gajhal

खट्याळ रसातली आध्यात्मिक गझल

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
6 Jul 2016 - 9:00 pm
खट्याळ रसातली आध्यात्मिक गझल

हसण्यात जन्म घ्यावा उरकून माणसाने
प्रज्ञा, कला, प्रितीवर भाळून माणसाने

दोन्ही मुठी रिकाम्या घेऊन जन्म-मृत्यू
तृप्तीसवे करावा हनिमून माणसाने

क्रोधिष्ट भावनाला देऊन सोडचिठ्ठी
शांतीसही बघावे बिलगून माणसाने

माया, तृषा, मनीषा नेईल आडमार्गा
लागू नयेच नादी उमजून माणसाने

करपाश घट्ट द्याया अथवा विलीन व्हाया
सुमतीस वश करावे रिझवून माणसाने

कवितागझलgajhalअभय-काव्यमराठी गझल

एक उर्दू गझल - जो ठिकाना हैं हमारा

पथिक's picture
पथिक in जे न देखे रवी...
16 May 2016 - 11:26 am

जो ठिकाना हैं हमारा हम वही जा रहेंगे
मिटटी से आये हैं मिटटी से जा मिलेंगे
ये हवा जो चली हैं इसके संग संग बहेंगे
कभी फूलों को चूमेंगे कभी धुल से खेलेंगे
न काफ़िलों से दोस्ती न मंज़िलों से यारी
कहीं भी रुकेंगे, किधरको भी चलेंगे
बेकार न जायेगा रोना यहाँ हमारा
एक आंसूं में से कल हज़ार फुल खिलेंगे
होशवालों को मुबारक बाग़े होश की सैर
हम दश्ते जुनूं में अपने यार से मिलेंगे

(कुणी अनुवाद केला तर उत्तम)

गझलgajhal

मोबाइल आणि मी !!!

फिझा's picture
फिझा in जे न देखे रवी...
8 Apr 2016 - 1:41 pm

मोबाइल आणि मी !!!

सकाळी उठल्या उठल्या आधी मोबाइल चेक करतो
कुणाकुणाला like अन share, वगैरे करून टाकतो !

दात घासायला घेतले कि ' snooze वाला' अलार्म वाजतो
अंघोळ होईपर्यंत बॉसचा, call पण येऊन जातो !

चहा नाश्ता करता करता videos काही पाहून घेतो
ऑफिसला पोचेपर्यंत सगळी गाणी सुद्धा एन्जॉय करतो !

ऑफिसचे काम तर काय रोजचेच आहे पण
whatsapp च्या कट्ट्यावर, आज बातमी नवीन आहे

गालातल्या गालात हसत आजूबाजूला पाहून घेतो
५, ६ वाक्यं टंकून, मोबाइल vibrator वर जातो

कविताgajhal

सावल्यांची सरमिसळ होते ..

drsunilahirrao's picture
drsunilahirrao in जे न देखे रवी...
2 Apr 2016 - 8:55 pm

एक ना कारण सबळ होते
पण तुझे जाणे अटळ होते

हे कसे नाते दुराव्याचे
जे कधीकाळी जवळ होते

कोणता येथे ऋतू आहे
देहभर ही पानगळ होते

चेततो वणवा फुलापासुन
नी झुळुकही वावटळ होते

रोषणाई केवढी आहे
सावल्यांची सरमिसळ होते

डॉ. सुनील अहिरराव

हे ठिकाणकविताप्रेमकाव्यगझलgajhalgazal

जसजसे जगणे सुखासिन होत आहे..

drsunilahirrao's picture
drsunilahirrao in जे न देखे रवी...
14 Mar 2016 - 6:57 pm

जसजसे जगणे सुखासिन होत आहे
दु:ख अधिकाधीक नमकिन होत आहे

सोसले मी जे,मला ना खंत त्याची
पण पहा दुनिया उदासिन होत आहे

केवढी शहरात आता शिस्त आहे
बोलणे अपराध संगिन होत आहे

घेतला आश्रय जिथे कोठे मिळाला
देवही आता पराधिन होत आहे

तू किती सांभाळ आता तावदाने
ते पहा वादळ दिशाहिन होत आहे

पांढरे काळे प्रतीदिन होत आहे
अन तुझे भवितव्य रंगिन होत आहे

डॉ.सुनील अहिरराव

हे ठिकाणgajhal

मी सुखाची भेट घेणे टाळतो ..

