मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तुझ्याच प्रीतिसाठी

श्रीकृष्ण सामंत ·
(अनुवादीत. कवी-इंदीवर) हरवून बसलो मी सर्वस्व माझे तुझ्याच प्रीतिसाठी का सोडीले तुझ्या प्रीतिने मला दारो दारी भटकण्यासाठी आंसवे नयनातली नाही ओघळली विचार मनातले नाही बोलले छपवूनी मनात ते मी फिरतो घुटकर मरण्यासाठी तुझ्याच प्रीतिसाठी झालीस ज्याची राहशी त्याची लख लाख लाभो तुला प्रीतिची थबकट माझी दुःखी चीतेवरी जीवंत जळण्यासाठी तुझ्याच प्रीतिसाठी श्रीकृष्ण सामंत

जागतिकीकरण आणि साहित्यप्रवास...

संपादक ·

मराठी साहित्य हे परिवर्तनाचे शस्त्र व शास्त्र बनावा.... हा मोलाचा विचार पटला. सध्या मराठी भाषेला साहित्य भाषा म्हणून झळाळी देणार्‍या तरूण साहित्यिकाची गरज आहे असे वाटते. कारण स्वभाषेचा अभिमान हा केवळ प्रचाराने जागवता येत नाही तर तो मनातून निर्माण व्हावा लागतो. त्यामुळे नवीन काळाची पावले ओळखून साहीत्य निर्मीती व्हावे असे वाटते हे खरे आहे. सरांचे विचार पटले. मुक्तसुनीतरावांच्या लेखाप्रमाणेच हा अग्रलेख देखील चिंतनीय.... पुण्याचे पेशवे

बेसनलाडू 14/07/2008 - 03:55
संपादकीय विचार फारच आवडले.जागतिकीकरणाचे मानवी जीवनावर झालेले परिणाम साहित्याच्या माध्यमातून प्रकट व्हावेत आणि त्या दृष्टीने साहित्यनिर्मिती व्हावी,पारंपारीक विषयांबरोबरच जागतिकीकरण आणि गतिमान जीवनाने जन्माला घातलेले 'हट् के' विषय साहित्यात हाताळले जावेत,हे पुरेपूर पटले. (समजूतदार)बेसनलाडू काही मराठी संकेतस्थळांवर संस्थळाचे मालक (मिसळपावचे नव्हे )लिहिल्या गेलेल्या लेखनाला पुर्वी अनुमतीची प्रतीक्षा करायला लावत. परंतु आंतरजालावरील मराठी लेखक-वाचकांच्या वाढत्या रेट्यामुळे, तसेच मिपासारख्या काही लोकाभिमूख संकेतस्थळांमुळे आंतरजालावरील परीटघडीची एकाधिकारशाही मोडीत निघाली ही एक आनंदाची गोष्ट आहे. मराठी भाषा, साहित्य, साहित्यसंमेलन सातासमुद्रापलिकडे जात आहे, ही अभिमानाची आनंदाची गोष्ट असली तरी येथील महाराष्ट्रभर वावरणार्‍या मराठी वाचकांकडे दुर्लक्ष होऊ नये, म्हणुनच की काय रत्नागिरीतही संमेलन व्हावे, असे वाटते. लेखाचा मूळ विषय लक्षात घेता येथे विषयांतर होऊन काही वाक्यांपुरते तरी लेखाचे बेअरिंग सुटले,असे माझे वाचक,लेखक आणि आंतरजालावरील मराठी भटक्या अशा सगळ्याच भूमिकांतून उमटलेले प्रामाणिक मत आहे.या वाक्यांतून आलेले विचार हे स्वतंत्र चिंतनाचा विषय असून त्यांवर वेगळे संपादकीय होईल,असा विश्वास वाटतो.प्रस्तुत विषयाच्या संदर्भात ते अप्रस्तुत वाटले.असो. (प्रामाणिक)बेसनलाडू लेखाच्या अनुषंगाने काही प्रश्न पडले,ते असे - १. जागतिकीकरणाच्या नकारात्मक बाजूच साहित्यातून मांडल्या जात आहेत/गेल्या आहेत,असे आहे काय?असल्यास ते बदलण्यासाठी काय करता येईल?त्याच्या सकारात्मक बाजूंवर झालेले लेखन,भिन्न संस्कृती आणि जीवनशैलींच्या निरीक्षणातून व अभ्यासातून निर्माण झालेले लेखन,त्याला मिळालेली स्वीकृती आणि दाद यांबद्दल आपणांस काय वाटते/आपले निरीक्षण वा अनुभव काय? २. जागतिकीकरण हे(च) मानवी मूल्यांच्या र्‍हासाचे मूळ ठरण्याइतपत मानवाची विवेकबुद्धी खुंटली आहे काय?नवसाहित्यात हेच दिसून येते काय? ३. स्वतःच्या मूल्यांचे व संस्कृतीचे पालन,भिन्न संस्कृती व मूल्यांचा स्वीकार आणि अंगिकार या बाबतींत जागतिकीकरणाने आणि/किंवा नवसाहित्याने काय परिणाम दाखवले आहेत? (पृच्छक)बेसनलाडू सर,तुम्ही संपादकीय लेखन व प्रतिसादांबरोबरच(किंवा त्या व्यतिरिक्त) वरील प्रश्नांच्या दृष्टीने आणि नवसाहित्याचा अभ्यासक म्हणा किंवा शिक्षक या नात्याने (काही कारणास्तव) फार लेखन करीत नाही,अशी माझी प्रेमळ तक्रार आहे.तिच्याकडे लक्ष द्यावे ही नम्र विनंती. (नम्र)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

काही मराठी संकेतस्थळांवर संस्थळाचे मालक (मिसळपावचे नव्हे )लिहिल्या गेलेल्या लेखनाला पुर्वी अनुमतीची प्रतीक्षा करायला लावत. परंतु आंतरजालावरील मराठी लेखक-वाचकांच्या वाढत्या रेट्यामुळे, तसेच मिपासारख्या काही लोकाभिमूख संकेतस्थळांमुळे आंतरजालावरील परीटघडीची एकाधिकारशाही मोडीत निघाली ही एक आनंदाची गोष्ट आहे. मराठी भाषा, साहित्य, साहित्यसंमेलन सातासमुद्रापलिकडे जात आहे, ही अभिमानाची आनंदाची गोष्ट असली तरी येथील महाराष्ट्रभर वावरणार्‍या मराठी वाचकांकडे दुर्लक्ष होऊ नये, म्हणुनच की काय रत्नागिरीतही संमेलन व्हावे, असे वाटते. आणि येथे विषयांतर होऊन काही वाक्यांपुरते तरी लेखाचे बेअरिंग सुटले,असे माझे वाचक,लेखक आणि आंतरजालावरील मराठी भटक्या अशा सगळ्याच भूमिकांतून उमटलेले प्रामाणिक मत आहे.या वाक्यांतून आलेले विचार हे स्वतंत्र चिंतनाचा विषय असून त्यांवर वेगळे संपादकीय होईल,असा विश्वास वाटतो.प्रस्तुत विषयाच्या संदर्भात ते अप्रस्तुत वाटले.असो. लेखन अनुमती, प्रतिक्षा हा स्वतंत्र चिंतनाचा विषय असला तरी त्याचा उदारीकरणाशी संबंध असावा, असे वाटते..... जागतिकीकरणातील आर्थिक उदारिकरणाचा आणि घटस्फोटाचा काय संबंध असा प्रश्न विचारण्यासारखा आमचा मुद्दा असेल पण दुर्दैवाने त्याला आमचा विलाज नाही. लोकांकडे जसा पैसा येऊ लागला. तसतसा लोकांचा स्वच्छंदीपणे जीवन जगण्याकडे त्यांचा कल वाढू लागला. जीवनाला व्यवहाराचे स्वरुप आले. प्रत्येक गोष्ट पैशात मोजली जाऊ लागली. कोणतीही गोष्ट पाहिजे असेल तर ती पैशाच्या जोरावर मिळवता येते. आणि नाही मिळाली तर त्यावरुन संघर्ष गुन्हे सुरु झाले. पती पत्नीत विश्वास राहिला नाही, संशयाचे वातावरण निर्माण झाले आणि त्याची परिणीती घटस्फोटात होऊ लागली. (उदाहरण: आर्थिक उदारिकरण आणि घटस्फोट संबध ) जागतिकीकरणाचा आणि साहित्य अनुमती प्रतिक्षेचा विषय म्हणजे वडाची साल पिंपळाला जोडण्यासारखे वाटू शकले. पण ज्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे, त्यांना आपण इतरांना कसेही वागवू अशी एक गुर्मी दिसून येते. आम्हाला वाटते तेच लिहावे कींवा आम्ही ठरवू तेच योग्य अशी त्यामागची भुमिका आहे. अशा परिस्थितीत नैतिक, अनैतिक, धर्म, अधर्म, सत्कृत्य- दुष्कृत्य, वगैरे गोष्टीचा विचार करायला धनदांडग्यांना वेळ नाही. त्यामूले लिहिलेलेले हे प्रामाणिक असेल का अशी शंका येते किंवा लेखकाच्या लिहिण्याला स्वातंत्र्य आहे का ? तो त्याचा विचार जशाच तसे मांडू शकतो का ? किंवा अशा अनुमतीमुळे थेट भिडणारे लिहू शकले का ? इतकाच माझा प्रश्न आहे. खरे तर संपादकीय वजा लेखन करतांना ते गाळता आले असते असा एक सभ्य विचार डोकावून गेलाच होता. पण वाटले ते लिहिले भले आवडो न आवडो. उदाहरर्णार्थ पाहा.....आम्ही एका वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवतो म्हटल्यावर काही गाइड विक्रेते आम्हाला गाइड लिहिण्याचा आग्रह धरतात. त्यासाठी आम्ही खूश होऊ असे पैसे मोजण्याची त्यांच्यी तयारी असते. त्यासाठी त्यांची एक अट असते, ती अट म्हणजे गाइड लेखकाची नावे ते टाकत नाही. ( लेखक: प्रसिद्ध लेखक असे लिहितात. ) याचाच अर्थ आमचे ज्ञान त्यांना विकतो. ही एक प्रकारची आर्थिक गुलामगिरी आहे. तसेच मालकांना आवडते लिहिणे म्हणजे एक गुलामगिरी आहे, एवढेच आमचे म्हणने आहे. अर्थात आम्ही लिहिलेले आपल्याला पटावेच अशी अपेक्षा नाही, पण आम्ही विषयाला धरुन लिहिण्याचा प्रयत्न केला आहे, असे आम्हाला प्रामाणिकपणे वाटते. बाकीच्या प्रश्नांची उत्तर येथे येतीलच, यावेत असे वाटते. आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बेसनलाडू 14/07/2008 - 07:54
लेखनविषय,उद्दिष्टे,जागतिकीकरण आणि वैचारीक व लेखनातील,प्रकटीकरणातील गुलामगिरी यांचा जो संबंध तुम्ही वर स्पष्ट केलाय,तो मला बादरायण संबंध वाटतो आहे,हे नम्रपणे आणि प्रामाणिकपणे नमूद करतो.म्हणूनच लेखनाचे बेअरिंग सुटून विषयांतर झाल्यासारखे वाटले.आणि असे वाटणारा मी एकटाच नाही,याचीही खात्री आहेच.पुरावा खालच्या एका प्रतिसादात आहे.असो. (खात्रीपूर्वक)बेसनलाडू खरे तर संपादकीय वजा लेखन करतांना ते गाळता आले असते असा एक सभ्य विचार डोकावून गेलाच होता. पण वाटले ते लिहिले भले आवडो न आवडो. हे तर उत्तमच! गाळता आले असते,हा विचार तुमच्या मनाला शिवला यातच तुम्हांला त्यावेळी लेखनाचे बेअरिंग सुटत असल्याचे/विषयांतर होत असल्याचे जाणवले होते,हे कळून येते.सभ्यासभतेशी त्याचा काडीचाही संबंध नाही/नसावा.अर्थात वाचकांच्या आवडीनिवडीविषयी संपादकाने स्वतःच्या लेखनात जागरूक नसावे(च);त्यामुळेच कोणाला कितीही आवडो,नावडो; संपादकाच्या चष्म्यातून तटस्थ परीक्षण आणि लेखणीतून वस्तुनिष्ठ लेखन उतरावे,हीच अपेक्षा असते.आणि संपादकाचे विचार हे त्याचे स्वतःचे असतात,हे वाचक म्हणूनही सर्वांनी मान्य केलेच पाहिजे/केलेले असते. (संपादकीय)बेसनलाडू बाकी मी विचारलेल्या इतर प्रश्नांची उत्तरे तुमच्याकडून येतील व त्यावर साधकबाधक विचारमंथन होईल, या विश्वासाने येथे वाचत,प्रतिसाद टंकत राहीन. स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद.यातून तुमच्या लेखनविषयक जबाबदारीचाच प्रत्यय आला. (आभारी)बेसनलाडू

प्रियाली 14/07/2008 - 04:59
जागतिकीकरणाचे मराठी साहित्यावर झालेले नेमके परिणाम, त्यातून निर्माण होत असलेल्या नव्या साहित्यकृती यांबद्दलही अधिक वाचायला आवडले असते.
केवळ तिथेच नव्हे तर मराठी संकेतस्थळावरही तसेच दिसून येते. चिंतन मननाअभावी लिहिण्याची प्रचंड घाई नवलेखकामध्ये दिसते. अर्थात टिकणारे लिहिता येत नाही, म्हणून त्यांनी आपली लेखणी थांबवावी असे मुळीच नाही. परंतु साचेबद्ध, एकसुरी, कंटाळवाणे आणि एकच लेखन चार-चार संकेतस्थळांवर टाकण्याची सवय, हे सर्व सोडले पाहिजे.
अगदी खरे आहे! हातात लेखणी आहे म्हणून आम्ही मनाला येईल तसे लेख टाकत जातो या विचारसरणीपेक्षा मी हा लेख का लिहितो? त्यामागील उद्दीष्ट पूर्ण होते काय? वाचकांना ते अपील होते का? याचा विचार लेखकाने जरूर करावा. ज्यांची लेखणी धारदार आहे त्यांनी साहित्यातील वेगवेगळे फॉर्म्स प्रयोगात आणायला काहीच हरकत नाही. प्रतिसादांचा भरघोस ओघ म्हणजे यश हे समीकरण खोटे आहे आणि या समीकरणावर श्रद्धा ठेवून ताकदीच्या लेखकांनी आपल्याला सिमीत करू नये असे वाटते. असो. वर बेसनलाडूने म्हटल्याप्रमाणे मलाही स्पष्टपणे असे वाटते की -
काही मराठी संकेतस्थळांवर संस्थळाचे मालक (मिसळपावचे नव्हे )लिहिल्या गेलेल्या लेखनाला पुर्वी अनुमतीची प्रतीक्षा करायला लावत.
हे वाक्य अप्रस्तुत वाटले. अनुमतीची प्रतीक्षा ही तात्पुरती आणि त्या मालकांना पटतील अशा सबळ कारणांतून आली होती. एका चांगल्या लेखात वरील वाक्याची गरज नव्हती.

मुक्तसुनीत 14/07/2008 - 08:01
मूळ विषय चांगला हाताळला आहे. त्यातील प्रशासकीय परवानगीबद्दलचा संदर्भ अवांतर असला तरी तो भाग अंमळ बाजूला ठेवावा असे मी सर्वपक्षीयाना विनवतो.

धनंजय 14/07/2008 - 08:15
याबद्दल बिरुटेसरांचे संपादकीय समयोचित आहे. भाषा मुळात प्रगल्भ असते म्हणून तिच्यात लोक लिहीत नाहीत - उलट लोक महत्त्वाच्या गोष्टी त्या भाषेत लिहितात, म्हणून भाषा प्रगल्भ होते. जागतिकीकरणामुळे अनेक नवीन विषय, चिंतेचेही आणि आनंदाचेही, आपल्या आयुष्यात आले आहेत. ते विषय हाताळून जोमाने साहित्यनिर्मिती झाली, तर वाचकांना ही रस वाटेल. वाचक मिळाले तर मराठी लेखकांना हुरूप वाटेल. आणि या प्रगतिचक्रात आपल्या भाषेची भरभराट होईल.
विंदाची कविता ऐकून माजी राष्ट्रपती डॉ. कलामांना मराठी भाषा शिकावी वाटते, याचा अर्थ असा की श्रेष्ठ अभिव्यक्ती ही उत्कंठावर्धक साहित्यास जशी गती देते तशी ती भाषेला नवा वाचक वर्गही जोडते.
वाह - कळीचा मुद्दा. येथे पुढच्या पिढीला मराठीतला वाचकवर्ग केले पाहिजे. त्यांच्या (म्हणजे आपल्याच) जागतिक झालेल्या आयुष्याशी निगडित श्रेष्ठ अभिव्यक्तीचे साहित्य तयार नसले, तर कंटाळून ही पिढी मराठीला केवळ "आजी-आजोबांशी बोलायची भाषा" अशी मानू लागेल. मुकसुनीत म्हणतात : "मूळ विषय चांगला हाताळला आहे. त्यातील प्रशासकीय परवानगीबद्दलचा संदर्भ अवांतर असला तरी तो भाग अंमळ बाजूला ठेवावा असे मी सर्वपक्षीयाना विनवतो." सहमत. माझीही तीच विनवणी.

