Skip to main content

पडू आजारी

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 13/07/2008 11:11 या दिवशी प्रकाशित केले.

निरोगी मौज

पडू आजारी
मौज हीच वाटे भारी
सेवा करणार्‍या व्यक्तीचे
कष्ट मात्र वाढतात भारी
स्वतःची कामे ऊरकून
रुग्ण सेवा नशिबी सारी

मौजच असेल करायची
जरी सर्वांनी मिळूनी
आहे एक गुरुकिल्ली
घ्यावी सर्वांनी समजूनी

खाणे,पिणे अन जेवण्याची
असावी हेल्धी स्टाईल
व्यायामाची संवय ठेवून
म्हणावे असाच दिवस जाईल
विश्रांतीची आवशक्यता
विसरून कसे चालेल

करून हे एव्हडे सारे
कुणी पडे आजारी
सेवेचे कर्तव्य वाटे न्यारे

श्रीकृष्ण सामंत

लेखनविषय:

वाचने 1424
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया