मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पत्र निमित्तमात्र

Bhakti ·

गामा पैलवान Sat, 01/17/2026 - 19:48
भक्ती, तुमचा हा परिचयपर लेख चांगला रंगला आहे. लेख वाचल्यावर एक प्रश्न पडला आहे. एखादा विचार अचूक शब्दांत उतरवायची हातवटी भाषेची की माणसाची मानायची?असा तो प्रश्न आहे. बघूया, कधी उत्तर मिळतंय. काही सापडलं तर इथे या धाग्यावर उल्लेख करेन. आ.न., -गा.पै.

लेखनविषय:
लेखनप्रकार
1 सुनीता देशपांडे आणि जी. ए कुलकर्णी यांच्यातील चिंतनशील पत्रव्यवहार (काही संकलन केलेला )नुकताच स्टोरीटेलवर संवादरूपाने ऐकला. गहन व्यक्तिमत्त्वांची निखळ, मायेने ओतप्रोत मैत्री...

[ताज्या जिलब्या] आचरटपणा

युयुत्सु ·

In reply to by सुबोध खरे

कांदा लिंबू Tue, 01/20/2026 - 10:08
एखाद्या बालकाला पिपाणी मिळाली कि ती सारखी वाजवून प्रत्येकाला ते काव आणतं तसं झालंय. ठ्ठो! अचूक! Lol

In reply to by सुबोध खरे

कांदा लिंबू Tue, 01/20/2026 - 10:08
एखाद्या बालकाला पिपाणी मिळाली कि ती सारखी वाजवून प्रत्येकाला ते काव आणतं तसं झालंय. ठ्ठो! अचूक! Lol
लेखनविषय:
लेखनप्रकार
[ताज्या जिलब्या] आचरटपणा =============== -- राजीव उपाध्ये टीप - आजच्या जिलब्यांचा नैवेद्य श्री० चंद्रसूर्यकुमार यांना समर्पित करण्यात येत आहे. मानवी इतिहास अनेक अंगांनी अनेकांनी लिहिला आहे. पण आचरटपणाच्या अंगाने लिहीला गेला नसावा असा माझा अंदाज आहे. आचरटपणा म्हणजे अतार्किक गोष्टींवर ठाम विश्वास, योग्य काय अयोग्य काय याच्या मनमानी कल्पना इ० आचरट कल्पना कशामुळे जन्म घेत असाव्यात. सामुहिक रित्या मानवी मेंदूची क्षमता अचाट असली तरी व्यक्तीगत पातळीवर ती मर्यादितच असते.

मंगळावरील मुरुमातील मुंग्यांचा मुरांबा.

गवि ·

कंजूस Fri, 01/16/2026 - 17:36
डोकेबाज पाककला. शुक्रावरील शेवाळाची उसळ*>> घावणे म्हणायचे आहे का? शुक्र ढगांत हरवलेला असतो.

युयुत्सु Fri, 01/16/2026 - 17:44
अनेक वर्षांपूर्वी पुण्यात य० गो० जोशी 'प्रसाद' नावाचे मासिक चालवत असत. त्यात एकदा "फोलकटांचा चिवडा" अशी पाकृ प्रसिद्ध झाली होती आणि बरीच गाजली होती. तसंच पंचतत्रातला एक श्लोक याच धर्तीवर आहे - यस्य कस्य तरोर्मूलं येनकेनापि मर्दितं| यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति|| तातपर्य- वेदांत (वि० अ थर्व वेदात अशा पाकृ भरपूर सापडायची शक्यता आहे)

In reply to by टर्मीनेटर

गवि Fri, 01/16/2026 - 17:58
हा हा हा... पण तिथल्या थंडीत ती लगेच गार होते. "गुरु"वरच्या गुळवेलीचा गुळांबा टाकायचे मनात होते. पण त्यामुळे जायंट ग्यास होतो म्हणतात. म्हणून तेही टाळले.