शिक्षण, शेती, संगणक जग, कुटुंब, नोकरी, मुले, स्त्री-पुरुष आणि इतरही विषयांसहित साहित्य हे परिवर्तनाचे माध्यम बनावे, मराठी साहित्य हे परिवर्तनाचे शस्त्र व शास्त्र बनावे अशा दृष्टिकोनाने लिहावयाचे म्हणजे ते प्रचारांती असावे असे नाही. स्वांतसुखाय या दृष्टीने ते लिहिले जाऊ शकते.
म्हणुन तर अनुदिन्यांचे पेव (चांगल्या अर्थाने)फुटले आहे. इतक्या चांगल्या अनुदिन्या आज आंतरजाला वर आहेत कि तुम्ही फक्त वाचत रहावे. अगोदर वाचु यात नंतर लिहु यात ही भुमिका घ्यायला लागलो तर आपण फक्त वाचतच राहु इतके सकस साहित्य आज आंतरजालावर आहे. हा जागतिकि करणाचाच साहित्यावर झालेला परिणाम आहे. आज आपण जगाच्या काना कोपर्‍यातून इथे जमतो ही बाब ही सकारात्मक आहे. राहिला मुद्दा प्रशासकीय अनुमतीचा. उदारीकरणातुन दिलेल्या तांत्रिक मुभेचा दुरुपयोग (जरी सापेक्ष असला तरी) होउ नये व रसभंग होउ नये म्हणुन घेतलेली काळजी आहे. आमच्या देव गुरुजींच्या भाषेत "कोणी खंडीच्या वरणात मुतलास का रे?" असे होउ नये म्हणुन. त्याची जागा वेगळी आहे. त्याला ही स्थान आहेच कुठेतरी. मी तर पिवळ्या पुस्तकांनाही साहित्य म्हणतो. त्यातही काही दर्जेदार मिळतं. बाकी अतिथी संपादकीय ही स्वांत सुखाय का होईना साहित्य सेवाच असते. अवांतर- चला मराठवाड्याला स्थान दिलं. आता भीती नाहि प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

कोलबेर 15/07/2008 - 01:31
जागतिकीकरणाचा मराठी साहित्यावरील परिणाम दिसू लागलेला आहे. जागतिकीकरणाचाच एक परिणाम म्हणजे पुस्तक/छापील ह्या पारंपारिक माध्यमांच्या मर्यादीत कक्षा तोडून बाहेर पडलेले अनुदिन्या/संकेतस्थळांवरील साहित्य.
अतिथी संपादकीय ही स्वांत सुखाय का होईना साहित्य सेवाच असते.
१००% सहमत!

विसोबा खेचर 14/07/2008 - 09:02
बिरुटेसर, आपला अग्रलेख खरोखरच सुरेख आहे आणि आजच्या मराठी साहित्यविषयक परिस्थितीबाबत सांगोपांग विचार करणारा आहे. मराठी सहित्याच्या उत्कर्षाविषयीची अतिशय प्रामाणिक कळकळ आपल्या अग्रलेखातून दिसून येते! पुन्हा एकदा सवडीने वाचेन. बाकी प्रियाली म्हणते त्याप्रमाणे काही संस्थळांवर लागलेल्या प्रशासकीय अनुमतीचं कारण हे तात्पुरते आणि त्या मालकांना पटतील अश्या सबळ कारणाकरताही असेल हे मान्य. परंतु माझ्या वैयक्तिक अनुभवानुसार बोलायचे झाले तर माझ्यासारख्या सातत्याने लेखन करणार्‍या एखाद्या सभासदाने त्यावर तीनतीनदा आक्षेप घेतला असता त्याला त्याबाबत एका शब्दानेही जाहीर अथवा खाजगी, कुठलेच उत्तर दिले गेले नाही/दिले जाऊ नये याचे सखेद आश्चर्य वाटले, आजही वाटते! त्यामुळे बिरुटेसरांनी 'एकाधिकारशाही' हा शब्द वापरला आहे तो येथे पटतो! एकाधिकारशाहीची भावना/अथवा माज (!) असला कीच असा बेमुर्वतखोरपणा आणि बेफिकीरपणा अंगी येतो! संस्थळ चालकांना काही एक ठाम धोरणे निश्चितच अवलंबावी लागतात त्या शिवाय संस्थळ चालवणे मुश्कील आहे हे स्वानुभवातून मीही मान्य करतो परंतु त्याचबरोबर त्यांनी त्या संस्थळाचे आधारस्तंभ असलेल्या सभासदांना वेळोवेळी विश्वासात घेऊन अधिकाधिक लोकाभिमूख रहायला पाहिजे हेही तितकेच खरे! तात्या.

विकास 14/07/2008 - 09:41
अग्रलेख आणि त्याचा विषय, मांडणी आवडले. सध्याची मराठी संकेत स्थळे ही पुढे मराठी माणसाच्या एकत्रीत येण्यासाठी (संघटीत वगैरे अर्थाने नाही!) म्हणून असलेली एक पायरी ठरावी अशी इच्छा आहे. अशी संकेतस्थळे चालू होण्या आधीपासून अनुदिन्या होत्याच पण त्यात एकतर्फी कर्णावापरून संवाद म्हणून ओरडण्यासारखा प्रकार होता. अर्थात याचा अर्थ तो प्रकार वाईट आहे असा नाही, त्यातून पण बरेच चांगले लिहीणारे तयार झाले असले तरी मिपा आदी संकेतस्थळांनी संवादाचे माध्यम दिले हे नक्की! वर्षाहूनही कमी कालावधीत नुसतीच अनेकांच्या विचारांची मिसळ करण्याचा प्रयत्न करणार्‍या या स्थळाने विविध प्रकारचे प्रयोग करून पाहीले. अशा प्रयत्नातून जसे हे संकेतस्थळ पुढे जात राहील असे वाटते तसेच येथील आणि इतर स्थळांवरील संवादातून पण एकंदरीतच मराठी माणूस अनुभवाचे आदानप्रदान देत पुढे जाईल अशी आशा वाटते.

अगदी समयोचित अग्रलेख. जागतिकीकरण - अनुदिन्या - संस्थळे यांचा एक निश्चित संबंध आहे. साहित्याच्या प्रांतात या जालीय माध्यमांचा आता सणसणीत वाटा आहे. या साहित्याच्या प्रकृतीबद्दल अजून विस्ताराने काही आले असते, तर आवडले असते.

In reply to by मेघना भुस्कुटे

नंदन 14/07/2008 - 12:26
सहमत आहे, अग्रलेख आवडला. जालीय माध्यमांच्या प्रकृती आणि क्षमतांबद्दल तसेच आतापर्यंतचे साहित्य (दलित साहित्याचा, तोही सुरूवातीच्या दलित साहित्याचा) अपवाद वगळला तर एकाच साच्यात गुंतून पडलेल्या ह्या साहित्याला बसणार्‍या धक्क्यांबद्दलही अधिक वाचायला आवडेल.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

सहज 14/07/2008 - 11:47
अग्रलेखाने विचारमंथन सुरू करायचे काम चोख बजावले आहे. जागतिकीकरणात वाचक त्याच्या कार्यक्षेत्रामुळे व आंतरजालावरील उपलब्ध माहीतीसाठ्याने पुर्वीच्या [जागतिकीकरणाच्या आधीच्या] वाचकापेक्षा जास्त संख्येने माहीतगार होतो आहे. जास्त माहीती मुळे सहाजिक आवडीनिवडी बदलत आहेत. जागतिकीकरणाने उपलब्ध साधनसामग्रीने बदलेले आयुष्य व बदलेले आर्थीक समीकरण, महीलांचे सबलीकरण, महीला वाचक/ लेखकांना मिळालेले स्वातंत्र्य याच परिणाम मराठी साहित्यावर होणार आहे. आंतरजालावरील लेखनाने, साहीत्य म्हणजे ज्ञानपीठ पारितोषक विजेती पुस्तके व तसेच प्रतिथयश लेखक म्हणजेच "साहीत्य" हा समज हळुहळू बदलत चालला आहे. आजवर मर्यादित स्वरुपात प्रकट झालेला वाचकवर्ग साहित्याला नवी दिशा, नवे योगदान देउ लागला आहे. आता हेच उदाहरण घ्या ना, संपादकीय सदर म्हणजे हाताच्या बोटावर मोजता येणार्‍या वृत्तपत्रातील संपादकांचे लिखाण इतकेच माहीत होते. केवळ काही दिवसांच्या चर्चेतुन आता संकेतस्थळाच्या माध्यमातुन केवळ भाषेच्या प्रेमातुन एकत्र आलेली देशविदेशातील मंडळी वेगवेगळ्या विषयावर वैचारिक लेखन करत आहे. मराठी वाचकाचा हा केवढा मोठा फायदा आहे हे नाकारता येत नाही. जागतिककरणाच्या ह्या प्रक्रियेत वाचकाला एकत्र यायची, मनसोक्त प्रकट व्हायची बहुमुल्य संधी मिळाल्याने इथलेच उदाहरण द्यायचे झाल्यास गेल्या वर्षभरातील या मंथनातुन काही लेखकरत्ने बाहेर आली आहेत जसे रामदास, धनंजय. काही रसीकरत्ने जसे मुक्तसुनित, चतुरंग जे ह्या साहीत्य यज्ञाचे अग्नीकुंड प्रज्वलीत करत आहेत. आंतरजालामुळे वाचकाची केवळ साहित्यीक अभिरुची नव्हे तर वाचकाचे एकंदरीत आयुष्य समृद्ध करणारी नवव्यवस्था आली आहे. एक हिरा शोधायला कित्येक टन माती चाळावी लागते त्याप्रमाणे संकेतस्थळाच्या खाणीत अनेक रत्ने निश्चीत बाहेर येत आहेत उद्याचे साहित्यिक ह्या माध्यमातुन अजुन झळाळुन येतील. नवे साहीत्य, नवे माध्यम असले तरी शेवटी लोकांना एकत्र करुन समाजाचा विकास हेच ध्येय जागतिकीकरणात देखील कायम ठेवायचे आहे. त्याकरता सर्वांनी साहीत्यनिर्मीती जरी केली नाही तरी सुसंवाद चालू ठेवण्याचे काम / भान ठेवले पाहीजे.

In reply to by सहज

मनिष 14/07/2008 - 12:47
जागतिककरणाच्या ह्या प्रक्रियेत वाचकाला एकत्र यायची, मनसोक्त प्रकट व्हायची बहुमुल्य संधी मिळाल्याने इथलेच उदाहरण द्यायचे झाल्यास गेल्या वर्षभरातील या मंथनातुन काही लेखकरत्ने बाहेर आली आहेत जसे रामदास, धनंजय. काही रसीकरत्ने जसे मुक्तसुनित, चतुरंग जे ह्या साहीत्य यज्ञाचे अग्नीकुंड प्रज्वलीत करत आहेत. आंतरजालामुळे वाचकाची केवळ साहित्यीक अभिरुची नव्हे तर वाचकाचे एकंदरीत आयुष्य समृद्ध करणारी नवव्यवस्था आली आहे. एक हिरा शोधायला कित्येक टन माती चाळावी लागते त्याप्रमाणे संकेतस्थळाच्या खाणीत अनेक रत्ने निश्चीत बाहेर येत आहेत उद्याचे साहित्यिक ह्या माध्यमातुन अजुन झळाळुन येतील.
आणि हेच ह्या माध्यमाचे सर्वात मोठे बलस्थान ठरणार आहे. गुगलने त्याच्या ऍड्सेन्स साठी 'द लाँग टेल' (लांब शेपूट - फार्शा प्रसिद्ध नसलेल्या संकेतस्थळांचा एकत्रित हिट काऊंट) ही संकल्पना फार कल्पकतेने वापरली. तसेच ह्या विखुरलेल्या, तुरळक पण दर्जेदार लिहिणार्‍या लेखकांबाबतही म्हणता येईल. अशा कथा एकत्र करून कदाचित लवकरच एखादे पुस्तक, मासिकही निघेल.

केशवसुमार 14/07/2008 - 12:32
बिरुटेशेठ, संपादकिय आवडले..या लेखाच्या अनुषंगाने मिपावर विचारमंथन ही सुरु होईल.. अभिनंदन!! बेलाशेठ म्हणतात तसे १. जागतिकीकरणाच्या नकारात्मक बाजूच साहित्यातून मांडल्या जात आहेत/गेल्या आहेत,असे आहे काय?असल्यास ते बदलण्यासाठी काय करता येईल?त्याच्या सकारात्मक बाजूंवर झालेले लेखन,भिन्न संस्कृती आणि जीवनशैलींच्या निरीक्षणातून व अभ्यासातून निर्माण झालेले लेखन,त्याला मिळालेली स्वीकृती आणि दाद यांबद्दल आपणांस काय वाटते/आपले निरीक्षण वा अनुभव काय? २. जागतिकीकरण हे(च) मानवी मूल्यांच्या र्‍हासाचे मूळ ठरण्याइतपत मानवाची विवेकबुद्धी खुंटली आहे काय?नवसाहित्यात हेच दिसून येते काय? ३. स्वतःच्या मूल्यांचे व संस्कृतीचे पालन,भिन्न संस्कृती व मूल्यांचा स्वीकार आणि अंगिकार या बाबतींत जागतिकीकरणाने आणि/किंवा नवसाहित्याने काय परिणाम दाखवले आहेत? ह्या प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी साधकबाधक चर्चा व्हावी.. परंतु साचेबद्ध, एकसुरी, कंटाळवाणे आणि एकच लेखन चार-चार संकेतस्थळांवर टाकण्याची सवय, हे सर्व सोडले पाहिजे. साचेबद्ध, एकसुरी, कंटाळवाणे हे व्यक्ती सापेक्ष(वाचक आणि लेखक) असू शकते असे वाटते..आणि एकच लेखन चार-चार संकेतस्थळांवर टाकल्याने नुकसान काहि ही नाही असे ही वाटले उलटपक्षी या मुळे जास्त वाचकांन पर्यंत पोचता येईल नवा वाचक वर्गही जोडला जाईल ... असो.. पुन्हा एकदा उत्तम संपादकिय लेखाबद्दल आभिनंदन आणि धन्यवाद. केशवसुमार

मनिष 14/07/2008 - 12:40
पण काही गोष्टी नाही समजल्या, काही पटल्या, काही नाही पटल्या --
जागतिकीकरणामुळे सामाजिक व आर्थिक विषमता वाढत जाते, गरीब राष्ट्रे आणि तेथील जनतेच्या दारिद्र्यातत भर पडत आहे. पर्यावरणाचेही प्रचंड नुकसान होत आहे. त्यासाठी वर्तमान बदलायचे असेल तर जागतिकीकरणाच्या प्रवाहात खंबीरपणे उभे राहून साहित्य समृद्ध करावेच लागेल.
म्हणजे काय? वर्तमान (किंवा भविष्य) बदलायचे तर कॄती जास्त आवश्यक नाही का?
असे करायचे असेल तर साहित्यविषयक विचार मांडताना आशय आणि अनुभवाचे क्षेत्र विस्तारले पाहिजे. मानवतावादी मूल्याकडे लक्ष पुरविले पाहिजे. आणि नेमका मानवतावादी मूल्यांचा र्‍हास होत आहे. दूरदर्शन, विविध वाहिन्यांच्या मालिका, चित्रपटांचे आशय या बाबतीत असे दिसते की, उपभोगवाद, चंगळवाद या मुळे सवंग लोकप्रियेतेसाठी लिहिले जाणारे लेखन वाढत आहे.
(१) अनुभवाचे क्षेत्र विस्तारणे - ह्यात कदाचित नातेसंबंध हेसुद्धा उपभोगतावादी, आत्यंतिक व्यक्तिकेंद्रीत होत आहे हे अपरिहार्यपणे जाणवेल. मानवतावादी मुल्यांचा र्‍हास होतो आहे हे एक जागतिकीकरणाचे वास्तव आहे. (२) मग -- साहित्यात जे घडते आहे (उपभोगवाद, चंगळवाद ) त्याचे प्रतिबिंब पडते आहे. 'जसे आहे तसे' दाखवणे, तत्कालिन समाजाचे शब्दचित्र उभे करणे हे साहित्याचे महत्वाचे कार्य. मग हे सवंग लोकप्रियेतेसाठी(च) लिहले जाते असे का मानावे? (३) त्याहून महत्वाचे साहित्याचे काम निरिक्षणे नोंदवणे, बदललेल्या समजाचा नात्यांचा, मानवी संबंधांचा धांडोळा घेणे, त्यातील व्यमिश्र गुंतागूम्त सम्जवून घेणे असेल तर काय बिघडले. 'समाजाने मानवतावादी मुल्ये जपावीत, त्यांचा र्‍हास होण्यापासून जपावे' हे एकवेळ समजावून घेता येईल - पण साहित्याने तेच करावे हे पटत नाही. साहित्याने त्यांचे प्रतिबिंब दाखवावे हे ठिक - लेखकाला वाटले तर त्याने त्यावर भाष्य करावे, मानवतावादी मुल्यांच्या दृष्टीकोनातून हे 'कसे असावे' ते लिहावे - पण त्याला तसे वाटत असल्यासच - ते साहित्याचे (किंवा कलेचे) गृहितक नकोत. साहित्य 'उपदेशामृत' होऊ नये. मला खर तर 'अनुभवविश्व विस्तारावे' आणि 'मानवतावादी मूल्याकडे लक्ष पुरविले पाहिजे. आणि नेमका मानवतावादी मूल्यांचा र्‍हास होत आहे' हे मुद्दे परस्परविरोधी वाटतात. मानवतावादी मूल्यांचा र्‍हास होतो आहे हे सत्य - तयाचा साहित्यातला समावेश हे खरे अनुभवविश्व विस्तारणे - नाही का?
वि. स. खांडेकरांची ययाती सारखी ऐतिहासिक कलाकृती अजरामर ठरली ती त्यांच्या लोकविलक्षण प्रतिभा शक्तीमुळे, कुसुमाग्रजांच्या नटसम्राटाने मराठी वाचकांचा हृदयाचा ठाव घेतला, विंदाची कविता ऐकून माजी राष्ट्रपती डॉ. कलामांना मराठी भाषा शिकावी वाटते, याचा अर्थ असा की श्रेष्ठ अभिव्यक्ती ही उत्कंठावर्धक साहित्यास जशी गती देते तशी ती भाषेला नवा वाचक वर्गही जोडते.
खरे आहे! हे पटले - तसेच 'अनुवादातून' वेगळ्या भाषेशी, संस्कृतीशीही संबंध जोड्सला जाऊ शकतो. गुलजार ह्यांनी मधे कुसुमाग्रजांच्या कवितांचा अनुवाद करून त्या अमराठी वाचकांपर्यट पोहोचवल्या. नटसम्राट अर्थातच 'किंग लिअर' वरून प्रेरणा घेऊन लिहिले होते. ब्लॉग, काही मराठी संस्थळ यांच्यामुळे, त्यातील सुलभतेमुळे, अनेक अ-लेखक नवीन कथा लिहितात आहे, त्यांना मर्यादित तरी ठराविक वाचकवर्गापर्यंत पोहोचता येत आहे, पुर्वीपेक्षा वेगळे फॉर्म्स, विषय यानिमित्ताने हाताळले जातात, लिहिले जातात - वर्तमानपत्रे, मासिक यासारखी माध्यमे देखील ह्या आंतरजालीय मराठी विश्वाची वेळोवेळी नोंद घेतात - ते मला फार मह्त्वाचे आणि चांगले लक्षण वाटते. वर्तमानपत्रे, मासिक याच्याप्रमाणेच 'आंतरजालीय मराठी ब्लॉग व संस्थळ' ह्या नव्या पण अतिशय वेगवान, सशक्त आणि समृद्ध माध्यमाची एक स्वतंत्र माध्यम म्हणून लवकरच ओळख निर्माण होईल अशी मला खात्री आहे . जागतिकीकरणात सगळ्यांचेच अनुभवविश्व झपाट्याने विस्तारते आहेच (आपल्या आधीच्या नोकरदार पिढीला जॉब इनसिक्युरीटी ही खर्‍या अर्थाने कधी जाणवलीच नाही, आणि आपल्या पिढीला जॉब सिक्युरीटी, पेन्शन हे विसरूनच जागावे लागणार आहे) त्याचे प्रतिबिंब वेगवेगळ्या रुपात साहित्यात पडेलच.

