात जातात.
16 Nov 2013 - 2:29 am | रेवती
चित्र्कलेच किम्वा अजून कशाचं एक दिवसाचं शिबिर/वर्कशॉप केलेलं असतं ; तेव्हा फक्त दोन मिनिटापुरतं हाय्-हॅलो
खी खी खी. श्या! कायपण.
19 Nov 2013 - 9:57 pm | वामन देशमुख
आपली स्मरणशक्ती इतकी कच्ची कशी असे वाटून पूर्वी मनात अपराधगंड यायचा, पण, आता अश्या लोकांना मी स्पष्टपणे "ओळखले नाही" असे म्हणतो, आणि समोरच्या व्यक्तीने आपली ओळख ठेवावी इतकी आपली किंमत नाही ही झाकलेली मुठ उघडी पाडण्यात आपलीच बेअब्रू होते हे ज्यांच्या लक्ष्यात येत नाही त्यांची अब्रू घालवतो.
च्यायला, आपल्याला समोरची व्यक्ती ओळखत नाही यात किमान अर्धा दोष आपलाच नाही का?
15 Nov 2013 - 11:07 pm | खटपट्या
१ ) सालं आमचं नेट नेहमी मेलेलं असतं…
२) ऑफिस - हा बघावं तेव्हा मिपा उघडून बसलेला असतो.
३) पत्नी - सारखं काय रे मिपा वर, कंटाळा नाही येत ? (तिला काय माहिती काय मजा आहे ती)
16 Nov 2013 - 2:12 am | आदूबाळ
एक वडगाव बुद्रुक / धायरी फाटा स्पेशलः
"काय? निवांत?"
16 Nov 2013 - 2:13 am | वीणा३
अशी पुरणपोळी कधी दुसरीकडे खायला मिळणार नाही (पुरणपोळी च्या जागी कुठल्याही खायच्या पदार्थाचे नाव टाकू शकतो.
जेवणाच्या बाबतीत माझ्या माहितीतल्या प्रत्येक घरातल्या लोकांच हेच मत आहे कि त्यांच्या इतकं नीट चांगलं चुंगलं चविष्ट जेवण / फळं / तूप / तेल कोणाकडेच नसतं. आणि जर दुसऱ्याकडे जर आपल्यापेक्षा जास्त नीट करतात हे लक्षात आलं की, त्यांच्याकडे जर अतीच असतं, पोट बिघडेल अशाने ही वरून पुस्ती.
माझ्या माहितीत असलेल्या प्रत्येक कुटुंबात स्वतः करत असलेल्या अन्नाचा / करण्याच्या पद्धतीचा अतिशय अभिमान आणि दुसऱ्याच्या पद्धतीला तुच्छ (हा कदाचित जास्त तीव्र शब्द होईल, कमी लेखण्याची म्हणा हवं तर )लेखण्याची प्रवृत्ती दिस्ते.
16 Nov 2013 - 2:17 am | वीणा३
तुमचा आधीचा पण लेख / काकू बहुतेक असाच काहीतरी होता (आठवत नाही). पण एवढा विचार केला तर निम्मं आयुष्य मौनव्रतात जाईल बहुतेक :D
18 Nov 2013 - 12:14 pm | मी-सौरभ
=))
16 Nov 2013 - 2:17 am | बॅटमॅन
१००!!!!!
(हाही लोकसंवादच आहे-मिपासाठी आणि सचिनसाठी पण :( :( :( :( )
16 Nov 2013 - 3:10 pm | लव उ
डोक्याला हेडअॅक झालाय नुसता...
आपला तर बाबा बॅडलकच खराब आहे...
16 Nov 2013 - 3:16 pm | शिद
च्यायची कटकट... फुकट डोक्याला शॉट.
16 Nov 2013 - 4:32 pm | अनुप ढेरे
"काय आज कामावर नाही का गेलास? अरे हो... आज शनिवार नाहीका.... मजाय राव तुम्ची शनिवारी सुट्टी म्हणजे"
16 Nov 2013 - 4:58 pm | अधिराज
"किती पगार आहे तुला तिथे?"
17 Nov 2013 - 12:33 pm | ज्ञानोबाचे पैजार
फोटो दिसत नाहित.
हापिसात चे.पु. ब्लॉक आहे, घरी जाउन बघतो.
17 Nov 2013 - 7:54 pm | मारवा
तुम्हाला कीती मुल ?
एकही नाही अजुन ?
लग्नाला कीती दिवस झाले ?
18 Nov 2013 - 12:05 am | आनंदी गोपाळ
तुम्ही लिवा>
माझा स्पेशल:
लँडलाईनवर फोन केलेला असतो.
"काय रे, कुठे आहेस?"
"मी ना? अरे जरा इकडे बाहेर आलोय"
"अरे भाऊ मग लँडलाईण कसा उचललास?"
"त.. ते.. त्ते ना? ते कॉल फॉर्वर्ड लावलाय"!!?
मी...