**मंगळावरील मुरुमातील मुंग्यांचा मुरांबा : एक प्राचीन-आधुनिक-वैज्ञानिक पाककृती** --- कालच घरच्या मागच्या अगण्णात मुंग्यांची रांगा दिसली आणि मन भूतकाळात गेल. माझ्या लहानपणी आमच्या गावी लाल मुंग्यांची दिसत असत. आमची आत्या त्या मुंग्यांची चविष्ट चटणी बनवत असे. मी विचार केला की आपण मानवजातीच्या विकासासाठी भविष्यकालात इतर ग्रहांवर देखिल खाता येऊ असा मुरंबा का बनवू नये.

हिंदू मराठी महापौर

बाजीगर ·
लेखनविषय:
हिंदू मराठी महापौर हिरवा उद्ध्वस्त ठेचला, स्तब्ध नकलाकार कुंचला, नानांनी असा विजय खेचला, बोलल्याप्रमाणे || आता विरोधी बाकडा, काय करेल तो वाकडा, पाय ओढणारा खेकडा, खोलल्याप्रमाणे || आधी ते EVM खोटे, आता शाई पुसती बोटे, किती बहाणे होते, सोलल्याप्रमाणे || ठेचूनी देशी पाकडा, भाजप बहुमत आकडा, विरोधी पडला तोकडा तोलल्याप्रमाणे ||

सैरभैर डायरी - २.४

कपिलमुनी ·

गवि Fri, 01/16/2026 - 16:49
फायनल साक्ष नेमकी काय झाली? उस्मानचे नाव घेतले? तसे वाटते आहे. तरीही कोणाकडून काही पीडा झाली नाही हे सुदैवच. या भागात काहीसं कन्फ्युजन झालं खरं. पण आवडलं. सॉरी.. ही चुकीची भाषा..खाली पुन्हा लिहीतो ;-) फायनल साक्षीत नेमका काय झाला? उस्मानचा नाव घेतला? तसाच वाटला मला वाचून. तरीही कोणाकडून काही कॉल आला नाही हा साला चांगला नशीबच म्हणायचा. हा भाग संपला की कथा संपली? कथेच्या या भागात काहीसा कन्फ्युजन झाला खरा. पण आपल्याला आवडला..

In reply to by गवि

कपिलमुनी Fri, 01/16/2026 - 19:54
जसा होता तसा खरा जबाब दिला. पुढे मेडिकल ऑफिसर ,पोलिस आणि मुलीचे आईबाप सगळ्यांनी पैसे घेऊन केस दाबली. आपल्याकडे फक्त खरे बोलल्याचे समाधान राहिले.

अभ्या.. Sun, 01/25/2026 - 18:06
एकच नंबर लेखन झाले आहे मुनी. . डायरी येऊ द्या जितकी आहे तितकी.

सौंदाळा Tue, 01/27/2026 - 21:51
दमदार लिखाण बहुतांश मध्यमवर्गीय पापभीरु लोकांनी असेच केले असते.

अस्वस्थामा Fri, 01/30/2026 - 06:06
जबरदस्त गुगली आम्हाला मुनी! कथा चांगलीच रंगलेली, अजून उत्कंठा वाढवत नेली असतीत तरी काही हरकत नसती हो. :)

२.१ २.२ २.३ ज्याचा पगार ७००० आहे.त्याला एकरकमी २ लाख म्हणजे मोठी रक्कम होती. बुलेटची डुग डुग कानात ऐकू यायला लागली होती. २.४ विचार करून सांगतो म्हणून बाहेर सटकलो. बिल्डरला प्रत्यक्ष बघणारा मी एकमेव साक्षीदार होतो , माझ्या साक्षीवर केस बरीच पुढे जाणार होती . पोलिसांना मोठा रीमांड मिळाला असता म्हणून ही गुळपट्टी लावणे चालले होते. उगाच माझ्या मागे झा*उपट ! असला रोज रोज थोडी आपल्या आयुष्यात घडते ?