चतुरंग 14/07/2008 - 16:43
आपला अग्रलेख चांगला आहे त्याबद्दल अभिनंदन पण अजून ताकदवान लिहू शकला असतात असे प्रामाणिकपणे वाटते. आता थोडे पटले/न पटले. पटले - साहित्यविषयक विचार हा स्थानिक पातळीवरुन जागतिक पातळीवर सहज गेला आहे आणि त्याचे मोठे श्रेय जागतिकीकरणाला जाते. दूरदर्शन, विविध वाहिन्यांच्या मालिका, चित्रपटांचे आशय या बाबतीत असे दिसते की, उपभोगवाद, चंगळवाद या मुळे सवंग लोकप्रियेतेसाठी लिहिले जाणारे लेखन वाढत आहे. केवळ तिथेच नव्हे तर मराठी संकेतस्थळावरही तसेच दिसून येते. चिंतन मननाअभावी लिहिण्याची प्रचंड घाई नवलेखकामध्ये दिसते. हे खरे. चिंतन/मननाने विचारांना एक खोली येते. कशासाठी लिहिले पाहिजे याचे भान येते. इतर सगळे भाराभर लिहितात, मी लिहिले नाही तर कोण दखल घेणार ह्या भीतीतून किंवा चला प्रतिक्रिया मिळायला लागल्या आहेत ना आता लिहितोच ह्या 'प्रेरणे'तून लिखाण होऊ नये नाही तर दर्जा घसरतो. इतर लिखित साहित्याबरोबरच मराठी संकेतस्थळाचे एक वेगळे साहित्यविषयक स्थान निर्माण होऊ पहात आहे ही फार मोठी जमेची बाजू आहे. न पटले - जागतिकीकरणामुळे सामाजिक व आर्थिक विषमता वाढत जाते, गरीब राष्ट्रे आणि तेथील जनतेच्या दारिद्र्यातत भर पडत आहे. पर्यावरणाचेही प्रचंड नुकसान होत आहे. त्यासाठी वर्तमान बदलायचे असेल तर जागतिकीकरणाच्या प्रवाहात खंबीरपणे उभे राहून साहित्य समृद्ध करावेच लागेल.....मानवतावादी मूल्यांचा र्‍हास.. म्हणजे नेमके काय? इथे जागतिकीकरणाचे परिणाम फक्त उणेच आहेत असे गृहितक घट्ट धरुन ठेवल्यासारखे वाटते. सामाजिक/आर्थिक विषमता, पर्यावरण र्‍हास, मानवतावादी मूल्ये आणि साहित्य ह्यांचा अर्थाअर्थी संबंध स्पष्ट होत नाही. दुसर्‍यापरिच्छेदात आलेले जागतिकीकरण, र्‍हास हे मुद्दे पुन्हा चौथ्या परिच्छेदात येतात त्यामुळे थोडा विस्कळितपणा जाणवतो. लेखनाचा चिरेबंदीपणा थोडा ढळलाय. मराठी साहित्यात आणखी कितीतरी आकृतीबंध उतरणे गरजेचे आहे - एवढेच न लिहिता कोणते आकृतीबंध आपल्याला अपेक्षित आहेत ह्याबद्दल थोडी चर्चा झाली असती तर अधिक श्रेयस्कर झाले असते. मराठी संस्थळे/अनुदिन्या ह्यावरील लिखाणाच्या बलस्थानांविषयी अधिक उहापोह व्हायला हवा होता असे वाटते. बाकी काही मुद्द्यांचा परामर्श इतर मेंबरांनी घेतला आहेच. असो. एकूण अग्रलेख 'मिपा'चा हा जालीय अग्रलेखाचा पायंडा अधिक भक्कम करणारा आहे ह्यात शंका नाही. चतुरंग

रामदास 14/07/2008 - 19:20
संपादकीयाच्या निमीत्ताने आवश्यक अशा सामाजीक मुद्द्यांवर चर्चा रंगत चालली आहे.त्यानिमीत्ताने आपल्या सर्वाचें अभिनंदन. मला जागतिकीकरणाचे काही फायदे दिसले ते असे. नविन माध्यमे स्वस्तात उपलब्ध झाल्यामुळे लिहीणार्‍यांची आणि वाचणार्‍यांची संख्या वाढीस लागेल. सुरुवात नक्कीच झालेली आहे.एकांगी लेखनाला आळा बसेल. माध्यमांवरची मक्तेदारी संपून माध्यमे जास्त लोकाभिमुख होत जातील.पण अजून तरी जागतिकीकरणाच्या परीणामांचे हवे तेव्हढे प्रतिबिंब लोकसाहित्यात पडलेले दिसत नाहीत.मानसिकतेतला बदल चित्रीत होताना दिसत नाही आहे. कदाचीत माझे वाचन कमी पडत असावे., किंवा मी नेहेमीच्या माध्यमांकडे दुर्लक्ष करीत असेन . असं असेल तर ते इतर नविन माध्यमांच्या प्रभावामुळे असेल. इथे मी हा सर्वसामान्य रसिक माणूस गृहीत धरला आहे. वेळेवर मक्तेदारी हा एक नवी समस्या उभी राहतेच आहे.सवंग लिखाण जसे आज होत आहे तसे ते कालही होत होते.आपली बहुभाषीय संस्क्रुती जास्त फायद्यात राहणार आहे. मधुशालेचं मराठीकरण मला सहजंच उपलब्ध झालं ते माध्यमाच्या वाढत्या प्रसारामुळे. संस्कृत भाषेतील स्तोत्रे या सोयीतूनच मिळाली. पण नविन अनुभूतींचे चित्रण फार कमी वाचायला मिळाले.जतन होताना दिसते आहे पण संवर्धनाची गती हळू आहे असे वाटते. चिंतन आणि मनन यांचा अभाव काही वेळ वाटतो खरा परंतू सकस निर्मीतीला थोडा वेळ द्यावाच लागेल. प्रयोगशिलतेला वाव मिळाला की हे नक्कीच होईल असे मला वाटते. भाषेमधील झालेल बदल हा विषय आपण जास्त चांगला आमच्यापुढे आणू शकाल असेही मला वाटते. प्रायोगीक कलाकृतींकडे संशयानी बघण्याचे दिवस आता संपत आलेले आहेत.संगीताकडे आपण बघीतलं तर हा बदल लक्षात येण्यासारखा आहे.मी जागतिकीकरणामुळे लोकांच्या आवडी निवडी सहज बदलताना बघतो.जीवन एक ऍड हॉक पद्धतीने व्यतीत करणार्‍याची संख्या वाढताना बघतो आणि व्यथीत होतो.कारण मानवी मूल्यांचे बदलत जाणारे अर्थ मी समजू शकत नाही.लोकहितवादींची शतपत्रे, हरी नारायण आपट्यांच्या कादंबर्‍या त्या त्या काळच्या सामाजीक बदलांचे दिवे होते. अपुर्‍या वेळेच्या या शतका मध्ये लोकांची मागणी लॉजीक साठी संपून सोल्युशनसाठी आहे . शास्त्राची मागणी कमी होऊन फक्त शस्रांना मागणी येत आहे हे आव्हान आपण लिहिणारे लोक पेलू शकू का? डॉ . बीरूटे सरांचे मनोमन आभार. लेख इथेच न थाबता पुढे अ-संपादकीय म्हणूनही वाढवत न्यावा ही विनंती. अवांतर. मी मनोरंजक लिखाण वाचत /लिहीत असल्यामुळे या विषयाशी माझा संपर्क कमी असतो. या लिखाणात तर्काची कमी असेअल तर ती माझी आहे. तर्क कमी असेल तर मनोरंजन नक्कीच होईल.

ऋषिकेश 14/07/2008 - 21:15
वा अग्रलेखाच्या मालिकेतला दुसरा संपादकीय लेख आवडला. अश्या असीम ;) विषयावर लिहिताना फाफटपसारा होण्याचा, नको त्या दिशेला लेख घसरण्याचा फार मोठा धोका असतो. तो टाळून इतका मोठा आवाका असणार्‍या विषयातील आपल्याला सांगायचा भाग निवडून केवळ त्यावर लेख लिहिल्याने तो 'नेमका' वाटला. त्याबद्दल अभिनंदन! नाहि म्हणायला प्रशासकीय अनुमतीचे सत्य वाचून घसरला की काय लेख असे वाटले पण इतकं चवीपुरतं मीठ हवंच नाहि का ;)
वि. स. खांडेकरांची ययाती सारखी ऐतिहासिक कलाकृती अजरामर ठरली ती त्यांच्या लोकविलक्षण प्रतिभा शक्तीमुळे, कुसुमाग्रजांच्या नटसम्राटाने मराठी वाचकांचा हृदयाचा ठाव घेतला, विंदाची कविता ऐकून माजी राष्ट्रपती डॉ. कलामांना मराठी भाषा शिकावी वाटते, याचा अर्थ असा की श्रेष्ठ अभिव्यक्ती ही उत्कंठावर्धक साहित्यास जशी गती देते तशी ती भाषेला नवा वाचक वर्गही जोडते
वा काय बोललात! अगदी सहमत! यात मला खटकली ती लेखाची बांधणी. म्हणजे विचार आणि कंटेंटच्या दृष्टीनं संपादकीयात हा लेख पुरेपुर उतरतो असं वाटतं मात्र विचार जरी मुळ विषयाला धरून असले तरी तर्कशुद्ध क्रमाने येत नाहित. काही ठिकाणी विचार मनात येतात तसेच कागदावर (इथे टंकनसुविधेवर) उतरवल्यासारखे वाटले. थोडी लेखाची पुनर्बांधणी (रीस्ट्र्क्चरिंग) केली असती तर परिपूर्ण "संपादकीयाचा" फील आला असता असे व्यक्तीगत मत आहे. -('मिसळ'लेला) ऋषिकेश

प्रमोद देव 14/07/2008 - 21:34
दिलीपराव लेखाचा आशय विचारप्रवर्तक आहे ह्या बद्दल अजिबात संदेह नाही. मात्र आपल्या लौकिकाला साजेसा उतरला नाही असेही वाटतेय. कुठेतरी काहीतरी कमी वाटतंय. नेमकेपणाने व्यक्त करता येत नाही पण वैयक्तिक माझ्याबद्दल बोलायचे तर मी फारसा संतुष्ठ नाहीये आपल्या कामगिरीवर. पुढच्या वेळेसाठी आत्ताच शुभेच्छा देऊन ठेवतोय. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

शितल 14/07/2008 - 22:20
मराठी भाषा, साहित्य, साहित्यसंमेलन सातासमुद्रापलिकडे जात आहे, ही अभिमानाची आनंदाची गोष्ट असली तरी येथील महाराष्ट्रभर वावरणार्‍या मराठी वाचकांकडे दुर्लक्ष होऊ नये, म्हणुनच की काय रत्नागिरीतही संमेलन व्हावे, असे वाटते. हो घरातील लोकाना पहिला मान आम्ही घरातीलच आहोत पण दुसरी कडे राहिलेलो शतकाच्या पलीकडे जाऊन डोकावण्याचे सामर्थ्य ज्या साहित्यात, ज्या लेखकात असेल तेच साहित्य प्रवाहात टिकून राहील. हे १००% खरे आहे.

प्राजु 15/07/2008 - 00:52
सर, आपला लेख आवडला. खूप विचार करून लिहिलेला आहे. जागतिकीकरणामुळे साहित्य निर्मितीवर परिणाम होतो आहे. माणसाचे अभ्यासाचे क्षेत्र वाढले आहे. पूर्वीच्या माणसांनी जे वाचले नसेल ते आता सहज वाचायला मिळते. हा जागतिकिकरणाचा फायदाच म्हणावा लागेल. बरेचसे ब्लोग्ज वाचनीय असतात पण ते सगळे वाचून आपण साहित्य निर्मिती करणं म्हणजे मग खूपच वेळ लागेल. भलेही इ-साहित्य लिहिणारे खूप विचार करत नसतील किंवा त्यांचे लेखन वर वर वाटणारे असेल पण त्यांच्या साहित्यातून दैनंदिन जीवनात घडणार्‍या गोष्टी डोकावतात. ज्या समाजात ते राहतात, वावरतात त्याचेच प्रतिबिंब त्यांच्या साहित्यातून दिसते आणि ते अपरिहार्य आहे. आपला लेख आवडला. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

सर्किट 15/07/2008 - 01:13
जागतिकीकरण आणि माध्यमांची मक्तेदारी संपणे ह्या दोन्हीतील कार्यकारणभाव सदर लेखातून स्पष्ट होत नाही. पण ह्याचा काहीतरी संबंध असावा, असे लेखकाने गृहीत धरलेले वारंवार जाणवते. "साहित्य लोकाभिमुख व्हावे" असा घोष चक्रधरांच्या काळापासून ऐकू येत आहे. मध्यंतरी ह्या घोषाचा अर्थ, "साहित्य विकले जावे" असा प्रकाशकांनी केला. आता अनुदिन्या आणि संकेतथळांवर स्वखुषीने फुकट लिहिणार्‍यांमुळे "साहित्य वाचले जावे" असा अर्थ होतो, एवढेच. ह्या बदलाचा संबंध "जागतिकीकरणाशी" कमी आणि माध्यमांच्या उपलब्धतेशी जास्त आहे. समजा जागतिकीकरण झाले नसते, आणि मराठी वृत्तपत्रांची / पाक्षिकांची / साप्ताहिकांची संख्या वाढली असती, तरीही हेच झाले असते. दुसर्‍या मुद्द्याविषयी बोलायचे(च) झाल्यास, मराठी संकेतस्थळांची एकाधिकारशाही मोडीत काढण्याचे श्रेय "मनोगत" कारांकडे जाते, हे मान्य करायला हवे. मायबोली ची एकाधिकारशाही त्यांनी मोडीत काढली, हे येथील जालसर्वज्ञांना पटेल. ह्याचा संबंध जागतिकीकरणाशी लावणे चुकीचे आहे. - (विचारी) सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

कोलबेर 15/07/2008 - 01:35
दुसर्‍या मुद्द्याविषयी बोलायचे(च) झाल्यास, मराठी संकेतस्थळांची एकाधिकारशाही मोडीत काढण्याचे श्रेय "मनोगत" कारांकडे जाते, हे मान्य करायला हवे.
सहमत आहे.. तसेच प्रशासकीय अनुमतीची प्रथा प्रथम बंद करण्याचे श्रेय उपक्रमाला जाते. (स्मरणशील) कोलबेर

चित्रा 15/07/2008 - 01:48
उत्तम विचारमंथन करणारा लेख! अग्रलेखातील सूर उपरोधिक वाटला (वरच्या प्रतिसादांमधून असे वाटणारी मीच एक आहे का अशी एक शंका आली). अग्रलेखातील जागतिकीकरणाविषयक उपरोधिक सूराचा अर्थ पाहुणे संपादक जागतिकीकरणाविरूद्ध आहेत असे नाही, तर या शब्दाचा जो वापर राजकारणी, समाजकारणी आणि इतर कुठच्याही संदर्भात झिजेपर्यंत करतात त्याविरूद्ध असावा. मिपावरील पाककृतींना येणारे प्रतिसाद पाहिल्यास जागतिकीकरणाचे परिणाम सहज दिसून येतात, शोधावे लागत नाहीत, त्यात जे काही जागतिकीकरणाचे परिणाम दिसतात ते सहज असतात. तसेच इतरही अनुभव साहित्यात जिवंत भिनलेले असले (मग ते जगभरच्या मातीत असोत का घराबाहेरच्या) तर त्यात जी सहजता असते ती यावी अशी या अग्रलेखाची अपेक्षा आहे असे वाटले.

तात्यासाहेब, आपण लिहिण्याची संधी दिली आणि त्यामुळेच मनातला विचार इथे टंकता आला. आपले पुन्हा एकदा मनापासून आभार !!! आमच्या तोडक्या मोडक्या लेखनाच्या तुलनेत मिपाच्या प्रतिसादांची वैचारिक उंची भारावणारी अशीच आहे. अनेक प्रश्न जागतिकीकरणाने, आणि मिपाच्या मित्रांनी उभे केले त्याची साधक बाधक चर्चा वाचायला मिळत आहे, अतिशय आनंद झाला, होत आहे. यावर चिंतन / मंथन करण्यासाठी अजूनही भरपूर संधी आहे, आपल्या प्रतिसादाला पोच देण्यासाठी हा प्रपंच. क.लो.अ. -प्रा.डॉ.दिलीप बिरुटे अवांतर : सध्या जालाच्या तांत्रिक अडचणींमुळे मिपावर येता येत नाही. त्यामुळे कृपया कोणताही गैरसमज नको, की कळकळीची विनंती.

