ह्या गांधींचं करायचं काय ???
ग़ेले दोन दिवस झाले मी ह्या घटनेचा विचार करत आहे.
पहिल्यांदा मी नेहमीचच आहे म्हणून दुर्लक्ष करून विसरण्याचा प्रयत्न केला पण काल रात्री "बघूया काय चाललय देशात" म्हणून "टी व्ही" लावला तर तेच नाटक चालू. अशी सणक आली ना मस्तकात कि विचारू नका, म्हणूनच हा लेख लिहण्याचा खटाटोप ....
आत ह्यात गांधींचा काय संमंध ? पण मी ज्या लोकांबद्दल बोलतोय ते महात्मा गांधी नसून आजचे ढोंगी गांधी म्हणजे अनुक्रमे "सोनिया ग़ांधी, राहुल गांधी व प्रियंका वढेरा [ सोईसाठी ग़ांधी , कारण त्याशिवाय व्ही आय पी ट्रीटमेंट मिळत नाही ]."
एकूण दोन घटना आहेत .....
१. पहिली म्हणजे गांधी-नेहरू घराण्याचे वफादार व आजच्या राजकारणातील एक अडगळ असे "अर्जूनसिंगांनी" भारताच्या पंतप्रधानपदासाठी सर्वश्री "राहूल गांधींचे " नाव पुढे करणे, अपेक्षेप्रमाने त्यावर राहूलने कोणतीही प्रतिक्रीया न देणे, त्यावर कॉग्रेस पक्षातर्फे "सध्या पंतप्रधानपदाची खूर्ची रिकामी नाही आणि सोनिया गांधींना चापलूसकी [ कॉग्रेसच्या राजकारण्यांसाठी कसा फिट्ट शब्द आहे बघा ] आवडत नाही" असा खूलासा करणे व शेवटी सोनिया व अर्जूनसिंगाची गुप्त बैठक [ ह्यात म्हणे त्यांना ठोकले , मी तर म्हणतो पाठ थोपटली असेल].
ह्यावरून एकंदरीत मला ह्या लोकांना म्हणायचे आहे तरी काय हे समजेना. अरे काही तरी किंमत ठेवा त्या "पंतप्रधान " पदाची. पुर्वीच्या शास्त्री, इंदीरा गांधी, राजीव गांधी, वाजपीई सारख्या माणसांनी हे पद भूषवून त्याची मानमर्यादा अतिशय उच्च करून ठेवली होती व आज त्याचे हाल कुत्रे पण खात नाही. ख़ुद्द मनमोहन सिंग कबूल करतात "मी हतबल आहे", बाकीचे काय पाहिजे अजून ? असो.
तर तो आपल्या चर्चेचा विषय नाही, तो आहे राहूलची योग्यता [ थोडक्यात लायकी ]. फ़क्त गांधी कुटुंबात जन्माला महान ,चांगले विदेशात शिक्षण घेतले, थोडा दिसायला चांगला आहे, झालच तर भाषने आईसारखी वाचून दाखवत नाही, व्यवस्थीत हिंदी बोलतो, झालच तर ४ दिवस गरिब आणि स्पेशली दलित जनतेत हिंडतो हे सर्व गूण भारताचा पंतप्रधान होण्यासाठी चिक्कार झाले का ? बाकी त्याची एकंदरीत देशाच्या परिस्थीतीबद्दल असलेली जाण, समज, थोडा अनुभव, ह्या लेवलला येण्यासाथी करावे लागणारे [ व लोकांनी केलेले ] कष्ट, करावा लागणारा त्याग ह्यांची काहिच किंमत नाही का ? का हा देश गांधी-नेहरू घराण्याला आंदण दिलाय ?