विविध राष्ट्रांच्या संविधानांतील अपेक्षा आणि धर्मांतील अपेक्षा

युयुत्सु ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
धर्मपालन आणी कायद्याचे पालन या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यांची गल्लत होऊ शकते आणि महत्त्व कशाला द्यायचे याबद्दल संभ्रम निर्माण होऊ शकतो. याचा निर्णय करताना ए०आय० ने जितकी स्पष्टता दाखवली आहे, तितकी मानवी विद्वान दाखवतील का ही मला शंका आहे. माझ्यामते कायद्याचे पालन धर्माचरणापेक्षा श्रेष्ठ आहे, ते अधिकार देते, तसेच संरक्षण देते.

नरो वा कुंजरो वा

चांदणे संदीप ·
पोटाची खळगी भरणे कारणी स्वार्थें, वैऱ्याची हो मनधरणी हसणे होईल पातक घोर भवती मूर्खांचा वाढेल जोर सत्य नित्य नको ओठी वाचेत मुग्धतेची पराकोटी आणि... मती निकामी होय तेधवा म्हणावे, नरो वा कुंजरो वा - संदीप भानुदास चांदणे

खुल जा सिम सिम

Bhakti ·

निनाद Fri, 01/16/2026 - 08:05
अगदी वेळेवर आलेले लिखाण. आवडले हे सांगायला नकोच! पुर्वी तीळाची किंमत खूप होती. मेसोपोटेमियात तिळाच्या तेलाचा वापर देवांना अर्पण करण्यासाठी, दिवे लावण्यासाठी आणि व्यापारात पैसा रुपाने ही केला जात असे. असे म्हणतात की अमेरिका खंडात अठराव्या शतकात गुलामगिरीच्या काळामध्ये आफ्रिकन गुलामांनी तिळाच्या बिया स्वतःसोबत अमेरिकेत नेल्या. आणि अमेरिकेत तीळ पसरला. अर्थातच तीळ ही भारताने जगाला दिलेली ही एक अमूल्य आणि 'आरोग्यदायी' भेट आहे.

चामुंडराय Sat, 01/17/2026 - 01:12
समयोचित लेख. भक्तीताईंनी कट्ट्याला आणलेल्या स्वादिष्ट तिळगुळ / तीळगुळ* वड्या आठवल्या. खूप आवडल्या होत्या. * तिळगुळ / तीळगुळ - जे काही बरोबर असेल ते वाचावे. दुसऱ्या हाटेलात ह्या वर जोरदार चर्चा चालू आहे. जिज्ञासूंनी लाभ घ्यावा.

टर्मीनेटर Sat, 01/17/2026 - 16:37
हा माहितीपुर्ण लेख गेल्या तीन दिवसांत वाचनातुन कसा काय सुटला ह्याचा विचार करतोय...
पुसदच्या अभिषेक सूर्यकांत रुद्रवारने एकाच तिळाचे ब्लेडच्या पात्याने चक्क शंभर तुकडे केले, तेही अवघ्या १६ मिनिटे व २० सेकंदांत.
कमाल आहे!

1 "तीळगूळ घ्या, गोड बोला" उद्या या घोषणेत आपण सर्वजण वाहून जाणार.

सैरभैर डायरी - २.३

कपिलमुनी ·

टर्मीनेटर Tue, 01/13/2026 - 13:48
मजा आ रहेला हैं भाय... 👍 बाल्याचा सीन वाचून 'बात हैं कमाल अपून की जिंदगी के खेल में' ह्या गाण्यातले खालील कडवे (2:25 to 2:45) आणि 'नाक्यावरचे' (तुमच्या भाषेत 'कट्ट्यावरचे') दिवस आठवले 😀
लफडा झगडा हो गया तो हो गया रे डर हैं क्या घोडा रखके खोपडी में ठोक दे फिकर हैं क्या... ज्यादा से ज्यादा क्या होगा रे? सजा मिलेगी या प्यारे छुट जायेंगे बेल में... सजा मिलेगी या प्यारे छुट जायेंगे बेल में...
BTW... क्रमश: लिवायला विसरले, की डायरीचा 'धी एन्ड' केल्यांव मुनीवर्य???