अरुण मनोहर 16/07/2008 - 07:10
येवढ्या अफाट विषयाला मर्यादीत जागेत बसवणे खरच कठीण आहे. बिरुटे सरांनी हे कठीण काम चांगले सांभाळले आहे. भरकटण्याचा धोका काही ठिकाणी टाळता आला नाही. पण तिकडे दुर्लक्ष करता येते. आवडलेले मुख्य मुद्दे असे--- >>जागतिकीकरणाच्या प्रवाहात खंबीरपणे उभे राहून साहित्य समृद्ध करावेच लागेल. असे करायचे असेल तर साहित्यविषयक विचार मांडताना आशय आणि अनुभवाचे क्षेत्र विस्तारले पाहिजे. मानवतावादी मूल्याकडे लक्ष पुरविले पाहिजे...... >>या दशकात महाराष्ट्रातील लोकजीवन समृद्ध झालेले आणि त्याचे चित्रण साहित्यातून उमटले पाहिजे, मराठी साहित्याची उंची वाढली पाहिजे. मराठी जीवनाच्या विविध परिघांना स्पर्श करण्यासाठी मराठी लेखकांचे अनुभवविश्व समृद्ध झाले पाहिजे. जागतिकीकरणानंतर साहित्याचे विषय बदलत आहेत. तीव्र संघर्ष आणि जगण्याची विलक्षण गती यामुळे जीवनातील फरफट वाढत आहे. शतकाच्या पलीकडे जाऊन डोकावण्याचे सामर्थ्य ज्या साहित्यात, ज्या लेखकात असेल तेच साहित्य प्रवाहात टिकून राहील. खालील मुद्द्यांवर मी सहमत नाही. >>>जागतिकीकरणामुळे सामाजिक व आर्थिक विषमता वाढत जाते, गरीब राष्ट्रे आणि तेथील जनतेच्या दारिद्र्यातत भर पडत आहे. हा स्वतंत्र अग्रलेखाचा चांगला विषय आहे. हा अग्रलेख ह्या विषयावर नाही म्हणून इथे चर्चा करत नाही. परंतू जाता जाता एक नमूद करण्याचा मोह टाळता येत नाही. दशक दोन दशकाआधी भारत कदाचित गरीब देश, मागासलेला देश आसेल. पण आज एक महाशक्ती बनण्याच्या मार्गावर आहे. हे काम जागतिकीकरणाशिवाय झाले असते का? >>>एकच लेखन चार-चार संकेतस्थळांवर टाकण्याची सवय, हे सर्व सोडले पाहिजे. हा मुद्दा पटत नाही . तसे बघीतले तर साहित्याचा प्रसार करायला हे एक उत्तम साधन आहे. हे फक्त साचेबद्ध, एकसुरी, कंटाळवाणे लेखनासाठी म्हटले आहे का? तसे असेल तरी पटत नाही. गुणवत्ता ही प्रकाशीत केल्यानंतर जोखता येते. जास्तीत जास्त जागी प्रकाशीत केल्यावर जास्त वाचन होउन जस्त उहापोह होइल, प्रातीनिधीक म्हटली जाउ शकणारे प्रतिसाद मिळतील. मगच ते लिखाणसाचेबद्ध, एकसुरी, कंटाळवाणे आहे की नाही ह्याचा अंदाज येइल. एखादे अक्षर साहित्य जर ह्यात असेल तर ते सगळ्या वाद प्रतिवादांना पुरुन उरेल.

3

मंगेश पाडगावकरांचे बेळगावात काव्यवाचन.

अविनाश ओगले ·

केशवसुमार 13/07/2008 - 21:56
ओगलेशेठ, चांगली बातमी दिल की हो तुम्ही.. ते कार्यक्रमाची चलचित्रे पण टाकता आली तर बघा की हो इथे म्हणतोमी.. १९८६ साली कराडला असताना ते पाडगावकर ऐकल होतं बघा..करंदिकर आणि बापट बरोबर.. काय मजा आल होत म्हणुन सांगू.. त्याच आठवण झालं बघा.. (बाळेकुंद्रीचं)केशवसुमार

अविनाशजी, मंगेश पाडगांवकर हे माझे सर्वांत आवडते कवी.त्यांना मी दीर्घायुष्य मिळो अशी त्या दयाघनाकडे प्रार्थना करतो. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

विसोबा खेचर 14/07/2008 - 08:19
ओगलेसाहेब, हे वाचून आपला हेवा वाटला! पाडगावकर माझेही अतिशय आवडते कवी. कार्यक्रम खूपच छान झाला असणार! :) तात्या.

आज १३जुलै. नामवंत कवयित्री इंदिरा संत यांचा ८वा स्मृतिदिन. संत कुटुंबियांच्यावतीने दरवर्षी या दिवशी एक कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. दहावीच्या परीक्षेत मराठी विषयात सर्वाधिक गुण मिळवणार्‍या विद्यार्थिनीचा आणि तिच्या शिक्षकांचा सत्कार करण्यात येतो. या वर्षी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र भूषण मंगेश पाडगावकर उपस्थित होते. डोह, कोरडी भिक्षा या पुस्तकांचे लेखक आणि मौजेचे संपादक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती कार्यक्रमाला लाभली होती. पाडगावकरांच्या सत्कारानंतर त्यांनी त्यांच्या सर्व लोकप्रिय रचना सादर केल्या. ८०व्या वर्षातला त्यांचा उत्साह, तडफ, जोम सर्वानाच चकित करून गेला.

... मी कुठे नाही म्हणालो

ऋषिकेश ·

प्राजु 13/07/2008 - 21:10
सध्या चालू मुद्द्यावरची... गझल (गझलच ना?) आवडली.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

विकास 14/07/2008 - 18:12
एकदम मस्त कविता! म.टा. अथवा सकाळ ला पाठवून पहा. लोकसत्तेत पाठवल्यास मात्र केतकर (सोनीयापुढे) म्हणतील "मी इथे (या कवितेस) नाही म्हणालो!"

सहज 14/07/2008 - 19:08
वाचुन राजकीय गझलेला मतदार कोड्यात पडाला मेंदु म्हणला देईन की मत, मी कुठे नाही म्हणालो?

सर्किट 14/07/2008 - 23:17
शब्दांत खूपच सुधारणा करता येईल. दहा पैकी सहा गुण. - (गुणकारी) सर्किट

ऋषिकेश 15/07/2008 - 10:07
प्राजु, तात्या, विकास, सहजराव आणि गुणकारी सर्किट ;) प्रतिसादाबद्दल अनेक आभार! :) -('मिसळ'लेला) ऋषिकेश

तिच मान्स आन त्योच तमाशा , मी कव्हा नाई म्हन्ल तिच बिअर आन त्योच बार, मी कव्हा नाई म्हन्ल हासत हासत जगायला , मी कव्हा नाई म्हन्ल तुपल्याशी नात जोडायला, मी कव्हा नाई म्हन्ल प्रकाश घाटपांडे

शैलेश कुलकर्णी याची ..मी कुठे काही म्हणालो ? ही दर्जेदार गझल वाचून सद्य राजकीय परिस्थितीवर काही ओळी सुचल्या..

पंतांच्या पगडीचे प्रवासवर्णन- पार्ट २

पुष्कर ·

विसोबा खेचर 14/07/2008 - 08:34
पुष्करशेठ, धन्य आहे रे बाबा तुझी! आपला, पात्या, सॉरी, तात्या! :)

In reply to by विसोबा खेचर

पुष्कर 14/07/2008 - 11:14
"धन्य आहे रे बाबा तुझी!" तुमच्या प्रतिसादाने मी 'धन्य' झालो याबाबतीत वाद नाही, 'धन्यवाद'!

पुष्कर 14/07/2008 - 11:07
'पब्दां'च्या अतिरेकाने डोक्याला त्रास दिल्याबद्दल क्षमस्व. पण मराठीत 'प' आणि 'म' पासून सुरू होणारे शब्द (विशेषतः क्रियापदं) बहुसंख्येने आहेत असा माझा प्राथमिक अंदाज आहे. तुम्हाला काय वाटतं?

मदनबाण 14/07/2008 - 11:23
पुष्कररांवांच्या प प्रसारणामुळे प्रभावित.. (चरिचब चहिनतम चतलियघे) असे म्हणणारा मदनबाण.....

मनस्वी 14/07/2008 - 14:35
पस्त पिहिलंएस पुष्कर! मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

In reply to by मनस्वी

विजुभाऊ 16/07/2008 - 13:27
पहा पहा * पेस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा पिणे वाढवून पिवेकानंद व्हा. * (हे लिहिताना कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा अस्पष्टसाही हेतू नाहिय्ये..कृ.ख ह. घ्या.) पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

पुष्कर 16/07/2008 - 13:10
मदनबाण, मनस्वी आणि पुण्याचे पेशवे, आपला अत्यंत आभारी आहे. तुमच्या सगळ्यांच्या नावांवरूनही हेच सिध्ह होतय की मराठीत 'म' आणि 'प' पासून सुरू होणारे शब्द खूप आहेत. -पुष्कर

अनिल हटेला 16/07/2008 - 13:55
ह्या ह्या ह्या!!!!! पुष्कर दादा !!! फार च तल्लख बुद्धी आहे बुवा तुझी...... कस काय सुचत रे तुला? -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

पाषाणभेद 21/09/2009 - 13:28
मस्त लिहीलेस रे पुष्कर. शोधले व वाचले. ----------------------------------- आणि हो, सांगायच राहूनच गेलं, या विधानसभेच्या ईलेक्शनदरम्यान मी नविन कार घेणार आहे. - पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या

पुष्कर 20/05/2012 - 15:19
धन्यवाद बॅटमॅन. मला एका मल्याळी मित्राने एक इमेल पाठवली आणि म्हणाला, काहीतरी मराठी आहे, बघ वाचून. बघतो, तर माझीच गोष्ट मला!! आता इकडे मित्रांना सांगितलं की ती गोष्ट माझी आहे, तर म्हणतात 'ह्यॅ ह्यॅ ह्यॅ.. एवढं पण गंडवायचं नाही, आम्ही इमेलवर कधीच्या काळी वाचलीये'. पण मी कधीच्या काळी लिहिलीये, त्याचं काय! काय करावे!

(पंतांच्या पगडीच्या प्रवासवर्णनावरील पावमिसळकरी प्रतिभावंतांच्या प्रतिसादांनी प्रेरणा पावून पुढचा पार्ट प्रसवला.) पार्ट २ - पंकजचं प्रेम-प्रकरण (पूर्वसूचना- पार्श्वभूमीकरिता पहा: पंतांच्या पगडीचे प्रवासवर्णन) पंकजला पकडण्यासाठी पंतांसोबत पुण्यात पोहोचलेली पंतांची पोरगी प्राची पंकजला पहिल्यांदा पाहताच पंकजच्या प्रेमात पडली. प्राचीने पंकज, पोलिसांची पकडा पकडी पाहिली. पंकजचा पदपथावरून पोबाराही पाहिला.

शिलालेख : अर्थ लावण्यास मदत ...

छोटा डॉन ·

प्रियाली 13/07/2008 - 16:54
फोटो सुधारून दिले आहेत. त्यांवर टिचकी मारली असता ते सुस्पष्ट दिसतील. फोटो नेमके कुठे मिळाले? (मंदिर, किल्ला का आणखी कोठे?) आणि अंदाजे कोणत्या काळातील असावेत? माझे लिपीज्ञान अगदीच गबाळं ;) आहे. तरी ४थ्या चित्रातील शिलालेख चार भाषांत लिहिलेला दिसतो म्हणजे सरकारी* असावा असे वाटून गेले. एक लिपी उर्दूची नस्तलीक वाटते, एक देवनागरी (इथे देवनागरीतील प्रत्येक अक्षर तोडून लिहिले आहे), बाकीच्या कन्नड किंवा तेलुगू (इथे काला अक्षर भैंस बराबर पण तेलुगू वाटते) आणि इंग्रजी वाटते. तसेच पूल बांधण्याचा काळ विक्रम संवत्सर १८९६ , शालिवाहन शके १७६१ दिसत असून राजा नानकबक्ष बहादूर याने पूलाचे बांधकाम केले असे वाचता येत आहे. इंग्रजीतील साल ए.डी. १८३९ दिसते आहे. येथे हिंदू आणि इंग्रजी कालगणना मेळ खातात. म्हणजे, हे बांधकाम शिवकालीन नसून ब्रिटीश कालीन आहे. सुमारे १६९-१७० वर्षांपूर्वीचे. गुरू नानक पंढरपुरात येऊन गेले होते. ते संत नामदेवांना गुरूस्थानी मानत. पंढरपुरांत शिखांचे प्रस्थ होते का/ आहे का? तसे असल्यास कोणा शिखाच्या कृपेने हा पूल बांधला गेला असावा असे वाटते. पहिल्या चित्रातील शिलालेख नक्की देवनागरीत आहे. मी अद्याप लक्ष देऊन वाचला नाही. वेळ झाला की वाचते परंतु त्यात पैशांबद्दल काहीतरी लिहिल्यासारखे वाटले. बहुधा बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या पैशांचा जमा खर्च असावा. अवांतरः त्यावर बहुधा "मुक्क्कामः हैदराबाद" असे देवनागरीत लिहिणार्‍याने ते मागाहून खरडलेले दिसते. चू. भू. दे. घे. * सरकारी बाबींबद्दल तयार केलेले शिलालेख प्रजेने वाचण्यासाठी राज्यातील सर्व प्रमुख भाषांत कोरण्याचा प्रघात होता.

छोटा डॉन 13/07/2008 - 22:45
हे शिलालेख पंढरपुरच्या [ विठ्ठलाचे गाव ] एका भागात असलेल्या गोपाळपुरात "श्री गोपाळाकॄष्णाच्या मदिरातले व त्याच्या आसपासच्या " परिसरातले " आहेत. काळ नक्की माहित नाही पण अंदाजे "शिवकालीन वा जस्ट त्याच्या नंतरचे" असावेत ... अंदाजे मजकुर त्याच्या "बांधणी, कुणी बांधले, राजाचे नाव " वगैरे असावा पण नक्की माहित नाही .... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

प्रियाली 14/07/2008 - 04:11
मला सुस्पष्ट वाचता आला नाही. :( श्री गोपालकृष्ण मंदिराच्या संबंधात पैशांची व्यवस्था कशी झाली त्याबद्दल आहे. पैसे खर्च केल्याने मंदिराचे बांधकाम झाले तत्सम काहीतरी सांगणारा शिलालेख आहे. इतरा कोणाला वाचता आला तर उत्तम आहे.

आंबोळी 14/07/2008 - 14:46
शिलालेख : १ श्री गोपालकृष्ण प्रसन्न श्री गोपालकृष्णाची ही निक डीची बांधनुक श्री जनाबाई -- शास : जो पैसा घेतात त्या पैशाचे देवस्थान खर्च जावुन : जे पैसे वुरले : ते हे काम केले : ग्राम स्त गुरव यानि केले: खर्च -- जेषृ--सके (लाल अक्षरे हा अंदाज आहे) आंबोळी

छोटा डॉन 14/07/2008 - 14:57
ह्या देवळाचे सर्व हक्क सध्या "गुरवांकडे" असतात, त्या अनुषंगाने त्यांचा उल्लेख असणे चुकीच नसावे ... त्या मंदिरच्या आवारात "जनाबाईचे मंदिर" पण आहे ... त्यामुळे ते ही बरोबर .. बाकी पहिली जी लिपी आहे ती "अरबी" असावी ... दुसरी "कन्नड व तमिळ" नक्कीच नाही, त्यामुळे तेलगु असणे शक्य आहे ... >>पंढरपुरांत शिखांचे प्रस्थ होते का/ आहे का? तसे असल्यास कोणा शिखाच्या कृपेने हा पूल बांधला गेला असावा असे >>वाटते. नाही, असे कधीच नव्हते ... शिख अगदी औषधाला म्हटला तरी शोधावा लागेल ... >>तसेच पूल बांधण्याचा काळ विक्रम संवत्सर १८९६ , शालिवाहन शके १७६१ दिसत असून राजा नानकबक्ष बहादूर याने >>पूलाचे बांधकाम केले असे वाचता येत आहे. इंग्रजीतील साल ए.डी. १८३९ दिसते आहे. हे पण बरोबर, पुल फार फार तर १५०-२०० वर्षे जुना असु शकतो ... आत्ता वापरात नाही पण ५ वर्षापुर्वी पर्यंत वापरत होते ... "शिवकालीन" असणे शक्य नाही ... मंदिर पण जास्त जुने नसावे, मी नक्की माहिती "उद्या" सांगतो विचारुन .... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

मला आमच्या गावात असलेल्या एका "गोपाळकॄष्णाच्या मंदिराच्या भिंतीवर" व त्याखाली असलेल्या एका पुलाच्या भिंतीवर काही "शिलालेख" दिसले. त्याचा अर्थ जाणुन घेण्याची उत्सुकता असल्याने आम्ही तेथेच काही ठिकाणी चौकशी केली पण ती "लिपी वाचण्यास व त्याचा अर्थ" सांगण्यास समर्थ अशी व्यक्ती मला सापडली नाही. मिपाच्या टॅलेंटचा वापर करुन घेण्यासाठी मी व माझ्या मित्राने त्याचे काही "फोटो" काढले आहेत. ते आता खाली "चिटकवतो " आहे. कॄपया त्याचा अभ्यास करुन मला त्याचा अर्थ लावण्यास मदत करावी .... कॄपया पहा आणि बघा काही उमजते का ? आपल्या इथल्या "प्रियालीताई, विजुभाऊ, मुक्तसुनीत, चतुरंग, तात्या, विकासराव " सारख्या जाणका

पडू आजारी

श्रीकृष्ण सामंत ·
निरोगी मौज पडू आजारी मौज हीच वाटे भारी सेवा करणार्‍या व्यक्तीचे कष्ट मात्र वाढतात भारी स्वतःची कामे ऊरकून रुग्ण सेवा नशिबी सारी मौजच असेल करायची जरी सर्वांनी मिळूनी आहे एक गुरुकिल्ली घ्यावी सर्वांनी समजूनी खाणे,पिणे अन जेवण्याची असावी हेल्धी स्टाईल व्यायामाची संवय ठेवून म्हणावे असाच दिवस जाईल विश्रांतीची आवशक्यता विसरून कसे चालेल करून हे एव्हडे सारे कुणी पडे आजारी सेवेचे कर्तव्य वाटे न्यारे श्रीकृष्ण सामंत

नास्तिक!

