बरोबर आहे मी ही सूचना आमलात आणेन
त्या अगोदर हे पहा
http://misalpav.com/node/1398 = एप्रिल फळ ; http://misalpav.com/node/1403 एप्रिल फळ (२) ; http://misalpav.com/node/1416 = एप्रिल फळ (३) ; http://misalpav.com/node/1424 एप्रिल फळ (४) ; http://misalpav.com/node/1466 = एप्रिल फळ (५)
डोळे या ईन्द्रियावर सिद्ध गुरुत्वकर्षण काम करत असते याची जाणीव होते डोळे सुस्तावतात. ब्र्हम्हानन्दी टाळी लागुनकेंव्हा झोप लागते तेच कळत नाही . दुपारी अडीच तीन ला डोळा लागतो तो सहा शिवाय उलगडत नाही. या दिवसात संध्याकाळे सहा वाजता देखील बर्यापैकी उजेड असतो . थोडेसे सकाळसारखे वातावरण असते त्यामुळे उजाडल्यासारखे वाटुन फसगत होते.
हे अगदी बरोबर बोललात. द्राक्ष खाल्ली की आम्हाला एखादा 'स्मॉल पेग' मारल्यासारखे वाटते.
भरपूर भूक लागलेली असताना अर्धवट जेवण करुन ताटावरुन उठावे तसे वाटतेय. जरा मोठे भाग लिहा की....
|| भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी ||
-इनोबा म्हणे
असेच म्हणतो...
>>उजव्या हाताला गार वाळ्याच्या पाण्याचा पितळी लोटा. आणि डाव्या हाताला द्राक्षाचा घड .पुस्तकाचे पान उलटावे आणि द्राक्षाचा एकेक दाणा हळुच तोंडात जावा.
आम्हीतर सध्या मि.पा.वरचे लेख वाचता वाचता द्राक्षं खातो... अहाहा...
सुरवात द्राक्षांची छान केलीत.
गुरुनाथ नाइक किंवा सुहास शिरवळकर कोणीतरी फुल्ल टाईमपास असे असावे . उजव्या हाताला गार वाळ्याच्या पाण्याचा पितळी लोटा. आणि डाव्या हाताला द्राक्षाचा घड .पुस्तकाचे पान उलटावे आणि द्राक्षाचा एकेक दाणा हळुच तोंडात जावा.
अगदी बरोबर.........
पण यावेळी आम्ही झोपत नसू कारण एकदा सुहास शिरवळकरचे पुस्तक हातात आले तर ते संपल्या नंतरच उठायचे.
पुढ्च्या भागाच्या प्रतिक्षेत.....
द्राक्षे खात खात सुहास शिरवळकर तर अगदी चोक्कस!;)
परत एकदा त्या आमच्या जुन्या घरात मनाने जाऊन आलो, तळमजल्यावरची तीच थंडगार खोली, अंगावर एक पातळशी चादर आणि जाड तक्क्या उशाला घेऊन सतरंजीवर पहुडणे आणि अशीच पुस्तकं वाचत
वाचत डुलकी काढणे.....काय काय मागे सुटून गेलंय;((
द्राक्षाचे घड म्हणलात ना विजूभाऊ आणि आमची इंजिनियरिंगची एक आठवण जागी झाली. आमच्या कॉलेजच्या समोर द्राक्षाचे मळे होते. ह्या एप्रिल-मेच्या दिवसात आम्ही तिथे दुपारी जात असू. तिथे मळेवाल्याला पैसे दिले की हवी तेवढी द्राक्षे तिथेच बसून खाता येत, एकच नियम बाहेर घेऊन जायची नाहीत - अहो आम्हाला काय फरक पडतोय? इथे न्यायची आहेत कोणाला?
आम्ही मित्रमंडळी दुपारभर तिथे पडीक असू आणि मनमुराद द्राक्षे हादडून संध्याकाळीच बाहेर! वा अजूनही आठवले की डोळ्यांवर धुंदी येते;;))
चतुरंग
बी असणारे द्राक्ष पण असते/असायचे हे नविनच कळ्ळे, असाच बिनाकोयीचा आंबा आला तर काय मजा येइल नाही !
दुपारचा आराम एन्जॉय करायच्या आठवणी मस्त, आम्ही अजुनही तो आनंद १५ दिवस- महिनाभरानी घेतोच :)
बी असणारे द्राक्ष पण असते/असायचे हे नविनच कळ्ळे
आजही बीयावाली द्राक्षेच ( हिरवी आणि काळी,लाल )आमच्या इथे जास्त मिळतात,सीडलेस खूप कमी मिळतात.
बिनकोयीचा आंबा झकास!
विजुभाऊ,द्राक्षांचे वर्णन छान!
स्वाती
हिरवे गार द्रक्षाचे मणे, मधेच्य एखाद्या मण्यावर उन्हाने आलेली तांबुस झाक पाहीली की उन्हातुन चालल्यामुळे गोर्यापान युवतीच्या गालावर आलेली लाली आठवते.
ओहोहो !!! क्या बात है रसिकलाल विजुभाऊ!
आईशप्पथ, चतुरंगराव,
काय सॉल्लीड मजा येत असेल ना? भर मळ्यात बसुन पाहिजे तेव्हढी द्राक्षं हादडायची, मित्रांच्या रेवड्या उडवायच्या, आणि बोलता बोलता तिथेच ढेकळांत जागा शोधून लोळत पडायचं....चुकुन दिसलाच एखादा कोल्हा तर दगड-धोंडे घेऊन त्याच्या मागं पळायचं...भर उन्हात पळापळ करुन दमल्यावर कुत्र्यासारखी जीभ बाहेर काढून ल्यॅ-ल्यॅ करत कसं तरी परत बसल्या जागी यायचं आणि पुन्हा द्राक्षं हादडायला सुरुवात करायची!
हाय! जुने दिवस आठवले.
थोडे जड जेवण झाले असावे . दुपारभर कोणीही छळायला येणार नसावे. हातात मस्त पैकी गुरुनाथ नाइक किंवा सुहास शिरवळकर कोणीतरी फुल्ल टाईमपास असे असावे . उजव्या हाताला गार वाळ्याच्या पाण्याचा पितळी लोटा. आणि डाव्या हाताला द्राक्षाचा घड .पुस्तकाचे पान उलटावे आणि द्राक्षाचा एकेक दाणा हळुच तोंडात जावा. काही वेळानन्तर अशी तन्द्री लागते
...और ये लगा चौका !
बाकी, स्वातीताईच्या,
पण यावेळी आम्ही झोपत नसू कारण एकदा सुहास शिरवळकरचे पुस्तक हातात आले तर ते संपल्या नंतरच उठायचे.
ह्या वाक्याशी आपण १०००००००००००% सहमत.
-(उन्हाळ्याच्या सुट्टीत 'बरसात चांदण्यांची' वाचताना रडलेला) ध मा ल.
प्रतिक्रिया
मागचे दुवे
बरोबर आहे मी ही सूचना आमलात आणेन
डोळे या
+१
विजुभाऊ,
मस्त चालू आहे विजूभाऊ!
मस्त
मस्त
बी असणारे द्राक्ष
द्राक्षं
तुमच्या
हिरवे गार