गवि Tue, 01/13/2026 - 14:09
हाही भाग आवडला. वेगळ्या जगाची ओळख. रामदास काकांची एक सीरिज आठवली. त्यांनी ती अर्धीच सोडली होती असे स्मरते. तिचा एरिया थोडा वेगळा होता. पण अशीच उत्कंठा वाढवणारी. पुभाप्र.

२.१ २.२ "मामू गाडी बाहेरवाली साईटला घे, देखते है ,क्या बताया भाईंने पोलिस को "उस्मानने थंड आवाजात सांगितले. २.३ उस्मान माझ्याकडे आणि मी त्याच्याकडे बघत अंदाज घेत होतो. पलीकडे डोकावून मामूला बोललो, "जातीवर आलास भाडखाऊ ! याला सोड तुलाच पहिला धरणार मी !" मामूला एकदम जिवाला लागले. "२ मिनिट बोलायचा भाउ , बाकी काही नाही, दीदीचा रीश्तेदार लागतो " पण मामूने गाडी साईटऐवजी कट्ट्याकडे घेतली.त्यालापण माहिती होते, कट्ट्यासोबत पंगा घेतला तर नंतर गावात पळवून मारतील..

DNA : आनुवंशिकतेपासून गुन्हेगाराच्या शोधापर्यंत

हेमंतकुमार ·

अनामिक सदस्य Mon, 01/12/2026 - 12:36
धन्यवाद डोक्टरसाहेब. काही प्रश्न आहेत. १. अशी ओळख पटवण्यासाठी दंतरचना कितपत विश्वसनीय असते? डी एन ए इतकी नक्कीच नाही पण कितपत यूनिक असते? तुलना करण्यासाठी दंतरचना किती लोकान्ची उपलब्ध असते? पाश्च्यात्य देशात दंतरचनेचा ठसा साठवून ठेवतात का? २. सर्व घटक अनुकूल असल्यास चाचणीचे यश 98.2% पर्यंत असल्याचे आतापर्यंत दिसले आहे. असे का असावे? उरलेले १.८% statistical error असावी का अजून अज्ञात असे काही घटक? ३. नातेवाइकान्चा DNA वापरून म्रुत व्यक्तिची ओळख पटवणे आणि एखाद्या मुलाचे पितृत्व सिद्ध करणे यात तान्त्रिकद्रुश्ट्या काही फरक असतो का? रँडम पुरुषाच्या डीएनए बरोबर जुळणी करून पितृत्व निर्देशांक का काढावा लागतो? तसे काही म्रुत व्यक्तिची ओळख पटवताना करावे लागत नाही का?

In reply to by अनामिक सदस्य

हेमंतकुमार Mon, 01/12/2026 - 14:41
धन्यवाद ! चांगले प्रश्न आहेत. सवडीने एकेक घेतो. १. मृताची दंत रचना ही ओळख पटवण्याची एक प्राथमिक पद्धत आहे. तिचा एक फायदा म्हणजे अपघाताच्या ठिकाणी जर प्रचंड उष्णता निर्माण झाली असेल तर शरीराचे अन्य अवयव जळून जातात परंतु दातांचे enamel हा मानवी शरीरातील सर्वात कठीण असा पदार्थ असून तो 1000 अंश सेल्सिअस तापमानापर्यन्त सुद्धा व्यवस्थित राहतो. अशा राहिलेल्या दातामधून सुद्धा डीएनए प्रोफाईल तपासणी करता येते हा एक बोनस. तिची विश्वसनीयता यासाठीची पहिली गरज म्हणजे संबंधित व्यक्तीच्या दंत उपचारांची नोंदणी केलेली असणे. जर अशी नोंदणी उपलब्ध झाली तर या चाचणीची विश्वसनीयता 80% पर्यंत राहते. मात्र एखादी व्यक्ती जिवंतपणे कधीच दंतवैद्याकडे गेली नसेल तर मग तिची विश्वसनीयता अर्थातच खूप कमी होते. बऱ्याच युरोपीय देशांमध्ये दंतवैद्यांनी त्यांच्याकडील येणाऱ्या लोकांचे एक्स-रे आणि अन्य अहवाल अनेक वर्षे सक्तीने जपून ठेवायचे असतात. अप्रगत देशांमध्ये अर्थातच नोंदणी प्रक्रिया अत्यंत कमी असते. अशा परिस्थितीतही मृताची ओळख पटवण्यासाठी दातांचा मर्यादित वापर असा होऊ शकतो : १. व्यक्तीचे अंदाजे वय, लिंग आणि वंश समजणे. २. व्यक्तीच्या व्यसनानुसार दातांवर काही डाग आढळू शकतात. ३. सोने किंवा महागड्या धातूचा कृत्रिम दात आढळल्यास ओळख पटवण्यासाठी अजून मदत होते.

In reply to by अनामिक सदस्य

हेमंतकुमार Mon, 01/12/2026 - 16:04
चाचणीचे यश 98.2% पर्यंत असल्याचे आतापर्यंत दिसले आहे. असे का असावे?
सर्वप्रथम एक तांत्रिक कारण : प्रोफाइल चाचणीचा निष्कर्ष हा संबंधित व्यक्ती अमुक असण्याची संभाव्यता व्यक्त करतो; तो निष्कर्ष खात्रीने ही मृत व्यक्ती हीच होती असे (absolute) म्हणत नाही. ही संभाव्यता टक्केवारीच्या संदर्भात सांगितली जाते (statistical confidence). २. एखाद्या व्यक्तीचा डीएनए जेव्हा एकमेवाद्वितीय असतो असे म्हटले जाते ते शब्दशः खरे व्हायचे असल्यास संपूर्ण डीएनएची प्रोफाइल चाचणी करणे आवश्यक आहे. परंतु वास्तवात डीएनएचे फक्त विशिष्ट ठराविक भागच तुलनात्मकरित्या तपासले जातात. याचे कारण म्हणजे कुठल्याही आपत्ती प्रसंगी जेव्हा हजारो मृतदेह ठराविक वेळात ओळखायचे असतात तेव्हा वेळ आणि संसाधनांची मर्यादा हे महत्त्वाचे घटक असतात. ३. प्रयोगशाळेसंबंधीच्या errors : यामध्ये डीएनए नमुना हाताळणीपासून ते प्रशिक्षित मनुष्यबळ, उपकरणे अशा असंख्य गोष्टींचा समावेश होतो. ४. एखादी जीवशास्त्रीय चाचणी 100% अचूक आहे हे विधान कायद्यालाही मान्य होत नाही कारण मानवी चुका अजिबात न होणे हे (जवळजवळ) अशक्य असते. तसेच DNA variation संबंधीचे वैज्ञानिक ज्ञानदेखील 100% ज्ञात असतेच असे नाही.