पिवळा डांबिस ·

विसोबा खेचर 13/07/2008 - 09:31
वा डांबिसा, अतिशय सुंदर व मनमोकळं प्रकटन रे! वाचून मस्त वाटलं! जियो...! मुंग्यांच्या वारूळावर कुणी फ्लीट फवारल्यावर मरणार्‍या मुंग्या, आणि या अनंत विश्वाच्या पसार्‍यात मरणारा मी याच्यात त्याच्या दृष्टीने काहीच फरक नाही..... अगदी खरं! पण आपण प्रत्यक्षात एकाकीच असतो! एकटेच जगतो आणि निघायची वेळ झाली की एकटेच निघून जातो!! अगदी खरं! अरे म्हणून तर मी आजपर्यंत लग्न केलेलं नाहीये! साला, आपण कुणाच्यात अन् आपल्यात कुणी गुंतून राहायला नको! बस! कोण नाय पायजेल! ;) इष्ट्मित्रांसाठी आपल्या तेराव्याच्या मिष्टान्नाची सोय करून.... हा हा हा! हे बाकी सही बोल्लास रे डांबिसा... :) नसेल माझा कोणत्याही दैवतावर विश्वास! नसेन मी कुणाचाही भक्त!! पण ही गणेशाची मूर्ती तर भावते ना मला? या गणेशमूर्तीचा चाहता तर आहे ना मी? मग त्याचा मित्र बनायला तर काय हरकत आहे? वा! अतिशय सुरेख विचार..! शेवटी, 'रूप पाहता लोचनी...' हेच खरं! तो पंढरीचा काळ्या असा रुपाने भुलवण्यातच माहीर आहे. काय असेल ते असो, आम्ही त्याच्या त्या कर कटावरी ठेवून विटेवरी उभ्या असलेल्या रुपाचेच चाहते आहोत! :) वा! डांबिसा, खूप छान आणि मनमोकळं वाचायला मिळालं रे! आषाढीच्या पूर्वसंध्येला वास्तव आणि भक्ति यांच्यात उत्तम समन्वय साधणारं काही चांगलं वाचायला मिळालं! मनापासून आभार... :) आपला, (भक्तवत्सल) तात्या.

हेरंब 13/07/2008 - 09:42
माझे विचार बरेचसे आपल्यासारखेच आहेत. पण मला असे वाटते की कोणाला जर या (काल्पनिक)आधाराची जरुर असेल तर तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. शेवटी मनःशांती मिळवणे हे महत्वाचे, ती कशी मिळवावी ते प्रत्येकजण मिळवायचा प्रयत्न करतो. एक मात्र नक्की, ह्याचा सार्वजनिक आविष्कार हा शांतिप्रिय नागरिकांना त्रासदायक ठरु शकतो. कधी कधी असे वाटते की ,बरीचशी माणसे यांत गुंतलेली आहेत तेच बरे आहे. ते सर्वजण जर नास्तिक होऊन प्रत्येक गोष्ट , शास्त्रीय कसोटीवर तपासून पाहू लागले तर अनेक लोकांच्या पोटावर पाय येईल . तसेच देवाच्या भीतीने का होईना, जे आज चांगले वागायचा प्रयत्न करत आहेत त्यांचे प्रमाण कमी होईल आणि गुंडगिरी, हिंसा ही अधिकच वाढेल.

मुक्तसुनीत 13/07/2008 - 09:52
डांबिस खान , लेख नेहमीप्रमाणे आवडला. त्यातला थेटपणा तर भिडलाच , पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे , याबाबतीत स्वतःच्या भूमिकेपलिकडे उत्तरे अस्तित्वात असणे शक्य आहे, किंबहुना हे सर्व लिखाणच एक मुक्त चिंतन आहे , ही जाणीव विशेष वाटली. नाहीतर अशा विषयांमधे आपल्या विरुद्ध भूमिकेबद्दल लोक अतिशय कडवटपणे बोलतात , दुसर्‍या बाजूचे अस्तित्वच नाकारतात. हे तुम्ही टाळले आहे ; तेव्हढा विवेक नि प्रामाणिकपणा तुम्ही दाखवला आहे. जे प्रश्न उभे केलेत ते सनातन आहेत, जन्मलेल्या प्रत्येकाला कधी ना कधी , कुठल्या ना कुठल्या पातळीवर जाणवलेले आहेत. कुणी त्या प्रश्नांना डावी घालून पुढे जातात, कुणी त्यातल्या एका उत्तराचा शांतपणे स्वीकार करतात, कुणी विचार करकरून दमून थांबतात, आणि अनेक लोक ज्या बाजूचा स्वीकार करतात ती बाजू त्वेषाने मांडत रहातात. कुणी ऐलथडी किंवा पैलथडी पोचू शकतच नाहीत. मी या बाबीचा मला झेपेल इतपत कणभर विचार करतो तेव्हा मला वाटते की , देव धर्मादि संकल्पनांना आपण आपल्या तर्काच्या, विवेकाच्या आधारे नाकारूसुद्धा , पण या नकाराच्या आधी आपण जे होतो, जो लेप आपल्यावर चढला , त्याचे थरांवर थर गोळा झाले ते सगळे असे तर्काच्या एका फटकार्‍याने पुसून टाकले जाऊ शकत नाही. कुणाला एखाद्या स्तोत्रातले सौंदर्य आवडत असेल , कुणाला स्तोत्रा-मंत्रांच्या पलिकडे जी एक काही हजार वर्षांची संस्कृती खुणावत असेल. कुणाला या कर्मकांडांच्या मधे आपल्या एकेकाळच्या आप्तस्वकीयांच्या स्मृतींचा सहवास असेल. गणेशाबद्दलच्या प्रेमाचे रहस्य उलगडणे फार कठीण वाटू नये. गणेशोत्सव म्हणजे प्रिय जनांचा सहवास , कर्मकांडांच्यापलिकडे असणारा जल्लोष. खुद्द गणेशाची संकल्पना सुद्धा प्रेमात पडावी अशीच. भारतीय मन आणि हत्तीच्या प्रतिकाचे काय घट्ट नाते आहे हा मानसशास्त्रीय संशोधनाचा विषय असावा. नास्तिक्य/आस्तिक्य हे विषय गहनच. त्यातून नास्तिकाला आस्तिक्यातल्या काही गोष्टींबद्दल वाटणारी अनामिक ओढ हे तर अजूनही खोलातले पाणी. तुमचा लेख सच्चा वाटला. माझ्या दृष्टीने हा त्याच्या यशस्वितेचा मोठा भाग.

In reply to by मनिष

सहज 13/07/2008 - 13:35
पिडा काकांच्या लेखनाइतकाच मुक्तसुनीत यांचा प्रतिसादही आवडला. असेच म्हणतो. होपफुली मला ह्याच विषयावर भविष्यात मुक्तक लिहायला जमावे.

टारझन 13/07/2008 - 10:38
२ सेकंद वाटले की हा विषय मी तर नाही ना लिहीला.. आपलं मत १०१% जुळलंय पिडांकाका. मी आमच्या खानदानातला एकमेव नास्तिक. वडील रोज ३-४ आरत्या आणि गायत्री मंत्र म्हणून आजही सर्व देवांची पूजा करत असतात. त्यांनी लहानपणी बळेच ते मंत्रपठन आणि पुजापाठ करण्याचा आग्रह केला. मी त्यांना संत गाडगे बाबांचे बोल ऐकवायचो.. "देव माणसात असतो, देव्हार्‍यात नाही ! दगडाला शेंदूर फासून देवपन येत नाही. हे सत्यानारायन अन् बाकी सब झूट" मी माझ्या आई-बाबांना देव मानतो. मी परिक्षेला जाताना (आई मला देवाच्या पाया पड म्हणून आग्रह करायची) आईच्या पाया पडून जात असे. मी पक्का नास्तिक, पण कधीही कोणत्याही देवाचा अपमान करून कोणाच्या भावना दुखावण्याचा अधिकार कोणालाही नाही. वर कोणी तरी म्हटल्यामुळे, जगात नितीमत्ता कायम रहावी, देव, पापपुण्य , स्वर्ग-नर्क आणि अबोव्ह ऑल आत्मशांती यासाठी हा कंसेप्ट असावा असे वाट्टे. माणूस जेव्हा निराश होतो,त्याला काहीही सूचत नाही तेंव्हा तो देवाचा धावा करतो (अन् मी माझ्या आईचा ). डांबिस काकांनी कोणाच्याही भावना दुखणार नाहीत अशा शब्दात लिहीलंय त्यामुळेच मी त्यांचा फॅन आहे स्वगत : खविसा शिकलास का काही? कसं लिहावं ते ? नास्तिक) कुबड्या खवीस (आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. ) नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.
तू भारी ...तर जा घरी...

कोलबेर 13/07/2008 - 10:42
मला वाटतय की नास्तिक ह्याचा अर्थ 'ऍथेइस्ट' असा घेतला तर वरील विचारातुन लेखक ऍथेइस्ट वाटत नाही. हे लेखन म्हणजे 'ऍग्नॉस्टीक' (मराठी शब्द माहीत नाही!) व्यक्तिच्या मनातील घालमेल आहे. -कोलबेर

In reply to by कोलबेर

मुक्तसुनीत 13/07/2008 - 10:50
ऍग्नॉस्टिक म्हणजे गब्बरच्या भाषेत "अब कहां गोली है , कहां नही , हमें नही पता ! हमें कुछ नही पता ! " किंवा गालिबच्या भाषेत " हम जहां हैं वहांसे हमकोभी कुछ हमारी खबर नही आती !" :-)

In reply to by कोलबेर

प्रियाली 13/07/2008 - 16:50
बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर असे सांगणारी आणि इतरांच्या मते आस्तिकतेपेक्षा नास्तिकतेकडे झुकणारी मंडळी. परंतु माझ्यामते, जो पर्यंत पुरावा दिसत नाही तोपर्यंत गोष्ट आहे का नाही याबाबत ठाम न राहणारा माणूस... (माझ्यासारखा) ;) वरील स्फुट तसे नाही. ही माणसाच्या संस्काराची, शिक्षणाची, अनुभवांची एकमेकांसोबत होणारी रस्सीखेच आहे. किंबहुना, लेखकाच्या जागृत मनाची धारणा आपण नास्तिक आहोत अशी असली तरी सुप्त मनात आपण नास्तिक नाही हे जाणवल्याने झालेली घालमेल वर व्यक्त झाल्यासारखी वाटली. अशा घालमेलींची, विशेषतः गणपतीच्या बाबत होणारी कारणे माझ्यामते अशी असावीत - १. महाराष्ट्रातील गणपतीचे स्थान. घराघरांतून व्यक्त होणारी श्रद्धा आणि गणेशोत्सवाचे मोहक स्वरूप. २. आई-वडिलांचा किंवा ज्येष्ठांचा गणेशावरील विश्वास आणि लेखकाचा आई-वडिलांवरील विश्वास. ३. गणपतीचे विद्यापतीचे रूप. "विद्यार्थी लभते विद्याम्|" - कोणाही सुसंस्कृत माणसाला भावणारं स्वरूप. ४. शिक्षण, प्रवास, अनुभव आणि इतर संस्कृतींमध्ये वावरल्याने स्वतःच्या मनाची होत जाणारी ठाम धारणा वगैरे. याहूनही अधिक असावीत परंतु पिडांच्या मनोविश्लेषणाचा पुढला टप्पा पुन्हा कधीतरी. :) आता माझे ठाम मत - या जगात कोणीही नास्तिक नाही. फक्त, प्रत्येकाच्या श्रद्धा वेगवेगळ्या ठीकाणी रूजू असतात. असो, स्फुट आवडले. अतिशय प्रामाणिक वाटले.

In reply to by प्रियाली

धनंजय 14/07/2008 - 01:32
प्रत्येकाची कशावरतरी श्रद्धा असतेच. तरी माझे स्वतःविषयी धोरण आहे की श्रद्धास्थाने कमीतकमी असावीत, आणि ज्या कल्पनांविषयी अनुभवाने बदल करता येतात अशा बाकी सर्व कल्पना असाव्यात. श्रद्धास्थाने कमी करता करता जी काही इनमिनतीन श्रद्धास्थाने बुलंद राहिली आहेत त्यांच्याविषयी मी मागे एक लेख लिहिला होता (दुवा). वर चतुरंग काही लोकांची विज्ञानावर श्रद्धा असते असे म्हणतात. माझ्या मते अशी कुठलीच श्रद्धा असू नये. विज्ञानातली प्रत्येक गोष्ट तपासून बघावी. ज्या गोष्टी तपासून घेणे सोयीचे नसते, किंवा कार्यबाहुल्यामुळे वेळ नसतो, त्यांच्यावर कुठल्याही "ऐकीव माहिती" इतपतच विश्वास ठेवावा. श्रद्धा मुळीच ठेवू नये. अशी कुठली श्रद्धा ठेवली तर मनुष्याच्या बुद्धिस्वातंत्र्याची हानी तर होतेच, पण विज्ञानाच्या मुळावरच घाव होतो. "बल", "अवकाश", "काळ" यांच्यासारख्या कल्पनांवरही फाजिल श्रद्धा ठेवू नये याविषयी मी अन्यत्र चर्चा केलेली आहे. (बल - दुवा१, दुवा२; काळ-अवकाश)

In reply to by धनंजय

विसोबा खेचर 14/07/2008 - 02:19
तरी माझे स्वतःविषयी धोरण आहे की श्रद्धास्थाने कमीतकमी असावीत, असहमत आहे...! आणि ज्या कल्पनांविषयी अनुभवाने बदल करता येतात अशा बाकी सर्व कल्पना असाव्यात. श्रद्धास्थाने असल्याशिवाय कल्पनाविश्वदेखील समृद्ध होत नाही/होणार नाही! आणि आपण अनुभवाने बदल करता येण्याबद्दल म्हणताय परंतु श्रद्धास्थानांशिवाय अधिकाधिक अनुभव कसा येणार? अनुभूती कशी येणार? मी संगीतक्षेत्राबद्दल, विशेष करून ख्यालगायकीबद्दल बोलतो आहे! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

धनंजय 14/07/2008 - 05:21
> मी संगीतक्षेत्राबद्दल, विशेष करून ख्यालगायकीबद्दल बोलतो आहे! इथे गुरूकडून ख्यालगायकी आदराने शिकावी असे म्हणत आहात ना? अर्थातच तुमच्याशी सहमत आहे. कदाचित "अढळ श्रद्धास्थाने कमी असावी" असे मला म्हणायचे आहे. "अढळ" म्हणजे अनुभवानेही जी कल्पना बदलणार नाही. जसे तुम्ही मागे मला उदाहरण दिले होते - भीमसेनांनी (म्हणजे त्याआधी खांसाहेबांनी) शंकर्‍यात कधी तीव्र मध्यम लावलेला आहे. पण तुम्ही तुमच्या प्रथम गुरूंकडून असे शिकला होता की शंकर्‍यात मध्यम वर्ज्य म्हणजे वर्ज्य! पण खांसाहेबांनी अधिकाराने लावलेला तो मध्यम अनुभवला की त्याला "चूक" म्हणायची कोणाची टाप आहे? आता या उदाहरणाला तुम्ही श्रद्धा म्हणता की अनुभव हे मला माहीत नाही. पण त्या अनुभवानंतर "शंकर्‍यात मध्यम वर्ज्य म्हणजे वर्ज्य!" ही तुमच्या प्रथम गुरूकडून मिळवलेली श्रद्धा अढळ राहात नाही. अनुभवाने त्या श्रद्धेत बारीकसारीक दुरुस्ती होते : "खानसाहेबांच्या परंपरेत शिकलेला अधिकारी माणूस मध्यम लावू शकतो, त्यास चूक म्हणू नये." अशा प्रकारे तुमचे प्रथम संगीत-गुरू हे अढळ श्रद्धास्थान न राहाता एक आदरणीय मार्गदर्शक श्रद्धास्थान राहाते. "आता तानपुर्‍याला षड्ज तरी लावावाच" हे तत्त्व अढळ आहे. आणि लावला तर पंचम नेमका "असा म्हणजे असाच" ऐकू येतो, हे तत्त्व अढळ आहे. पण माझ्यासारख्या "संगीत-ढ" माणसाच्या कानाला जर घसरलेला पंचम खटकत असेल, तर हे अनुभवाने तपासल्यामुळे अढळ (श्रद्धेमुळे नव्हे) तत्त्व मानण्यास हरकत नाही. स्वगत : धनंजयने या विषयावर बोलू नये. त्या कुठल्याशा रेकॉर्डिंगमध्ये "अरे, हे तर काहीतरी मस्त आणि वेगळे" इतकेच अंधूक जाणवले होते. कोणीतरी "वेगळे काय - मध्यम लावला आहे" असे सांगेपर्यंत काय अचाट घडले त्याचा धनंजयला गंध नव्हता. पण तात्यांनीच ही मध्यमाची माहिती दिली आहे, त्यांच्यावर तेवढीतरी "श्रद्धा" ठेव, आणि दे उदाहरण ठोकून! केवळ षड्ज-पंचम लावता येणार्‍या बाळबोध अशिक्षित कानाबद्दल सांगून धनंजयने आपले संगीत-अज्ञान जगजाहीर केलेलेच आहे.

