✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

एप्रिल फळ (६)

व
विजुभाऊ यांनी
Wed, 04/16/2008 - 23:26  ·  लेख
लेख

Book traversal links for एप्रिल फळ (६)

  • ‹ एप्रिल फळ (५)
  • Up
  • एप्रिल फळ (७) ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8009 वाचन

💬 प्रतिसाद (12)

प्रतिक्रिया

ध
धनंजय गुरुवार, 04/17/2008 - 00:16 नवीन

मागचे दुवे

लेखात द्या की विजुभाऊ. लेख प्रतिसादांसरशी मागे-पुढे पळत आहेत - माझे सर्व मागचेच वाचून नाही झालेत - शोधता नाकी नऊ येत आहेत. छान चालू आहे.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ गुरुवार, 04/17/2008 - 07:39 नवीन

बरोबर आहे मी ही सूचना आमलात आणेन

बरोबर आहे मी ही सूचना आमलात आणेन त्या अगोदर हे पहा http://misalpav.com/node/1398 = एप्रिल फळ ; http://misalpav.com/node/1403 एप्रिल फळ (२) ; http://misalpav.com/node/1416 = एप्रिल फळ (३) ; http://misalpav.com/node/1424 एप्रिल फळ (४) ; http://misalpav.com/node/1466 = एप्रिल फळ (५)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
इ
इनोबा म्हणे गुरुवार, 04/17/2008 - 00:30 नवीन

डोळे या

डोळे या ईन्द्रियावर सिद्ध गुरुत्वकर्षण काम करत असते याची जाणीव होते डोळे सुस्तावतात. ब्र्हम्हानन्दी टाळी लागुनकेंव्हा झोप लागते तेच कळत नाही . दुपारी अडीच तीन ला डोळा लागतो तो सहा शिवाय उलगडत नाही. या दिवसात संध्याकाळे सहा वाजता देखील बर्‍यापैकी उजेड असतो . थोडेसे सकाळसारखे वातावरण असते त्यामुळे उजाडल्यासारखे वाटुन फसगत होते. हे अगदी बरोबर बोललात. द्राक्ष खाल्ली की आम्हाला एखादा 'स्मॉल पेग' मारल्यासारखे वाटते. भरपूर भूक लागलेली असताना अर्धवट जेवण करुन ताटावरुन उठावे तसे वाटतेय. जरा मोठे भाग लिहा की.... || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
श
शक्तिमान Sat, 03/14/2009 - 13:33 नवीन

+१

असेच म्हणतो... >>उजव्या हाताला गार वाळ्याच्या पाण्याचा पितळी लोटा. आणि डाव्या हाताला द्राक्षाचा घड .पुस्तकाचे पान उलटावे आणि द्राक्षाचा एकेक दाणा हळुच तोंडात जावा. आम्हीतर सध्या मि.पा.वरचे लेख वाचता वाचता द्राक्षं खातो... अहाहा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
स
स्वाती राजेश गुरुवार, 04/17/2008 - 01:01 नवीन

विजुभाऊ,

सुरवात द्राक्षांची छान केलीत. गुरुनाथ नाइक किंवा सुहास शिरवळकर कोणीतरी फुल्ल टाईमपास असे असावे . उजव्या हाताला गार वाळ्याच्या पाण्याचा पितळी लोटा. आणि डाव्या हाताला द्राक्षाचा घड .पुस्तकाचे पान उलटावे आणि द्राक्षाचा एकेक दाणा हळुच तोंडात जावा. अगदी बरोबर......... पण यावेळी आम्ही झोपत नसू कारण एकदा सुहास शिरवळकरचे पुस्तक हातात आले तर ते संपल्या नंतरच उठायचे. पुढ्च्या भागाच्या प्रतिक्षेत.....
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 04/17/2008 - 01:17 नवीन

मस्त चालू आहे विजूभाऊ!

द्राक्षे खात खात सुहास शिरवळकर तर अगदी चोक्कस!;) परत एकदा त्या आमच्या जुन्या घरात मनाने जाऊन आलो, तळमजल्यावरची तीच थंडगार खोली, अंगावर एक पातळशी चादर आणि जाड तक्क्या उशाला घेऊन सतरंजीवर पहुडणे आणि अशीच पुस्तकं वाचत वाचत डुलकी काढणे.....काय काय मागे सुटून गेलंय;(( द्राक्षाचे घड म्हणलात ना विजूभाऊ आणि आमची इंजिनियरिंगची एक आठवण जागी झाली. आमच्या कॉलेजच्या समोर द्राक्षाचे मळे होते. ह्या एप्रिल-मेच्या दिवसात आम्ही तिथे दुपारी जात असू. तिथे मळेवाल्याला पैसे दिले की हवी तेवढी द्राक्षे तिथेच बसून खाता येत, एकच नियम बाहेर घेऊन जायची नाहीत - अहो आम्हाला काय फरक पडतोय? इथे न्यायची आहेत कोणाला? आम्ही मित्रमंडळी दुपारभर तिथे पडीक असू आणि मनमुराद द्राक्षे हादडून संध्याकाळीच बाहेर! वा अजूनही आठवले की डोळ्यांवर धुंदी येते;;)) चतुरंग
  • Log in or register to post comments
म
मनस्वी गुरुवार, 04/17/2008 - 09:36 नवीन