In reply to by अनामिक सदस्य

हेमंतकुमार Mon, 01/12/2026 - 16:33
३. नातेवाइकान्चा DNA वापरून म्रुत व्यक्तिची ओळख पटवणे आणि एखाद्या मुलाचे पितृत्व सिद्ध करणे यात तान्त्रिकद्रुश्ट्या काही फरक असतो का? रँडम पुरुषाच्या डीएनए बरोबर जुळणी करून पितृत्व निर्देशांक का काढावा लागतो? तसे काही म्रुत व्यक्तिची ओळख पटवताना करावे लागत नाही का?
* तांत्रिकदृष्ट्या काही फरक नाही; प्रयोगशाळेतील पद्धत वरीलप्रमाणेच राहील. * रँडम पुरुषाच्या डीएनए बरोबर जुळणी का करायची याचे उत्तर जीवशास्त्रीय असून ते समजायला त्या विज्ञानाची शैक्षणिक पार्श्वभूमी असल्यास बरे पडेल. १. प्रथम फक्त मुलाचा डीएनए आणि संशयित वडिलांचा डीएनए ही परिस्थिती पाहू. इथे आपण पुन्हा एकदा डीएनए मधील ठराविक सिक्वेन्सेसचीच तुलना करत आहोत. या सिक्वेन्सेस पैकी काही सर्वसाधारण समाजात दुर्मिळ असतात तर काही अत्यंत कॉमन असतात ( ५०%). २. वरचे जे कॉमन सिक्वेन्सेस आहेत ते त्या वंशातील एखाद्या अन्य काहीही संबंध नसलेल्या पुरुषामध्ये सुद्धा आढळू शकतात. त्यामुळे या जुळणीचा पुरावा दुर्बल होतो. म्हणून निर्देशांक काढायचा. जेव्हा निर्देशांक 99.9% किंवा त्याहूनही जास्ती असतो तेव्हा असे म्हणता येते की, त्या खटल्यातील संभाव्य बाप असलेली व्यक्ती जैविकदृष्ट्याही बाप असण्याची शक्यता अन अन्य कुठल्याही पुरुषाच्या तुलनेत खूपच जास्त आहे. . . . मृत व्यक्तीच्या बाबतीत आपण सख्या नातेवाईकांशी तुलना करतोच आणि म्हणून लेखात म्हटल्याप्रमाणे फक्त एकापेक्षा किमान दोन सख्ख्या नातेवाईकांचे नमुने मिळवणे श्रेयस्कर.

Bhakti Mon, 01/12/2026 - 15:12
मस्तच विषय. सर अलेक जेफरीज (Sir Alec Jeffreys )यांनी जागतिक स्तरावर हा DNA फिंगरप्रिंटिंग शोध लावला . डॉ. लालजी सिंग (Dr. Lalji Singh) यांना 'भारतातील DNA फिंगरप्रिंटिंगचे जनक' मानले जाते. environmental DNA (eDNA) विषयी नव्याने समजले.

सोत्रि Tue, 01/13/2026 - 05:32
environmental DNA (eDNA) ही भन्नाट कल्पना आहे, त्यावरील संशोधन अनेक सायफाय शक्यतांना वास्तवात आणता येईल! - (अभासू) सोकाजी

निनाद Tue, 01/13/2026 - 05:59
खूप मस्त लेख. जनुकीय अभियांत्रिकीचे अनेक अंग आहेत. भारतात प्रामुख्याने आधी शेतीसाठी याचा वापर झाला. २००२ मध्ये बीटी कापूस ला मिळालेली मान्यता हा या क्षेत्रातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरला. यामुळे भारताच्या कापूस उत्पादनात मोठी क्रांती झाली. क्रिस्पर तंत्रज्ञानाचा वापर करून भारतीय शास्त्रज्ञांनी भात, गहू आणि मोहरीच्या जाती विकसित केल्या आहेत. मला वाटते इतक्यातच 'जीनोम इंडिया प्रोजेक्ट' यशस्वीरीत्या पूर्ण झाला आहे. या अंतर्गत १०,००० भारतीयांच्या जनुकीय नमुन्यांचे सखोल विश्लेषण करण्यात आले. भारतीयांची शरीररचना पाश्चिमात्य देशांपेक्षा वेगळी असल्याने, थॅलेसेमिया, सिकल सेल ॲनिमिया सारख्या विशिष्ट भारतीय आजारांवर उपचार शोधण्यासाठी हा डेटा अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे/असावा. कॅन्सरवरील स्वदेशी उपचार, CAR-T सेल थेरपी,हा पण एक मोठा टप्पा आहे. उपचार भारतात स्वदेशी तंत्रज्ञानामुळे अत्यल्प दरात उपलब्ध झाले आहेत. हे जागतिक आरोग्य क्षेत्रात भारताचे मोठे यश आहे असे वाटते. आपल्याकडे खूप बाय टेक पदवीधर आहेत पण जनुकीय अभियांत्रिकीचे संशोधन मात्र त्यामानाने अगदी किरकोळ आहे. कारणे सर्वांना माहीतच आहेत... त्यामुळे अजून फार मोठा टप्पा यात आपल्याला गाठायचा आहे हे नक्कीच!