In reply to by धनंजय

चतुरंग 14/07/2008 - 02:47
मी विज्ञानावर श्रद्धा असते असे म्हटले ह्याचा अर्थ विज्ञान जी नजर देते, अनुभवाचा उहापोह करण्याची, शक्याशक्यतांचे निराकरण करण्याची, विश्लेषक आणि तर्काची नजर देते त्यावर श्रद्धा असावी. पण त्याचा अर्थ गोष्टी तपासू नयेत असा होत नाही. नाहीतर ती अंधश्रद्धा ठरते. संगीत शिकताना गुरुवर श्रद्धा ठेवणे/असणे हे शिष्याचे काम असते त्याशिवाय शिक्षण शक्य नाही पण ह्याचा अर्थ गुरुचे ज्ञान तपासून बघूच नये असा अजिबात नाही कारण त्याशिवाय फक्त शिक्षण होईल प्रगती नाही. ते ज्ञान तपासून बघण्याची पात्रता येण्यासाठी मूळ ज्ञान हे श्रद्धेनेच घ्यावे लागते. न्यूटनचे नियम तोकडे आहेत हे ठरवण्यापूर्वी आइनस्टाईनला ते श्रद्धापूर्वक समजावून घ्यावेच लागले असणार त्याशिवाय ते कुठे तोकडे आहेत हे कसे कळणार. 'श्रद्धेने बुद्धिस्वातंत्र्याची हानी होते' आणि 'श्रद्धेने विज्ञानाच्या मुळावर घाव बसतो' ही आपले विधाने धाडसी आहे असे मी म्हणेन. आपण दिलेल्या दुव्यांवरील लेख मी वाचलेत. सर्व लेख अभ्यासपूर्ण आहेत. श्रद्धा आणि फाजील श्रद्धा (अंधश्रद्धा) ह्यात फरक आहे. बहुतेक कल्पनांवर आपण श्रद्धा ठेवूनच पुढे जातो, प्रत्येक गोष्टीला 'ऐकीव माहिती' असे समजून पुढे जाता येत नाही. आपल्या आयुष्यात आपण अशा किती कल्पना तपासून पाहू शकतो हा स्वत:लाच विचारण्याचा प्रश्न ठरु शकेल. जसजसे ज्ञानाचे, विचारांचे क्षितिज विस्तारत जाते तसतशा आधी बाळगलेल्या श्रद्धा मागे पडत जातात नव्या पुढे येतात हे आयुष्यभर चालू असते. श्रद्धास्थानांचे बुलंद असणे/नसणे हे ही व्यक्तिसापेक्ष असू शकते. चतुरंग

In reply to by चतुरंग

धनंजय 14/07/2008 - 04:30
कदाचित त्याच कल्पनेसाठी आपण दोन वेगवेगळे शब्द वापरत आहोत. ज्याला तुम्ही "श्रद्धा" म्हणत आहात (म्हणजे न्यूटनचे म्हणणे गुरूकडून समजावून घेण्यापूर्वीची मनःस्थिती) त्यालाच मी "माहिती ऐकून घेणे" असे म्हणतो आहे. "ऐकीव माहिती" या माझ्या शब्दप्रयोगात कुठलाही अपमान किंवा कमीपणा दडलेला नाही. ऐकीव माहिती आणि पटलेली माहिती या दोहोंमध्ये हा फरक - नंतर दुसरे काही ऐकले तर आधीची ऐकीव माहिती बदलण्यास आपण तयार असतो. पटलेली माहिती बदलण्यास आपला तर्क चुकला हे कळावे लागते. (तिसरा प्रकार म्हणजे माझ्या ज्या थोड्या श्रद्धा आहेत, त्या बदलण्यास मी तयारच नाही. त्याही कोण्या गुरूंकडूनच मिळाल्या आहेत.) "श्रद्धा असू नये" म्हणजे गुरूबद्दल अपमानास्पद भावना असावी असे माझे मुळीच मत नाही. गुरूबद्दल आदरच असावा. बालवाडीपासून अगदी कालपर्यंत वेगवेगळ्या गुरूंनी शिकवलेले असंख्य तपशील मी आजतागायत तपासून स्वतःला पटवून घेतलेले नाहीत. पण या वेगवेगळ्या गुरूंची काहीकाही वचने परस्परविरोधी आहे. तरी त्या सर्वांचे म्हणणे मी आदराने ऐकून घेतो (यालाच तुम्ही "श्रद्धेने शिकतो" असे म्हणत आहात का?) आणि कुठेतरी स्मरणात ठेवतो. इतकेच काय, सोयीचे असल्यास आचरणात आणतो. पण जोवर तपासून पटत नाही तोवर ही ऐकीव माहिती आहे, वाटल्यास पुढे कल्पनेत बदल होईल, असेच मानतो. अनोळखी गावात गेलो, की कधी पानठेल्यावर विचारतो - अमुक गल्ली कुठे आहे, आणि ठेलेवाला सांगतो "अमुक खूण बघा, तमुक दिशेने वळा..." तसा अमुक खूण शोधतो तमुक दिशेने वळतो, - यालाच तुम्ही श्रद्धा म्हणत आहात का? मी याला ऐकीव माहिती म्हणतो - कारण पुन्हा पुढच्या नाक्यावर पत्ता विचारून मत बदलायला मी तयार असतो. शालेय शिक्षण हे याच प्रकारचे असते. एक गुरू जे सांगतो ते ऐकायचे, लक्षात ठेवायचे (अमुक खूण बघ, तमुक दिशेने वळ) - पण पटेपर्यंत पुढचा कुठला गुरू दुसरे काही सांगेल तर तेही आत्मसात करायची तयारी असते. यालाच तुम्ही श्रद्धा म्हणत असाल तर मग आपण एकाच वस्तूबद्दल दोन वेगवेगळे शब्द वापरत आहोत. माझ्या दृष्टीने अशा काही कल्पना आहेत, ज्या मी तपासण्याआधीच "बदलणार नाही" असे ठाम सांगतो - उदाहरणार्थ "माझ्यावेगळे अन्य विचारी लोक आहेत". (म्हणजे जर कोणी मला सांगितले की चतुरंगच काय सर्व-सर्व लोक माझ्या स्वप्नातल्या बाहुल्या आहेत, तर ते मी मुळीच मानणार नाही, ऐकूनच घेणार नाही. हां - अमुक एक आयडी स्वप्नातली बाहुली आहे, असे ऐकून घेण्यास तयार आहे.) त्या कल्पना "बदलणार नाही" असे मी ठाम म्हणत असल्यामुळे त्यांना ऐकीव माहितीपेक्षा वेगळे नाव देणे मला सोयीचे आहे. मी त्याला गृहीतक, ठाम पूर्वग्रह, किंवा श्रद्धा असे म्हणतो. पण तुम्हाला जर "गुरुबद्दल आदर" या कल्पनेला "श्रद्धा" असे नाव द्यायचे असेल तर माझी काही ना नाही. तसे असल्यास मला माझ्या प्रत्येक गुरूबद्दल आदर/श्रद्धा आहे, आणि पत्ता सांगणार्‍या पानवाल्याबद्दलही आदर/श्रद्धा आहे. हा त्या "श्रद्धा" शब्दाचा सुळसुळाट आहे, आणि तो शब्द फारच गुळगुळीत/संदिग्ध होतो आहे, असे राहूनराहून वाटते.

In reply to by धनंजय

चतुरंग 14/07/2008 - 08:41
श्रद्धा ह्या संकल्पनेचा थोडा विपर्यास होतो आहे. पानवाल्याला पत्ता विचारणे ह्यातून मिळणारी माहिती आणि एखाद्या गुरुकडून मिळणारे एखाद्या विषयातले ज्ञान ह्यांच्या पातळीतच फरक आहे असे तुम्हाला वाटत नाही का? २५ यार्डांच्या तलावात पोहोणे आणि इंग्लिश खाडी पोहून जाणे - दोन्हीही पोहोणेच आहे पण दोन्हीच्या पातळीत फरक आहे तसेच काहीसे. पानवाल्याच्या ठिकाणी माहीती ही फक्त माहिती (इन्फर्मेशन) असते. गुरुकडून मिळवायचे ते ज्ञान असते (नॉलेज) आणि त्याठिकाणी श्रद्धेचा संबंध येतो. गुरुने सांगितलेल्या कल्पना तुम्ही ऐकता. शंका उत्पन्न होतात. काहींचे निरसन होते काहींचे नाही. पण सुरुवातीपासूनच मी फक्त माहिती म्हणूनच ऐकत आहे मी श्रद्धा ठेवून ऐकत नाही हा ज्ञानमार्गातला अडथळा आहे असे मला वाटते. श्रद्धेचा संबंध मनाशी जास्त आहे. मनावर बुद्धीचा अंकुश असेल तर श्रद्धा ही अंधश्रद्धा होण्यापासून वाचते. कारण श्रद्धा असूनही बुद्धी ही शंका विचारायला/प्रश्न उपस्थित करायला कचरत नाही. त्यामुळे पहिल्यांदा श्रद्धेने ऐकलेल्या कल्पना नंतर नवीन ज्ञानामुळे बदलायला बुद्धी मनाला तयार करते आणि नवीन श्रद्धा तयार होते. एवढा फरक सोडला तर सर्वसाधारणपणे आपण दोघेही एकाच संकल्पनेसाठी ही चर्चा करीत आहोत. चतुरंग

In reply to by चतुरंग

विसोबा खेचर 14/07/2008 - 09:09
माझ्या मते श्रद्धेशिवाय या दुनीयेत काहीही करणे अशक्य आहे! आणि जर ठाम श्रद्धा मनी असेल तर मानवाला काहीही करणे शक्य आहे! अशी अक्षरश: अनेक व्यक्तिंची उदाहरणे देता येतील. श्रद्धेविना सर्व काही व्यर्थ आहे असं माझं मत आहे! मी अर्थातच डोळस श्रद्धेविषयी बोलतो आहे! आपला, (श्रद्धाळू) तात्या.

In reply to by चतुरंग

राघव 10/09/2008 - 12:00
चतुरंग, आपले विचार आवडलेत. पण सुरुवातीपासूनच मी फक्त माहिती म्हणूनच ऐकत आहे मी श्रद्धा ठेवून ऐकत नाही हा ज्ञानमार्गातला अडथळा आहे असे मला वाटते. योग्य निष्कर्ष. श्रीमहाराजांनी म्हटलेले आठवले - नामस्मरण करतांना अनेक शंका येतात. विश्वासाने मनापासून नाम घेत चलावे. हळुहळू शंकांची उत्तरे मिळून त्या दूर होत जातील. आता श्रद्धा नसेल तर वरीलप्रमाणे वागणे अशक्य आहे. पिडांकाका, स्फुट खूप छान. आवडले. मुमुक्षू

In reply to by प्रियाली

कोलबेर 14/07/2008 - 02:00
देव आहे की नाही ह्याचे ठोस उत्तर/सबळ पुरावा अजुन कुणालाच माहित नाही. ज्याला देव नसण्यापेक्षा देव असण्याची शक्यता अधिक वाटते तो आस्तिक/सश्रद्ध/भाविक बनतो. ज्याला दोन्हीपैकी कोणतीही बाजू सत्य असण्याची ५०-५० शक्यता वाटते ती व्यक्ती ऍग्नॉस्टिक असते (ह्यात देखिल देव नसण्याची/ असण्याची शक्यता किंचीत अधिक वाटते असे ऍग्नॉस्टिक देखिल आले.) नास्तिक माणूस म्हणजे जो देव ही संकल्पना अस्तित्वात असण्याची शक्यता इतकी कमी मानतो की आपले आयुष्य 'देव अस्तित्वात नाही' ह्या ऍझम्प्शन वरतीच घालवू इच्छीतो. देव ही शक्यता नसून देव आहे मला माहित झाले आहे/किंवा देव अजिबात नाही मला माहित आहे ही दोन्ही अतिरेकी टोके देखिल दिसुन येतात पण बहुसंख्येने सुजाण लोक हे ह्या दोन्ही टोकांच्या मध्ये असतात. नास्तिक म्हणजे ज्याची देव ह्या संकल्पनेवर श्रद्धा/विश्वास नाही तो. 'मी कधी ना कधी तरी लॉटरी जिंकेनच' ह्यावर श्रद्धा ठेवुन रोज लॉटरीची तिकिटे काढणारा माणूस त्याच्या ह्या श्रद्धेपायी आस्तिक ठरत नाही.

धनंजय 13/07/2008 - 10:57
"सुखकर्ता दुखहर्ता" एक सांस्कृतिक वारसा आहे - त्यामुळे आरती म्हणताना लोकांत सामिल व्हायला मला आवडते. बाकी ज्या वागणुकीने भावना, वेळ, पैसा, खर्च होणार असतो; किंवा अन्य लोकांचा वेळ आणि पैसा खर्च होणार असतो, त्या वागणुकीच्या बाबतीत मी शक्यतोवर अनुभवजन्य ठोकताळे वापरतो.

In reply to by धनंजय

तसा मी ठार नास्तिक आहे. पण "'सुखकर्ता दुखहर्ता' एक सांस्कृतिक वारसा आहे - त्यामुळे आरती म्हणताना लोकांत सामिल व्हायला" मलाही आवडते. रिचर्ड डॉकिन्जच्या धर्तीवर मला सांस्कृतिक हिंदू (कल्चरल हिंदू) म्हणता येईल आहे.

वा ड्यांबिस काय भारी मुक्तक आहे (धनंजयाची शब्दरचना अगदी चपखल असते) मी आणि माझा देव आठवला . हे मुक्तक अतिशय प्रातिनिधिक आहे. अंधश्रद्धा निर्मुलन समिती कडे येणार्‍या कार्यकर्ता च्या मनात असेच प्रश्न असतात. 'मी खोटे बोलणार नाही कारण ते माझ्या देवाला आवडणार नाही' असे म्हणणारा ईश्वरनिष्ठ सश्रद्ध आणि 'मी खोटे बोलणार नाही कारण माझ्या सद्सदविवेक विवेक बुद्धीला ते पटत नाही' असे म्हणणारा अश्रद्ध हे मला एकाच पातळीचे वाटतात. प्रकाश घाटपांडे

पिडां, लेख आवडला. तुमची घालमेल तुम्ही समर्थ पणे व्यक्त केली आहे. मला वाटते तुमची अवस्था पुलं सारखी आहे. ते सुद्धा नास्तिक (की ऍग्नोस्टीक म्हणू?) होते पण अतिशय भाविक / श्रद्धाळू होते. मला वाटतं श्रद्धा हा मनाचा मूळ पिंड असावा लागतो. आणि आपल्या भारतिय समूह मनाला तो वारसा जबरदस्त आहे. बिपिन.

चतुरंग 13/07/2008 - 18:20
आधुनिक विज्ञानाच्या अंगाने जाणारी तर्काची दिशा (विज्ञानावरील श्रद्धा असेही म्हणता येईल) आणि पूर्वापार चालत आलेल्या आस्तिकतेतला हा संघर्ष आहे. आपण देव मानत नाही कारण त्याच्या अस्तित्त्वाचा अजून कोणताही सबळ पुरावा नाही आणि त्याचवेळी देवाचा पुरावा मिळाला तर आपण ती गोष्ट कशी स्वीकारु ह्याबाबत मनाची घालमेल आहे. कोणत्याही मोठ्या परीक्षेचा निकाल लागायच्या आधी मनाची जशी अवस्था असेल तशीच ही आहे असे मला वाटते. अमूक गुण मिळाले तर तमूक करियर निवडूया, असे झाले तर तसे करुया, तसे नाहीच झाले तर दुसरा पर्याय स्वीकारावा लागेल अशी जी अनिश्चितता असते तसे. त्या अनिश्चिततेचा अंत रिझल्ट लागल्यावर होतो इथे थेवटपर्यंत कोणताही 'रिझल्ट' लागत नाही म्हणून आपण ही अनिश्चितता घेऊनच पुढे जात असतो, व्होकेशनल कोर्स घेऊन पुढे जावे तसे! दुसर्‍या कोणाचे लागलेले 'रिझल्ट' कितीही खात्री देणारे असले तरी ते आपले नसतात त्यामुळे त्यावर सर्वस्वी अवलंबून रहाणे पटत नाही म्हणजे पुन्हा अनिश्चितताच. मनाचे समाधान मग आपण वेगवेगळ्या गोष्टीत शोधत रहातो. पिडाकाका तुमची घालमेल तुम्ही योग्य शब्दात पकडलीत, ती मोकळेपणाने मांडलीत त्यातही विचार लादण्याचा अभिनिवेष न ठेवता, त्यामुळे हे विचार वाचनीय झालेत. तुमच्या मतांचा थेटपणा ह्या मुक्तकातून पोचला. सुंदर लेखाबद्दल तुमचे अभिनंदन आणि तुमच्या 'रिझल्ट' साठी आमच्या शुभेच्छा!! चतुरंग

In reply to by चतुरंग

प्राजु 13/07/2008 - 20:47
पण जर ईश्वर असेलच तर तो एखाद्या मूर्तीच्या स्वरूपात तर नक्कीच असणार नाही. ती एक अमूर्त ऍबस्ट्रॅक्ट पॉवर असेल....... हेच माझेही मत आहे. तुमच्या प्रामाणिक लेखनाइतकाच चतुरंग यांचं विश्लेषणही आवडलं. देव.. हि खरी तर एक संकल्पना आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो श्रद्धेचा भाग आहे. माणसाला मानसिक शांतता जिथे लाभते तिथे त्याची श्रद्धा जडते. म्हणजे आता खविस म्हणतो त्याप्रमाणे गाडगेबाबांना समाजसेवेमध्ये मनःशांती मिळत होती म्हणून त्यावर त्यांची श्रद्धा होती.. तर संत तुकाराम महराजांना विठ्ठलाच्या नामःस्मरणात मानसिक समाधान लाभत होतं त्यामुळे त्यांची विठ्ठलावर श्रद्धा होती. जे दिसतं ते शाश्वत आणि जे दिसत नाही त्याचं अस्तित्व न पटणारं.. एखाद्या शास्त्रज्ञ असा विचार करू शकेल कारण त्याची शास्त्रावरची श्रद्धा! पण निसर्गात खरंतर निसर्गच... हि एक अशी अद्भुत शक्ती आहे..की, काही गोष्टींना 'का?' चं उत्तर नाही. आणि माझ्यामते "निसर्गच देव आहे." आणि आपण जिथे वावरतो तोच निसर्ग असल्यामुळे सगळीकडेच देव आहे. आणि या अद्भुत शक्तीला एक रूप देण्याचा किंवा... या शक्तीवर विश्वास ठेवावा म्हणूनही असेल कदाचित याला एक रूप दिलं गेलं .. त्याला एका गोंडस स्वरूपात लोकांना आवडणार्‍या, भावणार्‍या रूपांत पुराण कर्त्यांनी सादर केलं.. आणि ते रूप म्हणजे मूर्ती.. मग ती गणरायची असो.. विठ्ठलाची असो वा आणखी कुणाची. संत ज्ञानेश्वरांनी विश्वात्मक देवाची प्रार्थना करण्याचा, त्याची उपासना करण्याचा उपदेश केला तो यामुळेच असेल कदाचित. त्यांनीही विश्वालाच देव मानलं.. या विश्वात्मक देवाकडे त्यांनी सर्व लोकांसाठी प्रार्थना केली.. सर्व लोकांच्या साठी पसायदान म्हणजे प्रसादाचं दान मागितलं...स्वतःसाठी काहिही न मागता...! आणि म्हणून संत ज्ञानेश्वर हे परमेश्वर रूप मानले जातात असं मला वाटतं. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

ऋषिकेश 13/07/2008 - 21:31
वा प्राजूताई!,
निसर्गच देव आहे
याच आधारावरतर इतिहासात अनेक संस्कृत्या उदयाला आल्या आणि हल्लीच्या निसर्ग-अधःपतनाच्या काळात/युगात हा विचार सगळ्यांमधे रुजला तर कीती प्रश्न सुटतील. असा विचार तुम्ही बाळगता याचा मनोमन आनंद झाला :) -('मिसळ'लेला) ऋषिकेश

मुक्तक आवड्ले. वय पन्नाशीच्या पुढे सरकायला लागल्यावर असे साक्षात्कार व्हायला लागतात. आपल्या लेखनावर टिका करतोय असे कृपया समजू नका. आयुष्याच्या आणि वयाच्या काही अनुभवानंतर विचारांशी मतभेद होतात आणि आपण कशाला तरी सत्य मानून बसतो. . तेव्हा असे काही सूचणे अपरिहार्य आहे. या विषयावर अनादि काळापासून चिंतन चालले आहे. आपल्या मुक्तकाचे जराही आश्चर्य वाटले नाही. उलट ते वाचायला आवडलेच. आपण आपली सुख दु:खे हीच सत्य मानतो. कारण तो आपला जागृतीतला अनुभव असतो. ज्याचा अनुभव घेता येत नाही. ज्याचा आपला जीवनात कोणताच सहभाग नाही. अशा कोणत्याही गोष्टीला आपण मानन्यास तयार नसतो. इतिहासातील काही सोयीच्या गोष्टींना आपण आपल्या जगण्याशी जोडून पाहतो. आणि काही एका निकषाला येतो. दु:खातिरेकाने व अनेक संकटाच्या दडपणाखाली चेंगरुन गेलेला अत्यंत विचारी मनुष्य देखील अधिक नास्तिकडे झुकतो . त्याला एक अचेतन शक्ती, वगैरे कल्पना थोतांड वाटतात. झाडावरुन फळ खाली पडणं ही काही मोठी अपरुप गोष्ट नाही. आपल्यापैकी कितीतरी जणांनी ती घटना बघितलेली असते. परंतु त्या पडत्या फळाचा संदेश, त्या पडण्याचा अर्थ समजून घेण्यासाठी कोणता तरी साक्षात्कार होण्याची गरज असते किंवा सर एझॅक न्युटनची असामान्य अशी शास्त्रीय प्रतिभा असावी लागते. या पैकी ज्याने त्याने ठरवावे फळ पडण्याचा अर्थ कसा घ्यायचा ते !!!!

