आपल्या लेकाच्या - रायबाच्या लग्नाचे आवतण अर्थात् आमंत्रण द्यायला आलेल्या तानाजीला जिजाऊंच्या मनातील सल ऐकून रहावले नाही आणि आवतण द्यायच्या ऐवजी तो जिजाऊंचे हे आवतण स्वीकारून कोढाणा केवळ चारशे मावळे आणि भाऊ सूर्याजी यांच्यासह जिंकून मृत्यूला सामोरा गेला ! - शिल्प - अकलूज येथील भावी "शिवसॄष्टी" - कविता माझी !
मी बघता उचलू नजर
पाहते "हिरवा" हा कोंढाणा !
करी ताठ अता हा कणा
बोलली जिजाऊ काढून फणा !
ऐकताच पिळुनी मिशा
गर्जला नादवीत दिशा
"मी आलो होतो आवतणाला
लगीन ह्या "राया"चे
स्वीकरले म्यां तुमचे आवतण
घेऊन दर्सन या पायांचे !"
झुंजला मर्द घेऊन चारशे
मावळे - ताना वाघ ढाणा
छाटून उदयभानूस , जिंकला
मध्यरातीस गड कोंढाणा !
दिसणार कंदीबी न्हाई आऊ
झेंडा तुमाला "हिरवा"
म्यां निंगालो म्होरं , शिवबा,
रायाची वरात पर् तुमी फिरवा !
| लेखनविषय: |
|---|
वाचने
7673
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
झुंजला
"सप्रे"म नमस्कार
In reply to झुंजला by धमाल मुलगा
उत्तम
जोशपूर्ण काव्य आहे.
धन्यवाद !
डोळ्यांत पाणी तर येणारच
In reply to धन्यवाद ! by उदय सप्रे
कोंढाणा-
"कोंढाणा" वाचलेत तर बरे होईल
कोंढाणा
मानाचा मुजरा..
सुरेख पोवाडा उदय!
सुंदर..
माझा पण ब्लॉग
In reply to सुंदर.. by प्राजु
सुंदर काव्य + आठवण
एक ऐतिहासिक चूक जाणवतेय!
सिंहगड
In reply to एक ऐतिहासिक चूक जाणवतेय! by प्रमोद देव
एक ऐतिहासिक चूक
मर्यादित ज्ञान!
In reply to एक ऐतिहासिक चूक by उदय सप्रे
जबरदस्त
कोंढाणा
सुंदर
आम्ही
दिसणार
स्फुर्ती देणारे काव्य