मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तर्राट झालं जी...

सायकलस्वार · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
खुळखुळ वाजं खिशातऽऽ भलतंच खुललंया आज... बायकुचं चुकवून ड्वाळं… सुमडीत गाठलंया बार अन् झनानलंऽऽऽ बाटल्यामंदीऽऽऽ अन ग्लासातनं व्हटात गेलं जी तर्राट झालं जीऽऽ... तर्राट झालं जीऽऽऽऽ... तर्राट झालं जीऽऽऽऽऽऽ.... झिंगून गेलंया सारंऽऽ त्वंडाचं सुटलंया घाण अल्लद झेपावल्यालंऽऽ आभाळामंदी विमान.. ग्यलं व्हटातनं.. या प्वटा मंदी अन प्वटातून भेजामंदी जीऽऽ तर्राट झालं जीऽऽ... तर्राट झालं जीऽऽऽऽ... तर्राट झालं जीऽऽऽऽऽऽ.... तंगडं कोंबड्याचं बकाणं चिवड्याचं... चखणं फुटान्याचं चरलं…. चरलंऽऽऽ.......... कळ आलं प्वटामंदी कोसळलं ताटामंदी बकाबका तिकडंच वकलं… रंगलंऽऽऽ रं आंगंचं कापडं रंगलं पडलंऽऽऽ रं कंबरंत लात पडलं फ्यकलंऽऽऽ रं उचलून भाईर फ्यकलं.. भिनलंऽऽऽ द्येशीचं ईष जारी भिनलं मग बागाडलं… सार्‍या गावामंदी.. अन् घराकडं गात आलं जी.. तर्राट झालं जीऽऽ... तर्राट झालं जीऽऽऽऽ... तर्राट झालं जीऽऽऽऽऽऽ.... अक्रीत घडलंया बायकुनं धरलंया.. कानपाट फडाफडा फोडलं… फोडलंऽऽऽऽ........ सात जन्माचं राग… साचलंया काळजात… तुला रं गुरागत झोडलं.. रंगलंऽऽऽ ह्ये रगतानं थोबडं रंगलं भिजलंऽऽऽ आंग घामानं चिंब भिजलं… तुटलंऽऽऽ ह्ये सदर्‍याचं गुंडी तुटलं सुटलंऽऽऽ ह्ये ल्यंग्याचं नाडं सुटलं होऽऽऽऽ.. कडाडलं.. गालफडामंदी… अन हाडं खिळखिळं झालं जीऽऽऽ............... ************************** Cheers!!!

वाचने 10404 वाचनखूण प्रतिक्रिया 14

चांदणे संदीप Fri, 05/20/2016 - 06:31
लईच तर्राट झालंय... त्येचा वकार युनूस झाला नस्ता तर बायकुनी हाण्ला नस्ता. पण लै माज केला पियाचा की बसा मंग बोंबलत...! वंगाळ झालं जीऽ वंगाळ झालं जीऽऽ वंगाळ झालं जीऽऽऽ लिव्हलंय तर भन्नाटच... आता येकदा चालीत म्हणून बघतो! Sandy

वेल्लाभट Fri, 05/20/2016 - 11:08
सही जमलंय... आमच्या व्हर्जनकडेही लक्ष वेधू इच्छितो http://www.misalpav.com/comment/839137#comment-839137 http://www.apurvaoka.com/2016/05/sairaat-vidamban-song-tarraat.html?m=1