देवदत्त 13/07/2008 - 21:49
छान आहेत विचार. या जगात आपण एकटेच असतो! इथे आल्यानंतर आपल्या मानसिक सुरक्षिततेसाठी नातेसंबंध बांधतो, आई, बाप, भाऊ बहीण, बायको, पोरं, मित्र वगैरे..... मी पूर्णत: सहमत. ईश्वराचं अस्तित्व मी नाकारीत नाही, पण मला स्वतःला अनुभव आल्याखेरीज मी त्यावर विश्वास ठेवणार नाही...... आणि जो मला त्याच्या अनुभव देऊ शकत नाही त्याला मी संत वा महात्मा मानू शकत नाही, मग तो वाटेल ती बडबड करीत असो....... माझेही हेच म्हणणे आहे :)

राजेश 14/07/2008 - 07:19
>>पण निसर्गात खरंतर निसर्गच... हि एक अशी अद्भुत शक्ती आहे..की, काही गोष्टींना 'का?' चं उत्तर नाही. आणि माझ्यामते "निसर्गच देव आहे. खर आहे. यालाच म.फुल्यांनी "निर्मिक" असा सुंदर शब्द वापरलाय. (नास्तिक)राजेश

विकास 14/07/2008 - 17:10
लेख आणि त्यातील विचार आवडले...त्यांच्याशी सहमत आहे आणि तरी देखील देवाला आणि त्याच्या मूर्त स्वरूपाला मी मनापासून मानतो - त्यात कुठेही अंधश्रद्धा आहे असे मला वाटत नाही... वेळे अभावी पटकन दोन गोष्टी लिहीतो: ऐकीव माहीती प्रमाणे विवेकानंदांना एकदा अमेरिकेत कोणीतरी खवचटपणे एक पुस्तक (का लेख) दाखवला त्याचे शिर्षक होते: "God is Nowhere" . ते शिर्षक दाखवत त्याने त्यांना विचारले की या बाबत आपले काय मत? विवेकानंदांनी मधे एक रेषा ओढत ते वाक्य बदलले : "God is Now Here" - आणि म्हणाले की तुम्ही तुमचेच वाक्य आता वाचा. अर्थात असे म्हणणार्‍या विवेकानंदांना भारत हा तमसातून जात असल्याने त्याने गीतेचा शोध "फूटबॉल मैदानावर" घ्यावा असे म्हणले होते! दुसरे श्रद्धास्थाना संबंधी नसले तरी पूजास्थानासंबंधी आहे. ग. दि. माडगूळकरांची खालील कविता त्या संदर्भात वाचनीय आहे.... आणि याच गदीमांच्या धाकट्या भावाची व्यंकटेश माडगूळकरांची, "एका नव्या जागृत देवस्थानाचा जन्म" ही कथा तर वाचनीयच आहे!

चित्रा 15/07/2008 - 23:56
छान लेख, आवडला. मुख्यत्वे आपले विचार दुसर्‍यावर न लादणे ही गोष्ट आवडली. अनेकदा मला स्पर्श करून जाणारे विचार आहेत. माझे लहानपण अगदी भाविक नाही, पण देव आणि कुळाचार यांनी भारलेल्या वातावरणात गेले आहे, आणि ते बालपण सुदैवाने फार छान, निसर्गाच्या जवळ असे गेले आहे. त्यामुळे सुखद आठवणी या अशा वातावरणाशी निगडित आहेत. त्यामुळे असेल, पण कोणाची श्रद्धा आणि भाविकपण यांना चटकन नावे ठेवणे मला जमत नाही. जेव्हा कसलाही अतिरेक होतो, माझेच काय ते बरोबर , तुमचे नाही असा भाव दिसतो तेव्हा तो मार्ग योग्य वाटत नाही. जर देव नाही असे समजले तर आपली रोजची अनेक आन्हिके जी आता काळाच्या ओघात आपल्याबरोबर आली आहेत त्यांना फाटा द्यावा लागेल. आणि ज्यांना ते पटते त्यांनी ते करावेही. र. धों. कर्वे यांच्याप्रमाणे एकच एक ध्यास धरून (जसे कुटुंबनियोजन) नास्तिकतेचा दुसर्‍यांच्या भावना समजून न घेता पुरस्कार करावा किंवा नाही, याबद्दल मला प्रश्न पडलेले आहेत.

प्रत्येकाच्या श्रद्धा वेगळ्या असतात पण विचार म्हणून वाचायला लेख खूप आवडला. विशेषतः मला एखादी गोष्ट दिसत नसली तरी ती असू शकते हा प्रांजळपणा आवडला. ------- अवांतर - संदीप खरेची 'नास्तिक' ही सुरेख कविता जरूर वाचा. जमल्यास मी त्या कवितेचा एखादा दुवा शोधतो. -------------------------- www.atakmatak.blogspot.com

In reply to by संदीप चित्रे

अन्या दातार 19/07/2008 - 12:57
एक अप्रतिम कविता एक खराखुरा नास्तिक जेंव्हा देवळाबाहेर थांबतो तेंव्हा खरंतर गाभार्‍यातच भर पडत असते की कोणीतरी आपल्यापुरत्या सत्याशी का होईना पण प्रामाणिकपणे चिकटून राहिल्याच्या पुण्याची एक खराखुरा नास्तिक जेंव्हा देवळाबाहेर थांबतो तेंव्हा शक्यता होते निर्माण की देवाने आपला आळस झटकून देवळाबाहेर येण्याची एक खराखुरा नास्तिक जेंव्हा देवळाबाहेर थांबतो तेंव्हा कोर्‍या नजरेने पाहत राहतो सभोवतालच्या हालचाली, भाविकांच्या नजरा कोणीतरी स्वतःचेच ओझे स्वतःच्याच पायावर सांभाळत असल्याचे समाधान लाभते देवालाच म्हणून तर एक खराखुरा नास्तिक जेंव्हा देवळाबाहेर थांबतो तेंव्हा देवाला एक भक्त कमी मिळत असेल कदाचित, पण मिळते अखंड समाधान, एक सहकारी लाभल्याचे!! देऊळ बंद झाल्यावर एक मस्त आळस देउन बाहेर ताटकळलेल्या नास्तिकाशी गप्पा मारता मारता देव म्हणतो, दर्शन देत जा अधून मधून.... तुमचा विश्वास नसेल आमच्यावर; पण आमचा आहे ना!!!!! एक खराखुरा नास्तिक जेंव्हा देवळाबाहेर थांबतो कंटाळलेल्या देवाला मोठ्या मिन्नतवारीने परत पाठवतो देवळात तेंव्हा कुठे अनंत वर्षे घेउ शकतो आपण दर्शन अस्तिकत्वाच्या भरजरी शालीत गुदमरलेल्या देवाचे...... एक खराखुरा नास्तिक जेंव्हा देवळाबाहेर थांबतो........ - संदीप खरे

In reply to by अन्या दातार

विकास 19/07/2008 - 18:33
मस्त कविता आहे! त्यावरून खोट्या अस्तिकाच्या देवळाबाहेरून जाताना नमस्कार करण्यासंदर्भातील ऐकलेल्या दोन मजेशीर ओळी आठवल्या (काव्य आठवत नाही पण आशय)... (देवाला पटकन नमस्कार केल्यासारखे करत)देवळाबाहेरून जाताना (दरवाजासमोर) थांबलो घटका दोन कारण उद्या खरच देव (असला आणि) समोर आला तर त्याने विचारू नये की "आपण कोण?"

अगोचर 19/07/2008 - 00:08
तो ( http:\\lahanpan.blogspot.com ) दिवाणखान्यात बसून चारचौघांच्या संगतीत मी जेव्हा तुझे अस्तित्व नाकारतो तेव्हा आकाशाचे एक दार किलकिले करून तू पाहतोस माझ्याकडे कौतुकाने कुतुहलानेही, आणि सगळे निघून गेल्यावर तार्याच्या अंधुक प्रकाशात तू उतरतोस माझ्या एकांतात आणि समोरच्य़ा खुर्चीत बसून म्हणतोस - अभिनन्दन तुझे विवेचन छानच होते इतके की मलाही शंका आली माझ्या अस्तित्वाची - पण तरिही मला माहीत आहे मला मानणार्यांमधे तू अग्रेसर आहेस फक्त तुझा दिवाणखाना तुझ्या काळजापासून फार दूर आहे, ईतकेच. -कुसुमाग्रज (मुक्तायन, पान ४५) http:\\lahanpan.blogspot.com

In reply to by अगोचर

मुक्तसुनीत 19/07/2008 - 00:15
कुसुमाग्रजांच्या कवितेतून बुद्धी आणि भावना यांच्यातली आस्तिकतेबद्दलची तगमग उत्तम व्यक्त होते. पिवळा डांबिस यांच्या लेखाचे प्रतिबिंबच जणू. कुसुमाग्रजांची आणखी एक याच अर्थाची कविता आठवते. सृष्टीच्या निर्माणाबद्दल शास्त्रज्ञांचे विचार बुद्धीला पटतात पण शास्त्रज्ञही कवीच्या डोळ्यानी रात्री चांदण्यानी खच्चून भरलेले आभाळ पाहू शकत नाहीत अशा अर्थाची ती एक मुक्त रचना आहे ...

In reply to by मुक्तसुनीत

धनंजय 19/07/2008 - 00:23
ती कविता मी वाचली आहे. शास्त्रज्ञांच्या कल्पनाशक्तीला आणि सौंदर्यानुभवाला कमी लेखण्यात त्यांचाही हातभार आहे. (मला जाणवतो नेमका तोच खरा सौंदर्यानुभव - तू ज्याला सुंदर म्हणतो तो रुक्षपणा, असे काही.) असो. काय करणार. त्यांच्या प्रतिभेला मी मानतो.

In reply to by धनंजय

मुक्तसुनीत 19/07/2008 - 00:34
शास्त्रज्ञांच्या कल्पनाशक्तीला आणि सौंदर्यानुभवाला कमी लेखण्यात त्यांचाही हातभार आहे. आज ती कविता माझ्याकडे नाही. पण आठवणीत अजूनही ताजी आहे. त्यात शास्त्रज्ञांच्या कल्पनाशक्तीला कमी लेखले आहे असे मला तेव्हा जाणवले नव्हते. आताही तसे वाटत नाही. चांदण्यांचे सौंदर्य, त्यातून या प्रचंड व्यवस्थेच्या निर्मिकाची संकल्पना आणि त्या कल्पनेतले सौंदर्य हा माझा सार्वभौम अनुभव आहे , असा काहीसा भाव मला त्या कवितेमधे वाटला. जसे बॉलीवूड मधला फेवरीट ड्वायलॉग असतो ना , तेरे बडे होनेसे मैं तो छोटा नही हो जाता :-) )

एकलव्य 19/07/2008 - 10:24
मन भिरभिरायला आणि लेखणी सरसरायला लावणारे असे काही येथे मोकळेपणाने लिहिलेले वाचायला मिळाले. आनंद झाला. धन्यवाद! - अंगठाबहाद्दर

शुचि 01/10/2010 - 02:15
>>स्वतःला पडताळा आल्याशिवाय, सर्वांनी पडताळून डॉक्युमेंट केल्याशिवाय कशावरही विश्वास न ठेवण्याची सवय अंगी लागली...... त्याचबरोबर आपल्याला जे दिसत नाही (एक्स रे, गॅमा रे, वगैरे) ते प्रत्यक्षात अस्तित्वात असू शकतं याची विनयपूर्वक जाणीवही झाली...>> आजचा दिवस सत्कारणी लागला इतकं सुंदर स्फुट वाचून. केवढा संतुलीत विचार. केवढी सुसंस्कृत भाषा, श्लोक. प्रियाली यांचा प्रतिसाददेखील आवडला - की नास्तिक कोणीही नसतो फक्त श्रद्धा वेगवेगळ्या ठिकाणी रुजलेल्या असतात.

मनमोकळं लेखन आहे. छान. नवीन काहीतरी असंच कणखर यावं ही विनंती. (हा जुना लेख आहे हे नंतर लक्षात आलं. पण आधी वाचला नव्हता त्यामुळे काय फरक पडतो?)

In reply to by सतिश गावडे

खर आहे. मनाची अशी आंदोलने होत असतात. पण उत्तरोत्तर माणुस प्रगल्भ होत असतो. श्रद्धा,अंधश्रद्दा, अश्रद्धा यांच स्थान तुमच्या मेंदुतच आहे ना शेवटी?

तुडतुडी 15/09/2015 - 13:24
माझ्यासारख्या एका क्षुद्र जीवाकडे लक्ष द्यायला त्याला मुळीच अवसर असणार नाही. मी त्याची प्रार्थना करीत आयुष्य घालवतोय की माझी कर्मं करीत जीवनकाल कंठतोय याला त्याच्या दृष्टीने काहीच महत्त्व नाही......
तुम्ही देव माना , नका मानू . मूर्तिपूजा करा , नका करू तो तुमचा प्रश्न आहे . देवाला तुमच्याकडे लक्ष द्यायला अवसर नाही हा गैरसमज आधी काढून टाका . तुमच्या प्रत्येक छोट्या - मोठ्या , चांगल्या - वाईट कर्मांची नोंद त्याच्याकडे आहे आणि असणार आहे .
ईश्वराचं अस्तित्व मी नाकारीत नाही, पण मला स्वतःला अनुभव आल्याखेरीज मी त्यावर विश्वास ठेवणार नाही...... आणि जो मला त्याच्या अनुभव देऊ शकत नाही त्याला मी संत वा महात्मा मानू शकत नाही, मग तो वाटेल ती बडबड करीत असो.......
अवश्य .पण तुम्हाला अनुभव येण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करताय हे महत्वाचं आहे . असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी असं होणार नाही . देव तुमचा नोकर नाही . अनुभवासाठी तुम्हाला प्रयत्न करावेच लागणार .
मी भारावल्यासारखी मान डोलावली
exactly . मूर्तीपूजेचा हाच उद्देश आहे .तुम्हाला मूर्ती दिसतेय म्हणून तुम्ही भारावू गेलात . जर काहीच दिसल नसतं तर हा भारावलेपणा आला असता का ? नाही ना . निर्गुण स्वरुपाची उपासना सोपी नाही . म्हणून तर मूर्तीपूजा सांगितली आहे .
ईश्वर जर असलाच तर तो हत्तीचं मुख आणि मानवी धड या स्वरूपात असेल यावर तर काडीचाही विश्वास नाही.
ह्याच्या मागचं अध्यात्मिक रहस्य खूप मोठं आहे . ते शोधून काढलं कि लॉजिक पटेल . गाडगे बाबांचं उदाहरण देणार्यांना गाडगेबाबा सतत 'गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला' म्हणत असत ह्याचा विसर पडला का ? एखाद्या पदार्थाला मस्त फोडणी दिली तर माणूस आवडीने ४ घास जास्त खातो आणि जेवल्याचा आनंद मिळतो . तसंच कर्म करताना नामस्मरणाची , ईश्वरभक्तीची फोडणी दिली कि त्याला एक भारदस्त अर्थ प्राप्त होतो .
पण आपण प्रत्यक्षात एकाकीच असतो! एकटेच जगतो आणि निघायची वेळ झाली की एकटेच निघून जातो
अगदी खरं . देव सोडून दुसरं कोणीही आपल्या बरोबर नसतं . म्हणून मी हि लग्न केल नाही आणि करणार हि नाही . ती संसाराची कटकट करण्यापेक्षा ईश्वरप्राप्तीसाठी प्रयत्न केले तर इथून जाताना नक्कीच काहीतरी घेवून जाता येईल . आणि तसंहि इथं परत कुणाला यायचय म्हणा . मृत्यूलोकाला कायमचा टाटा बायबाय करायचा आता.:-)
शालेय शिक्षण हे याच प्रकारचे असते. एक गुरू जे सांगतो ते ऐकायचे, लक्षात ठेवायचे
शाळेत शिकवणारे कधीही गुरु नसतात . ते फक्त शिक्षक असतात . 'गुरु' हि पूर्णपणे अध्यात्मिक संज्ञा आहे . उठसुठ कोणालाही गुरु म्हणू नये .

