कालगंगा

हरल्या आशांनी बघतो, तू मंत्री आगळा नाही

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
7 Sep 2015 - 5:06 pm
dive aagarअनर्थशास्त्रअभंगआरोग्यदायी पाककृतीकालगंगाकाहीच्या काही कविताकोडाईकनालचौरागढप्रेम कविताफ्री स्टाइलभूछत्रीलावणीवाङ्मयशेतीविठ्ठलहिरवाईहास्यअद्भुतरसप्रेमकाव्यविडंबनउखाणेम्हणीवाक्प्रचारसुभाषितेविनोदतंत्रkathaaअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकराजकारणरेखाटनस्थिरचित्र

"द्वारकेचा राणा"

शैलेन्द्र's picture
शैलेन्द्र in जे न देखे रवी...
13 Jul 2015 - 12:02 pm

मुखी नाम विठ्ठल, गळा तुळशीमाळा,
वाहतो प्रवाह ओलांडून काळा,
चाले रीघ आता, सुखाच्या शोधात ,
रूढीचे आवर्तन की भाव भोळा ,

उसळती अंतरी, कैक सलतात व्यथा ,
मनातून पाहती पंढरीच्या नाथा
असे रान तान्हे परी फुटे जीवा पान्हा,
समूहाची धुंदी नादावते माथा,

लाख शंका मनी, परी पाहता या जना
पेशीतून वाजे मृदुंग नी वीणा
मन माझे डोले, पडती तालात पाउले
रक्तातून वाहे द्वारकेचा राणा

- शैलेंद्र

कालगंगासंस्कृती