हेमंतकुमार Tue, 01/13/2026 - 07:52
पूरक माहितीपूर्ण प्रतिसादांबद्दल सर्वांना धन्यवाद ! प्रतिसादांमधून आलेले वैज्ञानिकांसंबंधीचे आणि बीटी कापूस आणि आजारांवरील उपचारांचे अन्य मुद्दे महत्त्वाचे आहेत. . . . वादग्रस्त पितृत्वासंबंधीच्या अलीकडे घडलेल्या १-२ रोचक प्रकरणावर नंतर लिहितो.

हेमंतकुमार Tue, 01/13/2026 - 08:27
एका विवाहित स्त्रीने तिच्या डॉक्टरवर आरोप केला होता की तिचे मूल हे नवऱ्यापासून झालेले नसून त्या डॉक्टरपासून झालेले आहे. म्हणून ती स्वतः, तिचे मूल व डॉक्टरची डीएनए चाचणी करण्यात यावी अशी तिची मागणी होती. मात्र त्या चाचणीला संबंधित डॉक्टरने नकार दिला. त्यावर त्या स्त्रीने मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली आणि तिथे तिची विनंती मान्य करण्यात आली. डॉक्टरला हे मंजूर नसल्याने त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने संपूर्ण प्रकाराची शहानिशा करून या डॉक्टरच्या बाजूने निकाल देताना म्हटले आहे की, आपल्या नवऱ्याबरोबर राहात असलेल्या स्त्रीने अन्य कुठल्याही पुरुषावर निव्वळ आरोप केला म्हणून त्याची डीएनए चाचणी करता येणार नाही. असे केल्यास त्या डॉक्टरच्या आत्मसन्मानाला ठेच पोचते आणि व्यक्तिगत गोपनीयतेचाही भंग होतो. तसेच ते मूल आता सज्ञान असून त्याचा या प्रकरणात काही संबंध नसल्याचे (not a party to the proceedings) न्यायालयाने म्हटले आहे. एखाद्यावर कोणी निव्वळ आरोप केला म्हणून त्याची डीएनए चाचणी सक्तीने करता येणार नाही, हा या निर्णयाचा मथितार्थ आहे.

‘डीएनए’ हे आपल्या पेशीच्या केंद्रकातील एक ऍसिड. ते आपल्या आनुवंशिकतेचा मूलाधार असते. त्यादृष्टीने त्याचा सखोल अभ्यास अनेक वर्षांपासून होत होता. त्याच्या रचनेच्या संशोधनाबद्दलचा नोबेल पुरस्कार 1962मध्ये दिला गेला हे बहुतेकांना माहीत असते. परंतु या शोधाची पाळेमुळे पार इ. स.. 1869मध्ये जाऊन पोचतात. तेव्हा Friedrich Miescher या स्वीस जीवरसायनशास्त्रज्ञाने पहिल्यांदा अशा एका रेणूची संकल्पना मांडली आणि त्याला nuclein हे नाव दिले होते. पुढे 1953मध्ये जेम्स वॅटसन यांच्या चमूने त्याची दुहेरी दंडसर्पिलाकार (helical) रचना शोधून काढली.