लेख आवडला. आणि आधी वाचला असता तर नसता पटला पण नुकतंच माझंही असंच काहीसं झाल्याने पटला. जर्सी सिटीमध्येही गणपती असतो हे मी नुसतं ऐकलं होतं. असुन असुन काय असणार असंही वाटलं. पण ज्या दिवशी कळालं की आज विसर्जन आहे तेव्हा का कोण जाणे आटापिटा करुन गेलोही. पोहचलो तेव्हा गणपतीचीच गाणी लावलेली होती. त्यात तेव्हा जे चालु होतं ते नेमकी ढोल ताशांचा रिदम असलेलं. ढोल ताशे आणि समोर गणपतीची अत्यंत सुंदर १५ फुटी मुर्ती. मी कधी मनापासुन नमस्कार करत नाही. म्हणजे घडतच नाही. बाकी लोक करतात, आपण नुसतेच टक लावुन मुर्ती बघत बसलो तर विचित्र दिसतं म्हणुन लोकलज्जेस्तव मी नमस्काराचं नाटक करते. पण आयुष्यात पहिल्यांदाच माझ्याकडुन ह्या मुर्तीला नमस्कार केला गेला. आणि फार फार रडायला आलं... देवासमोर कधी नमस्कार करुन मी रडेन असं मलाही वाटलं नव्हतं.. आपल्याला वाटत असतं पण कितीही नास्तिक असलो तरी आजुबाजुच्या लोकांचा प्रचंड आस्तिकपणा आपल्यावर कुठे तरी आदळलेला असतोच. आणि आयुष्यातल्या खुप सार्‍या आठवणींच्या खुणा म्हणुन तो आपल्या आतच रहातो. मी कितीही गणपती नाकारायचा म्हणलं तरी ढोल-ताशा-भगवा झेंडा-गणपती म्हणलं की मला पुणंच आठवतं. आणि मग गणपती पाहुन आपोआप भरुन येतं. चालला गजर, जाहलो अधीर, लागली नजर कळसाला पंचप्राण हे तल्लीन, आता पाहिन, पांडुरंगाला म्हणलं की मला भारतच आठवतो.. आणि विठ्ठल मला विलक्षण आवडायला लागतो. घडवणार्‍यांनी मुर्तीच तशा आर्त बनवल्यात की पर्याय उरत नाही. मला महालक्ष्म्यासुद्धा अशाच निरर्थक वाटायच्या. पण यंदाचे महालक्ष्म्यांचे नुसते फोटो पाहिले अन आठ्वलं की लहानपणापासुन दरवर्षी आमची मराठवाड्यातली सगळी मंडळी आमच्याकडे पुण्याला यायची. तोच सगळा १५ लोकांचा गोंधळ, तीच ठरलेली कामं आणि तरीही जेवायला दुपारचे चार वाजणार.. दरवर्षी! पुजा झाली की बाबा नैवेद्य दाखवायचे. आम्ही पोरांनी खपुन समजवलेल्या लक्ष्म्या.. आजीने लावलेल्या समया-काडवातींनी उजळलेल्या लक्ष्म्या.. वस्त्रमाळा आणि निर्गुडीच्या हारांमधुन शांतपणे आपल्याकडे बघणार्‍या लक्ष्म्या.. आणि त्यांच्या समोर कद घालुन मनापासुन काही तरी मंत्र म्हणणारे बाबा.. त्याक्षणी सगळे शांतपणे मागे उभे.. कुणी काही बोलायचं नाही.. आणि एक क्षणात अचानक "सुखकर्ता दुखहर्ता.." सुरु, सगळ्यांची पहिली टाळी सुद्धा एकत्र वाजायची.. सगळी मंडळी कितीही वेगवेगळी असली तरी त्या धाग्याने एकत्र बांधलेली होती. आमच्या मायबापांनी महालक्ष्म्याच नाकारल्या असत्या तर मला माझी चुलत भावंड नुसती नावानीच माहिती असती. पण आज महालक्ष्म्या म्हणलं की मला मराठवाडा आठवतो.. मला वास्तविक गणपती, महालक्ष्म्या किंवा पांडुरंगाशी काही घेणं देणं नाही. पण त्यांच्याशी ज्या माझ्या घराच्या आठवणी बांधल्या गेल्या आहेत, त्यांच्याशी माझं सख्य आहे.

In reply to by पिलीयन रायडर

उत्तम लेख वर काढल्याबद्दल धन्यवाद. मी स्वतः नास्तिक आहे पण आस्तिकांचा राग येत नाही. प्रत्येकाने आस्तिकपणा किंवा नास्तिकपणा त्याच्या त्याच्या अनुभवावरून किंवा मनाप्रमाणे ठरवलेला असतो. समस्यां तेव्हा निर्माण होते जेव्हा आस्तिक लोक नास्तिकांना आस्तिक बनवायचा किंवा नास्तिक लोक आस्तिकांना नास्तिक बनवायचा प्रयत्न करतात तेव्हा. माणूस आस्तिक किंवा नास्तिक असण्यापेक्षा प्रामाणिक, गरजेच्या वेळी हाकेला धावून येणार असणे जास्त मह्त्वाचे असे मी मानतो.

सप्तरंगी 21/09/2016 - 16:29
हे एक मुक्तचिंतन दिसते आहे, छान , प्रामाणिकपणे लिहिल्यासारखे वाटते पण तुमचा गोंधळ होतो आहे. आजकाल नास्तिकतेला असलेले वलय कदाचित स्वतःला मी नास्तिकच असे म्हणायची पटवायची घाई करत असेल . घाई करू नका स्वतःला नास्तिक म्हणून घायची बहुदा तुम्ही फेन्स वर बसलेले अज्ञेयवादी आहात (Agnostic)...कदाचित आस्तिकतेकडे झुकलेले नास्तिकतेकडे झुकू पाहणारे अज्ञेयवादी. खरे तर निष्कर्षाला यायची घाई न करता विचार चालू ठेवा, तरच रस्ता सापडेल नाहीतर तळ्यात-मळ्यात करत राहाल.

बाळ सप्रे 21/09/2016 - 18:21
मी अजूनही एक पूर्ण नास्तिक मनुष्य आहे.... पण मित्रहो, या गजाननाचा मी एक स्नेही म्हणून स्वीकार केला आहे.......
माणसाचे विचार इव्हॉल्व होत असतात. पण आठवणी या आत्ताच्या विचारांशी जुळणार्‍या असतीलच असे नाही. पूर्वायुष्यात आयुष्यावर कुटुंब, समाज यांच्या प्रभावाने जे घडत गेले त्यानुसार आठवणी रहातातच .. आणि आठवणी नेहेमीच प्रिय असतात.. तेव्हाचा तसा मी होतो.. आत्ताचा असा मी आहे.. तेव्हा गणपती देव वाटत होता.. आता जे मानवाच्या बुद्धी पलिकडे आहे त्याला मी देव मानतो. त्याला मानवरूप देण्याची व भक्ती/पूजा करण्याची गरज वाटत नाही.. त्यामुळे आठवणींशी निगडीत असल्याने व आत्ताच्या विचारांनी गजानन देव वाटत नसल्याने गजाननाचा स्नेही म्हणून स्वीकार वगैरे अट्टाहास करायची गरज नाही. ते चित्र अथवा शिल्प म्हणून आवडते किंवा स्त्रोत्र आरत्या यांचा अर्थ नसला तरी सूर भावतो किंवा मोदक फार आवडतो हे सत्य म्हणून स्वीकारता येउ शकते..

In reply to by बाळ सप्रे

आजानुकर्ण 21/09/2016 - 18:55
तेव्हाचा तसा मी होतो.. आत्ताचा असा मी आहे.. तेव्हा गणपती देव वाटत होता.. आता जे मानवाच्या बुद्धी पलिकडे आहे त्याला मी देव मानतो. त्याला मानवरूप देण्याची व भक्ती/पूजा करण्याची गरज वाटत नाही.. त्यामुळे आठवणींशी निगडीत असल्याने व आत्ताच्या विचारांनी गजानन देव वाटत नसल्याने गजाननाचा स्नेही म्हणून स्वीकार वगैरे अट्टाहास करायची गरज नाही.
+१
मोदक फार आवडतो हे सत्य म्हणून स्वीकारता येउ शकते..
+२ मस्त प्रतिसाद.

चौकटराजा 21/09/2016 - 20:53
मी पूजा करतो,गणपती बसवतो, घरात जिवत्या, गौरी हरतालिका सर्व चालू असते. दिवाळीला लक्ष्मी पूजन असते. सात ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले आहे. असे असूनही मी हार्ड कोटेट नास्तिक आहे. कारण या कशातही देव नाही याच्यावर माझा ठाम विश्वास आहे. देव जर जगात असेलच समजा तर तो निगोशिअबल नाही. सबब देव भक्ती, नामस्मरण यांचा उपयोग झालाच तर प्लासिबो म्हणून होईल कृपा वगैरे सब झूट. मग आमच्या नास्तिकांच्या आयुष्यात देव वारंवार का येतो. कारण एकच .जेंव्हा कशाचेच उत्तर कार्यकारण भावासह सापडत नाही त्यावेळी योगायोग हेच उत्तर असते व योगायोग हा तर विज्ञानात बसत नाही म्हणून नास्तिक ही म्हणतो देवाची कृपा ....दुसरं काय ? "

In reply to by चौकटराजा

बाळ सप्रे 22/09/2016 - 14:02
तुमच्या म्हणण्याप्रमाणे योगायोगाने देव तुमच्या आयुष्यात येतो. ते पटत नाही. तुम्ही हार्ड्कोर नास्तिक समजता तरीही गणपती बसवता, पूजा करता. कारण आपल्या विचाराला आचारात आणण्याची इच्छा अथवा धैर्य नाही म्हणून. तुम्ही दुसर्‍यांना थांबवू शकत नाही किंबहुना थांबवू नकाच.. त्यांना त्यांचा विचार करू दे. पण स्वतःला न पटणारं स्वतःच वागण्यापासून कोण अडवतय ?? ते जमवणं इतकं कठीण नक्कीच नाही. थोडासा निर्धार लागतो पण इथे योगायोग वगैरे कारणं अजिबात पटत नाहीत. आणि योगायोगाने देव आयुष्यात येणे आणि ही देवाची कृपा वगैरे मनापासून वाटत असेल तर तुम्ही नास्तिक असल्याचे म्हणणे हे स्वतःला फसवण्यासारखे आहे.

In reply to by बाळ सप्रे

चौकटराजा 23/09/2016 - 14:14
एक ,हे सर्व मी एकटा समाजात नाही . माझे कुटुंब ही आहे म्हणून करतो. माझ्यात धैर्य वगरे नाही हा तर्क चुकीचा. अगदी थेरॉट्कली पाहिलेत तर योगायोग असाही काही नसतो पण प्रॅक्टीकल आयुष्य जगताना आपल्या मनाचे समाधान तूर्तास तरी का होईना हे करून घेण्यासाठी नाईलाजाने देवाची इच्छा असे आपण म्हणतो. उदा आपल्या परिचयात जेंव्हा अकाली मृत्यू होतो त्यावेळी नास्तिकही इश्वरेछ्हा बलीयसी म्हणतो कारण तुझ्या बापाने दारू पिली बेसुमार ,म्हणून तो मेला हे सत्य त्या नातेवाईकाला सांगण्याचे धैर्य आपल्यात नसते. नास्तिकातही नसते व अस्तिकातही. धैर्याचा प्रश्न तेथे येतो. आपण म्हणता तेथे नाही.काही वेळा सत्य सांगण्याचे धैर्य आपल्यात नसते किंवा काही वेळा ते ऐकण्याचे धैर्य॑ दुसर्‍यात नसते.

In reply to by चौकटराजा

बाळ सप्रे 23/09/2016 - 17:17
माझे कुटुंब ही आहे म्हणून करतो
कुटुंबातही आपापल्या श्रद्धे/अश्रद्धेप्रमाणे वागण्याची मुभा असावीच. पण तुमच्याकडे धैर्य नाही हे म्हणणे जर चूक असेल तर कुटुंबात तुमच्या नास्तिक असण्यावर खुलेपणाने चर्चा झाली नसावी. असे असते तर तुमच्या नास्तिकतेला न पटणार्‍या बर्‍याच गोष्टी करण्याची इच्छा / आग्रह/ सक्ती झाली नसती. माणसं जपण्यासाठी जसे नास्तिक आस्तिकांच्या सर्व गोष्टींना घरात विरोध करत नाहीत तसे आस्तिकही घरातल्या नास्तिकांकडून हे सगळं करण्याची अपेक्षा ठेवत नाहीत. माझी श्रद्धा आहे तर मी पूजा करेन, मुलाकडून ती इच्छा अपेक्षा ठेवणार नाही. आणि तो नास्तिक आहे याची पूर्ण कल्पना असेल तर माझ्यासाठी म्हणून पूजा वगैरे करण्यापासून नक्कीच परावृत्त करेन. धैर्य शब्दाऐवजी विचाराप्रमाणे आचार करण्याचा स्वतःचा निग्रह नसणे असे म्हणणे जास्त योग्य ठरले असते.

प्रतिसाद कर्त्यांना अंधश्रद्धा आणि मेंदुविज्ञान हा सुबोध जावडेकरांच्या मेंदुच्या मनात या पुस्तकातील लेख वाचावा अशी आग्रहवजा सूचना आहे. श्रद्धा अश्रद्धा अंधश्रद्धा चे ठिकाण मेंदु आहे. मी माझ्या सोयी वा गरजेनुसार अस्तिक नास्तिक वा अज्ञेयवादी आहे. मानसिक आरोग्य जपण्यासाठी आपला मेंदु केवळ अमुर्तच नव्हे तर अनेक वेडगळ वाटणार्‍या सुद्धा कल्पनांचा आधार घेतो. प्रत्येक वेळी आपले त्यावर नियंत्रण असतेच असे नाही. ते त्या त्या वेळच्या परिस्थितीवर अवलंबून असते. ईश्वराचे निर्गुण निराकार, सगुण साकार, भक्तवत्सल करुणाघन अशी रुपे हे त्याच्या मेंदुचे अविष्कार असतात.

मारवा 22/09/2016 - 20:20
असाच सेम असाच विचार व्यक्त करणारा मेघश्याम पुंडलिक रेगेंचा एक लेख आठवला. एक कुतुहल नरहर कुरुंदकरांना मुलाची "मुंज" करावीशी वाटण्या संदर्भात व एक तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी लुप्त जुन्या प्राचीन विधीने जी त्यांना माहीत होती असे काहीतरी "त्र्यंबकेश्वर" मंदीरातील प्राण प्रतिष्ठे ची जबाबदारी स्वीकारली होती त्याचेही कुतुहल वाटते एकुण पण बहुधा तेव्हा त्यांनी इथे सर्वांना काही तरी प्रवेश द्यावा अशी काहीतरी अट टाकलेली होती असे अंधुक अंधुक वाचलेले स्मरते. माणुस एक इंटरेस्टींग क्रीएचर आहे व तो विसंगतच आहे मुळात त्याला सुसंगती अपेक्षीत केल्यावर वांधे होतात. सॅम हॅरीस सारखे लोकही आहेत नीरक्षीर विवेक करतात शेणातुन शेंगदाणा बाहेर काढतात असो.

प्रथमच सांगतो की मी एक नास्तिक माणूस आहे. "प्रारंभी विनंती करू गणपती, विद्यादयासागरा...." माझा मुलगा गजाननाच्या तसबिरीपुढे हात जोडून उभा असतो... मी ही त्याच्या मागे उभा रहातो. माझं मन आक्रंदून उठतं, " अरे तुझा विश्वास नाही या सगळ्यावर, सर्व थोतांड आहे ते!!" मनाला न जुमानता नकळत डोळे मिटतात, मस्तक लवतं..... काय जादू आहे ही? पुन्हा सांगतो की मी पूर्ण नास्तिक आहे.... एका ब्राम्हणाच्या घरांत जन्माला आल्यामुळे सर्व ब्राम्हणी संस्कार झाले. पण माझा त्याला काहीच इलाज नव्हता.

दाजी "पोष्टमन"

श्रीकृष्ण सामंत ·

मदनबाण 13/07/2008 - 16:31
"रिटायर्ड होता होता सॉरटरची जागा मिळाल्याने हजारो पत्रे सॉर्ट करून करून आंगठा हा असा वाकला "असं अभिमानाने सांगत असतो. सामंत साहेब छानच..... (डाकिया डाक लाया..)असे गुणगुणारा.. मदनबाण.....

प्राजु 13/07/2008 - 21:08
सामंत साहेब.. आपलं लिखाण म्हणजे एक मेजवानी असते असं म्हंटलं तर वावगं ठरू नये. छान आहे दाजीचं व्यक्तीचित्रण. अगदी सहज लिहिलं आहे. अभिनंदन!- (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

प्राजुजी, किती मनापसून लिहिता. वाचून हुरूप येतो.आभार www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

टारझन 14/07/2008 - 00:51
लै भारी .. अन् मेजवानी बद्दल आभारच.... एक नंबर सामंत काका.. अजुन येऊन द्या.... दाजी आवडले...सही व्यक्तीचित्रण.. कुबड्या खवीस (आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. ) नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.
तू भारी ...तर जा घरी...

कुबड्या खवीसजी,देवदत्तजी, आपले पण आभार.आपल्याला चांगलं लेखन वाचायाला देऊन आनंदी ठेवणं हेच आमचे प्रयत्न. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

भास्करभाऊना दाजी धरून सहा मुलं.दोन मुलगे अणि चार मुली.दाजी सर्वांत मोठा.तशी दाजीला आणखी दोन भावंड होती,परंतु ती लहानपणीच निर्वतली. भाऊ एकटे कमविणारे, गुंडू जोश्यांच्या दुकानात कारकूनाची नोकरी करून किती पगार मिळणार.एव्हडी मुलं झाल्यावर गरिबी ठाण मारूनच बसणार. दाजी जेमतेम इंग्रजी ४ थी पर्यंत शिकला.मराठी ४ ईयत्ता आणि इंग्रजी ४ ईयत्ता.खूप झालं असे त्याला वाटलं.पण खरं कारण ते नव्हतं.इंग्रजी शाळेत दीड रुपया मासिक फी होती.आठ,आठ आण्यानी वाढून ४ थीत ती दीड रुपया झाली होती.जस जशी दाजीची भावंड वाढू लागली तस तशी भाऊंच्या खर्चाला मेळ बसणं कठीण होवू लागलं. दाजी वेळेवर फी भरत नाही, म्हणून मास्तर त्याच्यावर