शैलेश कुलकर्णी याची ..मी कुठे काही म्हणालो ? ही दर्जेदार गझल वाचून सद्य राजकीय परिस्थितीवर काही ओळी सुचल्या.. त्या कोण म्हणतंय हे ओळखु येईल अशी आशा आहे ;)
त्याच जागा , त्याच चाली , मी कुठे नाही म्हणालो ?
तोच सौदा, ती खुशाली , मी कुठे नाही म्हणालो ?
धावते मग सोनिया माझ्यापुढे , टाकीत धापा ,
सांगते व्हा सरकारी, मी कुठे नाही म्हणालो ?
मजवरी होत्या परजल्या पार्टित तलवारी, जरी तू
लाज विसरू, गिळू थोडी, मी कुठे नाही म्हणालो ?
लाल चीनचे कवच होते, ते भांडले काही करोनी
वाचवणार माझे मवाली , मी कुठे नाही म्हणालो ?
"आपुली ही प्रीत ,म्हणशी, अणूकराराचेच नाते",
डाव्यांस तोडू, मोडू खोडी , मी कुठे नाही म्हणालो ?
-ऋषिकेश
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3953
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
हम्म..
सही...
मस्त!
नावडते राजकारण
अर्थ आवडला
घडामोडींवर भाष्य
In reply to अर्थ आवडला by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
प्राजु,
मी कवाच नाय म्हन्ल नाई
क्या बात है!
In reply to मी कवाच नाय म्हन्ल नाई by प्रकाश घाटपांडे