तसे असेल तर बंद करा ही लोकशाहीची नाटकं आणि जाहीर करा " यापुढे फक्त गांधी परिवारातील व्यक्तीलाच हे पद मिळेल, बकी कुणी ह्याला विरोध केला तर तो देशद्रोह समजला जाईल" म्हणजे विषयच संपला. आता तर ह्यांचे "चरणभाट " असा दाखला देतात की "राहूलने मनाचा मोठेपणा दाखवून मंत्रीपदाचा त्याग केला" . खरं की काय ? आम्हाला वाटलं सगळी नाटकंच चालू आहेत. छे छे किते मुर्ख ना मी ? मला एवढेच म्हणाय्चे आहे की सध्यातरी राहूलची या पदाचे स्वप्न सुध्धा बघायची लायकी नसताना त्याला मारून मुटकून फौजदार बनवायचा हा प्रयत्न कशासाठी? त्याला प्रोजेक्ट करण्यासाठी एवढी नाटके कशासाठी ? बाकीच्या कॉग्रेसमधल्या चरणभाटांना, चापलूसकरांना, चमच्यांना त्यांचा मतदारसंघात तोंड दाखवायला जागा नसल्यामुळे हा सर्व सावळागोंधळ का ?
अशाने देशाचे किते नुकसान होत आहे, आपली इमेज कशी खराब होत आहे याची काळजी कुणालाच नाही का ?
२. दुसरी घटना तर पहिल्यापेक्षा भयानक व निंदनीय. क़ाय तर म्हणे, प्रियंका गांधींनी म्हणे तिच्या पित्याचे मारेकरी नलिनी ची भेट घेतली, का तर की तिला ह्यामागचा हेतू जाणून घ्यायचा होता [ आत्तापर्यंत तपास करत असलेली पोलीस, गुप्तचर संघटना काय माश्या मारत होती का ?] , झालचं तर आपल्या पित्याला मारून किते मोठी चूक तिने केली आहे हे सुनवायचे होते [ तर तर , ती नलिनी पण संतच ना, मला तर वाटते आज पुन्हा एकदा वाल्याचा वाल्मीकी झाला असावा] व शेवटी येताना
"आपल्या मनात कोणतेही शतॄत्व नाही " हे सुनवून आपण किते महान हे जनतेला सांगायचे होते.
माझं तर डोकं सुन्न झालं. ह्यांनी आता बापाच्या मरण्याचे पण भांडवल करायला सुरवात केली तर. बर आत्ताच कसा निवडणूकीच्या तोंडावर हा महान विचार मनात आला ? जर ही गोष्ट पर्सनल असेल तर बरोबर आपल्या लाचार मिडियाची फौज कशाला बरोबर न्हेली आणि अख्ख्या देशाला हा नजारा कशासाठी दाखवला कारण तुमच्या मते ही गोष्ट अतिशय पर्सनल होती ? नेहमीप्रमाणे ह्या घटनेचे पण भाटांनी व मिडियाने उदे उदे केलेच, दुसरी अपेक्षा तरी काय ठेवणार हो ?
आता प्रश्न असा आहे की ह्या घटना ज्या रितेने घडल्या व त्या प्रोजेक्ट केल्या गेल्या ती पद्धत बरोबर आहे का ? का पब्लिकला चुत्यात काढायचे धंदे आहेत हे ? आपल्या देशात ह्या गांधींपेक्षा दुसरे कोणी लीडर बलायला नालायक आहे का ? मिडियापण ह्या लोकांच्या दावणीला बांधल्यासारखा का वागतो कारण तो तर लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे ? बाबासाहेबांना अपेक्षीत असलेली लोकशाही हिच का ? हे असे लोकच भविष्यात आपले नेतत्व करणार आहेत का ?