drsunilahirrao's picture
drsunilahirrao in जे न देखे रवी...
26 Feb 2016 - 7:36 pm

वेळ दु:खाला दिलेली पाळतो
मी सुखाची भेट घेणे टाळतो

फारसे घडले नसावे कालही
मी उगाचच रात सारी चाळतो

ही फुलांची वाट आहे पण इथे
ऱोज एखादातरी ठेचाळतो

कोणते असते हवेमध्ये जहर
रंग प्रेमाचा कसा डागाळतो

केवढी जडशीळ दुनिया वाटते
देव जाणे कोण ही सांभाळतो

चालला असता तुझा साधेपणा
मी कुठे रंगारुपावर भाळतो

डॉ. सुनील अहिरराव

गझलgajhalgazal

कैद तिच्या डोळ्यात दिगंतर असते ..

drsunilahirrao's picture
drsunilahirrao in जे न देखे रवी...
21 Feb 2016 - 9:59 am

चार दिवस पुरणारे अत्तर असते
प्रेम तसे मग बाकी खडतर असते

सुटकेचा आयास निरर्थक असतो
कैद तिच्या डोळ्यात दिगंतर असते

आपण अपुली सांभाळावी दुनिया
सूख जरासे दु:ख निरंतर असते

आकाशाला हातच पोचत नाही
नी स्वप्नांचे व्यस्त गुणोत्तर असते

प्रश्न तुला मी तोच कितीदा केला
तुझे आपले एकच उत्तर असते

कुठून कोठेतरी जायचे नुसते..
प्रेम शेवटी एक अधांतर असते

डॉ. सुनील अहिरराव

कवितागझलgajhalgazal

काटा

मयुरMK's picture
मयुरMK in जे न देखे रवी...
1 Jan 2016 - 12:55 pm

Rose Gif GIFs - Find & Share - Love You Swthrt

सर्वांनी बंद केल्या मजकडे येणार्या वाटा
राहिली फ़क्त तुझ्या पाऊलाची वाट आत्ता

स्वत:चे जीर्णावशेष घेवुन सोबतीला
जुन्या स्मृतींच्या आधारे उभा गाभारा

माझ्या स्वप्न राज्यात ना राणी ना प्रजा
विना प्रजेच्या राज्याचा मी हा अभागी राजा

न उगवताच कशी मावळते चांदणी
किनार्यास न भेटताच परततात लाटा

गझलgajhal

जिंदगी नुसतीच लुकलुकते दुरातुन ..

drsunilahirrao's picture
drsunilahirrao in जे न देखे रवी...
23 Dec 2015 - 10:10 am

चार शब्दांचा सहारा होत नाही
तेवढ्यावरती गुजारा होत नाही

खूप काही लागते जगण्यास येथे
प्रेम काही ऊनवारा होत नाही

गगनचुंबी हे तुझे आहे शहर पण
चांदतार्यांचा नजारा होत नाही

जिंदगी नुसतीच लुकलुकते दुरातुन
रोज आताशा इशारा होत नाही

टाळले मजला बरे केलेस तूही
(दु:ख दु:खावर उतारा होत नाही)

मी मनाला शिस्त आहे लावलेली
फारसा आता पसारा होत नाही

डॉ.सुनील अहिरराव

गझलgajhalgazalमराठी गझल

<<< आवडून घेतलेलं काही... >>>

प्यारे१'s picture
प्यारे१ in जे न देखे रवी...
18 Oct 2015 - 9:26 pm

http://www.misalpav.com/node/33278

हलकं घेतलं जावं ही नम्र विनंती

>>> सजदे में आज भी झुकते है सर
बस, मौला बदल गया देखो...

आम्हाला नेहमीच ऐकून घ्यावं लागतं
फक्त, कधी बॉसचं कधी बायकोचं.

>>> जरूरत है मुझे कुछ नये नफरत करनेवालों की
पुराने वाले तो अब चाहने लगे है मुझे....

आधी माझं स्त्री प्रजातीशी भांडण होतं नंतर मी त्यांना आवडू लागतो
(हाय का आवाज फेम पातेल्यातली आमटी)

पाकक्रियाबालकथाचारोळ्याबालगीतविडंबनउखाणेgajhalganesh pavalemango curryvidambanअभय-लेखन