मस्त

उजव्या हाताला गार वाळ्याच्या पाण्याचा पितळी लोटा. आणि डाव्या हाताला द्राक्षाचा घड
विजुभाऊ, हाही भाग छान झाला आहे.
  • Log in or register to post comments
स
सहज गुरुवार, 04/17/2008 - 10:06 नवीन

मस्त

विजुभाउ तुमचे ही लेखमाला म्हणजे मेजवानी आहे. पण काय राव त्या जांभळांची आठवण करुन दिलीत.. हाय तडपतोय.
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री गुरुवार, 04/17/2008 - 10:07 नवीन

बी असणारे द्राक्ष

बी असणारे द्राक्ष पण असते/असायचे हे नविनच कळ्ळे, असाच बिनाकोयीचा आंबा आला तर काय मजा येइल नाही ! दुपारचा आराम एन्जॉय करायच्या आठवणी मस्त, आम्ही अजुनही तो आनंद १५ दिवस- महिनाभरानी घेतोच :)
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश गुरुवार, 04/17/2008 - 11:44 नवीन

द्राक्षं

बी असणारे द्राक्ष पण असते/असायचे हे नविनच कळ्ळे आजही बीयावाली द्राक्षेच ( हिरवी आणि काळी,लाल )आमच्या इथे जास्त मिळतात,सीडलेस खूप कमी मिळतात. बिनकोयीचा आंबा झकास! विजुभाऊ,द्राक्षांचे वर्णन छान! स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
आ
आनंदयात्री गुरुवार, 04/17/2008 - 12:21 नवीन

तुमच्या

इथे म्हणजे जर्मनीत का ? (द्या यक पेटी पाठवुन सनी !)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश
ध
धमाल मुलगा गुरुवार, 04/17/2008 - 11:30 नवीन

हिरवे गार

हिरवे गार द्रक्षाचे मणे, मधेच्य एखाद्या मण्यावर उन्हाने आलेली तांबुस झाक पाहीली की उन्हातुन चालल्यामुळे गोर्‍यापान युवतीच्या गालावर आलेली लाली आठवते.
ओहोहो !!! क्या बात है रसिकलाल विजुभाऊ! आईशप्पथ, चतुरंगराव, काय सॉल्लीड मजा येत असेल ना? भर मळ्यात बसुन पाहिजे तेव्हढी द्राक्षं हादडायची, मित्रांच्या रेवड्या उडवायच्या, आणि बोलता बोलता तिथेच ढेकळांत जागा शोधून लोळत पडायचं....चुकुन दिसलाच एखादा कोल्हा तर दगड-धोंडे घेऊन त्याच्या मागं पळायचं...भर उन्हात पळापळ करुन दमल्यावर कुत्र्यासारखी जीभ बाहेर काढून ल्यॅ-ल्यॅ करत कसं तरी परत बसल्या जागी यायचं आणि पुन्हा द्राक्षं हादडायला सुरुवात करायची! हाय! जुने दिवस आठवले.
थोडे जड जेवण झाले असावे . दुपारभर कोणीही छळायला येणार नसावे. हातात मस्त पैकी गुरुनाथ नाइक किंवा सुहास शिरवळकर कोणीतरी फुल्ल टाईमपास असे असावे . उजव्या हाताला गार वाळ्याच्या पाण्याचा पितळी लोटा. आणि डाव्या हाताला द्राक्षाचा घड .पुस्तकाचे पान उलटावे आणि द्राक्षाचा एकेक दाणा हळुच तोंडात जावा. काही वेळानन्तर अशी तन्द्री लागते
...और ये लगा चौका ! बाकी, स्वातीताईच्या,
पण यावेळी आम्ही झोपत नसू कारण एकदा सुहास शिरवळकरचे पुस्तक हातात आले तर ते संपल्या नंतरच उठायचे.
ह्या वाक्याशी आपण १०००००००००००% सहमत. -(उन्हाळ्याच्या सुट्टीत 'बरसात चांदण्यांची' वाचताना रडलेला) ध मा ल.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा