भयंकररस:१

डॉ. एस. पी. दोरुगडे's picture
डॉ. एस. पी. दोरुगडे in जे न देखे रवी...
2 Nov 2015 - 8:17 pm

सारा जन्म पोरी फिरवण्यात गेला
पोरींचा गराडा त्यास सदा पडलेला
दरवर्षी एखादी तरी पोरगी गटवतोच
असा त्याचा लौकिक आता झालेला
सहकारी शिक्षिकांवरही त्याचा तसा
नेहमीच अन् डोळा हा राहिलेला
जरा कुठे ओढणी हलली, पदर ढळला
लगेच त्वरे तिकडे तो पाहू लागला
विद्यार्थिनीप्रिय शिक्षकाचा शिक्का त्यावर
तरीही उजळमाथ्याने वावर त्याचा राहिला
नैतिकतेवर जेव्हा भाषण देई मंचावरुनी
भयानकच ते अगदी सारे वाटे मजला!

मुक्त कविताराजकारण

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Nov 2015 - 8:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पण यात राजकारण काय आहे सॉरी भयंकर रस काय आहे.

-दिलीप बिरुटे

टवाळ कार्टा's picture

2 Nov 2015 - 8:40 pm | टवाळ कार्टा

या सगळ्या पोरी हिप्नोटाईज होउन त्याच्या ब्रोब्र गेलेल्या की स्वतःच्या मर्जीने?

डॉ. एस. पी. दोरुगडे's picture

3 Nov 2015 - 11:07 pm | डॉ. एस. पी. दोरुगडे

शिक्षकाचे असे वागणे भयंकर आहे.