18 Nov 2013 - 11:37 am | कपिलमुनी
काय झाला हसायला ?
18 Nov 2013 - 1:18 pm | मारकुटे
पाहिन पाहिन नाहितर बंद करुन टाकीन
18 Nov 2013 - 1:24 pm | प्यारे१
तू माझ्याकडे (अशा नजरेनं) का बघत होतास?
(मुद्दलात तुला कसं कळलं हा तुझ्याकडं बघतोय ते?)
18 Nov 2013 - 1:51 pm | स्पा
20 Nov 2013 - 9:27 am | पैसा
मिपावरचा जगप्रसिद्ध प्रतिसाद!!
18 Nov 2013 - 2:50 pm | प्रसाद गोडबोले
कंटाळा आलाय राव
18 Nov 2013 - 3:33 pm | राजेंद्र मेहेंदळे
भाजप सद्ध्या जोरावर आहे बुवा (म्हणजे नक्की काय?)
काँग्रेसचे काही खरे नाही या निवडणुकीत (तुम्ही कधी जाता मतदान करायला? लोळत तर पडलेले असता)
या राष्ट्रवादीवाल्यांना जाम माज आहे (आमच्या पार्कींगमध्ये गाडी लावुन वर आम्हालाच दमदाटी....)
मनसेच गप्प कशी अजुन? (का? तुमच्या काचा फोडायला पाठवु? ख्ळ्ळ ख्ट्याक)
ओबामा जाम हुशार हं पहील्यापासुन(तुमच्याकडे वारावर जेवतो काय?)
18 Nov 2013 - 11:12 pm | मन१
कंसातील टोमणे भारिच आहेत ....
शेवटाचे तीन जस्त आवडले. नाकावर दाणकन् ठोसा मारल्यासारखे वाटतात.
19 Nov 2013 - 11:00 pm | डॉ सुहास म्हात्रे
खी खी खी...
18 Nov 2013 - 5:34 pm | चिरोटा
भारताला ठीक करायचे तर लोकशाही उपयोगाची नाही. डिक्टेटरच हवा.
18 Nov 2013 - 5:35 pm | बॅटमॅन
आज आपले भारत जिंकले पाहिजे.
19 Nov 2013 - 3:55 pm | चौकटराजा
या, तुमचीच कमी होती.
आपलं कुठलं नशीब एवढं !
ए सॉल्लीड बोर आहे तो ' ती आपल्या मैत्रिणीला.
त्या बेदीमुळं आपला शिवलकर कुजविला गेला रे ! " आझाद मैदानावर चा कधीकाळचा डायलॉग.
जाउ दे आयला आपल्या नशीबात नव्हती ती '
बरं आम्ही मूर्ख तुम्ही शहाणे....बस्स ?
या क्रिकेटवाल्यांचे फारच लाड चाललेयत हल्ली !
19 Nov 2013 - 5:12 pm | परिंदा
एवढे ८५% मार्क्स मिळालेत तर आर्टस् काय घेतोस? सायन्स घे रे?
अरे मुलगा असुन रडतोस काय बायकांसारखा?
१ : "किती टक्के पडले?"
२ : "८९%"
१ : "ठीक आहेत. आमच्या त्यांच्या मामांच्या काकांची मुलगी आहे ना तिला ९५% टक्के मिळालेत."
२ : "हो का? नाव काय मग तिचं?"
१ : "आठवंत नाय रे. पण तुला काय करायचंय"
२ : "नाही सहजच. बोर्डात पहिला आलाय त्याला ९१% मिळालेत ना म्हणून.."
१ (आता चुप्प.)
19 Nov 2013 - 10:15 pm | मुक्त विहारि
कोट्यातील असतील...
20 Nov 2013 - 8:51 am | चौकटराजा
काही झालं तरा कावळा पिंडाला शिवेना.
किती बाटल्या रक्क्त लागलं ऑपरेशनला ?
अनेशेसिया जनरल , लोकल की स्पायनल दिला ?
अरे तू फार केलंस तिचं ! शेवटी प्रत्येकाला जायचं आहे !
इतः: पर तुम्हाला लग्न करायचं असेल तर करा आम्ही आपलं सावध करायचं काम केल बुवा !
बाळ बाळंतीण कुशल आहेत.
बरंय गाडी सुटायची वेळ झाली. तब्बेतील जपा म्हटलं !
काही नाही हो या तपासण्या म्हण्जे... डोकटर लोकांचं रॅकेट असतं !
काहे पैशा बियशाची मदत लागली तर सांग !
20 Nov 2013 - 9:00 am | मन१
सर्व वाचक, प्रतिसादकांचे पुनश्च आभार.
21 Nov 2013 - 4:58 pm | चावटमेला
आम्ही एवढे जीव तोडून सांगत होतो तर किंमत नव्हती, आता बस म्हणाव रडत
हे बघ, शेवटी निर्णय तुझा आहे, आम्ही काय भल्यासाठीच सांगतो
च्यायला, ह्या ट्रॅफिकनं वैताग आणलाय