तसे असेल तर माझ्यासारख्या सुशिक्षीत, पांढरपेश्या माणसाला तो फक्त स्वताचे बघतो, त्यांचे देशाशी काही देणेघेणे नाही अशा शिव्या देण्यात काय अर्थ आहे जर हे लोक असेच वागणार असतील. ह्या गोष्टींवर आपल्याकडे काहीच उपाय नाही का ? हे सर्व असेच चालू राहणार आहे का ? तसे असल्यास ह्याला कंटाळून राजकारणाकडे ढ़ूंकून न बघणाऱ्या व कदाचेत देश सोडून जाणाऱ्या माणसाला दोष देण्यात काय अर्थ आहे ? आपले मिशन "२०-२०" असेच लोक पूर्ण करणार आहेत का ? होय असेल तर त्यानंतर देशाची परिस्थीती काय असेल ? ह्या अश्या भाटगिरी करणाऱ्या न्युज चॅनेल्स वर बंदी आणावी का ?
मला माहित आहे की असे लिहून काही उपयोग नाही, कारण "हम नही बदलेंगे" असे त्यांनी ठरवले आहे. आपण जर हे वाचून काही करण्याचा प्रयत्न करणार असाल तर मी त्यात माझे थोडेसे समाधान मानतो व पुढे आपण अगदीच परिस्थीती हाताबाहेर जाउ देणार नाही अशी आशा बाळगतो.
वाचने
16709
वाचनखूण
प्रतिक्रिया
39
गांधींचे
वारसदाराचे -
परखड लेख
In reply to परखड लेख by शितल
पक्ष?
भ्रष्टाचारी
In reply to भ्रष्टाचारी by मनस्वी
असं नाही ...
In reply to असं नाही ... by छोटा डॉन
शिवाजी जन्माला यावा पण माझ्या घरी नको
उद्याच्या आशा .......
In reply to उद्याच्या आशा ....... by मानस
हद्द झाली
In reply to हद्द झाली by ऐश्वर्या राय
महान
डॉनकाका मी असहमत आहे या विचारांशी.
In reply to डॉनकाका मी असहमत आहे या विचारांशी. by विजुभाऊ
सहमत आहे .....
In reply to सहमत आहे ..... by मानस
कोणते कर्तृत्व बरे?
In reply to कोणते कर्तृत्व बरे? by ऐश्वर्या राय
हा हा हा हा
In reply to कोणते कर्तृत्व बरे? by ऐश्वर्या राय
इंटरनेट
In reply to कोणते कर्तृत्व बरे? by ऐश्वर्या राय
धन्यवाद
In reply to कोणते कर्तृत्व बरे? by ऐश्वर्या राय
ऐश्वर्या राय - महा-मानव
In reply to डॉनकाका मी असहमत आहे या विचारांशी. by विजुभाऊ
मीही सहमत आहे....
In reply to मीही सहमत आहे.... by नीलकांत
अहो ते तर असलेच पाहीजे की
In reply to अहो ते तर असलेच पाहीजे की by ऐश्वर्या राय
कंपुबाजी...
In reply to डॉनकाका मी असहमत आहे या विचारांशी. by विजुभाऊ
माझे मत ...
In reply to माझे मत ... by छोटा डॉन
"आय ए एस" अधिकार्यांनी / पटले
सगळॅ तसेच
पान्डोबा
वैताग आणि त्रागा?
In reply to वैताग आणि त्रागा? by नीलकांत
बारामतीचे साहेब
असहमत
सही
नेहरू घराण्याची देशावरील क्रूपा समजण्या साठी वाचा.
In reply to नेहरू घराण्याची देशावरील क्रूपा समजण्या साठी वाचा. by प्रा सुरेश खेडकर
नेहरू किंवा गांधी किंवा इतरही कुणी...
In reply to नेहरू किंवा गांधी किंवा इतरही कुणी... by नीलकांत
कौतुक :)
विजुभाऊ व नीलकांतशी असहमत...
हम्म!
In reply to हम्म! by विसोबा खेचर
काय तात्या...
डायरेक्ट पंतप्रधान पद
In reply to डायरेक्ट पंतप्रधान पद by नीलकांत
>>या चर्चेत
In reply to >>या चर्चेत by आनंदयात्री
राजकारण हा पिढीजात धंदा आहे त्यांचा !
खुलासा:
माझे मत ...