एप्रिल फळ (६)
लेखनप्रकार
मोघमपणे बोलायचे झाले तर एप्रिल महीना भारतिय कालगणने नुसार चैत्रा चा महीना .वर्षाचा पहीला महीना. नवे वर्ष तुम्हाला आरोग्याचे जावो असे केवळ म्हणुन निसर्ग थांबत नाही तर त्याच्या खजिन्यातली एकसे एक बढकर रत्ने तुम्हाला पेष करतो. नवीन कोवळी पालवी फुटली झाडे , फुलानी बहरलेले गुलमोहोर , जॅकरन्डा , बहावा, बकुळ , शिरिष , मोगरा ,बोगन वेल , लॅबर्नम , लाल ,केशरी , निळा, सोनेरी , हिरवट पांढरा रंगांची , गंधांची रेलचेल असते.
रस्त्याने जाताना गुलमोहराचे सडे पाहुन आपले वर्ष खरेच आनन्दाचे जाणार याची खात्रीच पटते.
असेच रमत गमत जात असलो तर मधेच एखादे फलांचे दुकान लक्ष्य वेधुन घेते. केवळ हारीने मांडलेली फळे हीच काय ती सजावट . रंगपंचमीच्या वेळी रंगानी नटलेले दुकाना असवे इतक्या विविध रंगांनी फळानी दुकान सजलेले असते.
हिरव्या पिवळ्या मोसंब्या , काळ्सर शेवाळी हिरवे कलींगड , पिवळे धमक आंबे , हिरवी गार द्राक्षे ,सोनेरी खरबूज , अन्जीरी गुलाबी अन्जीर , पांढर्यावर हिरवे पट्टे असलेली साखर काकडी .खाकी रंगाचे चिक्कू , आंब्याशी स्पर्धा करणारी पपई,लालभडक स्ट्रॉबेरी , जांभळे ,तुत्तु, रायण्या ,आंबोळया वगैरे माकड मेवा अजून यायचा असतो.या सार्या फळांच्या सोबत बसलेला फळवाल्याचा कळकट छोटा मुलगा सुद्धा या रंगसंगती मध्ये शोभुन दिसतो
ही सगळे फळे म्हणजे सम्राटांच्या दरबारातले मानकरी. सम्राटाला साजेल अशाच वेशात असतात. प्रत्येकाचा थाट काही औरच.
द्राक्षाचा बहर संपत आलेला असतो. मोत्यांची रास रचावी तशी द्रक्षांच्या घडाची रास पाहीली की आपण गर्भश्रीमन्त असल्यासरखे वाटु लागते,हिरवे गार द्रक्षाचे मणे, मधेच्य एखाद्या मण्यावर उन्हाने आलेली तांबुस झाक पाहीली की उन्हातुन चालल्यामुळे गोर्यापान युवतीच्या गालावर आलेली लाली आठवते.
माझ्या लाहनपणी द्राक्षे बीयांसहीत असायची. मोठीमोठी द्राक्षे आणि त्यात एखादे बी. चांगली टपोर्या जाम्भळाएवढी असायची द्राक्षे. सीडलेस द्राक्षे आली तेंव्हा ती या बीवाल्या द्राक्षांसमोर वामन बटु च दिसायची . आम्ही त्याना हिमगौरी च्या कथेतली सात बुटके म्हणायचो.
काही म्हणा द्राक्षे तेंव्हाही कधी आपल्या मातीतली वाटली नाहीत. ते फळ थोडे दुरावा राखुनच असते.फक्त थोड्या खस्ता खाउन वाळुन द्राक्षा बेदाणे होउन आल्या की त्या पाहुण्या वाटतात. थोडे जड जेवण झाले असावे . दुपारभर कोणीही छळायला येणार नसावे. हातात मस्त पैकी गुरुनाथ नाइक किंवा सुहास शिरवळकर कोणीतरी फुल्ल टाईमपास असे असावे . उजव्या हाताला गार वाळ्याच्या पाण्याचा पितळी लोटा. आणि डाव्या हाताला द्राक्षाचा घड .पुस्तकाचे पान उलटावे आणि द्राक्षाचा एकेक दाणा हळुच तोंडात जावा. काही वेळानन्तर अशी तन्द्री लागते ; डोळे या ईन्द्रियावर सिद्ध गुरुत्वकर्षण काम करत असते याची जाणीव होते डोळे सुस्तावतात. ब्र्हम्हानन्दी टाळी लागुनकेंव्हा झोप लागते तेच कळत नाही . दुपारी अडीच तीन ला डोळा लागतो तो सहा शिवाय उलगडत नाही. या दिवसात संध्याकाळे सहा वाजता देखील बर्यापैकी उजेड असतो . थोडेसे सकाळसारखे वातावरण असते त्यामुळे उजाडल्यासारखे वाटुन फसगत होते.
घरातले बाकी लोक हसायला लागले की कळते अरेच्च्या द्राक्षानी आपल्याला एप्रिल फूल केले की.....
(क्रमशः)
वाचने
8042
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
मागचे दुवे
In reply to मागचे दुवे by धनंजय
बरोबर आहे मी ही सूचना आमलात आणेन
डोळे या
In reply to डोळे या by इनोबा म्हणे
+१
विजुभाऊ,
मस्त चालू आहे विजूभाऊ!
मस्त
मस्त
बी असणारे द्राक्ष
In reply to बी असणारे द्राक्ष by आनंदयात्री
द्राक्षं
In reply to द्राक्षं by स्वाती दिनेश
तुमच्या
हिरवे गार